Saturday, October 3, 2009

पैलतीर........अंतिम

"काही नाही रे. बस असचं. तुझी काळजी वाटते."
" चल मग मी निघतो. फ्रेश होउन येतो. मग पार्कात फिरायला जाउ. "
" ओके. लवकर ये रे. !" असं म्हणुन चिन्मय तिथुन निघला.
पुढचे काही दिवस असेच निघुन गेले. नेहाचे ते चाळे सुरुच होते. एके दिवशी प्रिया काही मित्रांसोबत पार्कात बसली होती. नेहाने तिला पाहिले आणि तीला चिडवण्याच्या हेतुने तिला बरचं काही बोलुन गेली. प्रिया फक्त ऐकत होती. नेहा मोठ्या मोठयाने ओरडत होती आणि आजुबाजुचे लोक त्यांच्याकडे पाहत जात होते. प्रियासोबत असलेल्या मैत्रीणींनी नेहाला गप्प करण्याचे बरेच प्रयत्न केले पण ती ऐकायच्या मुडमध्ये नव्हती. प्रिया शांतपणे ऐकत होती आणि तिच्या डोळ्यांतुन अश्रुंची धार सुरु होती. शेवटी वैतागुन प्रिया जायला निघाली. ती रस्त्याच्या कडेवरुन डोळे पुसत चालली होती. मागुन नेहा त्या मुलाबरोबर बाईकवरुन येत होती. बाईकवरुन जाता जाता नेहाने प्रियावर लाथ मारली आणि अतैशय क्रुरपणे हसत भरधाव निघुन गेली. नेहाने मारलेल्या लाथेमुळे प्रिया रस्त्यावर पडली. ते बघताच तिच्या मैत्रीणीनी धावत येउन तिला सावरले. प्रिया अतिशय व्यथित होउन रडायला लागली. मानसीने तिला घरापर्यंत सोडले. प्रियाने मानसीला हे सगळं चिन्मयला सांगु नको म्हणुन सांगितले. पण चिन्मयला कुठुन तरी समजले. तो तडक प्रियाकडे गेला आणि त्याबाबत त्याने प्रियाला विचारले. प्रियाने त्याला झाला प्रकार कथन केला.
" बस्स ! दॅट्स द लिमीट ! मी तिला सोडणार नाही आता ! " चिन्मय रागाने बाहेर पडला.
प्रियाने त्याला थांबवले. " जाउ दे रे ! मला काही फरक नाही पडत. जाउ दे ! मला कळत नाहे की ती अशी विअर्ड का वागतेय. जस्ट फरगेट इट ! "
" नो ! आय वोन्ट ! तीने मला काही बोलावं तुला बोलण्याचा तिला काहीएक हक्क नाही. तिला मी बघुन घेतो आता. ! " चिन्मय तडक बाहेर पडला. तो नेहाच्या घरी गेला. नेहाची आई होती.
" नेहा कुठे आहे ?" त्याने विचारले. "का? काय काम आहे? " नेहाच्या आईने दारातच विचारले.
तिला न जुमानता चिन्मय घरात शिरला. आणि नेहाला हाक मारु लागला. नेहाचे वडील बाहेर आले.
" काय झालं बेटा ? नेहा नाहीए इथे.ती काही वेळापुर्वीच लंडनला निघुन गेली तिच्या आत्याकडे."
दात ओठ खात चिन्मयने त्यांच्याकडे पाहिले. तो रागाने लालबुन्द झाला. समोर असलेला फिशपॉन्ड जमीनीवर ढकलुन दिला. सगळीकडे काचा आणि पाणी पडले.आणि काही मासे तडफडु लागले. ते पाहुन नेहाची आई आणि वडील घाबरुन गेले. " अरे काय झाले काय ? " नेहाच्या वडीलांनी विचारले.
" काय झालं ? जर आता तुमची मुलगी समोर असली असती ना तर तुम्हाला कळलं असतं. सांगुन ठेवा तुमच्या मुलीला की यापुढे माझ्या समोर जरी आली ना तर ...... " नेहाची आई घाबरुन एका जागी बसली होती.
चिन्मय तिथुन निघुन गेला। त्या गोष्टीला बरेच महिने निघुन गेले. सर्व काही सुरळीत होते. त्यानंतर नेहाचा काही पत्ता लागला नाही.चिन्मयही सगळं काही विसरुन गेला.यथावकाश चिन्मय आणि प्रियाचं लग्नही झालं. लग्नानंतर काही महिन्यातच प्रियाने ती आई होणार असल्याची न्युझ चिन्मयला दिली. चिन्मय आनंदाने वेडा झाला होता. प्रियाला कुठे ठेवु आणि कुठे नको असं त्याला झालं होतं. दिवसेदिवस प्रिया अजुनच सुंदर दिसत होती. प्रत्येक दिवशी चिन्मय आणि प्रिया बाळाच्या येण्याचा जाणिवेने हरवून जायचे. प्रियाला आता सातवा महिना सुरु होता. एके दिवशी चिन्मयला कंपनीच्या कामासाठी नाशिकला जायचे होते. प्रियाही जायचा हट्ट धरुन बसली. चिन्मय तिला समजावत होता पण ती ऐकेना. शेवटी चिन्मय तिला घेउन गेला. रात्री मुंबईला परतत असताना अचानक रस्त्यात पाउस पडु लागला.रस्त्यात परतत असताना प्रियाच्या पोटात अचानक दुखु लागले. वेदनांनी ती विव्हळू लागली. चिन्मय आजुबाजुला हॉस्पिटल किंवा एखादा दवाखाना शोधत ड्राईव्ह करत होता. पण कळवळणार्‍या प्रियाला त्याला बघवत नव्हतं. तो तिला धीर देत होता. भिवंडी बायपासजवळ येताच टर्नवर प्रिया अचानक ओरडली. तिला बघताच चिन्मयचा कारवरील ताबा सुटला आणि समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने त्याच्या गाडीला चिरडुन टाकले. ..................................
**********************************************************************************
गाडीने आता वेग घेतला आणि ती मुंबईच्या दिशेने सुसाट पळू लागली. दोन - तीन वेळा चिन्मयने मिररमध्ये पाहिलं नेहा त्याच्याचकडे बघत होती. तिचे डोळे जड दिसत होते. चिन्मय तिला टाळत होता पण नेहाची नजर हटत नव्हती. पश्चाताप आणि करुणेची छटा तिच्या चेहर्ञावर स्पष्टपणे जाणवत होती. इतक्यात परत चिन्मयचा फोन वाजला. त्याने गाडी बाजुला घेतली.
" हा आई, काय झालं?" ........." व्हॉट ? कधी आणि कशी ????? ........ तु पहिल्यांदा तिला हॉस्पिटलला घेउन जा..... मी..म म्मी मी...... पोहोचतो अर्ध्या तासात ! अगं पण हा सातवा महिना आहे ना अचानक कसं काय.????? " ........... " ए पियु काय झालं गं? खूप दुखतयं का रे? डोन्ट वरी मी येतो लगेचच...... पियु.....तु बोलु नकोस जास्त ... मी म ....मी मी पोहचतो... आय लव्ह यु जान !!!! .........." आई तिला तबडतो हॉस्पिटलमध्ये घेउन जा ! मी पोहचतो.... !!! "
"काय झालं मि. चिन्मय ??? " राहुलने विचारले.
" नाही! काही नाही ! आय थिन्क शी नीड्स मी !!! मला पोहोचलं पाहिजे ताबडतोब." चिन्मयने गाडी सुसाट सोडली....त्याला धड काही सुचत नव्हतं. सारखा प्रियाचा आवाज त्याच्या कानात घुमत होता. त्याने काही मित्रानां आणि मैत्रीणींना फोन केले आणि घरी जाउन आईची मदत करायला सांगितले. तो खूपच टेन्स्ड झाला होता.राहुल त्याला धीर देत होता. आता ते भिवंडी बायपासच्या इथे पोहोचले होते. बायपासच्या टर्नजवळ येताच चिन्मयचा फोन परत वाजला. प्रियाचा फोन होता. फोन डॅशबोर्डवरुन उचलता उचलता अचानक हातातुन सटकला आणि खाली पडला. एका हाताने स्टेअरिंग सांभाळत असताना वळणावर अचनक समोरुन एक ट्रक सुसाट आला. राहुलने ते पाहिले आणि ऑरडला "मि. जाध........व !!!!!" ते पाहताच चिन्मयने पटकन ब्रेक मारुन स्टेअरिंग वळवले पण गाडिवरचा त्याचा ताबा सुटला. त्याचवेळी ट्रकवाल्यानेही कचकन ब्रेक दाबले आणि थांबवायचा प्रयत्न केला पण नियतीला ते मान्य नव्ह्ते. ट्रकने कोणतीही दयामाया न दाखवता त्या ऑडीला चिरडुन टाकले. एक कर्कश किंकाळी ऐकु आली आणि सेलफोन रिंग होत होता....
"चिन्मय्य्य्य्य्य्य्य !!!!! " नेहाने किंकाळी फोडली..... दचकून राहुल जागा झाला..
." काय..... झालं नेहा???? " नेहाने आजुबजुला पाहिलं ती तिच्याच गाडीमधे होती. राहुल बाजुला होता.. तिला कळेना आपण इथे कसे काय? ती फार घाबरली होती. घामाने डबडबून आणि धापा टाकट होती. राहुललाही कळेना की काय झालं?
" काय गं काय झालं काही स्वप्न वैगेरे पहिलंस का? "
" राहुल आप....प्ण कुठे आहोत सध्या? "
" कुठे म्हणजे ? रात्री गाडी खराब झाल्यापासुन इथेच आहोत. पावसात कुणी लिफ्ट देत नव्हतं. तु ही झोपी गेलीस. म्हणुन मग वैतागुन मी ही झोपलो.. पण झालं काय? " आता नेहाला कळलं की ते एक भयानक स्वप्न होतं. ती ताळ्यावर आली. राहुलने तिला पाणी पाजलं. आता तिला बरं वाटु लागलं. पण ते स्वप्न तिच्या मनातुन जाईना. तिचं मन सारखं चिन्मय आणि प्रियाबोवती घुटमळू लागलं. ती गाडीबाहेर पडली तिच्यापाठोपाठ राहुल बाहेर आला. हाय वे वर बरच ट्रॅफिक जमा झालं होतं. त्याने घडाळ्याकडे पाहिलं. साडे चार वाजले होते. ट्रॅफिक बघुन तो अजुनच वैतागला. बाजुला उभ्या असलेल्या व्यक्तिला त्याने विचारले, " अरे भाई सुनो ! क्या हुआ? इतना ट्रॅफिक क्युं है ?"
" कुछ नहीं साहब, अ‍ॅक्सिडेंट हुआ है आगे. एक कपल था गाडी में. ट्रकने उडाया !!! " नेहा पटकन चपापली....तिला हा संवाद ओळखिचा वाटला....पण तिला धड आठवत नव्हतं...राहुलने एका ट्रकवाल्याच्या मदतीने कशी तरी गाडी सुरु केले आणि सुटकेचा नि:श्वास टा़कला.काही वेळाने ट्रॅफिक हळूहळू मुव्ह होउ लागले. नेहाला काही सुचत नव्हतं. ती डोळे बंद करुन शांत पडुन होती आणि त्या स्वप्नाचा माग घेत होती. काही वेळाने जिथे अ‍ॅक्सिडेंट झाले होते तिथुन ते पास झाले. ट्रकने कारच्या चिंधड्या उडवल्या होत्या...डेड बॉडीज दिसत नव्हत्या.गाडीची हालत बघुन नेहाच्या अंगावर सरक्न कटा उभा राहिला... बरेच पोलीस उभे होते आणि ट्रॅफिक हलवत होते. राहुल आणि नेहा तिथुन पास झाले. नेहाने ठरवलं घरी गेल्यावर चिन्मय्च्या किंवा प्रियाच्या घरी जाउन त्यांना भेटायचं आणि त्यांची माफी मागायची...यथवकाश सकाळी साडे सहा - सात वाजता ते घरी पोहोचले. घरी जाताच नेहा बेडवर पडली. रात्रीच्या प्रवासात दमल्यामुळे ती गाढ झोपी गेली. दुपारी कसल्याश्या स्वप्नाने तीला जाग आली. घाबरुन ती बेडवर उठुन बसली. नंतर तिच्या लक्ष्यात आले की तिला चिन्मयला भेटायला जायचे आहे. उठुन ती किचनमध्ये गेली. कॉफी बनवली आणि हॉलमध्ये टीव्हीच्या समोर येउन बसली. राहुल घरी नव्हता.चॅनेल्स सर्फ करता करता एका न्युझ चॅनलवर येउन थांबली आणि समोरची ब्रेकींग न्युझ बघता तिच्या हातातला कॉफीचा कप खाली पडला. न्युझरिडर बोलत होती.
" काल रात्री सुमारे साडेतीन - चारच्या सुमारास भिवंडी बायपास इथे झालेल्या एका अपघातात एका भरधाव ट्रकने एका कारला उडविले। कारमध्ये असलेल्या जोडप्याचा जागीच म्रुत्यु झाला. कारमधील जोडपे हे दुसरे - तीसरे कुणी नसुन मर्सीडीज इंडियाचे सेल्स जनरल मॅनेजर मि. चिन्मय जाधव आणि त्यांची पत्नी सौ. प्रिया जाधव होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की सौ. प्रिया जाधव ह्या गर्भवती होत्या....... " पुढे नेहाला काहिच ऐकु येत नव्हते. हतबल होउन ती टीव्हीवरील क्लिप्स पाहत होती..........रात्री पडलेले स्वप्न काय होते ते तिला आता कळून चुकले. आतापर्यंत ती एकाच तीरावर होती. आपलं सारं काही तीने एका तीरावर वसवलं होतं जाणिवपूर्वक दुसर्‍याना दुखवून त्यांना पैलतीरावर सोडुन ती निघुन गेली होती. आयुष्यात पैलतीरही असतं याची तिला जाणिव झाली कारण काल रात्री ती त्या तीरावर जाउन आली होती.....
**********************************************************************************
नमस्कार.
सर्वात पहिल्यांदा मी माफी मागतो की जुलैला सुरु केलेली ही गोष्ट संपवायला आज ऑक्टोबर उजाडला आहे। काही विशेष कारणांमुळे आणि मुख्यतः माझ्या आळशीपणामुळे ही गोष्ट संपवायला उशीर झाला. मी काही मोठा लेखक नाही पण ही माफी मी काही स्पेशल लोकांसाठी मागत आहे. इन फॅक्ट या सर्वानी माझ्या प्रत्येक पोस्ट्ला खूप चांगला प्रतीसाद दिला वेळोवेळी लवकर पोस्टस संपवावी म्हणून मला शिव्याही घातल्या. मजा आली. बरं वाटतं.या ब्लॉगमुळे बरेच मित्र मिळाले. अगदी जगभरातुन. अशीच एक मैत्रीण साधना हिने मला ही गोष्ट पूर्ण करायला बरीच मदत केली. नेहमी शिव्या घातल्या. अगदी हक्काने. मला खूप बरं वाटलं. त्यानंतर सखीनेही मला खूप प्रोत्साहीत केले. सागर आणि काही अपरिचित मित्रानीं वेळोवेळी प्रतीसाद देवून फारच प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अतिशय आभारी आहे.
अजुन बरच काही लिहायचं आहे। आळसातुन आणि कामातुन वेळ मिळाल्यावर नक्की लिहिन. तोपर्यंत चीअर्स........ !!!!!!

समाप्त.