Wednesday, September 2, 2009

पैलतीर ....७

" अ‍ॅम... अं,,,म... सॉरी....पियु !" चिन्मय थोडासा बावरला....प्रियाने त्याच्याकडे पहिले ती ही सावरली... आता झाले ते काय होते???? आपण काय केलं??? प्रियाला एकदम आपण अपराधी असल्यासारखे वाटु लागले. ती पटकन वळली आणि तिने आपला चेहरा हातांच्या ओंजळीत लपवून घेतला. चिन्मयला तिच्याकडे जायचा पण धीर होत नव्हता. त्याच्याही मनात तिच भावन निर्माण झाली होती. तो फारच अवघडला होता. " पियु, ... " त्याने तिचे हात बाजुला केले. तिचे डोळे काठोकाठ भरले होते. तो पुढे काहि बोलणार इतक्यात तिने त्याच्या छातीवर डोके टेकले.
" चिनु.... अ‍ॅम सॉरी ... मला माहित नाही हे कसं झालं? मी मुद्दाम नाही केलं हे सारं .......! मला खरचं नाही कळलं रे ! म...मी.....मी " ती फार घाबरली होती....
" पियु, पियु.....रिलॅक्स... ! "
पण ती वेड्यासारखी बड्बडत होती. चिन्मय तिला समजावत होता पण आपण काहि तरी घोर पाप केलंय असं तिला वाटत होतं ती थरथरत होती. ती ऐकत नाहिए असं पाहुन चिन्मयने तिला मिठित कवटाळले.
" पियु... शांत हो ! काहि नाहि झालयं आणि हे तु नाहि मी ही केलयं... आय हॅव टु बी सॉरी... तु थोडी शांत हो ! " त्याने तिला बेडवर बसवले आणि तिला थोडे पाणी पाजले. ती त्याचाशी नजरपण भिडवत नव्हती.
" पियु ? अगं, इकडे बघ ना माझ्याकडे.... "
" चिन्मय तु जा रे इथुन.. तु असलास कि मला काय होतं कळत नाही."
" हे बघ तुझे आई वडील आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीए.....तु शांत झोप.. आणि उगाच कसलाही विचार करु नकोस...."
प्रिया कुशीवर वळली आणि तिने चिन्मयकडे पाठ केली. चिन्मयने तिच्या केसांवरुन हात फिरवला आणि तो हॉलमध्ये जावून सोफ्यावर आडवा झाला.... आपण एका मोठ्या धर्मसंकटात पडलोय याची त्याला जाणिव झाली होती. हे प्रेम असं का असतं ? का ज्याला जे हवं ते मिळत नाही ? या भावना, फिलिंग्ज इतक्या डेलि़केट का असतात ? नेहाचं प्रेम आपल्याला ६-७ महिन्यात कळावं आणि जी अगदी लहान असल्यापासुन प्रेम काय असतं हे कळतसुद्धा नसताना आपल्यावर प्रेम करतेय तिचं प्रेम आपल्याला का कळू नये? नाही! मी दोघांना कम्पेअर नाही करत. पण ..... ! शीट ! डोकचं चालत नाहीए....चिन्मय सोफ्यावरुन उठला आणि व्यथित होउन इकडे तिकडे फिरु लागला. पण त्यचं लक्ष लागत नव्हतं. अचानक त्याचं लक्ष भिंतीवरच्या कपाटाकडे गेलं. कसलीशी बाटली होती. चिन्मयने कपाट उघडलं. " वॉव! जॉनी ब्लॅक ! काकांचा विजय असो! " बाटली संपायला आली होती. काका घेतात हे त्याला माहित होतं. त्याने मस्त पैकी एक ग्लासात ऑन द रॉक्स पेग भरला आणि तो खिडकी कडे जावून उभा राहिला. पाउस आता थांबला होता पण रिमझिम सुरुच होती. पोटात दोन घोट गेल्याने त्याला जरा बरं वाटु लागलं होतं... अंगाला झोंबणार्‍या गार वार्‍याबरोबर जॉनी ब्लॅक ! त्याच्या मनातुन हळूहळू ते सारे विचार गायब होउ लागले. तशातच त्याचे दोन पेग झाले. तो सोफ्यावर येवून आडवा झाला......
**************************************************************************
गाडी बराच वेळ थांबली होती. पुढे गाड्यांची रांग लागली होती. चिन्मयने सीट थोडीशी मागे घेतली आणि शांतपणे रेलुन बसला. राहुल डाराडुर होउन झोपी गेला होता. बराच वेळ चिन्मय खिडकितुन बाहेर बघत होता अणि नेहा त्याला. राहुन रहुन नेहाला त्याच्याशी बोलावसं वाटत होतं. पण तिच्या मनाचा धीर होत नव्हता.
"कसा आहेस चिन्मय ? " नेहाने न राहवून विचारले. चिन्मयने काहीच उत्तर दिले नाही.
" चिन्मय !" नेहाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चिन्मयने सिगरेट्चं पाकिट उचललं आणि तो बाहेर गेला. रस्त्याच्या कडेला जावून त्याने सिगरेट लाईट केली. नेहा गाडीतुन बाहेर पडली आणि चिन्मयपाशी गेली.
" चिन्मय! "
" बोल !"
तु मला माफ नाही करणार ?"
" तु माफी मागायला फार उशीर केलास. "
" अ‍ॅम सॉरी. जे काही झालं.... "
"तुझ्यासाठी ते 'जे काही' असेल नेहा पण ..... "
"चिन्मय प्लिझ मला माफ कर. "
"हे बघ, तु प्लिझ गाडित जाउन बस. तुझा नवरा आहे तुझ्यासोबत. हे सगळं ठिक नाही वाटत. आपण आज अनासये भेटलो तेव्हा तुला माफी मागायची आठवण झाली. इतकी वर्षे कुठे होतीस तु ? मी आणि प्रियाने तुझ्यामु़ळे जे काही भोगलंय त्याची मला आठवणही काढायची नाहीए. तु सुखी राहा आणि मलाही तसं राहायचा प्रयत्न करु दे... "
" प्रिया कशी आहे? मी..म्..मी फार त्रास दिला तिला. फार वाईट वागले तिच्याशी... "
" हे बघ नेहा. जे काही झालं ते आम्ही विसरायचा प्रयत्न करतोय, किंबहुना आम्ही विसरलोयसुद्धा ! तु प्लिझ पुन्हा त्या जखमांना कुरतडु नकोस. आय रि॑क्वेस्ट यु! आम्ही दोघेही एका मोठ्या वादळातुन सावरुन आत्ताच कुठे बाहेर पडलोय.आणि आता तु माफी माग किंवा नको त्याने काही फरक पडत नाही. तु माझ्या माफीच्या लायकीची नाहीस... एक वेळ मी माझं समझू शकतो पण तु प्रियाशी जसं वागलीस........ तुला तसं करता कामा नये होतं. तिचा बिचारिचा काय दोष होता ? फक्त एवढाच की ती माझ्यावर प्रेम करत होती.... नेहा! कधी या गोष्टींचा विचार केलायस कि तुझ्या एकटीमुळे मला, प्रियाला, आमच्या घरातल्यांना किती त्रास सहन करावा लागला ? प्रिया !!!.... तिला सावरेपर्यंत.... जावू दे ! मी का सांगतोय तुला हे सगळं? तुला त्याने काय फरक पडणार आहे ? तु प्लिझ गाडित जावून बसं. " चिन्मय बांध फुटल्याप्रमाणे बोलत होता आणि नेहा निच्छल होउन ते ऐकत होती.
" चिन्मय! मला एक चान्स दे रे ! फक्त एक ! मला प्रियाला भेटायच आहे. तिची माफी मागायची आहे. तिच्या गळ्यात पडुन मला रडायचयं! प्लिझ चिन्मय ! प्लिझ !"
नेहाचे डोळे भरुन आले होते.
" नाही नेहा ते शक्य नाही! मी तुझी सावलीही तिच्यावर पडु देणार नाही ! "
" चिन्मय! असं बोलु नकोस रे ! महित आहे, माझा गुन्हा अक्षम्य आहे. कदाचित त्याचीच शिक्षा मला देवाने दिली असावी. आज आमच्या लग्नाला ३ वर्षे होत आली तरीही माझी कुस रिकामीच आहे.. ठिक आहे मी नाही भेटणार प्रियाला. नाही भेटणार... ! " नेहा अश्रु आवरत बोलली.... चिन्मय काही बोलला नाही. तो वळला आणि गाडीमध्ये जावून बसला..
.गाड्यांच्या कर्णकर्कश गोंगाटाने राहुलला जाग आली. गाडी एक जागी थांबली होती. राहुलने डोळे चोळत पाहिले पूढे - मागे गाड्यांची रांग लागली होती. " काय झालं मि. जाधव ?"
" काही नाही ट्रॅफिक, अ‍ॅज युजवल."
" बापरे, मी तर झोपुनच गेलो होतो. किती वेळ झाला?"
" ५ - १० मि. झाली असतिल.काही तरी मेजर असणार....." असं बोलुन चिन्मय गाडिच्या बाहेर आला आणि त्याने सिगरेट पेटवली. राहुलही बाहेर पडला.
" अरे, आमच्या मॅडम कुठे गेल्या ? देअर शी इज !... नेहा ! " राहुलने तिला हाक मारली. तशी नेहा गडिचा दिशेने चालु लागली.
" अरे भाई सुनो, क्या हुआ आगे ? " राहुलने तिकडे उभे असलेल्या एका व्यक्तिला विचारले.
" पता नही साहब. शायद अ‍ॅक्सिडेंट हुआ है. कोई अभी बता रहा था कि एक कपल था गाडी में. सामनेसे आते हुए एक ट्रकने उडाया."
" ओह माय गॉड! " राहुलने एक सुस्कारा सोडला. चिन्मय दुर कूठे तरी आकाशात एकटक बघत होता. इतक्यात त्याचा फोन रिंग झाला.
" हाय जान ! " नेहा परत चाचपडली पण परत सावरली. हा मुद्दाम तर बोलत नसेल ना ? तिच्या मनात एक शंका चाटुन गेली.
" काहि नाही ट्रॅफिकमध्ये अडकलोय. तु काय करतेस ? " .....
" या, अ‍ॅम मिसिंग यु टु ! मी पोहचेन लवकर. तु काही काळजी करु नकोस आणि शांत झोपी जा. इन फॅक्ट आय हॅव अ कंपनी विथ मी ! "..........
"या, त्यांची गाडी खराब झाली होती. सो आय ऑफर्ड अ लिफ्ट टु देम." ....
" हे बघ. तु माझी काळजी करु नकोस. मे येतोय लवकरच. अ‍ॅम डाईंग टु सी यु. " ...
" चल तु झोपी जा. अँड डोन्ट मिस्ड मी मच. " " लव्ह यु टु जान ! " .......
त्याने फोन ठेवला. राहुल बाजुलाच उभा होता. " लव्ह मॅरेज ? "
" नाहि. अरेन्ज्ड ! "
" किति वर्षे झाली तुमच्या लग्नाला? "
" आय थिन्क दिड! "
" ओह! दॅट्स ग्रेट.!" " पण वाटत नाही हं की तुमचं अरेन्ज मॅरेज असेल असं."
"असं का?"
" नाही, सॉरी, म्हणजे जितक्या प्रेमाने तुम्ही तुमच्या वाईफशी बोलताय असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज...." चिन्मय फक्त हसला...
" आय लव्ह माय वाईफ बियॉन्ड एनिथिंग!..."
ट्रॅफिक आता हळूहळू सरकत होतं॥ चिन्मयने गाडी सुरु केली..किमान १ किलोमीटर अंतरावर ते अ‍ॅक्सीडेंट झाले होते। ट्रकने अतिशय क्रुरपणे गाडीच्या चिन्धड्या उडवल्या होत्या आणि त्या गाडीत असलेल्यांच्याही... नेहाच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. चिन्मयने हळूह्ळू गाडी तिथुन काढली आणि हळूहळू ते मुंबईच्या दिशेने निघाले.....
***********************************************************************************
.त्या शुक्रवारी चिन्मय हाफ डे घेउन घरी गेला. प्रियाच्या पायाचे प्लॅस्टर काढायचे होते. त्या ३ -४ दिवसांत त्याने नोट केले की, नेहा त्याच्याशी नीट बोलत नव्हती. बहुतेक वेळा फोन उचलत नव्हती. कधी कधी तीची आई फोन उचलायची.. चिन्मय रविवारच्या भेटीबद्दल थोडासा टेन्स्ड होता. पण नेहाच्या अशा वागण्यामुळे तो अजुनच व्यथित झाला होता. प्रियाला घेउन तो हॉस्पिटलमध्ये गेला. प्रियाच्या पायाचे प्लॅस्टर काढण्यात आले. आता तिचा पाय पुर्णपणे बरा झाला होता पण डॉक्टरानी तिला ३-४ दिवस विश्रांती घ्यायला सांगितले. जाताना चिन्मयने तिला टॅक्सीमध्ये बसवले पण दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. टॅक्सी सिग्नलला उभी होती. चिन्मयचं लक्ष सहज बाहेर गेलं. समोर सीसीडी मध्ये त्याला नेहा दिसली. कुणाबरोबर तरी बसली होती. मुलगा ओळखीचा वाटत नव्ह्ता. चिन्मयने तिला फोन केला. फोन वाजताच नेहा चाचपडली, इकडे तिकडे बघु लागली. नंतर तिथुन उठुन ती थोडी बाजुला गेली आणि तीने फोन अ‍ॅन्सर केला.
" हाय जान ! "
" हाय चिन्मय, !"
" काय करतेस ? "
" काही नाही रे, घरी आहे. थोडं बरं वाटत नाहीए. सकाळपासुन डोकं जाम झालयं. आपण नंतर बोलुया? मी थोडा आराम करते."
" ओके. टेक केअर, बाय." नेहाने बायसुद्धा न म्हणता फोन कट केला. नेहा परत त्या मुलापाशी आली आणि तिथे बसली. क्षणार्धात चिन्मयला आपल्या डोक्यावर आभाळ कोसळतयं असं वाटु लागलं. तो अतिशय चिडला होता. रागाने त्याचा चेहरा लालबुन्द झाला होता. प्रिया हे सगळं बघत होती. सिग्नल ग्रीन होताच टॅक्सी पळू लागली.. चिन्मय खिडकीला डोकं टेकुन बसल होता आणि त्याच्या डोळ्यातुन पाणी वाह्त होतं. प्रियाला ते पाहवलं नाही. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचे अश्रु पुसले. टॅक्सी बिल्डिंगमध्ये शिरली. चिन्मयने प्रियाला तिच्या बेडरुममध्ये सोडले आणि तो जायला निघाला. तो फार अपसेट झाला होता. प्रियाने त्याला थांबवलं,
" चिनु ! "
" काय ?"
" अ‍ॅम सॉरी ! हे सगळं माझ्यामुळे झालं. "
" इट्स ऑलराइट पियु ! " त्याने तिच्या गालाला हात लावला. " चल मी निघतो, तु आराम कर. बाय." चिन्मय घरी आला पण त्याचं कशातही लक्ष लगत नव्हतं सारखी नेहा डोळ्यासमोर नाचत होती. आयुष्यातलं कोणतंही सत्य मग ते कितीही कटु असुदे त्याची स्विकारायची तयारी होती पण चिमुट्भर असत्य त्याच्या पचनी कधीही पडत नसे आणि ते ही नेहाकडुन तो स्विकारायला कधीही तयार नव्हता. ती कुणादुसर्‍याबरोबर होती याचं त्याला दु:ख नव्ह्तं, त्याला तीने आपल्यशी खोटं बोलल्याचं वाईट वाटत होतं... कसे तरी ते दोन दिवस ढकलले. रवीवारी सकाळी त्याला नेहाच्या आईचा फोन आला. आपण येत असल्याचे त्याने तिला कळविले. सकाळी ११.००च्या दरम्यान तो नेहाच्या घरी पोहचला. नेहाची आई आणि वडील सोफ्यावर बसले होते. चिन्मयने त्यांना नमस्कार केला. नेहा दिसत नव्हती. नेहाच्या आईने चिन्मयला समोरच्या प्लॅस्टीक्च्या खुर्चीकडे बोड दाखवून बसायला सांगितले. चिन्मय बसला. घरातल्या मोलकरणीने एका प्लॅस्टीकचा ग्लासमधून पाणी आणुन दिले. चिन्मयने थँक्स म्हणुन ते नाकारले.
" तर मि. चिन्मय जाधव, तुम्हाला काही कल्पना आहे की आम्ही तुम्हाला इथे का बोलावलयं ते ?" नेहाच्या आईने तोर्‍यात विचारले.
" कदाचित माझा अपमान करण्यासाठी ! " चिन्मय उत्तरला. दोघेही चापापले.
" नाही, आम्ही असं ऐकुन आहोत की तुम्ही नेहावर प्रेम करता आणि तिच्याशी लग्न करायची तुमची इच्छा आहे ? "
" नाही ! तुम्ही चुकीच ऐकलयं. नेहा आणि मी एकमेकांवर प्रेम करतो आणि आमची दोघांचीही एकमेकांशी लग्न करायची इच्छा आहे. "
" ओके. मग तुम्ही काय ठरवलयं ?" "काही नाही. तुम्ही आशीर्वाद द्या. ताबडतोब लग्नाचा मुहुर्त कादुया. "
" मि. चिन्मय जरा सांभाळून बोला. आम्ही दोघेही या लग्नाला तयार नाही आहोत. "
" डजन्ट मेक एनी डिफरंस, मला तुमच्याशी कुठे लग्न करायचयं ?"
" शट अप ! तुम्हाला लग्न म्हणजे काय खेळ वाटला ? झालं तेवढं पुरे झालं. आता पाणी डोक्याच्या बाहेर चाललयं. मला हे मान्य नाहीय. मी नेहाचं लग्न तुमच्याशी कदापी होउ देणार नाही. ! "
" मला कारण कळेल ? म्हणजे माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का? मी वेल सेटल्ड आहे. दादरसारख्या भागात माझं स्वत:चं घर आहे. चांगली नोकरी आहे. एकुलता एक आहे. घरात आई वडीलांशिवाय दुसरं कुणीही नाही. कसलंही व्यसन नाही. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? "
" प्रॉब्लेम ? मि. जाधव तुम्हाला ठावूक आहेच. ! हे बघा मि. चिन्मय आम्ही ब्राम्हण आहोत. आमच्या उभ्या पिढ्यांमध्ये असलं कुणी केलं नाही. आमच्या कूटुंबात आमचा मान आहे. माझ्या मुलीने एका खालच्या जातीतल्या माणसाशी लग्न करावं हे मी कधीही सहन करु श़कणार नाही. तेव्हा तुम्ही हे सगळं विसरुन जा. आणि तिच्या आयुष्यातुन दुर व्हा. ! "
" ओके म्हणजे माझी जात प्रॉब्लेम आहे तर? पण नेहाने मला जेव्हा सांगितलं की ती माझ्यावर प्रेम करते तेव्हा मला याची काहीच कल्पना दिली नव्हती. नाही म्हण्जे तुम्ही लहानपणापासुन तिच्या मनावर हे बिंबवायला हवं होतं ना ? की बाई गं, कुणा खालच्या जातीतल्या माणसाशी प्रेम करु नकोस त्याने आपल्या सत्तर पिढ्या नरकात जातील. यु नो मिसेस कुलकर्णी जेव्हा मी तिल किस केलं तेव्हाही ती मला असं काही बोलली नाही. स्ट्रेन्ज ना ? "
" मि. जाधव !!! "
" ओरडु नका मिसेस कुलकर्णी ! इट्स नॉट गुड फॉर यु ! मी आणि नेहाने ऑलरेडी ठरवलयं की काही झालं तरी लग्न करायचं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मला अडवा. "
" मि. जाधव ! आपण हे प्रकरण पुढे न वाढवणं तुम्हाला हितकारक ठरेल !"
" धमकी देताय ?"
" चेतावनी !"
" ओह ! आय सी! नो प्रॉब्लेम ! मला या बाबतीत नेहाशी एकांतात बोलायच आहे. "
" सॉरी ! या पुढे नेहाला तुम्ही भेटु शकत नाही. " पुढचं काही न ऐकता चिन्मय सरळ नेहाच्या रुममध्ये गेला, नेहाची आई त्याला अडवायला आली पण चिन्मयची नजर बघुन तीने पाय मागे घेतले. चिन्मय आत गेला आणि त्याने दार लावून घेतले. त्याला बघताच नेहा ओरडली " चिन्मय ! काय करतोस तु हे ? "
" घाबरु नकोस. फक्त तुझ्याशी बोलायचयं. "
" काय बोलायचयं ? "
" मला माहित नाही नेहा की तुझ्या मनात काय चाललयं ते ? गेला आठवडाभर मी तुला नोट करतोय. तु माझ्याशी नीट बोलत नाहीस, मल अव्हॉइड करतेस, त्या दिवशी तर चक्क माझ्याशी खोटं बोललीस, सीसीडीमध्ये होतीस आणि घरी असल्याचं सांगितलंस ! तुझ्या घरातले आपल्या लग्नाचा विरोधात आहेत हे आपल्याला पहिल्यापासुनच ठावूक आहे. त्यात नवीन काही नाही. मला माहीत आहे कदाचित तुझी आई तुला प्रेशराईज्ड करत असेल पण मला तुझ्याकडुन जाणुन घ्यायचं आहे कि तुझा निर्णय काय आहे ते ? मग तो काहीही असो ! जर तु हो म्हणालीस तर कुणाच्या बापालाही घाबरणार नाही. जर तु नाही म्हणालिस तर काहीही न बोलता निघुन जाईन आणि परत तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाही. ट्राय मी! " नेहा गप्प उभी होती.
" नेहा बोल काही तरी यार! युवर सायलेंस इज किलिंग मी डॅम! ! "
" चिन्मय, अ‍ॅम सॉरी ! आय कान्ट मॅरी यु ! "
" थँक्स नेहा ! " असं बोलुन तो तिच्या रुमच्या बाहेर पडला आणि जायला निघाला...पण तो हे सगळ इतक्या सहजतेने घेईल असं त्यांना वाटलं नव्हतं. त्याला चिडवायच्या उद्देशाने नेहाची आई बोलली
" सो मि. चिन्मय आय होप तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल! "
" मिळालं ! मिसेस कुलकर्णी ! आभारी आहे ! "
" मग आता तुमचा आणि तुमची मैत्रीण प्रियाचा रस्ता मोकळा ना ?"
" माईंड यु मिसेस कुलकर्णी ! दॅट्स नन ऑफ युवर बिझनेस ! मी तुमच्या मुलीच्या आयुष्यातुन चाललोय! तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आता ! त्यामुळे माझ्याशी बोलताना जरा सांभाळून बोला ऑर एल्स प्रत्येक शब्दाची तुम्हाला भारी किंमत मोजावी लागेल! माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल बोलायची न तुमची ना तुमच्या मुलीची लायकी आहे. तेव्हा जरा जपून ! "
चिन्मयचा तो अवतार पाहुन नेहाची आई घाबरली. ती गपकन खाली बसली
" आणि नेहा, एक लक्षात ठेव ! या निर्णयाचा तुला पश्चाताप होईल पण तेव्हा मी तुला कधीही माफ करणार नाही !!!! "
" दरवाजा समोर आहे ! " नेहा बोलली.
" हो. मला दिसतोय! पण तुला तो यापुढे कधीही दिसणार नाही! !! " चिन्मय तडकपणे बाहेर पडला आणि घरी गेला.झाला प्रकार त्याला अपेक्षित होता त्यामुळे त्याला त्याचा फारसा त्रास झाला नाही... तो भरपेट जेवला आणि शांतपणे झोपुन गेला. पूढचे काही दिवस त्याने असेच घालवले पण नेहाची आठवण त्याला सारखी सतावत होती..तो जिथे जाई ती ती जागा त्याला नेहाची आठवण करुन देत असे. त्यात नेहा मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी नेहमी त्याच्याघरासमोरुन किंवा पार्कातुन त्या मुलाबरोबर फिरताना दिसत असे. तिच्या अशा वागण्याने चिन्मय फारच अस्वस्थ झाला होता.... बरेच दिवस तो प्रियालाही भेटला नव्हता..एके दिवशी संध्याकाळी तो प्रियाच्या घरी गेला.. प्रिया तिच्य रुममध्ये काही तरी वाचत बसली होती. त्याला बघताच ती हसली.
" या साहेब, वेळ मिळला तर! " " कशी आहेस तु? पाय कसा अहे तुझा ? " तिच्या बाजुला बसत चिन्मय बोलला.
" चिनु काय झालं रे ? आज १० दिवसानी तु मला भेटतोयस... आणि हा अवतार काय करुन घेतलास ? त्या दिवशी तु नेहाच्या घरी जाणार होतास ! काय झालं तिथे ? "
" काही नाही यार ! चल मी येतो ! मला थोडं काम करायचयं! तो जायला उठला इतक्यात प्रियाने त्याला अडवलं, " चिनु, थांब ! बस इथे ! " प्रियाने त्याला खाली बसवलं.
" काय झालं ? सांगशील काही ?"
" चिन्मयने तिला झालेला सारा प्रकार सांगितला..सांगता सांगता तो रडायला लागला.
" तिच्या नकाराने मला बिल्कुल वाईट वाटलं नाही, फक्त तिच्या वागण्याने मी हर्ट झालोय. ती मला चिडवण्यासाठी त्या कोणत्या तरी नव्या मुलाबरोबर फिरत असते. सारखी माझ्या घराच्या बाजुने राउंड मारत असते... अ‍ॅम जस्ट फेड अप यार ! ठिक आहे संपलं ना? मग एकमेकांना त्रास का द्यायचा? मला काही कळत नाहीए! काय करु हिचं ? "
"चिनु तुला एक सांगायचं होतं ! आय होप तु रागावणार नाहीस.."
" काय ? बोल ना ! " ....

क्रमशः