Thursday, August 20, 2009

पैलतीर .... ६


तशाच मनस्थितीत तो ऑफीसला गेला पण कामात त्याचे बिल्कुल लक्ष लागत नव्हते. त्याने नेहाला फोन केला.

"
नेहा ! "

"
ह्म्म, वेळ मिळाला तर फोन करायला साहेबांना. "

"
या, काहि नाही , जस्ट मिसिंग यु.कशी आहेस तु?"

"
मला काय धाड भरलिय? मी ठिक आहे. तु बोल. चिन्मय, काही प्रॉब्लेम आहे का?"

"
अं, हं, हम्म ! काहि नाहि डोकं जड झालयं, तु आज हाफ डे घेशील? तुला खूप मिस्ड करतोय.तुला डोळे भरुन बघावसं वाटतयं! "

"
ओह, माय माय! आज काय एकदम प्रेम भरभरुन आलयं? एनिथिंग स्पेशल? "

"
नाही गं ! बस तुला भेटावसं वाटतय. मी ऑफिसमधुन वाजता निघेन. आय्' पिक यु अप आणि सोबतच लंच करुया. इज दॅट ओ़के ?"

"
यस बॉस, तुम्ही म्हणाल तसं !"

"
चल देन, विल सी यु !"

"
ओके"
", हॅलो, !!!"

"
हम्म बोल ना"

"
नथिंग, जस्ट वाना से, आय लव्ह यु"

"
आय लव्ह यु टु सोना"

"
बाय लव्ह."

"
बाय."

काही करुन नेहाला सांगितलं पाहिजे. पण कसं सांगु? काय करावे तेच त्याला कळत नव्हते.

"
सर, आपको किर्ती म्यॅडम्ने बुलाया है." ऑफीसबॉयने वर्दी दिली.

"
ओके. आता हुं ."
आता हिला काय झालं? सकाळ्पासुन तर ठिक होती. मनात बडबडत तो किर्तीच्या केबिनमध्ये शिरला.
"यस किर्ती ?"
" ओह, चिन्मय ! देअर वॉझ कॉल फ्रॉम मि.फ्रॅन्क. ही वॉझ ॅस्किन अबाउट ऑर्डर डिटेल्स व्हिच यु गॉना रजिस्टर.यु प्लिझ मेल हिम ऑल डिटेल्स किपिंग सीसी टु मी. आय होप धिस टाईम यु विल ...... हॅलो, मि.चिन्मय, आर यु ऑलराईट? " चिन्मय भानावर आला.
" अं, या किर्ती, ॅम ऑलराईट. आय्' मेल ऑल डिटेल्स टु यु "
"चिन्मय व्हॉट्स राँग विथ यु ? यु हॅव टु सेन्ड डिटेल्स टु मि.फ्रॅन्क "
" ओह! या, सॉरी आय्' डु इट." असं म्हणुन चिन्मय तिच्या केबिन मधुन सटकला. पटापट सर्व डिटेल्स मेल करुन तो ऑफीसमधुन निघाला. नेहाचं ऑफिस नरिमन पॉईंटला होतं. पोहचेपर्यंत त्याच्या डोक्यात बरिच वादळं उठत होती. तो वाजताच नेहाच्या ऑफिसच्या खाली पोहोचला. बाईक बाजुला उभी करुन त्याने नेहाला फोन केला.
" हे जान! "
" आलास का तु?"

"
हो खालिच आहे.लवकर ये."

"
येते रे, दोन मिनिटात पोहचते."

"
ओके."

काहि वेळ गेला. चिन्मय तिच्या वाटेवर डोळे लावून होता. नेहा समोरुन येत होती. त्याला बघताच तिने हात वर करुन तिला हाय केलं. एका हातात बॅग आणि दुसर्या हाताने वार्याने उडणारे केस सावरत ती चालत होती. रस्त्यावरच्या अनेक नजरा तिला न्याहळत होत्या पण तिची नजर फक्त चिन्मयकडे होती. ती चिन्मयपर्यंत पोहचेपर्यंत त्या सार्या नजरा तिच्याबरोबर पुढे सरकत होत्या. ती धावतच जवळ आली आणि चिन्मयने तिला आपल्या मिठित बंद केली त्याबरोबर त्या सार्या नजराही नाक मुरडत दुसरीकडे वळल्या.

"
यु लुक्स ब्युटिफूल"

"
थँक यु" एक लार्ज स्माईल देत नेहा उत्तरली.

"
सो, कुठे जाउया?"

"
तु म्हणशील तेथे !"

"
तुझ्या आवडत्या ठिकाणी?"
"दिल्ली दरबार ?ओह हो! आज काय झालयं काय तुला ? प्रमोशन वैगरे झालं कि काय ? "

"
नाही गं ! बस असचं. बोल तुला काय खायचा मुड आहे आज ?"

"
मला ना..... तुला खायचयं" दोघेही हसु लागले. '

"
चल मग ! "

"
ओके लेट्स गो!" नेहा चिन्मयच्या मागे बसली. दोघेही रेस्टॉरंट्मध्ये पोहोचले. जेवण झाल्यावर नेहाने विचारले,
" आता कय करायचं?"

"
करायला खूप काहि करु शकतो पण जागा नाहीए ना! " चिन्मय तिला चिडवत बोलला.

"
अच्छा? असं काय करणार तु?"

"
बघायचयं तुला?"

"
हो! "चल मग जाउया, माझ्या घरी कुणी नसणार !"

"
आला मोठा शहाणा, म्हणे घरी कुणी नसणार. तुझ्या आईला जर कळलं ना तर ती मला कधी घरातच नाही घेणार."

"
नेहा, ॅक्चुअली, मला तुझ्याशी काही बोलायचयं,"

"
काय ? बोल ना !"

"
इथे नको, कुठेतरी शांत ठिकाणी जाउया."

"
म्हणजे तुझ्या घरी?" नेहाने चिडवत विचारले.

"
नको घरी नको. चल निघुया."

"
चिन्मय, काय झालं? सांग ना." आल्यापासुन बघतेय तुझं चित्त थार्यावर नाहिए. बोल काय झाल?"

"
काही नाही गं राणी !मी ठिक आहे.चल निघुया." असं म्हणुन ते बाहेर पडले
" चिन्मय, बाहेर उन बघ किती आहे ते, मी काळी होईन ना रे !"

"
माझी बायको काळी असलेली मला चालेल गं!"
नेहाने तोंड वाकडं केलं " तुला ना माझी मुळी काळजीच नाहीए."

चिन्मयचा हाथ धरुन ती चालु लागली.

"
बोल ना काय सांगणार होतास?"

"
सांगतो ना चल कुठे तरी बसुयात, तुला एवढी घाई का लागलिय?"

"
घाई म्हणजे? काय माहित काय सांगणार आहेस? मला भीती वाटतेय।"
" कसली भीती? वेडीच आहे." चिन्मयने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते बाईकपाशी आले.

"
एक काम करुया. सी फेसला जाउया. तिथे गार्डनमध्ये शांत बसता येईल."

"
ओके. "

बाईकवरुन ते सी फेसच्या दिशेने निघाले. वातावरण थोडेसे ढगाळ होते त्यामुळे गार वारा सुटला होता. नेहा चिन्मयला घट्ट मिठी मारुन बसली होती. सी फेसवर पोहोचल्यावर दोघेही बाजुच्या गार्डनमध्ये गेले आणि एक बेंच्वर बसले. नेहा त्याच्या खांद्यावर विसवली. चिन्मय एकटक उसळलेल्या समुद्राकडे बघत होता. नेहाला कसं सांगावं याचाच विचार करत होता.

"
आपण सी फेसच्या गार्डनमध्ये एका शांत जागी बसलोय. हो ना?" नेहाने विचारले.

"
हो. का? "

"
नाहि म्हणजे तु काही तरी मला सांगणार होतास म्हणुन विचारलं."

"
हो. बट आय होप तुला वाईट नाही वाटणार कि,न्वा राग नाही येणार."

"
का? कुणी दुसरी आवडलिय का?'

"
तसं नाही गं. पण तसच कहि तरी आहे."

"
, कोड्यात बोलु नकोस सांग ना काय झालं ते, किती सतावशील?"

"
ओके. सांगतो." असं म्हणुन चिन्मयने रात्रीचा तो सगळा प्रकार तिला सांगितला. हळुह्ळु नेहा चिन्मयपासुन बाजुला झाली. तिचा चेहरा रागाने लालबुन्द झाला होता. चिन्मयने तिला जवळ घेतले.

"
हाव डेअर शी ? बिच!" नेहा दात ओठ खात ओरडली.

"
नेहा, रिलॅक्स. जे तिला वाटतं होतं तेच तिने कन्फेस केलं अँड नथिंग इस राँग इन दॅट।"
" तु तिचीच बाजु घेणार रे, तुझी लाडाची ना ती."

"
हे बघ नेहा, शी लव्ह्ज मी. आय डोन्ट. ओके.?"

"
आय्' किल हर !"

"
नेहा वेडी झालीस का? ॅक्चुअली चुक माझीच आहे मी तिच्या इतक्या जवळ जायला नको हवं होतं. लहानपणापासुन ती माझ्याबरोबर आहे गं, माझ्या कधी लक्षात ही गोष्ट आलीच नाही.पण हे ही खर आहे की माझ्या मनात तिच्याबद्दल असं काही कधीच आलं नाही. आम्ही दोघं एकत्र शाळेत गेलो. कॉलेजमध्ये एकत्र गेलो. आता जॉबही एकत्रच करतो. मी खरं सांगतो नेहा, मला खरच तिच्याशिवाय करमत नाही. ती जे जे काही काल बोलली ते सगळं मलाही लागु होतं पण ह्या सगळ्याला मी प्रेम हे नाव नाही देउ शकत. कारण ती जागा तुझी आहे. काय करु तेच कळत नाहीए.नेहा यु गॉट टु हेल्प मी. "

"
मी कय हेल्प करु तुला? त्यादिवशी मी तुला बोलले तर तु मला तुझ्या मैत्रीबद्द्ल लेक्चर दिलास. माझं ऐकतोस कुठे तु ? तुम्ही दोघं एकत्र शाळेत गेलात, कॉलेजला एकत्र गेलात, जॉबही एकत्र करता मग आता काय लग्न करा आणि आयुष्यभर एकत्रच राहा. जस्ट लाईक एक दुजे के लिये ॅन्ड ऑल." नेहा चरफडत होती.

"
नेहा प्लिझ, जान....तु तरी असं नको बोलुस.हे बघ तिने स्पष्ट सांगितलयं की ती आपल्य दोघांमध्ये कधीही येणार नाही. तिने फक्त तिच्या मनात जे काही होतं ते मला सांगितलं."

"
मला माहित आहे ती आपल्या दोघांमध्ये नाही येणार पण जेव्हा जेव्हा ती समोर येईल तेव्हा तेव्हा ते तुला जड जाईल आणि पर्यायी मलाही. मग तु काय ठरवलयंस?"

"
कशाबद्दल? "

"
म्हण्जे तुमच्या दोघांबद्दल ?"

"
नेहा प्लिझ."

"
ओके ओके. ते जाउ दे तु जास्त विचार करु नकोस तिच्याबद्दल आणि तिच्याशी ह्या विषयावर काही बोलुही नकोस. सगळ काही ठिक होईल." नेहा त्याच्या केसांवरुन हात फिरवत म्हणाली.

"
आय होप सो." आणि परत दोघेही उसळणार्या समुद्राकडे बघत एकमेकांत हरवून गेले.

"
नेहा ? " चिन्मयने ओठ तिच्या कानाकडे नेले

"
हम्म. काय? "

"
झोपलीस का?" त्याचे ओठ तिच्या गालांवर टेकले होते.

"
गप्प ना रे, तु असं केलेस ना कि अंगावर शहारा येतो." नेहा लाजत बोलली.

"
अच्छा ? आणि काय काय होतं ?"

"
काही नाही ! एक नंबरचा संधीसाधु आहे नुसता. एक चान्स सोडत नाही किस करण्याचा." तिचे गाल लाजेने आरक्त झाले होते.

"
आता तुझ्यवर चान्स नाही मारणार तर आणखी कुणावर मारणार ?"

"
डेअर यु ! असा बडवून काढेन ना !" नेहा त्याला बिलगली.

"
अय लव्ह यु सो मच!"

"
आय लव्ह यु टु !"आता बरं वाटतयं अगदी हलकं हलकं. किति टेंशन्मध्ये होतो मी. कळत नव्हतं तुला कसं सांगावं ते."

"
यु नो चिन्मय, तु खूप चांगला आहेस. नेहमी दुसर्यांचा विचार करणारा. भरभरुन प्रेम करणारा. कधीही रागावणारा आनी मुख्य म्हणजे माझं ऐकणारा. मला असाच नवरा हवा होता. आय गॉट यु ॅन्ड आय गॉट एव्हरीथिंग ! यु आर माय मॅन !"

"
काळोख पडायला लागलाय. निघुया मग ? "

"
ओके चल."

चिन्मय तिला तिच्या घरापासुन थोड्या अंतरावर ड्रॉप केले. नेहाने जाता जाता त्याच्या गालवर ओठ टेकवले आणि ती पळुन गेली. चिन्मयने बाईक फिरवली आणि तो घराच्या दिशेने निघाला.

************************************************************************************

त्या गोष्टीला - दिवस निघुन गेले. सर्व काही रुटिन सुरु होते. प्रियाचा पाय आता थोडा बरा झाला होता. म्हणजे ती आधाराने चालु शकत होती. चिन्मय रोज तिला बघितल्याशिवाय राहत नसे. तो दिवस रविवार होता. प्रियाच्या घरातलेही कुठेतरी बाहेर गेले होते. चिन्मय प्रियाच्या घरीच होता. दुपार झाल्यावर त्याने प्रियाच्या आवडीचे चायनिझ मागवले. दोघांनीही यथेच्छ ताव मारला.

"
खूप दिवसांनी खाल्लं रे, मजा आली !"

"
हम्म, मी पण. इन फॅक्ट मी आणि नेहा त्या दिवशी दिल्ली दरबारमध्ये गेलो होतो."

"
वा! दिल्ली दरबार क्या बात है?"

"
पियु, !"

"
काय? "

"
काही नाही. मी त्या दिवशी नेहाला सगळं सांगितलं."

"
अच्छा, मला शिव्या घातल्या असतील ना तिने. ॅम सॉरी यार."

"
इट्स ओके. उगाच तिला अंधारात ठेवणं बरं नाही, म्हणुन सांगितलं सारं."

"
बरं केलंस.मला पण तिच्याशी बोलायचयं. इन फॅक्ट तिची माफी मागायचीय. बिचारीला मी उगाच दुखावलं."

"
तसं काही नाही. थोडी अपसेट झाली होती. पण नंतर शांत झाली."

"
पियु, मला थोडं टेन्शन आलयं."

"
का रे ? काय झालं?"

"
काही नाही तुला महितए ना नेहाच्या घरातले मला अजिबात लाईक करत नाहीत. नेहाच्या आईने तर तिला म्हणे शपथ वैगरे घातलिय. तिची आई तर मला अगदी पाण्यात बघते. तिच्या घरातल्यानी मला भेटायला बोलवलयं."

"
वा! कधी रे? लग्नाबद्दल? "

"
पुढच्या रविवारी. माहित नाही. तु येशील ना माझ्याबरोबर?"

"
मी कशाला? काही नको. उगाच अजुन गैरसमझ वाढतिल. तुच जाउन ये."

"
, असं काय करतेस. चल ना माझ्याबरोबर प्लिझ. फॉर मॉरल सपोर्ट. मला भीती वाटतेय."

"
भीती कसली त्यात?"

"
अजुन कसली नाही गं पण ... चल ना प्लिझ."

"
ओके. पण माझं प्लॅस्टर??"

'"
शुक्रवारी काढणार आहेत ना? मग आपल्याला तिकडे रविवारी जायचयं."

"
ठिक आहे. एनिथिंग फॉर यु!"

"
थँक्स, !"

दोघेही बराच वेळ बोलत बसले होते. बाहेर पाउस सुरु होता. सगळीकडे काळोख झाला होता. पावसाबरोबर वाराही खिडक्यांची आदळापट करत तितक्याच जोरात वाहत होता. वार्याने उडणारे पावसाचे पाणी खिडकितुन अंगावर उडत होते. चिन्मयने उठुन खिडकी बंद केली आणि प्लेट्स घेउन तो किचनमध्ये गेला. किचन मधलं आवरुन तो परत रुममध्ये आला. प्रिया त्या खिडकीसमोर उभी राहुन बाहेर बघत उभी होती. वार्याने तिचे केस उडत होते आणि पावसाचे तुषार तिच्या चेहर्यावर ओसंडत होते.तिला पाहुन तो क्षणभर जागीच थांबला आणि तिच्याकडे पाहु लागला. प्रिया त्या पावसात कुठेतरी हरवून गेली होती. चिन्मय तिच्य जवळ गेला आणि तिच्या मागे उभा राहिला तरी तिला कळलं नाही. पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहणार्या चातकाच्या डोळ्यात पाउस पडल्यावर जो हर्ष होत असेल तो त्याला तिच्या डोळयांत दिसत होता. राहवून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवले. प्रिया शहारली आणि परतून तिने चिन्मयकडे पाहिले. चिन्मय एकटक तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहर्यावरुन पावसाचे थेंब ओघळून वाहत होते. तिची नजर खाली झुकली होती. शीतल वार्याने आणि त्यात पावसाच्या थेंबानी तिचं अगं थरथरत होतं. चिन्मयने तिचा चेहरा हळूहळू वर केला. पण प्रिया त्याच्या़कडे बघत नव्हती. तिचे गाल लाजेने आरक्त झाले होते. तिच्या चेहर्यावरुन ओघळणारे पावसाचे थेंब तिला अधिकच खुलवत होते. चिन्मयने तिच्या चेहर्यावरुन हात फिरवला प्रियाने त्याचा चेहर्यावर फिरणारा हातावर आपला हात ठेवला. पावसाचा जोर अजुनच वाढत होता आणि वारा त्याला तितक्याच वेगाने साथ देत होता. अचानक कुठेतरी प्रखर विज चमकली आणि - सेकंदानी ढगांचा प्रचंड गडगडाट झाला. पत्या आवाजाबरोबर घाबरुन प्रिया चिन्मयच्या मिठित शिरली आणि तिने त्याला घट्ट पकडले. आज चिन्मयला काही तरी वेगळच जाणवत होतं. नेहमी आपल्या मिठित शिरुन रडणारी ती आजची प्रिया नव्हती.चिन्मयने तिला विचारले ," , काय झालं? घाबरलीस का? " प्रिया काही बोलली नाही पण तिने चिन्मयला अधिकच घट्ट पकडलं. चिन्मयने तिचा चेहरा वर केला ती अजुनही थरथरत होती.

"
पियु डोळे उघड ना. मी आहे ना इथे का घाबरतेस?"

प्रियाने हळूहळू डोळे उघडले आणि ती चिन्मय़कडे पाहु लागली. तिने एक हात चिन्मयच्या गालावर ठेवला. तिच्या चेहर्यावरुन नजर हटवता त्याने तो पकडुन आपल्या ओठांजवळ आणला. त्याच्या त्या स्पर्शाने ती शहारली. चिन्मयने तिला जवळ घेतले प्रियाने डोळे बंद करुने घेतले होते. तिला चिन्मयचे ऊष्ण श्वास जाणवू लागले. चिन्मयने तिच्या थरथरणार्या ओठांवर आपले ऑठ टेकवले आणि पुढच्या काही क्षणांत दोघांचेही ओठ एकमेकांत गुंतले गेले. पाण्यातुन बाहेर काढलेल्या माश्याला परत पाण्यात सोडल्यावर त्याच्यात जो नविन जीव येतो त्याचप्रमाणे प्रिया चिन्मयच्या ओठांत मिसळून गेली. प्रियाच्या आयुष्याचा तो सुवर्णक्षण असावा आता मला मरण आले तरी चालेल तिच्या मनात आले. वर्षानुवर्षे वाळवंटात भट़कणार्याला पाण्याचा एक थेंब जरी दिसला तरी त्याच्यासाठी तो थेंब म्हणजे ओसंडुन वाहणारी गंगा असते.त्या एका थेंबाला प्राशुन त्याला पुढच्या आयुष्याचा प्रवास करायचा असतो. प्रियाची स्थिती त्या वाळवंटात भट़कणार्याप्रमाणेच होती.तिला काही सुचत नव्हते आणि चिन्मयलाही. दोघेही एका वेगळ्याच दुनियेत स्वार झाले होते. वार्याच्या एका प्रचंड झोताबरोबर खिडकी आदळली आणि दोघेही भानावर आले.......

क्रमश :