बरोब्बर साडे बारा वाजता ट्रेन कुडाळला थांबली. लगबगीने ती
स्टेशनवर उतरली आणि बाहेर आली. स्टेशनबाहेर प्रवाशी आणि रिक्षांची झुंबड
उडाली होती.कोकणात पहिल्यांदाच तिने पाउल ठेवं होतं आणि जसं अभी सांगायचा
अगदी तसंच
वातावरण होतं ते. दुपार असली तरी वार्याची एक मंद झुळूक अंगावरुन वाहतच
होती.इथुन तिला अभयच्या गावी जाण्यासाठी एसटीने जाणे भाग होते. रिक्षा करुन
ती एसटी स्टँडवर जायला निघाली.तिथे पोचल्यावर तिने चौकशी खिडकीपाशी जाउन
गाडीची चौकशी केली तेव्हा गाडीसाठी अजुन १५-२० मि. बाकी होती.तोवर ती गाडीची वाट बघत
तिथेच बसली आणि आजुबाजुला न्याहळू लागली. स्टँडवर थोडी गर्दी
होती. गाडीची वाट बघत कुणी गप्पा मारत होते.शाळा कॉलेजच्या मुलांचा गोंधळ सुरु होता.क्वचित एखादे रडणारं लहान मुल आणि त्याला धपाटा घालणारी आई.बाजार करुन आता घरी जायची वाट बघत असलेल्या बायका. या सगळ्यात
कोणतीही गाडी आली की त्याच्यामागे धावणारे हे सगळे लोक आणि एका विशिष्ट
आवाजात त्या गाडीची होणारी अनाउंसमेंट. हे सगळं ती बघून हसत होती. मग ५-१०
मि. तिला समजलं की इथे बसुन गाडी मिळणार नाही. कारण मोस्ट ऑफ गाड्यांचे फलक
धड वाचताच येत नव्हते. मग ती सुद्धा एखादी गाडी आली की त्या लोकांमध्ये
मिसळून जायची. अभी पण त्या एसटी स्टँडवरची ही गम्मत नेहमी सांगायचा.तिला ते
आठवलं आणि उगाचच स्वतःवर हसू आलं. १५ मि. तिची गाडी आली आणि पुन्हा ती
त्या सगळ्या लोकांमध्ये मिसळून गेली.लोकांची घाई फक्त बसण्यासाठी जागा हवी
म्हणून होती हे तिला महत्प्रयासानी एसटीत चढल्यावर कळलं.कशी बशी तिला एक
विंडो सीट मिळाली आणि ती स्वतःवरच खुश झाली.बसमध्ये नुसता गोंधळ सुरु होता
आणि तो सुद्धा मालवणीत.ती ते एक एक संभाषण ऐकायचा आणि समजायच प्रयत्न करत
होती. मालवणी भाषा समजायला कठीण नव्हती पण तिला ती बोलता नसती आली.कधी कधी
ती अभयला संगायची,"मला पण शिकव ना रे मालवणी." मग तो सांगायचा एखाद्या
मालवणी मुलाशी लग्न कर महिन्या-दोन महिन्यात मस्त बोलायला लागशील. त्यावर
ती नाक मुरडायची. गाडी बरीच भरली होती आणि त्या सगळ्या गर्दीतुन वाट
काढत,लोकांच्या सामानावर पाय ठेवत, शिव्या घालत आणि लोकांच्या शिव्या घेत
कंडक्टर तिकिटं फाडत होता. काही वेळाने गोंगाट कमी झाला. बरीच लोकं उतरली
होती. तिला लास्ट स्टॉपवर उतरायचं असल्याने काळजी नव्हती.पाउण एक तासाने
गाडी एका मो़कळ्या पठारावर आली. दोन्ही बाजुला लांबवर पसरलेलं पठार आणि
मधून ती एसटी सूसाट धावत होती. वार्याने उडणारे केस सावरत ती दूरवर त्या
पठारकडे बघत होती. कातळावर मध्येच कुठेतरी सोन्यासारख्या पिवळ्या गवताचा
पट्टा तिच्याबरोबर धावत होता. त्यावर चरणारी गुरं, एखादं दुसरं झाड, एखादी
टपरी, मध्येच कुठल्यातरी गावाला गेलेली वाट, असं सारं तिच्याबरोबर मागे पडत
होतं. एसटी शिडांत हवा भरलेल्या जहाजासारखी ते पठार कापत सूसाट निघाली
होती.थोड्यावेळाने पठार संपलं आणि एक दोन स्टॉप घेउन एसटी एका घाटातून उतरु
लागली तोच तिची नजर समुद्रवर गेली आणि समुद्राचे दर्शन होताच ती हरखून
गेली. दूरवर तो समुद्र पसरलेल होता.मध्येच एक डोंगर समुद्रात घुसला होता.
दुपारच्या वेळी शांतपणे लाटा किनार्याला थोपटत होत्या. गाडी घाटवळनातून
जात असल्याने समुद्र मधे मध्येच दिसायचा पण त्या घाटवळणातूनच तो फार छान दिसत
होता. अभी नेहमी सांगायचा ती हीच जागा तर नसेल ना. तिला आठवलं अभय नेहमी
त्या जागेचा उल्लेख करायचा. गाडी घाट उतरुन आता त्या छोट्याश्या शहरात
शिरली आणि पाच एक मिनिटात एसटी स्टँडवर पोचली.
"चला, लास्ट स्टॉप." म्हणत कंडक्टरने आरोळी दिली आणि बाकीच्या प्रवाशांसोबत ती खाली उतरली तेव्हा दुपारचे पावणे तीन वाजले होते.तिने वळून पाहिलं हे एसटी स्टँड फार प्रशस्त होते. पशिमेकडुन समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येत होती.गाड्यांसाठी फलाट होते आणि कसलाही गजबजाट नव्हता. ती अभयच्याच गावी पोचली होती. फक्त त्याने कधी तरी उल्लेख केल्याप्रमाणे स्टँडवरुन रिक्षाने त्याच्या घरी जायचं होतं.पण काही केल्या तिला त्या जागेचं नाव आठवेना. आता काय करायचं या विचारात ती पडली.बराचवेळ डोक्याला ताण देउन झाला तरी तिला ते नाव आठवेना.पण तिथे उभं राहुन काही होणार नव्हतं म्हणुन तिने रिक्षावाल्यांना विचारायचं ठरवलं. अनोळख्या ठीकाणी ते थोडं रिस्कीच होतं म्हणा पण नाईलाज होता.
रिक्षा स्टँडवर जाउन तिने अभयच्या नावावरुन त्याच्या घराची चौकशी करायचा प्रयत्न केला पण ते नाव धड कुणाला माहित नव्हतं. मोठी पंचाईतच होउन बसली होती.काय करावं या विचारातच असताना एक रिक्षावाला तिच्याकडे आला आणि त्याने विचारलं,
"म्यॅडम,ते अभय पाटकर म्हणजे मुंबैवाले काय?"
"हो! हो ! मुंबईलाच असतात ते." तिला थोडा धीर आला.
"तुमच्याकडे त्येन्चा पूर्ण अॅड्रेस नाही काय किंवा मोबाईल नंबर वैगरे?" त्याने विचारले.
"नाही ना! म्हणजे याच शहरात तो राहतो कुठेतरी पण मला त्या जागेचं नावंच आठवत नाहीय."
"अरे देवा, आता काय? मला वाटता म्यॅडम तेंचा घर समुद्राच्या बाजुस आसा काय?" काही तरी आठवल्यासारखं करुन तो रिक्षावाला बोलला.
"होय अगदी. त्याचं घर समुद्राच्या बाजुलाच आहे."
"बरा. चला तर मग मला माहिती आहे ते कुठे राहतात ते."
"नक्की ना? प्लिज मला घेउन चला तिथे." ती जायला उठली. एका अनोळख्या ठीकाणी अनोळख्या व्यक्तिबरोबर जायला ती कधीच तयार झाली नसती पण आता तिचा नाईलाज होता. ती रिक्षात जाउन बसली आणि निघाली. ५-६ मिनीटात मुख्य रस्त्या सोडुन रिक्षा एका कच्च्या रस्त्याला लागली. ती थोडी धास्तावली,पण आजुबाजुला घरं होती त्यामुळे तिला थोडा धीर होता. आजुबाजुची घरं अगदी ठेवणीतली होती. प्रत्येक घराला कुंपण होतं आणि ती कुंपणं वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांच्या वेलीनी आणि फुलानी भरुन गेली होती. १-२ मिनिटानी रिक्षा थांबली. तिने रिक्षाचे पैसे दिले आणि रिक्षातुन उतरली.
"इथेच आहे का त्यांचं घर?" तिने विचारलं.
"होय. इथुन पुढे सरळ चलत जावा, आनि उजवीकडे वळा. तिथे एक न्हानसं देउळ आसा. त्या देवळाच्या पाठीच आहे त्यांचा घर."
"मनापासुन आभार तुमचे. तुम्ही नसता तर आज माझं काही खरं नव्हतं." ती म्हणाली आणि जायला वळली.
"तुम्ही कोण त्यांच्या नातेवाईक का?" रिक्षावाल्याने विचारले. ती थबकली.
"हो. म्हणजे, ते अभय माझे मित्र आहेत." ती उत्तरली.
"बरा.सांभाळून जावा." रिक्षावाला तिच्याकडे न बघता बोलला आणि रिक्षा घेउन निघून गेला.
तिने आजुबाजुला पाहिलं आणि एक मोठा श्वास घेतला.फायनली आपण पोचलो.
ती अभयच्या घराच्या दिशेने चालू लागली. समुद्राची गाज आता अगदी स्पष्ट ऐकू येत होती.वारा तिच्या अंगावरुन झुले घेत बागडत होता. त्या वार्यासोबत आजुबाजुचे माड पण संथ लयीत डोलत होते.पायवाटेवरली रेती तिच्या फ्लोटर्समधुन तळव्यांना टोचत होती. हळूहळू चालत ती त्या देवळापाशी आली आणि देवळामागले अभयचे घर तिला दिसले. मागच्या दोन दिवसाची तिची धावपळ,अस्वस्थता,धडधड सारं काही आता शिगेला पोचलं होतं.तिचे सगळे प्राण तिच्या डोळ्यांत जमा झाले होते.कधी एकदा त्याला पाहतेय असं तिला झालं होतं. देवळाला वळसा घालुन ती देवळाच्या मागे आली. समोर ते घर उभं होतं. आजुबाजुच्या घरांप्रमाणेच या घरालाही कुंपण होतं. तिने हळूच त्या कुंपणाला असलेला छोटा गेट खोलला आणि अंगणात पाउल टाकलं. अंगण प्रशस्त होतं. अंगणाच्या पुर्वेला एक तुळशी वृंदावन होतं आणि कोपर्यात पारिजातकाचं झाडही.घरात कसलीच हालचाल जाणवत नव्हती. अंगणातुन चालत ती त्या घराच्या व्हरांड्यात आली.तिथेही कुणी नव्हतं.व्हरांड्यातला झोपाळा स्थिर होता. मुख्य दरवाज्याच्यावर बरेच जुने फोटो होते. ती थोडीशी घाबरली आणि इकडे तिकडे पाहू लागली. आपण बरोबर अभयच्याय घरी आलोय ना?तिच्या मनात उगाच शंकेची पाल चुकचुकली आणि तिचा चेहरा पडला. कुणाला हाक मारावी का असा विचार करुन ती मुख्य दरवाजाच्या दिशेने चालू लागली तोच अभय बाजुच्या खोलीतून बाहेर आला.
" ओह्ह माय गॉड! लूक व्हू इज हीयर!" तो तिला बघून ओरडलाच.
तिला बघून ती दचकली पण लगेच सावरली. हो. तिच्यासमोर तोच उभा होता. नेहमीसारखा हसत. ती त्याच्याकडे पाहत राहिली. "अभय" म्हणुन त्याला जाउन मिठीच मारावी असं तिला प्रकर्षाने वाटलं.
"अभय!!" ती उच्चारली. चटकन तिच्या डोळ्यांतून दोन थेंब घरंगळत गेले
"काय गं?" बरी आहेस ना? आणि कशी पोचलीस तू? तुला कसं सापडलं घर? ठीक आहेस ना? घरी सगळे ठीक आहेत ना?" तो तिला विचारत होता आणि तिचं कशावरही लक्ष्य नव्हतं.आत्ता याक्षणी त्याला फक्त बघत राहावं किंवा त्याच्या मिठीत झोकून देउन रडून द्यावं असं तिला प्रकर्षाने वाट होतं. ती स्तब्ध होती.पण एक अनावर हुंदका तिला आवरता आला नाही.
तो तिच्याजवळ गेला. तिच्या गालावरल्या आसवांना पुसत म्हणाला,"चित्रा, इट्स ओके. काय झालयं? इज एव्हरीथिंग ऑलराईट?"
त्याचा तो शीतल स्पर्श होताच ती कोसळली आणि तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकुन दिलं आणि इतकावेळ कोंडून ठेवलेल्या आसवांना त्याच्या छातीवर रितं करु लागली.
"आय मिस्ड यू अभी. आय मिस्ड यू सो मच. का असं केलंस रे माझ्याशी? तुला कितीदा फोन ट्राय केला. तुझ्या ऑफीस, तुझ्या घरी जाउन आले. तुला एकदाही नाही वाटलं का मला कॉल करावासा. काहीही न सांगता तू मला सोडुन आलास." त्याला बिलगून रडता रडता ती बोलतं होती. त्याने दोन्ही हात तिच्याभोवती वेढेले त्यासरशी ती अजुनच त्याला बिलगली.
"ए वेडी! आहे ना मी इथे आणि आज इतक्या दिवसांनी भेटलीस तर भांडणारच आहेस का? बघ माझ्याकडे , चित्रा!" त्याच्या मिठीतून हळूहळू बाहेर पडली. तिचे डोळे आसवांनी डबडबून गेले होते. त्याने ओंजळीत चेहरा घेउन तिचे अश्रू पुसले.
"ये बैस इथे.थांब मी पाणी आणतो." तिला बाजुलाच असलेल्या खूर्चीवर बसवून तो आतमध्ये गेला आणि पाणी घेउन आला. तोवर ती सावरली होती.
ती पाणी पिउ लागली आणि तो तिच्याकडे बघू लागला.
"घरी कुणी नाही का? आई - बाबा कुठेत?" पाणी पिता पिता तिने विचारलं.
"नाही. अगं माझ्या वहिनीच्या भावाचं लग्न आहे आज त्यामुळे घरातले सगळेजण कालच देवगडला गेलेत. येतिल संध्याकाळपर्यंत."
"ओके."
काही वेळ दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले.
"असा काय बघतोय? असं बघू नको माझ्याकडे." ती लाजण्याचा निरर्थक प्रयत्न करु लागली.
तो हसला. "बरं मग बोल."
"काय बोलु? मला काहि नाही बोलायचयं. तूच बोल. सांग पुन्हा एखादी स्टोरी. का सोडुन आलास मला ते." ती लटक्या रागाने बोलली.
तो पुन्हा हसला."बरं सांगतो. तू एक काम कर. बाहेर वॉशरुम आहे. फ्रेश हो. मी तोवर आपल्यासाठी मस्त कॉफी बनवतो. मग बोलुया आपण."
"ठीक आहे." ती उठली आणि बॅगपॅकमधून टॉवेल आणि काही कपडे घेउन वॉशरुमच्या दिशेने गेली. वॉशरुम प्रशस्त होता.काल रात्रीपासुन ते दिवसभराच्या प्रवासात अंगाला चिकटलेले कपडे तिने उतरवले तेव्हा तिला अगदी हलकं हलकं वाटु लागलं. तिने हलकेच शॉवर ऑन केला.
काही शीतल थेंब तिच्या चेहर्यावर पाझरले आणि मग तिला राहवलं नाही. त्या पाण्याचा तो गारवा ती शरीरभर झेलू लागली.प्रवासाचा शीण त्या थेंबांबरोबर तिच्या शरीरावरुन वाहून जात होता आणि एक विलक्षण प्रसन्नता तिला जाणवत होती. कितीतरी वेळ ती शॉवरखाली नुसतीच उभी होती.तिच्या मनातली सारी काही कालवाकालव,भीती, धडधड ती त्या गार पाण्याच्या प्रवाहावर वाहवू देत होती. काही वेळाने तिने शॉवर बंद केला आणि कपडे बदलून जेव्हा ती केस पुसत वॉशरुमच्या बाहेर पडली तेव्हा तिला जाणवलं की वातावरण खूप आल्हाददायक झालं होतं. खट्याळ वारा तिला हलकेच स्पर्शुन जात होता, एक दोन चाफ्याची फुलं अलगद तिच्यावर निसटुन पडली होती. कुठला तरी रानपक्षी त्याच्या मंजुळ आवाजात ताना देत होता. या सगळ्याने ती क्षणभर हरखून गेली. तितक्यात अभय एका ट्रेमध्ये दोन कप कॉफी, एक ग्लास पाणी आणि काही बिस्किटे घेउन अंगणातच आला आणि ते दोघं तुळशी वृंदावनाच्या मागे पारिजातकाच्या झाडाखाली अंगणाच्या कठड्यावर जाउन बसले.
"पाणी कसलं गार होतं रे." केस पुसत ती म्हणाली.
"अगं पण गीझर ऑन करायचा ना, आणि तू केस पण भिजवलेस का? वेडे सर्दी होईल ना पाणी बदललं तर." तो एक कप तिला देत बोलला.
"काही होत नाही सर्दी." ती कप घेत बोलली. तो वाफाळलेला कप तिने नेहमीप्रमाणे नाकाकडे नेला आणि त्या कॉफीचा तो सुगंध भरुन घेतला.
"अम्म्म्म!! धीस इज व्हॉट आय वॉझ मिसिंग बॅडली! " कॉफीचा एक सीप घेवून ती बोलली.
"ओह्ह! म्हणजे फक्त माझ्या हातच्या कॉफीसाठी इतक्या लांबवर आलीस तर." तो मिश्किलपणे म्हणाला.
"ह्हो! कॉफीसाठीच आलीय. बस्स? तसं पण मला तुझ्यात काहीच इन्ट्रेस्ट नाही. तू फक्त सकाळ संध्याकाळ अशी मस्त कॉफी बनवून देत जा मला.खुश्श??" ती पुन्हा लटक्या रागाने बोलली.
खरं तर या इतक्या संवांदात दोघांत भांडणं व्हायला हवी होती आणि "गुडबाय" पर्यंत पोचायला हवी होती. पण यावेळी तसं झालं नाही. दोघेही गालातल्या गालात हसत होते. ती शांतपणे कॉफीचा एक एक सीप घेत होती मध्येच ओठांच्या कोपर्यावर ओघळणारा थेंब हलकेच जीभेने टीपत होती. तो फक्त तिला बघत होता. ती आज फार वेगळीच दिसत होती.म्हणजे नेहमीसारखी नाही. तिच्या चेहर्यावर एक वेगळीच प्रसन्नता खेळत होती.पश्चिमेकडे झुकलेल्या सुर्याची सोनेरी किरणे माडांच्या झावळ्यातून तिच्या चेहर्यावर झिरपत होती. तिच्या शरीरालाही एक उन्मत्त उभार आला होता.
"फक्त बघतच राहणार आहेस की काही बोलणार पण आहेस." ती त्याच्याकडे न बघता बोलली.
तो पुन्हा हसला.
"हसतोस काय माकडा. बोल ना. काय झालं होतं तुला? सगळं काही सोडुन येण्याआधी तुला एकदाही मला कॉल करावासा नाही वाटला का रे? मला माहीत आहे की त्यादिवशी जे घडलं ते घडायला नको हवं होतं. मलाही नाही कळलं की मी असं का वागले ते. तुझी माफीही मागायची होती.पण धीर होत नव्हता. राग आला होता. पण खरं सांगते अभी, तो राग फार क्षणिकच होता रे! म्हणजे मी तिथुन निघुन गेले, ट्रेन मध्ये बसले आणि अचानक वाटलं की मी हे काय करुन बसले? आय मीन, मला असं करायचंच नव्हतं.पण सगळं अनपेक्षित! विचित्रच!
पण नंतर तुझ्याशी बोलायचा धीरच होईना. उगाच मनात अपराधी वाटायला लागलं. स्वतःला समजावलं की कदाचित मी तुझ्या लायकच नसेन म्ह्णुन अशी वागले तुझ्याशी.मनाशी खेळत, स्वत:ला समजावत मी राहु लागले. तुझी फार आठवण यायची. वाटायचं तू कॉल करशील. पण नंतर वाटू लागलं की तुला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, तू माझ्या या अशा वागण्याने हर्ट झाला असशील, मी कॉल केला तर बोलशील की नाही? सगळे मनाचे खेळ मी खेळत राहिले. पण काल परवा जेव्हा तुझा कुठेच ठावठीकाणा लागेना तेव्हा मात्र मी घाबरले. खूप घाबरले रे. तू कुठेच नव्हतास अभी. अचानक मला एक भयंकर रितेपणा जाणवू लागला. कधी आली नव्हती इतक्या प्रकर्षाने तुझी आठवण येवू लागली. बस्स कसंही करुन तू एकदाचा मला माझ्या डोळ्यांसमोर हवा होतास. सगळीकडे फिरले. तुझ्या ऑफिसला कॉल केला तू तिथे नाही. तुझ्या फोन नंबर बंद, एफबी, ट्विटर बंद. मग शेवटी तुझ्या घरी गेले. तिथेही वॉचमन जेव्हा म्हणाला की तुम्ही इथे नाही राहत म्हणुन तेव्हा अभी, तेव्हा मी कोसळले रे! काय करावं ते सुचेनाच! तेव्हा बाजुच्या गोरे काकूनी सांगितल की तुम्ही गावी आलात तेव्हा मला थोडं हायसं वाटलं आणि मग मी इथवर आले." बोलता बोलता पुन्हा तिचे डोळे डबडबले.
अभयने तिच्या हातावर हात ठेवला. ती थोडीशी शहारली. "आय अॅम सॉरी अभी. आय हर्ट यु."
"ईट्स ओके. चिउ." खूप दिवसांनी तिने त्याच्या तोंडातुन "चिउ" ऐकलं आणि पुन्हा तिला भरुन आलं.
"चल. आपण समुद्राव्रर जाउया. मी ही बरेच दिवस बाहेर नाही पडलोय. तू थकली नाहीस ना? आय मीन तसं असेल तर घरीच थांबुया." त्याने तिला हात धरुन उठवलं.
"नाही नाही, सगळा थकवा, शीण केव्हाच निघुन गेलाय.चल जाउया.पण अरे हे ट्रे!" ती उठत बोलली.
"असू दे इथेच आल्यावर घेउन जाईन आतमध्ये चल." ती दोघं घराबाहेर पडली.
समुद्र अगदी हाकेचा अंतरावर होता. माडांच्या आणि सुरुच्या झाडांतुन पायवाटेवरुन ते दोघे चालत होते. सुर्य उगाचच समुद्रावर रेंगाळत होता. चालत चालत ते दोघे किनार्यावर आले आणि तिने पायातले फ्लोटर्स काढुन एका हातात घेतले आणि अनवाणी चालू लागली.
"अगं पायाला काही तरी टोचेल ना. चप्पल घालून चाल." तो काळजीने बोलला.
"काही नाही टोचत-बिचत. आणि टोचलं तर टोचलं तू आहेस ना काढायला." ती हसून बोलली.
"कोणता फालतू बॉलीवूड सिनेमा बघितलाय रिसेन्टली असे डायलॉग मारायला?" तो तिला चिडवत बोलला.
त्या मउशार वाळूत तिचे पाय हलकेच रुतत होते. वाळूचा स्पर्श तिला गुदगुल्या करत होता. एका हात तिने अभयच्या हातात गुंफला होता. चालत चालत ते एका ठीकाणी आले. तिथे किनार्यावर एक नाव होती. त्या नावेला टेकून दोघेही बसले.
"ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे. इथुन समुद्र काय सुन्दर दिसतो ना?" तो म्हणाला.
ती समोर पाहु लागली. तो विशाल समुद्र दूरवर पसरला होता. त्या अवखळ लाटा गर्जना करत किनार्यावर आदळून पुढे जोरात किनार्याला स्पर्श करायला धावत होत्या. जणु त्यांच्यात स्पर्धाच होती कि कोण कितपत पुढे जाते त्याची. सुर्य समुद्रात अर्धामुरदा उरला होता. समुद्रावर उडणारे समुद्रपक्षी आपापल्या घराच्या दिशेने जात होते. दूरवर समुद्रात काही नावा समुद्राशी झगडत पुढे जात होत्या. उजव्याबाजुला दूरवर एक डोंगर समुद्रात घुसला होता. त्यावर एक लाईटहाउस होते. हे सगळं डोळ्यांत भरुन घेत तिने अभयच्या खांद्यावर हलकेच डो़कं ठेवलं आणि तितक्यात एका घंटेचा टोला संधीप्रकाश चिरत तिच्यावरुन सरसरत गेला, आणि एकामागुन एक असे सहा टोले त्या आसमंतात घुमले होते आणि त्यासरशी तीने त्याच्या हात घट्ट धरुन ठेवला होता.
"अगं, इथे पुढेच थोड्या अंतरावर गावतलं चर्च आहे. घाबरलीस?" त्याने विचारलं.
"अं?? नाही." ती.
आता सुर्याला समुद्राने गिळून टाकलं आणि काळोखाने आपले बाहुपाश पसरवायला सुरुवात केली. वारा हळूहळू घोंगावू लागला आणि लाटांची गर्जना अधिकच वाढली. डोंगरावरले लाईटहाउस तांबड्या प्रकाशाने उजळले आणि एका ठराविक अंतराने तांबड्याप्रकाशाचा झोत सभोवार फेकू लागले. समुद्रात एखाद दुसरा कंदील हेलकाउ लागला आणि ह्ळूहळू आकाशात चांदण्या जमा होउ लागल्या. आता ती दोघं त्या किनार्यावर विसावली होती. त्याच्या उजव्या बाहुची उशी करुन ती आभाळाकडे एकट़ बघत पडली होती.
"चिउ......" काही वेळाने त्याने तिला हाक मारली.
"हम्म्म." ती उच्चारली.
"काही नाही." तो.
"बोल ना." ती.
"काही नाही. तुला आठवत मी तुला नेहमी सांगायचो की माझ्या गावी समुद्र किनार्यावर पडुन आकाशातल्या चांदण्या मोजायला फार मज्जा येते." तो बोलला.
ती हळूच हसली."हो. आणि जेव्हा जेव्हा तू असं सांगायचास तेव्हा तेव्हा मला वाटायचं की काय मज्जा येईल ना, आपण दोघं असे किनार्यावर पडुन असे आभाळ बघत पडून राहु."
"शाहणी कुठली. मग तेव्हा का नाही बोलायची?"
"असंच. नाही बोलायचे. पण आज जेव्हा ते सगळं पाहतेय तेव्हा बोलावसं वाटलं." ती आभाळाकडे बघत बोलली.
"वेडी कुठली."
"असुन दे. वेडी तर वेडी. वेडीबरोबर असतो तो वेडा." ती खुदकन हसली.
"तू वेडी."
"हां बाबा. मी वेडी. बस्स! तू हुशार, शहाणा." ती कुशीवर वळत त्याच्याकडे पाहत हसत हसत बोलली. तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहर्याजवळ आलेला.
"श्या! काय हे? भांड ना जरा. मला तू अशी शरण आलेली. नाही आवडत." तो तिचे उष्ण श्वास चेहर्यावर झेलत, अडखळत बोलला.
"पण तू मला असाच आवडतोस आणि प्लिज आता मला नाही भांडायचयं तुझ्याशी. अगदी मस्करीतही नाही. तू भांडलास तरी चालेल. तू माझ्यावर रागावलास तरी चालेल,पण मला नाही भांडायचं तुझ्याशी.आता या क्षणापासुन मला तुला हरवायचं नाहीय. दोन दिवस माझी काय अवस्था झाली होती हे तुला नाही समजणार अभी." खोल गेलेल्या आवाजात त्याच्या चेहर्यावर बोटं फिरवत ती बोलली.
तो शहारला. अलगद दुसर्या हाताने त्याने तिला वेढुन घेतलं. चांदण्यांच्या सौम्य प्रकाशात तिचा चेहरा खुलला होता. तिच्या श्वासांचा जोर वाढला होता. तिने डोळे मिटुन घेतले होते. मिटलेल्या डोळ्यांनी ती सर्व काही पाहत होती. तो थोडासा बावरला होता. दोघंही एकमेकांच्या मिठीत होते. त्याचे श्वास तिला जाणवत नव्हते पण अगदी भरलेल्या ढगाप्रमाणे तो तिला भासत होता. तिचं धडधडणारं काळीज आणि विलंबित श्वासोच्छवासांनी तिच्या छातीची होणारी दोलने त्याच्या छातीवर अडखळत होती. हळूहळू त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. जणु तो भरलेला ढगच तिच्या ओठांवर अलगद बरसला होता आणि कैक वर्षापासुन तहानलेला चातकाप्रमाणे ती ही त्याच्या ओठांच्या ढगातुन बरसणारे थेंब हळूहळू प्राशुन घेउ लागली. ही अनुभूती विलक्षण होती. किती तरी वेळ ते दोघे एकमेकांच्या ओठांत मिसळत होते. एकमेकांच्या मिठीत विरघळत होते. काळोखाने दोघांना वेढुन घेतले होते पण आभाळातून लुकलुकणार्या तार्यांनी त्या काळोखाला भेदुन एक जाळीदार सौम्य प्रकाशाची चादर दोघांवर पांघरली होती.
हळूहळू ते दोघं विलग होउ लागले.लाजुन चिंब झालेलं ती आभाळाकडे एकटक पाहु लागली.तो ही तिच्या डोळ्यांतली नक्षत्रं छेडू लागला.लुकलुकणार्या तार्यांनी गच्च भरलेलं ते आभाळ तिला अभयच्या मिठीपुढे क्षुद्र वाटु लागलं. किती बरं वाटलं होतं त्याच्या मिठीत. ती विचार करु लागली.कसे स्वतःला आपण हरावून बसलो होतो. त्याच्या मिठीत एक वेगळाच आधार जाणवला होता.
"काय बघतेस आभाळाकडे?" त्याने हसुन विचारलं.
"काही नाही." ती ही हसली.
इतक्यात त्या गच्च भरलेल्या आभाळातून एक तारा निखळला आणि वेगाने नाहीसा झाला. तिने पाहिलं.
"अभी, तुटलेला तारा!" ती हरखून ओरडली आणि क्षणात डोळे मिटुन काही तरी पुटपुटली.
" काय हसतोस रे?"
"काही नाही! असंच"
"सांग ना, का ह्सलास?"
"तू काय मागितलसं त्या तार्याकडे"?
यावर ती लाजली त्याच्या कुशीत चेहरा लपवत बोलली, "काही नाही. जे मागितलं ते असं सांगायचं नसतं मग इच्छा पूर्ण होत नाही."
"ओह्ह्ह! असं आहे का?"
"होहह्ह्ह! असंच आहे."
"पण जे मागितलं ते कधी मिळालं का?"
"यापूर्वी मी कधीच काही मागितलं नव्हतं....."
"मग आता काय मागितलं? "
"काही नाही मागितलं, आणि तुला ते नाही समजणार." त्याच्याकडे डोळे भरुन बघत ती उच्चारली आणि तिच्या त्या टपोर्या डोळ्यांतुन दोन थेंब गालांवर ओघळले. त्या थेंबांचं सौंदर्य आकाशातल्या कोणत्याही तार्यापेक्षा नितांत सुंदर होतं.
तो तिच्याकडे बघत राहिला.ती दूर कुठेतरी पुन्हा त्या आकाशात हरवून गेली. तिला तसं पाहून तो बोलला..
"आता सोड ते आकाश,
आणि ये माझ्या जगात.
तारे ही असेच तुटतात,
तुला पाहून वेगात."
ती गोड हसली," कश्या सुचतात रे तुला अशा ओळी? अगदी प्रसंगानुरुप!"
"पण खरं सांग, असा तुटलेला तारा दिसल्यावर काही मागितलं की मिळतं का गं? " त्याने तिला टाळत विचारलं.
"माहित नाही. पण काही इच्छा, स्वप्ने ही अशीच त्या तुटलेल्या तार्यासारखी कुठेतरी आयुष्याच्या या अंतराळात लुप्त होउन जातात ना रे?आकाशातून अचानकपणे ज्या वेगाने एखादा तारा निखळतो त्यावेळी त्याचे ते क्षणिक सौंदर्य पार वेडावून टाकते. क्षण दोन क्षण दिसणारे ते सौंदर्य डोळ्यात आणि मनात भरता भरत नाही तर मग त्यावेळी मनातल्या अनेक अपूर्ण इच्छेंपैकी अशी कोणती इच्छा व्यक्त करावी हे मला कळतच नाही.पहिल्यांदा असं नव्हतं पण जेव्हापासुन तू आयुष्यात आलायसं माझी प्रत्येक अंधश्रद्धेवर श्रध्दा जडू लागलीय."
"वेडूबाई. असं काही नसतं."
"माहितीय मला. पण अभ्या, पुन्हा नाही ना रे सोडुन जाणार तू मला असा?" तीने काळजीने विचारलं.
"नाही गं वेडे, आता कुठे जाउ मी? आणि गेलो तरी तू काय सह्जा सहजी मला थोडी जाउ देणारेस? शोधुन काढशीलच ना? आणि तसंपण आत्ताच त्या तुटलेल्या तार्याकडे मला मागुन घेतलयंसच ना?
ती क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली,"तुला कसं कळलं रे? मी हे मागितलं ते?"
"बस्स कळलं. न कळायला काय झालं?" तो गालात हसत म्हणाला.
"चोर आहेस एक नंबरचा, लबाड.सगळं कळतं होतं ना तुला मग का मला सोडुन आलास असा?"
"माहित नाही चिउ.पण खरं सांगतो त्यादिवशीच्या प्रकारामुळे मी हर्ट वैगरे झालो नव्हतो. तुझी रिअॅक्शन साहजिक होती.पण माहित नाही का मला त्यावेळी सगळंच तुटल्यासारखं वाटलं.तू निघुन गेलीस आणि मग उगाच गिल्टी वाटु लागलं.ठरवलंही होतं तुला कॉल करायचा, तुझी माफी मागायची पण नाही त्यादिवसापासुन माझ्यातला मी हरवून बसलो.पण चिउ खरं सांगतो एक-दोन दिवसानी मी जसं तू म्हणालीस तसंच नॉर्मल झालो गं. ठाउक होतं की एवढं काही झालेलं नाही.काही दिवस गेले आणि एकदा मला सडकून ताप आला.डॉक्टर वैगरे सगळं झालं. १० दिवस हॉस्पिटलमध्येच होतो.आई उश्याशी बसुन असायची. म्हणायची चित्राला बोलावून घेते म्हणुन. पण मीच नको म्हणालो. मला तुझी खूप आठवण यायची गं. खूप वाटायचं तुला बघावं, तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी भांडावं पण माहित नाही आजार बळावत होता आणि सगळेच काळजीत होते. काही दिवसानी बरं वाटलं पण नंतर एक प्रकारची विरक्ती येउ लागली मनाला.कशातच लक्ष्य लागेना. वैतागुन जॉब पण सोडुन दिला.पण हे सगळं आपल्या त्या प्रकारामुळे नाही हे मी नक्की सांगतो."
बोलता बोलता त्याने तिला छातिशी कवटाळलं.
"मग तिकडे करमेना म्हणुन इकडे आलो.थोडे दिवस बरं वाटलं पण आजाराने पुन्हा डोकं वर काढलं.मग आजाराचा आणि माझा तो लपंडाव सुरुच राहिला.ठाउक होतं तू एके दिवशी नक्की येशील.असं नव्हतं की तुला मी भेटणारच नव्हतो, तुला कॉल करणार नव्हतो; पण मी पुरता हरलो होतो या आजाराशी.कधी कधी वाटायचं की हा आजार आता मला घेउनच जाणार.त्याआधी तुला एकदा भेटायचं होतं, पण त्याआधीच........." त्याचा आवाज क्षीण झाला.
"त्याआधीच??? त्याआधीच काय अभी?" तिने विचारले
"काही नाही. चल घरी नको जाउया का?उशीर झालाय," तो तिचे गाल ओढत बोलला.
"नको. इथेच थांबुया, असेच रात्रभर एकमेकांच्या कुशीत. मला नाही जायचं कूठे तुला सोडुन." ती.
"वाह! आई आपल्या दोघांची वरात काढेल." तो.
"जाउया रे थोड्यावेळाने.मला तुला असा भरुन घेउ दे." ती त्याच्या गालावर गाल घासत म्हणाली.
"बरं." तो.
"ए अभी, ती अंगाई गा ना रे."
"काही काय? अंगाई आणि आता? रात्री झोपताना गाईन हं."
"नाही आत्ता गा ना प्लिज,प्लिज्,प्लिज.." ती लाडात आली.
"चिउ काय गं?"
"गा ना रे, असं काय करतो."
एखाद्या लहान मुलाप्रमाणे ती त्याच्या कुशीत शिरली. एका हाताने तिला थोपटवत तो गाउ लागला. त्याचे आर्त स्वर तिच्या अंगावरुन वाहुन लाटांमध्ये मिसळून समुद्रात विलीन होउ लागले. ती त्या स्वरांनी भारावुन गेली आणि एक संदिग्ध ग्लानी हलकेच तिच्या डोळ्यांवर पसरु लागली.
एका लाटेच्या प्रचंड आवाजाने तिला जाग आली. हळूहळू तिने डोळे उघडले तेव्हा टॉर्चचे एक दोन प्रखर झोत तिच्या डोळ्यांवर पडले. समोर काही दिसेना. पण काही लोक आहेत हे तिला जाणवलं. ती ताडकन उठून बसली आणि बावरुन इकडे तिकडे पाहु लागली.
"अभी, उठ रे. अभी बघ ना कुणीतरी आहे इथे, अभ्या." ती बाजुला चाचपडुन अभयला शोधु लागली. पण तो तिथे नव्हता. ती घाबरली. इकडे तिकडे बघु लागली. त्यांच्या वेशावरुन तिने ताडलं की ते कोळी होते.घाबरुन त्याला हाका मारु लागली. काही वेळासाठी तिला कळेना की हा असा सोडुन कुठे गेला ते.
"कुणागेरच्या पावण्या तुमी?" समोर उभ्या असलेल्यांपैकी एकाने विचारले.
"अं? काय? मी? मी त्या अभय पाटकरांच्या घरी.. तो इथेच होता माझ्यासोबत, आजुबाजुला गेला असेल. आम्ही गेले एक दोन तास इथेच होतो... अभीssssss, अभ्या.." ती घाबरुन हाका मारु लागली.
त्या लोकांमध्ये पुन्हा कुजबुज सुरु झाली. तिचं अभयला हाका मारणं सुरुच होतं.
"आमचं ऐकाल का जरा?" एकजण म्हणाला.
"काय? मी काही नाही ऐकणार, अभयला येउ दे. तो आत्ता इथेच होता माझ्यासोबत." तिला दरदरुन घाम फुटला होता.
"म्यॅड्म, कदाचित तो घरी गेला असेल. आमचं ऐका रात लय चढली आसा. अशावेळी इथे थांबणा बरोबर नाय.तुमी आमच्याबरोबर चला त्याच्या घरी सोडतो तुम्हाला." विनवणीच्या सुरात एकजण म्हणाला.
ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पण तिला भयंकर भीती वाटत होती. कुठे गेला असेल हा आपल्याला सोडुन? त्याचं काही बरं वाईट झालं नसेल ना. एकदम त्याला हाका मारत ती किनार्यावर धावत सुटली. तिच्या मागोमाग ते लोकही धावू लागले. त्यातल्या दोघांनी एका अन्तरावर तिला गाठलं आणि तिला समजाउ लागले. आता ती फुटली आणि रडु लागली. मग ते सगळे तिला घेउन अभयच्या घरी निघाले. तिला काही सुचत नव्हतं. अतिशय घाबरलेली ती त्यांच्याबरोबर चालत होती. काहीवेळाने ते अभयच्या घराच्या अंगणात पोचले. पैकी एकजण हाक मारु लागला. ती तशीच उभी होती. घरातुन अभयची आई, वडील, भाउ बाहेर आले. अभयच्या आईला बघताच चित्रा धावतच तिच्याकडे गेली आणि तिला बिलगुन रडु लागली. अभयच्या आईला हे सगळं अनपेक्षित होतं.
"चित्रा? तू कधी आलीस? आणि कुठे होतीस? हरवली होती का बाळा? काय गं? काय झालं?" अभयची आईने तिला छातीशी कवटाळलं.
"आई अभय कुठाय? तो मला पुन्हा सोडुन आला! आई, असं का करतो तो नेहमी?" ती आईला बिलगुन अधिकच रडु लागली. सगळेजण या प्रकाराने अचंबित झाले होते. तिला जे लोक किनार्यावरुन घेउन आले होते ते अभयच्या बाबांशी आणि भाबाशी बोलत उभे होते. अभयच्या आईने तिला घरात नेले तोवर अभयची वहिनी पाणी घेउन आली. तिचं रडणं थांबतच नव्हतं ती सारखी अभयला हाक मारत होती पण तो कुठेच दिसत नव्हता. त्याच्या आईला सगळी हकीकत ती सांगत होती. ते कधी आणि कशी पोचली. अभय कसा भेटला, कॉफी घेउन आपण समुद्रावर गेलो आणि हा तिथुन कसा गायब झाला. ती भरभर बोलत होती. तिचे श्वास फुलले होते.बोलता तिचं खोलीतल्या भिंतीवर लक्ष्य गेलं आणि ती स्तब्ध झाली. तिच्या तोंडुन शब्दच फुटेना. फक्त ती त्या समोरच्या भिंतीकडे पाहत राहिली.
अभय त्या भिंतीवरल्या फोटोमध्ये गोंड्याच्या फुलांआडुन हासत तिला पाहत होता.....
"उध्वस्त मनांच्या विरहाची
गाणी गातो वारा,
कूणाची तरी स्वप्ने घेउन कोसळतो
प्रत्येक तुटलेला तारा...."
समाप्त

interesting story ..........चारोळी तर भारीच !!
ReplyDelete
Deleteधन्यवाद भाउ :)
Very Touching..........keep it up...
ReplyDeleteThanks a lot :)
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteHey, I'm sorry. your comment was accidentally got removed by me. Anyways Thanks a lot
DeleteGood.... heart touching....!!!!!
ReplyDeleteheart touching..!! Keep itt up
ReplyDeleteThank You Devdatt :)
Deleteदादा , मस्त heart touching story आहे रे ….
ReplyDeleteशेवटी रडवलस रे ….