Sunday, November 1, 2009

फोन भूत !!!!

त्यावेळी मी आणि तेजस व्ही.एस्.एन्.एल्.मध्ये होतो. मला वाटतं गणपतीचे दिवस होते. आणि शनिवार होता. काम तसं फारसं नव्हतं. ऑफीसमध्ये आल्या आल्या तेजसने वर्दी दिली. " भाई, आज घरपे कोई नहीं है. रात को जश्न मनायेंगे."
त्यानुसार देव, जगदीश आणि अमेयला निमंत्रण गेलं. संध्याकाळी ७ वाजता तेजसच्या घरी जमायचं....आम्ही ४ - ५ वाजता ऑफीस सोडलं. मी तेजसला बोललो की मी घरी जातो आणि घरच्यांना तोंड दाखवून परत येतो. त्यावेळी मी घाटकोपरला राहायचो. मम्मीच्या समोर काही तरी पुडी सोडली आणि सटकलो. तिथुन बस स्टॉपवर आलो आणि ३०५ पकडली... आय थिंक ७ दिवसांचे गणपती गावी चालले होते.. त्यामुळे थोडं ट्रॅफीक होतं... मी सायनला पोहचलो असेन इतक्यात माझा सेल वाजला. नंबर अनोळखी होता..मी फोन उचलला." हॅलो... हॅलो..... " बोलतोय पण समोरुन फक्त ढोल ताश्यांचा किंवा मिरवणुकीचा आवाज येत होता पण व्यक्तीचा आवाज येत नव्हता... मी हॅलो हॅलो बोलुन वैतागलो आणि फोन डिसकनेक्ट केला... परत ५ मि. त्याच नंबरवरुन फोन आला. पुन्हा तेच !! मी हॅलो.. हॅलो ओरडतोय पण गोंगाटाशिवाय कसलाही आवाज नाही.... त्यात तो नंबरही ओळखीचा नव्हता....म्हणुन मी रिटर्न कॉल केला पण परत तोच आवाज आला.. दुसर्‍या वेळी माझा कॉल अ‍ॅन्सर नाही झाला. काही वेळाने तेजसचा फोन आला.. " कुठे आहेस रे? " त्याने विचारले.
'" अरे मी बसमध्ये आहे. सायनला पोह्चतोय. थोडा ट्रॅफीकमध्ये अडकलोय..."
गणपती विसर्जन असताना मी शिवाजी पार्कला जायला घाटकोपरहुन बस पकडली म्हणुन त्याने माझा उद्धार केला. मघाशी आलेले फोन कॉल कुणाचे असतील याचा विचार करत आणि गणपतींची मिरवणुक आणि मिरवणुकितल्या मुलींना बघत बघत मी अराउंड ७ - ७.३० वाजता पार्कात पोहचलो.तेजस आणि देव कट्ट्यावर स्टॉक घेउन बसले होते.. जग्गु, आणि अमेय अजुन आले नव्हते... आम्ही कट्ट्यावर तोपर्यंत पार्कातल्या पोरी बघत बसलो...बोलता बोलता मी तेजस आणि देवला मघाशी मला आलेल्या फोन कॉल्सबद्दल बोललो...दोघांना नंबरही दाखवला.. मी त्या नंबरच्या बाबतीत थोडा क्युरीअस होतो कारण एका वर्षापूर्वी माझं ब्रेक - अप झालं होतं. तरीही मी तिला विसरु शकलो नव्हतो... अजुनही नाही विसरु शकत्...त्यामुळे मला वाटत होतं की कदाचित तीच फोन करत असावी... कारण फोन आल्यावर मला बाकी सगळे आवाज येत होते फक्त त्या व्यक्तीचा आवाज येत नव्हता.. त्यामुळे मला असं वाटत होतं की ती मुद्दाम बोलत नसावी...पण कन्फर्म होत नव्हतं. मी ती शंका तेजस आणि देवला बोलुन दाखवली. साल्यांनी मला वेड्यात काढलं आणि मग आम्ही तेजसच्या घरी पोहचलो....काही वेळांनी सगळेजण पोहचले आणि मग मैफील सुरु झाली.. १ - २ पेग झाले असतिल.इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. बॉस लोकांचा उद्धार करुन झाला. एकमेकांची खेचुन झाली ( काय म्हणुन विचारु नका, आपण जाणकार आहात ) मग तेजसने सिगरेट फुकत त्याचा नेहमीचा शेर बोलुन दाखवला..
" अर्ज है ! "
" इर्शाद "
" के बेवफा सनमसे सिगरेट अच्छी है !"
" वा ! वा ! वा ! वा !"
" के बेवफा सनमसे सिगरेट अच्छी है, साली दिल जलाती है पर होठोंसे तो लगती है !"
" वा ! वा !! माश्या हलवा, माशा हलवा !!"
तिसरं राउंड सुरु झालं.. इतक्यात त्याच नंबरवरुन परत फोन आला... मी घडाळ्याकडे पाहीले. साडे नऊ वाजले होते. मी फोन उचलला.." हॅलो... हॅलो...." कुणाचाच आवाज नाही...आत मात्र पलीकडुन कसलाही आवाज येत नव्हता.. शांत !!! मी १ - २ वेळा हॅलो हॅलो बोलुन वैतागुन फोन डिसकनेक्ट केला...परत १ - २ मिनिटानी त्याच नंबरवरुन फोन... आताही तेच..कुणी बोलत नाही...मी हॅलो.... हॅलो बोलुन परत फोन ठेवला... एव्हाना बाकीचे सगळेजण माझ्याकडे बघत होते..." काय झालं रे ? कोण होतं? " तेजसने विचारले...
" माहित नाहे रे, त्याच नंबरवरुन फोन आलाय... मघाशी कसले कसले आवाज येत होते... आता तर आवाजही येत नाहीत्...कोण आहे कुणास ठाउक ! ' मी वैतागुन बोललो आणि एक लार्ज सिप घेतला...मग ती स्टोरी जग्गु आणि अमेयला सांगितली... काही वेळाने परत फोन आला... मी अ‍ॅन्सर न करताच डिसकनेक्ट केला... परत फोन आला ..... मी डिस्कनेक्ट केला....असं दोन तीन वेळा झालं... मग मला थोडं वाटु लागलं की तीच असावी... ब्रेक अप झाल्यापासुन आम्ही एकमेकांशी बोललो नव्हतो... किंवा भेटलोही नव्हतो. ( पी. एस. :- मी ३ पेग डाउन आहे.) वैतागुन मी फोन स्विच्ड ऑफ केला... म्हटलं मरु दे !! नंतर बघुया... तसं माझी लव्ह स्टोरी अमेय आणि तेजसला माहित होती.. मी थोडासा अपसेट झालो...मला तिची प्रकर्षाने आठवण यायला लागली....मला अपसेट बघुन काही जणांनी मला धीर दिला... आणि ४ था पेग भरला... तेजसने मला सेल ऑन करायला सांगितले... बोलला बघुया परत फोन येतो का. मी नाय नाय करत फोन ऑन केला... काही वेळ निघुन गेला आणि परत फोन आला...." नॉट अगेन ! डॅम्न ! " म्हणुन मी फोन सोफ्यावर फेकुन दिला...फोन वाजुन वाजुन बंद झाला.. पण परत वाजायला लागला... मी उचलला...वैतागुन, रागाने ओरडलो..." हॅलो कोण आहे?? बोलत का नाही..??? " माझी जिभ अडखळत होती...
" सोनु तु आहेस का? बोल ना ! तु बोलत का नाहीस ?? " मी बोलुन बोलुन थकलो पण समोरुन कसलाही आवाज नाही...मी फोन डिसकनेक्ट केला...
" मला वाटतं तीच आहे..अजुन कुणी नसणार आणि इतक्या रात्री अजुन कोण फोन करणार?" मी बोललो...
" तीच कशावरुन ? " कुणी तरी विचारले..
" तीच असणार यार इतक्या रात्री अजुन कोण फोन करणार ? आय मीन जर दुसर्‍या कुणाला बोलायचं असतं तर त्याने ब्लँक कॉल का दिले असते?? "' ( चार पेग डाउन ) आता मला सॉलेड चढली होती..मला काही सुचत नव्हतं.. फोन येतच होते... आणि मी डिसकनेक्ट करत होतो..कारण बोलुन काहिच फायदा होत नव्हता.. त्यानंतर येणार्‍या प्रत्येक कॉलला मे किती तरी मुलींची नावं घेतली...भक्ती, पल्लवी, श्वेता, सोनु.... हे समजुन की यापैकी कुणी फोन करत असावं... सगळेजण माझ्याकडे डोळे फाडुन बघत होते...( आणि हो एक सांगायचं राहिलं मी जेव्हा जेव्हा त्या नंबरवर फोन करायचो तेव्हा तो फोन फक्त रिंग व्हायचा. कुणीही अ‍ॅन्सर करत नव्हतं त्यामुळे मी अजुन कन्फ्युझ होतो..) काही वेळाने माझ्या कन्फ्युझनची जागा भीतीने घेतली...कारण एका वर्ष झालं होतं तिला बघुन आणि तिच्याशी बोलुन. त्याकाळात तिच्याविषयी मला काहिच कळलं नव्हतं. किंबहना मी ते जाणुन घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता...आमच्यात जे काही झालं होतं ते सगळं मी मनाच्या कुठच्या तरी कोपर्‍यात गाडुन ठेवलं होतं..त्यामुळे तिचं काही बरं - वाईट तर झालं नसेल ना या विचाराने मी घाबरलो होतो...म्हणजे अ‍ॅल्कोहोलचा माझ्यावर इतका परीणाम झाला होता कि. तो फोन कॉल भुताचा किंवा एखाद्या आत्म्याचा असावा असं मला वाटत होतं.( एखद्या चित्रपटासाठी चांगला कॉन्सेप्ट आहे. नाही का? ) मी अशी शंका बोलुन दाखवल्यावर सगळे सिरिअस झाले... फोन आल्यावर मी तो स्पीकरवर ठेवायचो जेणे करुन त्यांनाही ऐकायला जावं..पण काहीच ऐकु येत नव्हतं.. पण ,मला बाकिच्यानी वेड्यात जमा केलं.नंतर मला ह्या साल्यांचा डाउट यायला लागला, कदाचित यांच्यापैकीच कुणीतरी प्रँक करत असेल.. मी त्यांआ शिव्या घालायला सुरुवात केली, बोललो साल्यांनो तुम्हीच हे कॉल करताय्.सगळ्यांनी आपापले सेल फोन काढुन समोर ठेवले..५ मि.परत फोन आला..आता काय बोलणार??? मी फोन उचलला, काही बोलायला जानार इतक्यात काय झालं, अमेय काही तरी बोलला आणि ते चक्क मला माझ्या फोनमध्ये ऐकु आलं. मी घाबरलो..घाबरुन बोललो, " हे काय? चाललयं?? आपण जे ह्या रुममध्ये बोलतोय ते मला माझ्या फोनमध्ये ऐकु येतेयं, डॅम्न!!! " " बघु, बघु" म्हणुन कुणीतरी फोन घेतला इतक्यात तो डिसकनेक्ट झाला... हे काय चाललयं, मला काहिच समजत नव्हतो.. माझ्या काहिच लक्षात येत नव्हतं. बाकिचेही माझ्याकडे घाबरल्यासारखे बघत होते...अ‍ॅलकोहोलचा परिणाम असेल माझं डोकं सुन्न झालं होतं. त्या सारख्या सारख्या फोन कॉल्सच्या टॉरचर्समुळे मी वेडा झालो होतो... अतिशय घाबरलो होतो. लिकर संपलं होतं. पण फोन कॉल्स संपले नव्हते...सगळेजण मला रिलॅक्स व्हायला सांगत होते.मला काय करावे ते सुचत नव्हते... इतक्यात परत फोन वाजला.. मी अ‍ॅन्सर केला..भयाण शांतता...." हॅलो ?......."
पलिकडुन काहि तरी कुजबुजण्याचे आवाज... श्वासोच्छवासांचा आवाज....मी चापापलो...
पलिकडुन व्हिस्परिंग आवाज आला, " हॅ......लो....."
मी ओरडलो, "ए कुणीतरी बोलतय..." " हॅलो... कोण आहे?? " मी भीत भीत विचारले....
"दी....प.....कक्क्क..???." व्हिस्परिंग साउंड....
" या अ‍ॅम दिपक.... व्हु इज धिस??" ( मला स्केरी मुव्ही आठवला.)..
" दी...पकक्क्क...., यु...आ...र डे....ड नाव...! अ‍ॅम कमिंग....
." कोण आहे ? *#*** !!! ,,, #* @***, फ*%^@***!!!!, हिम्म्त असेल तर समोर ये...!! " मी त्वेषात तोंडाला येईल ते बोलत होतो...
" कोण आहे रे ? काय झालं ? " ' माहित नाही रे कोण आहे साला,बॅस्टर्ड मला बोलतोय यु आर डेड नाव !!!"
" आवाज कुणाचा आहे? ''
" काय माहित ?? इट्स व्हिस्परिंग !!! "
सगळेजण गपगार झाले.. काय चाललयं कुणालाच काही कळत नव्हतं... माझी तर सगळी उतरली... मी घामाघुम झालो होतो... कोण असेल?? मला काहिच कळत नव्हतं... ( ४ पेग डाउन झल्यावर काय माती कळणार ???) माझे सगळे तर्क वाया जात होते... बरं हे सगळं संध्याकाळपासुन सुरु झालं होतं आणि आता तर रात्रीचे २ वाजायला आले होते.... ती इतक्या रात्रभर जगुन फोन का करेल??? बरं तीने इतक्या वेळा फोन केला, एकदा तरी ई बोलली असती ना!! आणि ती यु आर डेड ! असं कशाला म्हणेल??? शी* मॅन ! डोकंच चालत नव्हतं... मी सेल स्विच्ड ऑफ केला... आणि बसुन राहिलो....बाकिचे झोपायच्या तयारीला लागले...पण माझी झोप तर केव्हाच उडाली होती...सगळ्यांनी मला धीर दिला .. आणि झोपायला सांगितले... पण मी पुरता घाबरुन गेलो होतो.. तेजसने मला पाणी आणुन दिले.. मी सगळ्यांकडे बघत होतो आणि ते माझ्याकडे विचित्र नजरेन बघत होते..होत असलेल्या प्रकाराला काय म्हणावं तेच कळत नव्हतं !! भुताटकी??? आत्मा??? डॅम्न!! ( मी ह्या बाबतीत डरपोक आहे ) नंतर ह्या विषयावर आमच डिसकशन सुरु झालं.. कोण - कोण कसले कसले, कुठुन कुठुन ऐकलेले भुता - खेतांचे किस्से सांगत होते आणि मे अजुन घाबरत होतो... इतक्यात तेजसने मला खिडकीपाशी बोललवलं अनी सांगितलं की समोरच्या बिल्डिंगमधला तो फ्लॅट आहे ना तिथुन एका मुलीने उडी घेउन आत्महत्या केली होती....आणि तो किस्स सांगितला... देव आणि अमेयने तेच सांगितले... नंतर मी बिछान्यावर पहुडलो पण मला झोप येत नव्हती. ती खिडकी आणि बाहेरचा भयाण अंधार मला डिस्टर्ब करत होता... मी तेजसला ओरडलो
"पहिल्यांदा ती खिडकी बंद कर साल्या, तिथे कुणे तरी आहे... !!!"
" अरे कुणी नाही तिथे !! झोप गपचुप ! "
" नाही, नाही ! मला कुणीतरी दिसतयं तिथे !!! बंद कर आधी !!' मी ओरडु लागलो...आणि परत उठुन बसलो...
आणि एक भयंकर डायलॉग मारला, मला माहित नाही हा डायलॉग मला कसा आठवला किंवा कसा सुचला !!
मी बोललो, " हे बघा, माझ्याशे जे काही होतयं ते मला माहित नाही, पण जिथे प्रकाश आहे, जे आपण पाहु शकतो तेच सत्य आहे, जिथे प्रकाश संपतो तिथे अंधार सुरु होतो.. आणि ह्या अंधारात काय चाललयं हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपण तिथे प्रकाश टाकत नाही.... " ( डॅम्न ! काय खतरनाक डायलॉग होता ना ?? )
आतापर्यंत अमेय वैतागला होता, " ए साल्या आता जर गप्प बसला नाहिस ना तर डोक्यात बाटली घालेन, केव्हापासुन बडबड करतोय, कसली भुतं आणि आत्मा??? तु काय कुणा मुलीचा रेप करुन तीला मारुन टाकलयं? जी आता भुत बनुन तुला मारायला आलीय...आता जर गप्प झोपला नाहीस ना तर इथे एक आत्मा तयार करीन,.... तो तुझा !!"
( साला राक्षस !!! ) मी गप्प झालो. पण मला झोप येत नव्हती. मी घाबरलो होतो.. घाबरल्यामुळे आणि ती खिडकी दिसत असल्यामुळे माझी धडधड वाढली होती.. मला घाम फुटला होता...
मी अमेयला बोललो..." मला कसं तरी होतयं ... आय थिन्क माझा ब्लड प्रेशर ... अम्या साल्या मला हॉस्पिटलमध्ये घेउन चल... माझं काही खरं नाही..."
सगळेजण मला शांत करत होते पण मी कुणाचच एऐकत नव्हतो..
शेवटी अमेय उठला... " साला, हा काय झोपायला देणार नाही....मरु दे रे, देव सांग त्याला कुठुन फोन येतायत ते,, दाखव त्याला भूत...."
मी शांत....
" काय? काय " कोण फोन करतो???'" मी देवकडे पाहिले, तो हसत होता... मला बोलला... "सेल स्विच ऑन कर."
मी पटकन सेल स्विच ऑन केला...आणि त्या नंबरवरुन फोन आला... मे देवकडे पाहिले त्याचा सेल त्याच्या हातात होता पण त्याचा नंबरवरुन कॉल येत नव्हता.. सगळ्यांचे फोन सगळ्यांकडे होते... पण कुणाच्याच सेलवरुन फोन येत नव्हता.....
"काय चाललयं ? कुणी सांगेल का???"
अमेयने एक टपली मारली " आरे साल्या इथुन फोन येतोय तुला." आणि देवने खिशातुन दुअसरा सेल बाहेर काढला..!!
डॅम्न!! जेव्हा मला हा सगळा प्रकार कळला तेव्हा माझा चेहरा बघण्यालायक झाला होता.. सगळेजण माझ्यावर हसत होते...माझी खेचत होते....जर हा सगळा प्रकार तेव्हा रेकॉर्ड केला असता तर एम टीव्ही बकरावर फर्स्ट प्राईझ मिळालं असतं.... खतरनाक एपिसोड झाल होता.. मी ही नंतर हसायला लगलो.....
*****************************************************************************************************************************************************************************************************************
त्याचं झालं असं, देवकडे दोन सेल फोन होते. एक आय थिंक रिलायंसचा आणि एक गरूडा... पैकी रिलयन्सचा नंबर माझ्याकडे होता पण गरुडाचा नव्हता..त्यावेळी गरुडाची स्कीम होती कि महिना १२०० रु. फिक्स्ड भरायचे अणि कोणत्याही लोकल नंबरवर अनलिमिटेड बोलायचे....तोच फोन त्याच्याकडे होता...संध्याकाळी मी जेव्हा बसमध्ये होतो तेव्हा देव मला फोन करत होता पण काही प्रॉब्लेम्समुळे मला त्याचा आवाज येत नव्हता. फक्त तो गोंगाट ऐकु येत होता...मी जेव्हा त्यांना पार्कात भेटलो आणि त्या कॉल्सबद्दल सांगितले साल्यांनी तेव्हाच ठरवले की आज ह्याल घ्यायचं...त्याप्रमणे त्यांनी बाकिच्यांनापण सांगुन ठेवले होते....पीताना देव हळुच खिशात हात घालायचा आणि माझा नंबर डायल कारायचा.. मी फोन उचलल्यावर हरामखोर सगळे शांत व्हायचे...जेव्हा मी बोललो की अरे यार आपण जे बोलतोय तेच मला ऐकु येतेयं तेव्हाच मला समजायला हवं होतं की इथुनच कुणी तरी फोन करतयं. पण अ‍ॅल्कोहोल डोक्यात चढल्यावर डोकं थोडंच काम करणार !! असो...शेवटी क्लायमॅक्स ! व्हिस्परिंग साउंड !!!! देव बाथरुममध्ये गेला आणि तिथुन त्याने फोन केला होता.. दारु पिताना नॉरमली सगळेजण सारखे सारखे टॉयलेटला जात असतात त्यामुळे माझं त्याच्याजडे लक्ष नव्हतं. प्लस त्याचा फोन माझ्यासमोरच होता...आणि साले सगळेजण इतकी क्लास अ‍ॅक्टींग करत होते की मला जरासुद्धा शंका आली नव्हती... डॅम्न!! त्यानंतर हा प्रकार सगळ्या मित्रांना कळवण्यात आला.. आणि मला सग्ळे फोन करुन व्हिस्परिंग आवाजात बोलायाच !" दी....पप्प्प्क... यु आर डेड !! " सगळ्यांची हसुन हसुन पुरेवाट लागली.... आजही तो किस्सा आठवला की मला स्वत:वरच हसायला येतं!!! असतात एक एक त्यापैकी मी एक !!!