Friday, January 28, 2011

निशिगंध .... अंतिम

 
रिया, मी, मीरा आणि रियाचं होणारं बाळं! या एवढ्याच माणसांत मी सध्या गुंतलो होतो. प्रत्येक पाउल सांभाळुन टाकत, प्रत्येक भावनेला  तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपत होतो. कुठेही कुणाला धक्का लागु नए! खरं तर सगळ्यात जास्त मी मीराला जपत होतो. मला तिला हरवायचं नव्हतं. तिच्याशिवाय आता जगण्याचा विचारही सहन होत नव्हता. पण काही गोष्टी नसतात आपल्या हातात. वाळुसारख्या, जितकी घट्ट मुठीत पकडावी तितकी ती घसरत जाते. 
रियाला घरी आणल्याच्या दुसर्‍यादिवशीच, मला माहित होतं समीर स्वस्थ बसणार नव्हता! तो त्यावेळी जरी नशेत होता तरी माझा हात विसरला नसेल याची मला खात्री होती. रियाने त्याला कॉल करुन सगळं काही सांगितलं. तिला ही हे सगळं ऑकवर्ड वाटत होतं. पण सगळ्याच गोष्टींचा नाईलाज होता. कुणाला काही कळत  नव्हतं की काय करायचं ते. मी २ दिवस सुट्टी टाकली आणि घरीच होतो. मीराच्या घरच्यांनाही ही खबर लागली होती. तिसर्‍या दिवशी समीरचा मला कॉल आला. त्याने माझ्याकडुन फक्त माझा अ‍ॅड्रेस घेतला आणि तो येतोय म्हणुन सांगितलं. संध्याकाळी समीर घरी आला. त्याच्या चेहर्‍यावर पश्चाताप जराही दिसत नव्हता. मी त्याचे स्वागत केलं. तो सरळ रियाच्या खोलीत गेला. मी हॉलमध्येच थांबलो होतो. कसले तरी पेपर्स त्याने रियाच्या समोर ठेवले. रियाने ते पेपर्स पाहिले. काहि बोलली नाही. तिने त्या पेपर्सवर साईन केली आणि समीरला परत दिले. काही न बोलता समीर बाहेर आला. त्याचा चेहरा पुर्णपणे हरल्यासारखा वाटत होता. "रिया?? आर यु शुअर अबाउट धिस???" त्याने आपला इगो पुन्हा एकदा जागा करण्याचा प्रयत्न केला.
"आय थिंक, आय हॅव साईन्ड दोज क्रॅप समीर!" ती अगदी निर्भयतेने बोलली.  समीरने माझ्याकडे पाहिले. पण तो काही करु शकला नाही. तो पुर्णपणे हरला होता. आज पहिल्यांदाच रियाने त्याला चोख उत्तर दिले होते. निमुटपणे तो बाहेर पडला. मी त्याला सोडायला पण गेलो नाही. मी रियाच्या खोलीत गेलो, पेपर्सची एक कॉपी हातात घेतली आणि वाचु लागलो. डिवोर्स पेपर्स होते ते. 
"सुटले एकदाची! खुप वैताग आला होता. आज मला खुप हलकं हलकं वाटतयं. मानेवर असलेलं प्रचंड ओझं फेकुन द्यावं त्याप्रमाणे!" ती बोलत होती. ममा आली. "काय झालं गं?" 
"काही नाही आई, बस्स! एका मोठ्या बंधातुन सुटले! खुप बरं वाटतयं आज! फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतयं. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना उगीच त्रास झाला, माहित नाही  कधी सुटका होतेयं आता. तोपर्यंत माझा त्रास काढाल ना?" 
ममा हसली, तिच्या केसावरुन हात फिरवत बोलली,"काही नाही गं! माझ्या मुलीसारखीच तु मला! कुणी तुझं राहो न राहो, ही आई आहे तुझी!" रिया ममाला बिलगली आणि इतकावेळ कोंडुन ठेवलेले सारे अश्रु तिने रिते केले. काही वेळाने सारं काही शांत झालं. ती उठुन घरात वावरु लागली. ममाबरोबर किचन मध्ये गेली. 
दुसर्‍यादिवशी मी ऑफिसला जायला निघालो. तिने तिचं रेझिगनेशन माझ्याकडे दिलं. मी ऑफिसमध्ये ते सबमिट केलं. बॉस मानायला तयार नव्हता. पण शेवटी त्याने ते अ‍ॅक्सेप्ट केलं. सगळ्या ऑफीसला शॉक होता. दिवसभराचं काम आटोपुन मी संध्याकाळी मीराला भेटायला गेलो. ती थोडीशी अपसेट वाटत होती. बराच वेळ गप्प राहुन आम्ही फक्त डोळ्यांतुन बोलत होतो. मी तिला घरी सोडायला गेलो. तिच्या आई-वडीलांना भेटलो. त्यांनी लग्नाच्या तयारीबद्दल विचारले. मी काही उत्तर द्यायच्या मनस्थितीत नव्हतो. मी त्यांना सगळी कल्पना दिली. आणि माझी अडचण समजावुन सांगितली. ठीक आहे, बघुया काय ते यावरच ती चर्चा थांबली. तिची आई थोडी नाराज वाटली, "आम्ही सगळ्या पाहुण्यांना सांगुन मोकळे झालो, पत्रिकाही प्रिंटीगला दिल्या, आणि आता अजुन काय ठरवायचे?" 
"अगं, प्रिंटींगला दिल्यात, वाटल्यातर नाहीत ना अजुन?" तिचे वडील तिच्या आईला अडवत बोलले.मी तिथुन जायला निघालो. तिचे वडील दरवाज्यापर्यंत सोडायला आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला,"मला कळतयं सगळं, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तु जे करतोयस ते ठीकच करतोय्,पण.. असु दे! बघुया आपण काही उपाय काढु यावर. मी तुझ्या आई - वडीलांशी बोलतो!" 
मी त्यांचे आभार मानुन निघालो. मीरा आज सोडायला आली नाही! मी घरी पोचलो तेव्हा खाली रियाची कार दिसली. घरी जाउन बघतो तर, रियाच्या खोलीत तिचं काही सामान दिसलं. समीरने तिची गाडी आणि तिच्या सगळ्या वस्तु, कपडे वैगरे पाठवून दिले होते. रिया, लॅपटॉपवर काहि तरी करत बसली होती, " अरे आलास तु? ऑफीसमध्ये काय झालं? " सगळे शॉक्ड झाले असतिल ना?" 
"हो गं. बॉस तर ऐकायलाच तयार नव्हता, तुझ्याशी बोलायचं म्हणत होता. पण केलं कसं तरी मॅनेज!" 
"ओके. मी बोलते त्याच्याशी नंतर! जा तु फ्रेश हो आणि जेउन घे!" 
"ओके. तु ठीक आहेस ना?" 
"हो रे मला काय झालयं? आय अ‍ॅम परफेक्टली फाईन! बाय द वे, आज जेवण मी केलयं! " 
"तु का काम करतेस? तुला आराम करायला सांगितलय ना!" 
"अरे बसुन बसुन काय करणार, तुला एक गम्मत सांगु? दुपारी ना, शेजरच्या काही बायका आल्या होत्या घरी, त्यांनी माझ्याबद्दल आईना विचारलं." 
"मग?? ममा काय बोलली?" 
"आई बोलल्या. कि ही माझ्या चुलत बहिणीची मुलगी आहे. तिचा नवर्‍याला कामानिम्मित्त स्टेट्सला जावं लागलं म्हणुन तिला  माझ्याकडे आणलयं, मग त्या सार्‍या बायका माझ्याकडे अगदी कौतुकाने बघत होत्या. मला काय काय विचारत होत्या. काय होतयं, कसं वाटतयं वैगरे. मला खुप मज्जा येत होती. एका काकीनी तर मला घरी बनवलेली लोणच्याची बरणीच आणु दिली, आणि मी अर्धी संपवली पण, सही ना?" 
सही ना? मला मीराची एकदम आठवण आली. 
"हे बघ मला मीराची सवय लागली, सही ना बोलायची! गेला होतास आज भेटायला?" 
"हो! ठीक आहे ती." 
"आणि कहर काय माहित आहे का? आई माझं डोहाळे जेवण करणार आहे!" मला कसं तरीच फील होतयं! मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं, थँक्स टु यु!" ती गोड हसली.

मी फ्रेश व्हायला गेलो. कालपासुन रिया पुर्णपणे बदलली होती. मुक्त झाल्यासारखी, स्वच्छंदी पक्ष्यासाराखी उडत होती. मला बरं वाटलं, पण तितक्याच प्रकर्षतेने मीराची आठवण येउ लागली.  मीराला कॉल केला. बराच वेळ रिंग होत होता पण तीने रिसीव्ह नाही केला. पहिल्यांदाच तीने माझा कॉल रिसीव्ह नाही केला. मला कसं तरीच वाटु लागलं. 
"मी थोड्या वेळाने कॉल करते." तीचा टेक्स्ट आला; परक्यासारखा. 
मी ओके म्हणुन रिप्लाय केला. पण तिचा कॉल नाही आला. मी रात्रभर तिच्या कॉलची वाट पाहत होतो, पण तिचा ना कॉल नाही आला. पुढचे काही आठवडे असेच गेले. आमच्या लग्नाची डेट ही निघुन गेली. दोघांच्या घरी अस्वस्थता पसरली होती. कुणीच कुणाला काहीच बोलत नव्हते. आजकाल, मीराशी जास्त भेटणं होत नव्हतं. रियाने रिझाईन केल्यापासुन कामाचा व्यापही वाढला होता. घरी यायला रात्री बराच उशीर व्हायचा. रिया वाट बघत जागी असायची. मी घरी आल्यावर माझ्यासोबत जेवायला थांबायची आणि मग दिवसभरातल्या तिच्या गप्पा सांगत बसायची. मी घरी यायचो तेव्हा दमलेला असायचो. वाटायचं आता बेडवर पडलो की झोपुन जाईन पण झोप लागायचीच नाही. सारखा मीराचा चेहरा डोळ्यांसमोर नाचायचा. तिचे ते डोळे! आणि चुकुन जरी झोप लागली तरी काहि विचित्र स्वप्नं पडायची आणि मग माझी झोप तुटायची. आज तब्बल १ महिना झाला होता. मीराला भेटुन, तिला पाहुन, तिच्याशी भरभरुन बोलुन. ती फार दुर जात होती माझ्यापासुन कि कदाचित तिला जपायचे माझे प्रयत्न तोकडे पडत होते काय माहित पण आम्हा दोघांत एक अनामिक दरी तयार झाली होती. कसलेही गैरसमज नव्हते तरीही! आणि त्यादिवशी ज्याची भीती होती तेच झाले. मीराच्या घरातुन, तिच्या आईकडुन लग्न मोडल्याचा निरोप आला, तोही नंदा मावशी मार्फत. ममा भयंकर चिडली होती. पण तिला कसं तरी सावरलं. उगाच रियाला यातलं काही कळु नए नाहीतर ती पुन्हा... मी स्वत: तर उध्वस्त झाल्यासारखा पण तरीही कसाबसा स्व्तःला सावरत होतो. मी मीराला भेटण्याचा तिच्याशी बोलयचा प्रयत्न करत होतो पण ती मला भेटायला तयार नव्हती. फक्त तिने टेक्स्ट केला, "अ‍ॅम सॉरी बट आय कॅन्ट टॉलरेट धीस एनीमोअर!" 
"व्हॉट आर यु टॉकींग अबाउट? मीरा प्लीज, डोन्ट डु धीस टु मी, मी नाही राहु शकत तुझ्याशिवाय प्लीज, मीरा टॉक टु मी!" 
"अ‍ॅम सॉरी, आय थिंक देअर इज नथिंग टु टॉक अबाउट. बाय." बस्स हा तिचा शेवटचा टेक्स्ट! मी दिवसातुन किती वेळा तरी वाचत असे. 

रियाला सारं काही जाणवत होतं. पण ती तसं दाखवत नव्हती. आम्हीही सगळे तिला या सगळ्या गोष्टींपासुन दुरच ठेवत होतो. त्या रात्री मी असाच तिच्या रुमच्या बाल्कनित उभा होतो. दुर कुठेतरी आकाशात बघत. मनात साहजिकच मीरा. आणि सारखा सेल फोन चेक करत. कदाचित तिचा कॉल किंवा टेक्स्ट येईल. मागुन खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. मी वळलो. रिया होती. "अरे, सॉरी. मी जातो. तु झोप." मी जायला वळलो. 
तिने माझा हात धरुन थांबवलं. "थांब ना थोडा वेळ, जरा गप्पा मारुया. बरेच दिवस बोललो नाही आपण. म्हणजे मी बोलतच असते. पण तु काहीच बोलत नाहीस." 
"असं काही नाही गं! बस्स!" 
"तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही का रे? इतकं सगळं झालं घरात आणि मला कुणी काहीच सांगत नाही. बरोबर का सांगाल? मी कोण लागते तुमची? आईनेही काही नाही सांगितलं. गेले दोन महिने मी तुझ्या घरी आहे आणि एवढं सगळं झालं तरी मला काहिच कोण सांगायला तयार नाही." 
"अरे काही नाही झालं, तु झोप चल. औषधं घेतलीस तु?" 
"विषय नको रे बदलुस, प्लीज. मला माहित आहे सगळं, आणि हे ही ठावुक आहे की हे सगळं माझ्यामुळेच झालयं.माझ्यामु़ळेच मीरा तुझ्या आयुष्यातुन निघुन गेली. पहिल्यांदा मला माझा संसार सांभाळता नाही आला आणि आता तुझ्या आयुष्यातही मी... " 
"स्टॉप इट रिया. असं काही नाहीए. मला माहित होतं की तुला हे असंच वाटणार आणि तु टेंशन घेणार म्हणुन तुला आम्ही काही सांगितलं नव्हतं. तसं पण मला माहित आहे कि मीरा मला सोडुन नाही राहु शकत. मी आणेन तिला परत. फक्त ती माझ्याशी बोलत नाहीए आणि भेटत नाहीए. तु काहीही काळजी करु नकोस आणि प्लीज कसलंही टेंशन घेउ नकोस, निदान बाळासाठी. होईल सगळं ठीक. माझा माझ्या प्रेमावर पुर्ण विश्वास आहे. जर मीराही माझ्यावर तितकचं प्रेम करते तर बिलीव्ह मी, ती माझ्याशिवाय कुणा दुसर्‍याचा विचारही नाही करु शकणार. फक्त या सगळ्या प्रकारामुळे ती आणि तिच्या घरातले थोडेसे नाराज आहेत आणि काही नाही. होईल सगळं ठीकं." 
मी तिला हे सगळं सांगत होतो पण स्वतःलाच भरोसा देत होतो कि होईल सगळं ठीक. मी रियाकडे पाहिलं, ती माझ्याकडे पाहत होती. खोलवर, डोळ्यांच्या आरपार. मी नजर चुकवली आणि पुन्हा आकाशाकडे बघु लागलो. ती येवून माझ्या खांद्यावर विसावली. काही न बोलता. आम्ही किती तरी वेळ तसेच उभे होतो आकाशातल्या चांदण्या मोजत. 

रियाचा हा सातवा महिना सुरु होता. दरम्यान पुन्हा एकदा सगळं काही शांततेत सुरु होतं निदान एकमेकांना दाखवायला तरी. नाही तर घरतला प्रत्येकजण व्यथित होताच. गेले ३ महिने माझं आणि मीराचं बोलणं झालं नव्हतं. ना टेक्स्ट, ना कॉल पण मनातल्या मनात आम्ही एकमेकांशी नेहमी बोलायचो. असंच. जेव्हा मला तिच्याशी बोलावसं वाटे, जेव्हा तिची मला प्रकर्षतेने आठवण येई मी तिच्यासाठी एक पत्र लिहायचो आणि माझ्या मेल बॉक्सच्या ड्राफ्ट्समध्ये सेव्ह करायचो. अशी अनेक मेल्स माझ्या ड्राफ्टबॉक्स मध्ये पडुन होती. जी तिला कधी पाठवलीच नाही. लिहायला नाही सुचलं की ती मेल्स परत वाचायचो. असं नेहमी सुरु होतं. या महिन्यात ममीने मोठ्या धामधुमीत रियाचं डोहाळे जेवण पार पाडलं. रिया खुप खुश होती आणि फारच सुन्दर दिसत होती. मीराच्या घरीही मम्मीने आमंत्रण पाठवलं होतं. पण तिथुन कुणी नाही आलं. त्या दिवशी मला मुंबई एअरपोर्ट्वर समीर दिसला. मी आमच्या कंपनीच्या एका गोर्‍या साहेबाला रिसिव्ह करायला गेलो होतो, तर तिथे हा दिसला. फारच खंगला होता. आणि सारखा खोकत होता. त्याला जाउन भेटायचं ठरवलं पण तितक्यात तो गोरा साहेब आला आणि मी तिथुन निघालो. संध्याकाळी घरी आल्यावर रियाला हे सांगु की नको असं झालं होतं. नाही सांगितलं, पण मनात समीरला जाउन भेटायचं ठरवलं. रात्री जेवताना रियाला अचानक त्रास होउ लागला. तिला दम लागत होता आणि तापही भरला होता. तिला ताबडतोब हॉस्पिटलला घेउन गेलो. एक रात्र ट्रीट्मेंट देउन दुसर्‍या दिवशी तिला घरी आणलं. ती खुपच चिंतातुर दिसत होती. काहीच बोलत नव्हती. शांत पडुन होती. मी तिच्या शेजारी बसुन होतो. 
"केव्हा सुटतेय यातुन असं झालयं रे मला!" बोलतानाही तिला धाप लागत होती. 
"शुशुशु... गप्प पडुन रहा! जास्त बोलु नकोस. बरं वाटेल तुला." थोड्यावेळाने ती झोपी गेली. पण हे असं नेहमी होत होतं. ती सारखी आजारी पडायची आणि बोलताना तिला धाप लागायची.
**************************************************************************** 
एक रात्री असाच बेडवर पडलो होतो. मीराची खुपच आठवण येत होती. ते सारे क्षण आम्ही एकत्र व्यतित केले होते ते सगळे झरझर डोळ्यांसमोरुन वाहत होते. वाटत होतं आत्ता या क्षणी ती समोर यावी आणि मी तिला मिठीत घेउन असाच तिला बघत बसावं. मी तिच्या आठवणीत  असा बुडुन गेलो होतो की इतक्यात कुणाचा तरी टेक्स्ट आला. बघितला तर मीराचा होता, "हाय" इतका एकच शब्द होता त्यात. क्षणभर मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
मी ताबड्तोब तिला रिप्लाय केला, " मीरा, कशी आहेस? खुप मिस्ड करतोय तुला" 
"मी पण" 
"मीरा, प्लीज बोल ना माझ्याशी, किती दिवस झाले रे तुझा आवाज ऐकुन." 
"अम्म नको. खरच नको. मला राहवलं नाही, तुला खुप मिस्ड करत होते म्हणुन टेक्स्ट केला. आपण बोल् नंतर. टेक केअर. गुड नाईट.." 
"ओके.गुड नाईट. टेक केअर. :)" 
खुप बरं वाटलं होतं मला त्या दिवशी. आज किती तरी दिवसानी आमचा संवाद झाला होता.मला ठावुक होतं ती माझ्याशिवाय नाही राहु शकत, मला तरी कुठे जमत होतं.  आज किती तरी दिवसांनी मी शांत झोपलो होतो. त्यानंतर आमच टेक्सट्वर तुरळक असं बोलणं सुरुच असायचं. 
जस जशी रियाची ड्यु डेट जवळ येवु लागली तसतशी माझी आणि घरातल्यांची काळजी वाढु लागली कारण रिया दिवसेंदिवस खुपच अस्वस्थ होत होती. तिच्या चेहर्‍यावर नेहमी कसली तरी चिंतेची रेघ असायची. मी नेहमी तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करायचो पण ती टाळायची. घरातले सगळे जण तिला नेहमी रिलॅक्स ठेवायचा प्रय्त्न करायचे. एक दिवस ती अगदी निपचित पडुन होती. तिला तसं बघुन मी घाबरुन गेलो. काही बोलत नव्हती, फक्त एकटक कुठेतरी बघत, काही खातपण नव्हती. निदान बाळासाठी म्हणुन तरी जेव म्हणुन ममा तिला जबरदस्तीने भरवायची. तिच्या मनात काय चाललं होतं ते कुणालाच कळत नव्हतं. काहीतरी गुढ, खोल असं तिच्या मनात चाललं होतं आणि ते मला स्प्ष्ट जाणवत होतं, पण ते जाणण्यासाठी मी तिला कधी फोर्स नाही केलं.
*********************************************************************************
त्यादिवशी संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान  मी एका महत्त्वाच्या मिटींगमध्ये बसलो होतो. क्लायंट खुपच डोकं खात होता. जवळजवळ दीड तास उलटुन गेला होता तरी त्या क्लायंटचे प्रश्न संपले नव्हते. ममाचा कॉल आला पण मी रिजेक्ट केला. नंतर तिचा टेक्स्ट आला, " रियाला लेबर पेन होतायत, अ‍ॅ'म टेकिंग हर टु हॉस्पिटल, तु ताबडतोब निघ" 
"ओके."  
"सॉरी, जेन्टलमन आय हॅव टु स्टॉप धिस मिटींग हिअर अ‍ॅज आय हॅव टु लिव्ह नाव!" 
"बट अ‍ॅम नॉट डन यट." 
"बट अ‍ॅम डन!" आणि मी तिथुन निघालो. धावतपळत नरीमन पॉईंटवरुन कॅब पकडली, पण मध्येच ट्रॅफिक; कॅब सोडली. परत धावत सीएसटी स्टेशनवर. 
रियाचा कॉल, " या रिया," 
"तु  कुठे आहेस? प्लीज लवकर ये!" बोलताना तिचा श्वास अडखळत होता. 
"डोन्ट वरी, अ‍ॅम ऑन माय वे, मी येतोय. पोचतो लवकर. स्टे स्ट्राँग रिया! अ‍ॅम कमिंग!" 
"प्लीज, लवकर ये, मला नाही सहन होत. प्लीज!!" 
"हो मी येतोय!" 
तिचा आवाज मला फार अस्वस्थ करुन गेला. ऑलमोस्ट प्लॅटफॉर्मवरुन सुटलेली ट्रेन मी धावत धावत पकडली. भायखळा क्रॉस्ड झालं आणि ट्रेन जागच्या जागी थांबली. हलतच नव्हती. ममाचा दोनवेळा कॉल येवून गेला. बराच वेळ झाला तरी ट्रेन हलत नव्हती. शेवटी ट्रॅकवर उतरलो आणि ट्रॅकमधुन धावत सुटलो. चिंचपोकळीहुन मेन रोड्ला आलो तर लालबागला हे ट्रॅफिक. आज काय होतयं तेच कळत नव्हतं. धावतपळत मी हॉस्पिटलला पोचलो. 
लेबररुमच्या बाहेर ममा, वैशु आणि पप्पा होते. 
वैशु??? नाही! वैशु नव्हती! मीरा होती! मला पहिल्यांदा वैशुच वाटली, मीराला मी इथे एक्सपेक्ट करतच नव्हतो. आज किती तरी दिवसांनी मी तिला बघत होतो, पण.... . 
मला बघुन ममा आणि मीरा माझ्याकडे आली, "कशी आहे रिया? डॉक्टर काय बोलले?" 
"काही नाही, सारखी तुला हाक मारतेय, तिला सहन नाही होत वाटतं मला बघवत नाही तिला." 
"मी भेटुन येउ का तिला?" 
"नको, आता नको." 
"मीरा, तु कधी आलीस? तुला कसं कळलं?" मी लेबर रुमच्या दिशेने जात बोललो. 
मीराही माझ्याबरोबर चालु लागली. "आत्ताच आले, रियाने कॉल केला होता." 
"रियाने? तूला कॉल केला?" मी विस्मयाने विचारलं. 
"हो रे, मला ही कळेना. बोलली, तु प्लीज ये. मला सहन नाही होत!" 
"ओके" 
थोडीशी शांतता.. पण ती माझ्याकडे बघत नव्हती.. 
"कसा आहेस तु?" खुप वेळाने तिने विचारलं. 
"बस्स ठीक.मला रियाची काळजी वाटतेय. गेले काही दिवस ती खुपच अस्वस्थ होती. काही बोलतच नव्हती." 
"डोन्ट वरी, होईल सगळं ठीक." ती बोलली. मी तिच्याकडे बघुन हसलो. ती ही गालातल्या गालात हसली. 
एक - दीड तासांनी डॉक्टर बाहेर आले, " हाव इज शी? इज एव्हरिथिंग ओके?" मी विचारलं. 
"या, एव्हरिथिंग इज ओके. काँग्रॅट्स इट्स अ बेबी बॉय! अ‍ॅन्ड बोथ मदर अ‍ॅन्ड बेबी आर फाईन." 
माझा जीव भांड्यात पडला. "थँक्स! थँक्स सो मच डॉक्टर! कॅन वी सी हर?" 
"या, आफ्टर समटाईम्स, त्या आता शुध्द्दीत नाहीय. नर्स तुम्हाला सांगतिलच."
"ओके."
ममा आणि मीरा लेबर रुम मध्ये गेल्या मी बाहेरच होतो. मनात पटकन आलं आज, तिला समीरची गरज होती. किती कमनशीब आहे साला! 
रियाला दुसर्‍या वार्डमध्ये शिफ्ट केलं तेव्हा मी तिला बघायला गेलो. पार थकुन गेली होती. पण तिच्या चेहर्‍यावर एक वेगळचं तेज उमटलं होतं. आई होण्याचं. मी तिच्याजवळ गेलो. 
"काँग्रॅट्स, मॉम! " 
"थँक्स बेटा!" तिच्या चेहर्‍यावर हसु उमटलं. 
"आर यु ओके?" 
"या, गुड! अचानक काहितरी वेगळचं वाटतयं रे! पोट रिकामी झालं पण मन आईच्या 
बनण्याच्या जाणिवेने अचानक भरुन आलयं!" 
"थँक्स टु यु, मी तुझे हे उपकार आयुष्यभर नाही विसरणार! आज समीर असयला हवा होता शेजारी, पण.. '' तिचे डोळे भरुन आले. 
एवढ्यात ममा आणि मीरा बाळाला घेउन आले आणि बाळाला रियाकडे दिले. तिच्या चेहर्‍यावरचं ते समाधान, तो आनंद, ते सगळे भाव जगात मला आतापर्यंत कुठेही दिसले नव्हते. ती डोळे भरुन बाळाकडे पाहत होती आणि आम्ही तिला. मीरा माझ्याबाजुलाच उभी होती. खरं तर मला रियाच्या जागी मीराच दिसत होती. काही वेळाने मी आणि मीरा जायला निघालो. 
रियाचा निरोप घेतला आणि निघालो. "चल मी तुला सोडुन येतो. खुप उशीर झाला ना?" 
"अम्म, हो रे." 
आम्ही तिथुन माझ्या घरी गेलो, आणि रियाची कार घेउन मी मीराला तिच्या घरी सोडायला गेलो. वाटेत कुणीच काही बोलत नव्हतं, ना ती ना मी! तिचं घर आलं तेव्हा ती जायला निघाली. "मीरा!!!" 
"अं? काय?"  
"काही नाही, थँक्स तु आज रियासाठी आलीस."  ती फक्त हसली काही बोलली नाही. 
"जाउ आता? इट्स टु लेट नाव!" परत ते परके शब्द! माझ्या जिव्हारी लागले, 
"ओके. गुड नाईट. अ‍ॅन्ड थॅन्क्स अगेन!" 
"इट्स ऑल राईट!" आणि ती निघुन गेली, मागे एकदाही वळुन न बघता. जेव्हा तिच्या रुममधली लाईट बंद झाली तेव्हा मी तिथुन निघालो.
त्यानंतर मी एक आठवडा सुट्टीच टाकली. तशी गरज नव्हती पण यावेळी रियाच्या सोबत असणं मला फार गरजेचं वाटत होतं. ती खुप खुश दिसत होती. तिच्या चेहर्‍यावरची ती चिंतेची रेघ पुसट झाली होती पण ती पुसली  गेली  नव्हती याची मला पुर्ण कल्पना होती. तिचं बाळं खरचं खुप गोड होतं. अगदी तिच्यासारखं. पण खुप सुस्ताड होता. सारखा झोपुन राहयचा आणि बिलकुल रडायचा नाही. 
"कसा रे हा, नुसता झोपलेला असतो. नुसता दुध पितो आणि झोपुन जातो." 
"हो गं, पण सही आहे! अगदी श्रीमंतांची लक्षणं आहेत, मस्त आरामात जगायचं, आपण याला श्रीमंत म्हणुया!" 
"सही आहे, श्रीमंत! " ती त्यापुरती माझ्याशी हसायची, बोलायची पण माझी पाठ वळली कि अस्वस्थ व्हायची. मला ते लगेच जाणवायचं, कसं ते माहीत नाही. दरम्यान मीराचं आणि माझं टेक्स्टवरच बोलणं व्हायचं. ३-४ दिवस झाले असतिल. रिया थोडीशी रिकव्हर झाली होती. म्हणजे उठुन फिरण्याइतपत. मम्मी दिवस रात्र तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्येच असायची.
त्या दिवशी, सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला बाहेर पडलो आणि ममाचा कॉल आला. 
"अरे तु लवकर हॉस्पिटलमध्ये ये, एक प्रॉब्लेम झालायं." ती घाई घाईत बोलत होती.
"काय झालं? रिया ठीक आहे ना? बाळं ठीक आहे ना? " 
"तु ये तर आधी मग सांगते तुला!" 
मी तसाच रियाची कार घेउन हॉस्पिटलला पोचलो. धावतच रियाच्या वार्ड्मध्ये पोचलो. बेडवर रिया नव्हती. पाळण्यात बाळंही नव्हतं. ममा डोक्यावर हात ठेवून बसली होती. मला बघताच ती माझ्याकडे आली आणि रडु लागली.
"ममा काय झालं? रिया कुठे आहे? आणि बाळं कुठे आहे? काय झालं सांगशील का?" एव्हाना माझ्या डोक्यात नको नको ते विचार थैमान घालत होते. 
रडत रडत ममाने एक चिठ्ठी माझ्या हातात दिली, मी थरथरत ती ओपन केली आणि वाचु लागलो.
"डीअर आकाश, 
मी तुझी खुप आभारी आहे, आभारी म्हणण्यापेक्षा आयुष्यभर ऋणी राहिन. मैत्रीच्या एका शब्दाला तु जागलास आणि माझ्या सुखासाठी स्वःताच्या सुखाची पर्वा केली नाहीस. 
मला हे सगळं जाणवत होतं. पण मी काहीच करु शकत नव्हते. अडकले होते ना म्हणुन. 
तु, आई, बाबा, वैशु आणि मीरा सगळ्यांनी माझ्यासाठी खुप सोसलं. मला कशाचीही कमी राहु दिली नाही.मला कळत नाही की तुम्हा सर्वांचे मी आभार कसे मानु? पण माझ्यामुळे तुझ्यात आणि मीरा मध्ये झालेली दरी मला पाहवत नव्हती. आपल्यात तसं काही नव्हतं, निखळ मैत्रीशिवाय, नाही का? पण आज खरं सांगते, मी तुझ्या बाबतित स्वार्थी झाले होते. नेहमी तु माझ्या सोबत असावा असं वाटत राहायचं,. तु सोबत असला की मला खुप बरं वाटायचं. तुझं बोलणं, तुझं असणं या सगळ्यात मला बाकीच्या गोष्टींचा विसर पडयचा. कदाचित तु हे नोटीस केलं की नाही ते माहित नाही पण मीराला ते लगेच जाणवलं. शेवटी ती पण एक स्त्रीच आहे रे. स्त्रीयांच्या मनात काय चाललेलं असतं ना एखादी स्त्रीच ओळखु शकते. तिला जाणवत होतं की मी तुझ्या जवळ येत चाललेयं, म्हणुन ती तुझ्यापासुन दुर जात होती. हे सगळं मला पाहवत नव्हतं. तुझं तिच्या आठवणीत अस्वस्थ होणं आणि तरीही मला बरं वाटावं म्हणुन माझ्याशी वेगळा आकाश होउन वागणं, खरचं मला तुझा हेवा वाटायचा. वाटायचं की का नाही तु समीरच्या आधी मला भेटलास. असो. 
त्या दिवशी मी मीराला कॉल केला होता. बराच वेळ तिच्याशी बोलले. खुप प्रेम करते रे ती तुझ्यावर आणि मला माहित आहे तु ही तितकचं करतोस तिच्यावर. 
माझं काय? चल मी आता तुला तु मला दिलेल्या शब्दातुन मुक्त करते. बघ पुन्हा एकदा स्वार्थी झाले ना मी? 
मी इथुन चाललेय. श्रीमंतांना घेउन. 
घाबरु नकोस.
मी सगळी अरेंजमेंट करुन ठेवलिय. मी  काहीही वेडंवाकडं करणार नाहीए. मी माझ्या बाळासोबत राहिन्. कुठे चाललेय ते नाही सांगत, कारण मला माहित आहे साल्या तु मला परत घेउन येशील. यापुढचं आयुष्य मी आणि श्रीमंत मस्तपैकी जगायचं ठरवलयं. 
मागच्या ४-५ महिन्यात तुम्हा सर्वांकडुन खुप काही शिकलेयं. स्पेशली तुझ्याकडुन! 
आईला सांग जरा या पोरीला माफ कर म्हणुन. 
मी कोणाचाही निरोप न घेता निघतेय. एक दिवस नक्की भेटायला येईन. आणि हो बाळाचं नाव मी श्रीमंतच ठेवलयं, सही ना?. 
मीराला मला माफ  करायला सांग आणि तुम्ही लवकर लग्न उरका! 
चल आवरते मला जास्त लिहिता येत नाही. डोळेही पाणवलेत आणि तु ही समोर नाहीस; असला असतस तर अश्रु जमिनीवर पडण्याआधिच पुसले  असतेस. खरचं तुला अश्रुंची किंमत जास्त कळते. यु टेक केअर. 
बघु, पुढे मागे तुला भेटायला नक्की येईन, तोपर्यंत जरा माझ्या पिल्लासोबत मस्त विहार करुन येते. पिल्लाबरोबर मी ही जरा उडायला शिकेन. 
तुझी,
रिया."

मी चिठ्ठी चुरगळली आनि खिश्यात टाकली. ममा मला बिलगली होती. मी तिला शांत केलं आणि आम्ही घरी आलो. हा एक प्रचंड मोठ्ठा धक्का होता आमच्यासाठी पण.... 
जाउ दे!! नको त्या आठवणी... 
 ******************************************************************************
त्या संध्याकाळी मी रियाच्या रुमच्या बाल्कनीत उभा होतो. रियाची खुप आठवण येत होती. कशी असेल? कुठे असेल? त्या ३-४ दिवसांच्या पिल्लाला घेउन कुठे गेली असेल? माझं डोकं सुन्न झालं होतं. मला काहीच कळत नव्हत. त्या रुममध्ये सारखी तीच दिसत होती. घरातले सगळे शांत होते. गेले ४-५ महिने तिची सवय झाली होती. काय करु? तिला शोधायला कुठे जाउ? काहिच कळत नव्हतं. तिचं ते पत्र, ती आणि मीरा असं सारं काही माझ्या मनात नाचत होतं .
अश्याच त्या चक्रात गुंतलो होतो  कि माझ्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला, रिया!!!  माझ्या मनात पटकन तिचाच विचार आला. 
वळलो तर समोर मीरा उभी होती. मी तिच्याकडे एकटक बघत आणि ती ही माझ्याकडे एकटक बघत. दोघे काहिच बोललो नाही. ती पुढे आली आणि माझ्या मिठीत विसावली. तिने मला घट्ट कवटाळलं, "अ‍ॅम सॉरी एके! मी नाही रे राहु शकत तुझ्याशिवाय, अ‍ॅम रिअली सॉरी! मी नाही जाणार परत तुला  सोडुन!" 
तिच्या अश्रुनी माझा खांदा भिजला होता. 
निशिगंध बहरुन माझ्या रोमांरोमांतुन वाहु लागला..पण सुगंध ओळखता येईना...... 

रिया??????????????????

की

मीरा??????????????????


समाप्त.