आपण एकमेकांशिवाय फार जास्त वेळ दूर राहु शकत नाही हे त्या दोघांना
चांगलंच ठाउक होतं आणि गेली ५-६ वर्षे हे असंच सुरु होतं. ते ज्या दिवशी
भेटले होते त्या दिवसापासुन ते आतापर्यंत अनेकदा त्यांच्यात भांडणं झाली
होती. अगदी बोलता बोलता देखिल भांडणं व्हायची. कधी कधी ही भांडणं 'गुडबाय
फॉरेव्हर',"आय विल नेव्हर गॉना सी यु अगेन" अशा वाक्यांनी संपायची. पण ते
फॉरेव्हर जास्तित जास्त २-३ महिने असायचं. पुन्हा ते एकमेकांना आठवू लागत.
पुन्हा त्या दोघांना एकमेकांची उणिव जाणवू लागे आणि मग दोघे पुन्हा
एकमेकांना कुठूनतरी शोधुन आणुन एकमेकांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न
करत. या एकमेकांना शोधुन आणण्याच्या कामात तिचा पुढाकार जास्त असायचा. तो
जितका प्रेमळ तितकाच कठोर. त्याचे गुडबाय फॉरेव्हर हे त्याच्यासाठी नेहमीच
फॉरेव्हर असायचे. त्याच्या बर्याच मित्र मैत्रीणीना आणि काही
नातेवाईकांनाही त्याचा हा स्वभाव ठाउक होता. त्याने एकदा ठरवलं की एखाद्या
व्यक्तीचं तोंड नाही बघायचं तर नाहीच. एखादी व्यक्ती मग ती कितीही जवळची का
असेना एकदा का त्याच्या मनातून उतरली की ती कायमची असायची.पण
तिच्याबाबतित असं नव्हतं. तो तिच्यापासुन किती तरी वेळा दूर गेला होता, पण
जेव्हा जेव्हा ती हाक मारायची तो तिच्या हाकेला 'ओ' द्यायचाच. त्यालाही
कळत नव्हतं की असं का ते?
तिच्यावर त्याचं प्रेम होतं. जीवापाड प्रेम करायचा तो तिच्यावर. त्याबाबत एकदा त्याने तिला धीर धरुन सांगितलं ही होतं आणि अपेक्षेप्रमाणे तिने नकार दिला होता. तो त्याने पचवलाही होता. प्रेम नाही तर फ्रेन्ड्शिप ही असली फालतु लॉजिक्स त्याच्या अखत्यारीत कधीच नव्हती. त्यामुळे असेल तो तेव्हापासुन तिच्यापासुन दोन हात दूरच राहत असे. पण असं कितीही केलं तरी त्याला ठाउक होतं की तिला मनातुन काढणं फार कठीण जाणार होतं. तिच्या नकाराचं कारण त्याने तिला कधीही विचारलं नाही. कारण, "Do you love me?" असं त्याने तिला कधीच विचारलं नाही,पण "I love you." हे मात्र त्याने तिला निक्षुन सांगितलं होतं. त्यामुळे तिच्या नकाराची कारणं त्याच्यादेखत निकृष्ट्च होती.
पण तिच्या मनात काय सुरु होतं हे तिलाच कळत नव्हतं. तो तिला आवडत होताच. पण प्रेम वैगरे?? तिला काय हवं होतं हे तिला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही कळलं नव्हतं. पण तो तिच्यापासुन दूर गेलेला मात्र तिला कधीच सहन होत नसे. थोडे दिवस ती मन मारुन राहायची. गेला तर गेला उडत असं काहीसं उगाच आपल्या मनाला समजावत राहायची. पण ते फक्त काही दिवसच! मग नेहमीच्या वाटेवर, ट्रेनमध्ये, इकडे तिकडे फिरताना तिला तो सतत आठवत राहायचा. त्याच्या नसण्याने अचानक एक प्रकारचा रितेपणा तिला जाणवू लागे. ती पोकळी तिचा जीव घेउ लागे. दिवस-रात्र तो तिच्या मनात घर करुन असायचा. पण हे तिने कधीही त्याला जाणवू दिलं नाही. तेव्हाही नाही, आताही नाही आणि हे ती त्याला कधी जाणवू देणारही नव्हती. पण यावेळी असं नव्ह्तं. का कुणास ठाउक यावेळी त्यांची ही "जुदाई" बडी लंबीच झाली होती. ३-४ महिने तरी निघून गेले होते. त्याचा काहीच ठावठीकाणा नव्हता. प्रत्येकवेळी मीच का जायचं त्याच्याकडे त्याला कधीच वाटत नाही का स्वतःहून यावसं? तिला ठाउक होतं की तो असं कधीच करणार नाही; पण तरिही तिला मनोमन असं वाटत राहायचं की भांडण झाल्यावर त्याने स्वतः येवून तिचा रुसवा दूर करावा.पण मग तिला वाटु लागे अशी अपेक्षा तरी तिने त्याच्याकडून का करावी? तो थोडीच माझा बॉयफ़्रेंड आहे? ती स्वत:शीच भांडत राहि.
तिला आठवलं. एकदा असंच त्यांचं छोटुसं भांडण
झालं. नेहमीप्रमाणे दोघेही एकमेकांशी बोलायचे बंद झाले. दोन - तीन दिवस
झाले असतिल या भांडणाला.ती एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी
जायला बाहेर पडली.चर्चगेट स्टेशनला जात असताना रस्त्याच्या दुसर्या
बाजुला तो उभा असलेला तिला दिसला. त्याला बघताच अचानक तिचं काळीज धडधडायला
लागलं. का ते तिलाही कळलं नव्हतं.उगाच पोटात फुलपाखरांच्या गुदगुल्या तिला
जाणवू लागल्या. हा मला भेटायला तर आला नसेल ना. तिला वाटुन गेलं. पण
कदाचित त्याचं लक्ष्य नव्हतं कारण तो फोनवर कुणाशी तरी बोलत उभा होता.
सिग्नल अजुन ग्रीन झाला नव्हता त्यामुळे ती त्याला बघत उभी राहिली आणि
पोटातल्या रेशीमी गुदगुल्या थांबवायचा नाहक प्रयत्न करु लागली. सिग्नल
ग्रीन झाला आणि माणसं भराभर रस्ता क्रॉस करु लागली. तो सुद्धा फोनवर बोलत
बोलत इकडे तिकडे कुणाला तरी शोधत त्याबाजुने चालू लागला. तो जसा जसा जवळ
येत होता तिच्या पोटातली फुलपाखरं अजुनच चेकाळत होती. ओठ उगाच हसत होते.
त्याचं अजुनही लक्ष्य नव्हतं. चालता चालता दोघेही समोरासमोर आले. दोघांनीही
एकमेकांना पाहिलं. तिचे ओठ गालांवर स्वार झाले. पण तिला पाहूनही न
पाहिल्या सारखं करुन तो भरभर निघूनही गेला. तिला ते बिलकुल अपेक्षित
नव्हतं. रस्ता क्रॉस करुन तिने मागे वळून पाहिलं. जिथे ती उभी होती तिथेच
एक फुलपाखरु उभं होतं. तो तिच्याजवळ गेला. तिने त्याच्या हातात हात गुंफले
आणि ती दोघं तिथुन उडुन गेली. त्याने एकदाही मागे वळून तिच्याकडे पाहिलं
नाही. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. नाही, तो कुणाबरोबरही का जाईना
पण मला बघुनही न बघितल्यासारखं करतो म्हणजे काय? इतका कसला ह्याला तोरा?
साला, स्वत:ला शाणा समजतो का? गेला उडत!यापुढे मी साल्याचं तोंडही बघणार
नाही. संतापत तिने जाउन ट्रेन पकडली. पोटातली फुलपाखरं केव्हाच उडुन गेली.
पण त्यावेळी सुद्धा काही दिवसानी तिनेच पुन्हा पॅच अप केले होते. त्याच्या
त्यावेळी कितीही राग आला असला तरी काही दिवसांनी तो तिला आठवू लागला आणि
सगळ्यात महत्त्वाचं ते फुलपाखरु कोण होतं ज्याच्या हातात हात गुंफुन तो
तिच्याकडे न बघता उडून गेला होता हे तिला माहिती करु घ्यायचं होतं.
तो प्रसंग तिला आठवला आणि उगाच हसु आलं.नेहमीप्रमाणेच यावेळी सुद्धा आपल्यालाच पॅच अप करावे लागणार हे तिला पक्कं ठाउक होतं. आज घरी जाताना स्टेशनवर उतरल्यावर
त्याला कॉल करुया असं ठरवून ती स्टेशन यायची वाट बघत राहीली. पण का कुणास
ठाउक यावेळी तिला त्याची प्रकर्षाने आठवण येउ लागली होती. न रहवून तिने त्याला
'हाय." असा मेसेज टाकला. पण बराच वेळ झाला तरी त्याचा काहीच रिप्लाय नाही
आला. काहिवेळाने तिने पाहिलं तेव्हा तो टेक्स्ट अन्डिलिव्हर दाखवत होता.
तिने पुन्हा तो फॉरवर्ड केला तरीही तेच.तिला राहवेना. स्टेशन यायला अजुन बराच वेळ होता. सेल फोनमधले
त्यांचे मेसेज कॉन्वरसेशन्स ती वाचू लागली. आणि मनात हसू लागली. काय
वेड्यासारखे आपण टेक्स्टसवर भांडत बसायचो. ते टाईप करुन भांडण्यात काय मजा
होती. तरीही मग तो वैतागुन एक टेक्स्ट टाकायचा,
"हे बघ मला टाईप करायला कंठाळा येतोय, भांडायचं असेल तर भेटुन भांड किंवा कॉल कर, मी टाईप करत बसणार नाहीय. गुडबाय." आणि तरीही ते भांडण रात्रभर टेक्स्ट्सवर सुरुच असायचं. ते सगळं वाचत ती मनात हसत होती. वेडा नुसता!

तोवर
स्टेशन आलं. ट्रेनमधुन पटकन बाहेर पडुन ती एका शांत ठीकाणी आली. धडधडत्या
काळजाने तिने त्याचा नंबर डायल केला. तिचे प्राण तिच्या कानात गोळा झाले
होते. खूपवेळ झाला तरी तिला समोरची कॉलर ट्युनही ऐकू आली नाही. कॉल
डिसकनेक्टकरुन तिने पुन्हा डायल केला यावेळी " द नंबर यु हॅव डायल इज इन
करेक्ट." असा मेसेज आला म्हणुन पुन्हा चेक करुन तिने डायल केला तेव्हा, " द
नंबर यु आर ट्राईंग टु रिच टू इज टेंपररली डिसकनेक्टेड." असा मेसेज आला.
ती हिरमुसली. गेली कित्येक वर्षे त्याचा नंबर कधीच बंद नव्हता. नॉट रिचेबल
असेल पण डिसकनेक्टेड का? फेसबुकवर मेसेज टाकुया असा विचार करुन तिने त्याचं
नाव फेसबुकच्या सर्च बार मध्ये टाकलं. त्याच्या नावाचे ५-६ जण होते पण तो
नव्हता. तिने बरीच शोधाशोध केली. म्युचुअल फ्रेंड्सच्या लिस्टमध्येही जाउन
बघितलं तरी त्याचा प्रोफाईल कुठे दिसला नाही. सेम केस ट्विटरवर सुद्धा. तो
सापडतच नव्हता. आता काय करावे? मित्र- मैत्रिणींपैकी कुणाला कॉल करुन
विचारावं का? पण उगाच सगळ्यांना वाटेल की ही आता का चौकशी करतेय? त्यावेळी
तर त्याच्यावर किती भडकली होती त्याने मित्रांना त्यांच्याबद्दल सांगितलं
होतं तेव्हा. त्याला किती घालुन पाडुन बोलली होती. तिला तो प्रसंग आठवला.
जाउ दे. उद्या बघते हा कुठे हरवलाय ते असा विचार करुन ती घरी गेली. पण तिला
राहवत नव्हतं. काही तरी विचार करुन तिने एका मैत्रिणीला कॉल केला. इकडच्या
तिकडच्या गोष्टी आटपून तिने त्याच्याबद्दल तिला विचारलं पण तिला काहीच
ठाउक नव्हतं. आता तिला उगाच त्याच्याबद्दल काळजी वाटु लागली. त्या चिंतेत
ती धड जेवलीही नाही. हा असा अचानक कुठे गायब झालाय? फोन नाही पण फेसबुक आणि
ट्वीटरवर तर नेहमी पडीक असायचा आणि आता तर त्याचा तिथे प्रोफाईलच नाहीय.
रात्रभर तिला झोप लागलीच नाही. कुठे असेल हा? ती विचार करत करत झोपी गेली.
पहाटे तिला जाग आली तिच एका भयानक स्वप्नाने. भयभीत होउन
ती बेडवर उठून बसली. तिचं सर्वांग भीतीने थरथरत होतं. घमाघूम होउन ती
कितीतरी वेळ त्या भयंकर स्वप्नाच्या छायेत बसुन राहिली. काहीवेळाने तिने
घडाळ्याकडे पाहिलं साडे पाच वाजले होते. तशीच उठुन ती खिडकीपाशी गेली.
आजुबाजुचा परिसर हळूहळू जागा होत होता. पहाटेचा मंद वारा तिच्या अंगावरुन
वाहू लागला. काळोखात दूर कूठेतरी बघत आताच पडलेलं स्वप्न ती आठवू लागली.
खरं तर तिला ते भयंकर स्वप्न आठवायचचं नव्हतं पण कित्येक महिन्यानी तिने
त्याला स्वप्नात पाहिलं होतं. ती हरखून गेली होती. पण नको.... त्या
स्वप्नाचा शेवट काही करुन तिला आठवायचा नव्हता.
ऑफिसला तयारी करायची वेळ झालीच होती. ब्रश करत ती बाथरुममध्ये शिरली पण
त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरुन जातच नव्हता. हे असं इतकं आजच का होतयं.
तिला कळत नव्हतं. विचार करत करत तिने शॉवर ऑन केला. त्या शॉवरमधुन होणारा
वर्षाव तिच्या त्या गोर्या देहावर शांतपणे एका लयीत कोसळू लागला. तिच्या त्या सतेज कांतिवर त्या वर्षावाचे टपोरे थेंब बरसून निसटू लागले. अळवाच्या पानावर जसे
पावसाचे थेंब मोत्यासारखं दिसण्याच्या नादात निसटुन जातात ना अगदी तस्सेच.
त्याने जर आपल्याला असं पाहिलं असतं तर नक्कीच असं काहीसं काव्यात्मक
बोलला असता आणि डोळेभरुन पाहत राहिला असता. तिला उगाच तो आपल्याला कुठून
तरी चोरून पाहतोय असं अचानक वाटलं आणि लाजेने तिने डोळे मिटुन घेतले. तिचे
भिजलेले गाल लाजेने अजुनच आरक्त झाले आणि तिच्या त्या केवड्याच्या
फुलासारख्या फुललेल्या देहावर सर्र्कन काटा उभा राहिला. हळूहळू तिने डोळे
उघडले आणि समोरच्या आरशात स्वतःला निरखू लागली. कसलीशी ओढ तिच्या डोळ्यांत
साठून राहिली होती. अंगावर आलेला काटा शॉवर जेलच्या फेसाने हळूहळू नाहीसा
होत होता. शरीराच्या उंचवट्यावरुन ओघळणारे पाणी तिला अस्वस्थ करत होते.
तिने पटपट अंघोळ आटोपली आणि शेगडीवर कॉफीसाठी दूध ठेवलं. ही कॉफीची सवयही
त्याच्यामुळेच लागलेली.नाहीतर चहा म्हणजे तिचा जीव की प्राण. एकदा
त्याच्या घरी ती गेली होती तेव्हा त्याने जी कॉफी केली होती तेव्हापासुनच
की काय कॉफी तिला आवडु लागले होती. पण तिला ती धड करता येत नसे. मग फक्त
कॉफीसाठी म्हणून ती त्याच्या घरी जात असे. तो फार छान कॉफी करायचा आणि
मग ती दोघं त्याच्या बेडरुमला लागुन असलेल्या गच्चीत समोर पसलेल्या मुंबईकडे
बघत बघत कॉफी घेत गप्पा मारत बसायचे.
आईने लक्ष्यात आणुन दिलं तेव्हा तिने त्या उतू जाणार्या दूधावर फुंकर मारली. आज तिचंही मन त्याच्यासाठी असंच उतू जात होतं. सकाळच्या स्वप्नामुळे ती अस्वस्थ तर होतीच पण ते सगळं ती इग्नोअर करत होती. आज जर त्याच्याशी काँटॅक्ट झालंच तर त्याला भेटायलाच जायचं असं तिने मनाशी ठरवूनच टाकलं होतं.बस्स झालं आता! कधी एकदा त्याला बघते,त्याला ऐकते असं तिला झालं होतं. त्याला भेटायला गेले तर मग काय घालुन जाउ? नकळत ती तिच्या कपाटाकडे गेली आणि तिने तो अबोली रंगाचा कुडता आणि व्हाईट लेगिंग्ज काढली. जेव्हा ती दोघं पहिल्यांदा एकमेकांसोबत फिरायला गेली होती तेव्हा तिने हे काँबिनेशन घातले होते.तिला लांबूनच त्याने पाहिलं होतं. लोकांच्या घोळक्यातून स्टेशनच्या पायर्या सावकाश उतरुन ती बाजुलाच असलेल्या एका झाडापाशी उभी राहुन त्याची वाट बघत उभी राहिली होती. तिने तिला अगोदरच पाहिलं होतं. तो सवकाश चालत तिच्यापाशी गेला. अबोली रंगाच्या कुर्तीवर व्हाईट लेगिंग्ज.इतकी सुंदर ती पहिल्यांदा कधीच दिसली नव्हती. त्याने तिला पाहुन एक लार्ज स्माईल दिली आणि प्रतिसादादाखल तिचेही ओठ खुलले.
"या काँबीनेशनमध्ये तू नुकत्याच उमलेल्या पारिजातकाच्या फुलासारखी दिसतेस!" तो उद्गारला
आणि ती क्षणभर स्तब्ध झाली होती. नंतर त्याच्या प्रत्येक कवितेत पारिजात असाच भरभरुन फुलला होता.तो क्षण आता तिच्या मनाला गुदगुल्या करुन गेला. तिने तेच कपडे घालायला घेतले आणि सगळं आवरुन ती घराबाहेर पडली. जाता जाता सहज ट्राय म्हणुन तिने त्याचा नंबर पुन्हा डायल केला पण तो डिसकनेक्टेडच होता.
आज काम करायचा तिचा बिलकूल मूड नव्हता. त्याला कसं शोधावं याचा विचार करत ती राहिली.त्याच्या ऑफिसमध्ये कॉल केला तर? अरे हां! इतका वेळ आपल्याला का सुचलं नाही हे? तिने पटकन त्याच्या कंपनीचं नाव गुगल केलं काँटॅक्ट अस ऑप्शनमध्ये जाउन तिने त्याच्या कंपनीच्या बोर्डलाईन्वर कॉल केला.बर्याच वेळाने समोरुन कॉल अॅन्सर झाला.
"गुड मॉर्निंग! हाव कॅन आय हेल्प यु?" समोरुन टिपिकल रिसेपशनिस्टचा गोड आवाज.
"हॅलो! गुड मॉर्निंग! कॅन आय टॉक टु मि.अभय पाटकर?"
"अम्म! अभय पाटकर? व्हीच डिपार्टमेंट मॅम?"
"सेल्स!"
"ओह! सेल्स! अॅम सॉरी मॅम, मि. अभय इज नो मोअर वर्किंग विथ अस."
"व्हॉट?? व्हेन ही लेफ्ट?"
"आय थिंक ३ मंथ्स बॅक. मे आय नो व्हू इज धिस? अॅन्ड व्हॉट्स इट्स रिगार्डींग?"
"नथिंग! नथिंग" तिने फोन ठेउन दिला.
तिला आता अधिकच भीती वाटु लागली. नक्की काय झालं असेल? कुठे गेला हा? तिच्या मनात अनेक विचार येउ लागले आणि ते सकाळचं स्वप्न फणा काढुन तिच्या समोर उभं राहिलं. आता शेवटचा उपाय म्हणून तिने त्याच्या घरीच जायचं ठरवलं. कालपासुनची तिची अस्वस्थता वाढतच होती. त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला होता.आता ती खूपच घाबरली होती.डेस्कवरुन उठून ती मॅनेजरच्या केबिनमध्ये गेली आणि तब्येत बरी नसल्याने त्याच्याकडुन घरी जायची परवानगी मागितली.मॅनेजरने तशी परवानगीही दिली कारण ती फारच अस्वस्थ दिसत होती. एका ड्रायव्हरला तिला कारमधून स्टेशनवर सोडुन येण्यास सांगितले. ड्रायव्हर तिला सिएसटी स्टेशनवर पोहचवून परत ऑफिसला गेला.तिकीट घेवून ती ट्रेनमध्ये चढली आणि विंडो सीटवर जाउन बसली.
क्रमश:

interesting..... :)
ReplyDelete