मी क्षणांचा भागीदार, क्षणांचा साक्षीदार!
युगांच्या भाषा कुठुन करणार?
अशाच काही क्षणांच्या आठवणींनी हे वर्ष आता सरेल.
युगांच्या भाषा कुठुन करणार?
अशाच काही क्षणांच्या आठवणींनी हे वर्ष आता सरेल.
डिसेंबर महिन्याचे अखेरचे दिवस. या वर्षातली शेवटची पोस्ट लिहतोय. बाहेर मस्त थंडी पडलीय. खिडकीच्या शेजारी बसुन, गार वार्याच्या झुळूकीबरोबर मन आपोआप मागे मागे जातेय आणि शब्द होउन लॅपटॉपच्या स्क्रीनवर उमटतयं. बरंच काही दिलं या वर्षाने मला आणि तेवढचं हिरावून घेतलं. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल! गेल्या वर्षी डिसे. ०९ मध्ये ट्युलिप टेलिकॉम मध्ये जॉईन झालो. या डिसे. ला १ वर्ष पुर्ण झालं. बघु अजुन किती वर्ष काढतो ते इथे! :)
या वर्षी एप्रिलमध्ये बर्याच वर्षापासुन मनात असलेली गोवा ट्रीप आम्ही केली. वेल, माझ्या आयुष्यातली सगळ्यात खराब ट्रीप होती. माझे अगदी जीवाभावाचे मित्र मी या ट्रीपमुळे तोडले. ४ दिवसांची ट्रीप होती. पण मी ज्या दिवशी गेलो फक्त तो दिवस फिरुन, एक रात्र काढुन दुसर्या दिवशी मित्रांचा निरोप घेतला, तो कायमचा! होतात काही समज - गैरसमज मैत्रीत असे; पण प्रत्येकाला त्याची चुक समजायला हवी ना? मला समजली आणि मी बाजुला झालो. खूप गहन मैत्री होती आमची. आयुष्यातले बरेच, ऑलमोस्ट खूप काही क्षण आम्ही एंजॉय केले होते. दिवसभर ऑफीसमध्ये धुमाकूळ, संध्याकाळी मुव्हीज, नाहीतरी पार्कात टाईमपास! कधी हुक्की आली की स्टॉक घेउन पार्कातल्या पीचवर रंगलेल्या गप्पा! एकमेकांची खेचाखेची! पोरींच्या गजाली! आणि बरंच काही! खुप मिस्ड करतोय मी हे सगळं! अगदी कठोर होउन मी त्यांच्यापासुन दुर गेलो. आता परत जावेसेपण वाटत नाही! :(
यावर्षी ट्रेक छान झाले. रोहनने मराठी ब्लॉगर्सची ट्रेक अरेंज केली होती. १७ जुलै ला आम्ही ६ जण विसापुर ट्रेक करुन आलो. रोहनबरोबर ट्रेक करण्याची इच्छा होती. सही माणुस आहे! त्याच ट्रेकला काही नवीन ब्लॉगर्स मित्रांशी ओळख झाली. अनुजा, सागर नेरकर, सुहास झेले, भारत मुंबईकर! त्यानंतर नुसता बझबझाट! धमाल!
त्यानंतर सुधागड, तांदुळवाडी, रतनगड, रायगड असे ट्रेक्स केले. अनुजाच्या इथे एक खादाडी ट्रेक पण केला! ( स्वगत:- आयला त्या पिकनिक ची पोस्ट मला टाकाअय्ची आहे अजुन! ) एकदम मस्त आणि खतरनाक! धम्माल आली! आता सारे अगदी जीवाभावाचे मैतर झालेत!
बरचं काही झालं या वर्षात, वेल सगळं काही सांगण्यासारखं नाहिए!
तरीही, सगळी मज्जा मज्जा!
अशीच मज्जा मज्जा आपणा सर्वांच्या आयुष्यात येवो आणि हे वर्ष सर्वांना सुखाचे जावो!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.... :) :)
ReplyDeleteआभार योगेश, तुलाही नववर्षाच्या शुभेच्छा !
ReplyDeleteनव वर्षाच्या अनेक शुभेच्छा! :)
ReplyDeleteनववर्षाच्या शुभेच्छा ...
ReplyDeleteदादा,
ReplyDeleteनवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा रे....
धन्यवाद श्री ताई!
ReplyDeleteतुला आणि तुझ्या कुटुंबियाना माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा!
हे अॅप्स! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
ReplyDeleteपाटील साहेब धन्यवाद! आणि आपणासही हार्दिक शुभेच्छा !
ReplyDeleteमित्रा, नूतन वर्षाच्या तुला शुभेच्छा. :)
ReplyDeleteधन्स अनघा!
ReplyDeleteतुलाही माझ्याकडुन नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ! :)
नवीन वर्षाच्या शुभेच्छा :)
ReplyDeleteनववर्षाभिनंदन…
ReplyDeleteमित्र परिवार वाढत जाओ, किल्ले सर होत राहो, ब्लॉग पोस्ट येत राहो आणि खादडी बहरत जावो...
आणि हो २०११ मधली तुझी पहिली चहा/कॉफी सत्कारणी लागो आणि वर्ल्डकपपुर्वी तुझी विकेट पडो... ;-)
हे हे हे सिद्धु ! आवडल्या तुझ्या शुभेच्छा ! :)
ReplyDeleteतुलाही माझ्याकडुन नववर्षाभिनंदन !
दिपक... छान लिहिले आहेस.. आवर्जून उल्लेख केलास बरे वाटले.. :) पुढच्या वर्षी सुद्धा असेच काही ट्रेक करू मित्रा... मी नसीन तरी करत राहा.. :) शुभेच्छा...
ReplyDeleteपुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
ReplyDeleteनवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
रोहणा! आभार मित्रा! खरं सांगु तर हे ट्रेकचे वेड तुझा ब्लॉग वाचुनच लागले !
ReplyDeleteAnd I Realized that It's A Really nice to go crazy with treks rather than any other things !! :)
Wish You A Very Happy New YEar !
आभार दीपक भाउ! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
ReplyDeleteमस्त झालिये पोस्ट ....नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .......अशाच चांगल्या चांगल्या पोस्ट लिहित रहा वेळच्या वेळी.... आळशी ....
ReplyDeleteThnks Jyo !!
ReplyDeleteAalas ha mansaacha mitra aahe !
Be Lazy go crazy !!
दीपक मला एका गोष्टीचे फार वाईट वाटले .
ReplyDelete{सतत बोलत राहायला त्याला आवडते. दुसऱ्याला बोलायची संधी कमी मिळेल असा तो सतत बोलत राहातो.}अशी तुजी ओळख माझा मते
माजी आणि तूझी याच वर्षी भेट झाली आणि या मधे माझे कुठे ही नाव नाही आले .ज्यावेळी तू मला भेटलास त्यावेळी मला खरच खुप आनंद झाला होता आणि आजही तो आहे.
प्रिय मित्र महेश,
ReplyDeleteसर्वप्रथम माफी मागतो की मे तुझा उल्लेख नाही केला या पोस्ट मध्ये. खरं तर जाणिवपुर्वक मी असं नाही केलं.
जरी आपली भेट यावर्षीच झाली तरी आपण काही एकमेकांना नवखे नाहीत. ८वी ते १०वी आपण एकाच वर्गात शिकलो कि मित्रा!
शाळेपासुनचे मित्र आपण आणि तु असं वाईट वाटुन का घेतो?
आपण चांगले मित्र आहोत आणि राहु !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !