आजचा पल्ला जास्त दूर नव्हता. रेडीचा यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला आणि
सावंतवाडी असं फिरुन यायचं होतं. संध्याकाळी जत्रा आणि दशावतार पण बघायचं
होतं त्यामुळे लवकर फिरुन येउन थोडा आराम करायचा असं ठरवलं. त्यामुळे आज
थोडं उशिराच निघालो. पुन्हा ती बाईक रेंटवर घेतली.आमच्या गावतुन मातोंड या
गावच्या रस्त्याने वर कापावर आलो. इथुन आसोलीमार्गे आरवली, शिरोडा, रेडी
असं जायचं होतं. सड्यावर पोचलो तेव्हा मस्त उन पडलं होतं. लहानपणी, मे ची
सुट्टी पडली की या सड्यावर वाडीतली आम्ही सगळी पोरं फिरायला यायचो. काजु,
आंबे, फणस, करवंद यांची चंगळ असायची. कधी कधी आमच्या क्रिकेटच्या मॅचेस पण
व्ह्यायच्या. या विस्तृत पसरलेल्या सड्यावर क्रिकेट खेळायला फार मज्जा
यायची. खूप धम्माल दिवस होते ते.
सड्यावरुन आसोली - टांकमार्गे आम्ही वेंगुर्ला - शिरोडा रस्त्यावर आलो. इथुन पुढे आरवलीचं प्रसिद्ध देवस्थान श्री वेतोबाच्या दर्शानासाठी गेलो. वेंगुर्ल्यातील अनेक प्रसिद्ध देवस्थानांपैकी आरवलीचा वेतोबा हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. काही वर्षांपूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार झालाय. मंदिर अतिशय सुंदर आहे. तसेच आरवलीचा समुद्रकिनाराही अतिशय सुंदर आहे. इथुन पुढे शिरोड्याच्या बाजारातुन वाट काढत काढत आम्ही हुड्यावर येउन पोचलो. इथुन उजवीकडला रस्ता रेडी-तेरेखोलकडे जातो तर डावीकडला रस्ता आरोंदा,सावंतवाडीकडे जातो. आम्ही रेडीच्या रस्त्याला लागलो. पहिल्यांदा रेडीचा प्रसिद्ध गणपती पाहायचा होता. रेडी गाव मँगनिझ आणि इतर खनिज द्रव्यांच्या मुबलकतेमुळे ९० च्या दशकात झोतात आले होते. इथे बर्याच मोठ्या प्रमाणात मायनिंग झाले आहे. अजुनही डंपर - ट्रक्स यांची ये जा सुरु असते.

रेडीचं गणपती मंदिर समुद्राच्या
किनारीच आहे. मायनिंगमुळे तिथपर्यन्तचा रस्ता फक्त डंपर आणि ट्रक्सच्याच
योग्यतेचा आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरु आहे. मंदिरातली
द्विभुज गणेश मुर्ती खूप संदर आहे.
गणेशाचे दर्शन घेउन आम्ही यशवंतगडाकडे
निघालो. गावतल्या विठोबाच्या मंदिराच्या मागुन रस्ता किल्ल्यापर्यंत आणि
किनार्यापर्यंत जातो. काहीवेळातच रस्त्यावरुन किल्ल्याची तटबंदी दिसु
लागली. किल्ल्यापाशी येउन बाईक लावली आणि किल्ल्यात प्रवेश केला.
यशवंतगड नकाशा :- साभार http://trekshitiz.com/trekshitiz/index.asp
नकाशात दाखवल्याप्रमाणे किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहेत. मुख्य दरवाज्याकडला बुरुज अजुन शाबूत आहे. प्रत्येक दरवाज्याची कमानही अजुन शाबूत आहे. दुसर्या आणि तिसर्या दरवाज्याच्या मध्ये एक खंदक आहे. अंदाजे २० फूट खोलीचा हा खंदक संपूर्ण किल्ल्याभोवती आहे. तिसर्या आणि चौथ्या दरवाज्याच्या बाजुला एक चोर दरवाजाही आहे. चवथ्या आणि पाचव्या दरवाज्याच्यामध्ये पहारेकर्यांसाठीच्या देवड्या आहेत. पाचवा दरवाजा भव्य आहे. आणि जुन्या वास्तुंची साक्ष देत उभा आहे. किल्ल्यात बरीच झाडी माजली आहे. नकाशात दाखवलेल्या वाटेप्रमाणे आम्ही वाड्याच्या दिशेने निघालो. वाड्यात प्रवेश करायला छोटे कमानदार दरवाजे आहेत. एका मागुन एक असे तीन दरवाजे आपल्याला दालनात घेउन येतात. हा वाडा थोडा भुलभुलैय्या टाईप आहे. वाड्याची बरीच पडझड झालेली आहे. भिंती तितक्या शाबुत आहेत. इथुन पुढच्या वाटेने आम्हाला पायर्या शोधुन तटबंदिवर चढायचे होते. बरीच शोधाशोध करुनही पायर्या सापडत नव्ह्त्या कारण किल्ल्यात बरीच झाडी माजलेली आहे. खूप वेळ इकडे तिकडे फिरुन मी जरा उत्तरेच्या बाजुने मोकळ्या जागेवर गेलो असता तटबंदीला लागून असलेल्या छोट्या पायर्या दिसल्या. इथुन एका बुरुजावरुन समोर निळशार अरबी समुद्र आणि रेडीच्या खाडीचे सुन्दर चित्र दिसत होते. मग त्या तटबंदीवरुन चालत चालत आम्ही पाचव्या दरवाज्यापाशी आलो आणि तिथे असलेल्या पायर्यांवरुन खाली उतरलो. किल्ल्यावर अजुन बघण्यासारखे काहीच नव्हते. नुसतं जंगल माजलं आहे. तिथुन आम्ही बाहेर पडलो आणि रेडीच्या किनार्यावर आलो.
किल्ल्याचे काही फ़ोटो
किल्ल्यातल्या त्या वाड्यात शिरलो तेव्हा वर पाहिलं तर
एक सुंदर फ्रेम दिसली. वाड्याचं छ्प्पर केव्हाच उडून गेलेलं. वाड्याच्या
भिंतीवरुन काही झाडं जगली होती आणि एक प्रकारच नैसर्गिक छप्पर त्या
वाड्याला दिसत होतं. पण सगळ्यात सुंदर त्या झाडांच्यामधुन ते निळं आकाश
दिसत होतं.
बुरुजावरुन दिसणारा आरवलीचा किनारा आणि रेडीची खाडी
महाराष्ट्रात या. वाघ तुमची वाट पाहत आहे. :)
अह्ह्ह!! काय सुंदर किनारा होता! अगदी निळाशार पसरेला. शांत! एक - दोन अंग्रेज कपल्स तिथे समुद्रस्नान करत होते. आम्ही तिथुन पुढे किनार्यावरुन चालत निघालो. अनवाणी किनार्यावरुन चालताना काय भारी वाटत होतं. पाणीही अतिशय गार होते. बराच वेळ तिथे फिरुन मग आम्ही तेरेखोलला निघालो.
तेरेखोल रेडीहुन ५ किमीवर आहे. इथला तेरेखोल हे गाव गोवा सरकारच्या हद्दीत येते. तेरेखोलची नदी अरबी समुद्राला जिथे मिळते तिथे काठावर हे गाव वसले आहे. इथल्या शांततेमुळे बरेच अंग्रेज लोक्स इथे असतात. आम्ही किल्ल्यावर पोचलो तेव्हा तिथे एका शाळेची सहल आली होती आणि सगळी मुले किल्ल्याच्या बाहेअरच्या आवारत जेवायला बसली होती. गोवा सरकारच्या हद्दीत असल्याने किल्ला उत्तम आहे. आतमध्ये एक मस्त रेस्टॉरंट आहे. गडाच्या आत पोर्तुगिजकालिन "सेंट अँथनी" चर्च आहे. किल्ल्यावर बाके काही विशेष नाही. पोर्तुगिज बांधणीचे कॅप्सुल बुरुज इथे पाहवयास मिळतात. इथुन तेरेखोलची खाडी आणि समोरे केरी बीच फार सुन्दर दिसतं. १७व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष्य ठेवण्यासाठी केली. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगिजांकडेच होता.
किल्ल्याचे प्रवेशद्वार
किल्ल्यातले चर्च
बुरुजावरून दिसणारे केरीम बीच, तेरेखोल नदी आणि अरबी समुद्राचा संगम
किल्ला
फिरुन झाल्यावर आम्ही तेरेखोलच्या जेट्टीवर गेलो. इथुन एक मोठ्ठी लाँच
निघते आणि समोर गोव्याच्या केरीम बीचपर्यंत सोडते. इथे थोडावेळ बसुन मग
आम्ही परतीला लागलो. परत येताना महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर असलेल्या
जकात लाटेवर आम्हाला मपोसेच्या पोलिसांनी थांबवलं. इकडचं तिकडचं न विचारता
त्याने "पहिल्यांदा बॅग चेक केली. गोव्यात दारु स्वस्त असल्याने मोस्ट ऑफ
लोक इथुन दारु विनापरवाना घेउन येतात. त्यामुळेच असेल की त्याने आमची पहिली
बॅग चेक केली. मागल्यावेळी इथे आलो होतो तेव्हा माझा कझिन ड्युटीवर होता.
तिथुन आम्ही निघालो आणि पुन्हा हुड्यावर आलो. इथुन आता आरोंद्याला त्या
कझिनच्या घरी जेवायचं आंत्रण होतं तिथे गेलो. हा कझिन म्हणजे माझ्या मामीचा
भाउ. तो माझ्याच वयाचा. त्यावेळी सुट्टी पडली की मी इथे आरोंद्याला येत
असे. मग दिवसभर आमचे उंडगेगिरी सुरु असायची. इथे समुद्र जवळ असल्याने मला
हा गाव अतिशय आवडायचा. आम्ही दिवसभर खेळायचो, भटकायचो, कधी मासे पकडायला
जायचो तर कधी किरणपाणी इथे लाँचमध्ये बसुन पलिकडे गोव्याच्या किनार्यावर
फिरुन यायचो. इथुन अरंबोळ वैगरे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. खूप वर्षानी मी
इथे आलो होतो. तिथे मस्त मच्छी खाउन आम्ही सावंतवाडीच्या रस्त्याला लागलो.
सचिनला सांवतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी त्या भाचींसाठी घ्यायची होती. मी ही कधी त्या चितार आळीत गेलो नव्हतो. चितार आळीत फिरुन काही लाकडी खेळनी खरेदी केली आणि तिथुन आम्ही घरच्या वाटेला लागलो. वाडीहुन घरी पोचायला अर्धा तास पुरेसा होता. अंदाजे पाच पर्यंत आम्ही पोचलो असतो. पण काही तरी वेगळंच झालं...

सावंतवाडि - चितार आळी ( खेळणी)
सावंतवाडीहुन निघुन आम्ही तळवडेला पोचलो. इथुन सरळ रस्ता
वेंगुर्लेला जातो आणि डावीकडे वळल्यास मातोंडमार्गे पालला म्हणजे आमच्या
घरी पोचायचा शॉर्टकट होता. रस्ता मला माहीत होता. पण माहीत नाही कुठे तरी
मी चुकलो. तळवडे गेटमधुन निघाल्यावर काही अंतरावरच पालसाठी उजवीकडे वळावं
लागतं, पण तो रस्ता इतका छोटा होता आणि तिथे कुठेच मार्गदर्शक फलक नव्ह्ता
त्यामुळे मी चुकलो आणि सरळ पुढे गेलो. काहीवेळाने सचिनने बाईक माझ्याकडे
दिली. खूप वर्षानी मी बाईक चालवायचा धाडसी प्रयत्न करत होतो. पहिल्या
झट्क्यात जमली नाही मग पुन्हा किक मारली, रेझ दिला, पहिला गिअर टाकला आणि
हळूहळू बाईक मारायला लागलो. रस्ता खडबडीत होता. मी ३०-४० वर बाईक मारत
होतो. फक्त मला भीती चढावाची वाटत होती कारण चढाव आल्यावर बाईक नक्की
कोणत्या गिअरवर आणि किती स्पीडवर ठेवायाची हे माहीत नव्हतं. तरी सचिन मागुन
सांगत होता आणि मी त्याचं ऐकुन गाडी मारत होतो. थोड्यावेळ्याने मातोंड आणि
पालला जोडणार तो खतरनाक चढाव आला आणि मी गांगरलो. कारण समोरुन एसटी वैगरे
आली तर उतार असल्याने एसटीवाले जोरात येतात. पण तसं काही झालं नाही. सचिन
सांगत होता गाडी आहे त्या स्पीडवरच ठेव. पण बाईकने थोडा वेग घेतला होता.
चढावाच्यामध्ये आलो आणि सचिन ओरडला गिअर पुढे टाक!
आता पुढे म्हणजे नक्की
कुठे हे धड कळेना. त्यात गिअर बदलायचा म्हणजे क्लच दाबायचा आणि गिअर
बदलायचा हे माहित होते. मी गिअर बदलायसाटी क्लच दाबला गिअर बदलणार इतक्यात
लक्ष्यात आलं की बाईकला रेझ मिळालाय.
अतिशय कन्फ्युझ्ड सिच्युएशन! सचिनने काही तरी सांगायचं म्हणुन ओरड्ला!
अतिशय कन्फ्युझ्ड सिच्युएशन! सचिनने काही तरी सांगायचं म्हणुन ओरड्ला!
मला कळलं नाही ! बाईक रेझमध्ये होती ! सचिन म्हणाला क्लच सोड!
आय थिंक त्याला रेझ देउन नको असं म्हणायचं असेल.
मी क्लच सोडला! बाईक रेझमध्ये! फुल्ल व्हिल्ली ! काटकोनात उभी राहिली
मी क्लच सोडला! बाईक रेझमध्ये! फुल्ल व्हिल्ली ! काटकोनात उभी राहिली
अगदी घोडा दोन पाय वर करुन जसा उभा राहतो ना अगदी तशीच!!
आम्ही दोघे होतो त्या पोझीशनमध्ये धपकन खाली बसलो. बाईक समोर उभी राहुन बाजुला जाउन आडवी झाली !!
हे सगळं कसं २०-३० सेकंदात घडलं!!
आम्ही दोघे होतो त्या पोझीशनमध्ये धपकन खाली बसलो. बाईक समोर उभी राहुन बाजुला जाउन आडवी झाली !!
हे सगळं कसं २०-३० सेकंदात घडलं!!
सुदैवाने आम्हा दोघांना काही लागलं नाही पण बम्सवर पडल्याने रस्त्यावरचे दगड टोचलेच!!
उठुन पहिल्यान्दा बाईक बघितली आणि तिला उचलून उभी केली. बाईकला विशेष काही झालं नव्हतं. डाव्या बाजुचा मिरर आणि पुढला इंडिकेटर दोन्ही गेले होते. बाईक दुसर्याची असल्याने अजुन टेंशन होतं. आम्ही बराचवेळ तिथे उभे राहिलो होतो. त्याचवेळी एक गावकरी तिथून बाईकवरुन जात होता. आम्हाला तिथे उभं बघुन त्याने बाईक थांबवली आणि आमची विचारपूस करायला सुरुवात केली. आम्ही काही नाही म्हणून वैगरे त्याला टाळलं पण त्याने ओळखलं होतं की हे दोघे बाईकवरुन पडलेत. आम्ही बाईक सुरु करुन पाहिली. ती ठीक होती. आता इथुन अगदी थोड्याच वेळ्यात आम्ही घरी पोचणार होतो. पण बाईकचं काय सांगायचं याचं टेंशन होतं. इथुन चढावावरुन आम्ही वर कापावर आलो आणि घराच्या दिशेने सुटलो. मी मामाला कॉल केला आणि त्याला सगळं सांगितलं.

१५-२० मि. माझ्या लक्ष्यात आलं की हे
माझं गाव नाही. म्हणजे मातोंडचा चढाव चढल्यावर कापावरुन लगेच उतार सुरु
होतो आणि ५ मि. आम्ही घरी पोचायला हवं होतं. पण १५-मि झाली तरी आम्ही पोचलो
नव्हतो. आजुबाजुचा परिसर ओळखिचा वाटत नव्हता आणि पुढे एका वाडीकडे आलो आणि
आजुबाजुची घरं बघुन मी ताडलं की मी रस्ता चुकलोय! पण चुकून कोणत्या गावात
आलो हे ही कळलं नव्हतं! सचिनला बाईक थांबवायला लावली आणि तिथे उभ्या
असलेल्या गावकर्यांना मी विचारलं की हा कोणता गांव आहे आणि इथुन पालला
कसं जायचं. ते लोक आम्हाला बघुन चिंतेत आले. एकजण म्हणाला हे आजगांव आहे.
भेन्डी! मी कसा काय चुकलो आणि कुठे चुकलो हेच लक्ष्यात येत नव्हतं. कारण
त्या चढावापर्यंत आणि तिथुन पुढे सड्यापर्यंत अगदी मला वाटलं होतं की मी
माझ्याच गावी आहे. कारण सगळा रस्ता अगदी सेम होता. आता काळोख पडायला आला
होता. त्यातल्या एकाने आम्हाला संगितलं की असेच जर सरळ पुढे गेलात तर
शिरोड्याला पोचाल किंवा पुन्हा मागे जा. कापावर जिथे दोन रस्ते फुटतात
तिथुन लेफ्ट मारा कही वेळाने अजुन दोन रस्ते दिसतील. पुन्हा लेफ्ट मारा.
जोसोली मार्गे तुम्ही आसोली या गावी पोचाल. आसोलीहुन घरचा रस्ता मला माहित
होता. शिरोड्याहुन पुन्हा उलटं येणं अजुन उशिर झाला असता म्हणुन आम्ही मागे
फिरलो.
सड्यावर आलो तिथे त्या माणसाने संगितल्याप्रमाणे फाट्यावरुन
लेफ्ट मारला. संध्याकाळ उलटुन गेली होती. हा रस्ता खराब होता. लालमातीच्या
रस्त्यावरुन धुरळा उडवत आम्ही पुढे चाललो होतो. काही वेळाने पुन्हा एका
तिठ्यापाशी आलो. इथुन लेफ्टला जायला त्या माणसाने सां गितलं होतं. तरीही
पुन्हा एकदा तिथुन जाणार्या एका माणसाकडुन कन्फर्म करुन घेतलं आणि आम्ही
जोसोलीच्या मार्गाने निघालो. हा रस्ता मस्तच होता. एका ठीकाणी डोन्गर फोडुन
वळणावळणाचा सुन्दर रस्ता बनवला आहे. दोन्ही बाजुला विशाल लाल रंगाचे डोंगर
उभे आहेत आणि त्या खिंडीतुन वळणावळणाच्या रस्त्यातुन आम्ही जोसोली गावात
पोचलो. हा रस्ता मला अतिशय आवडला होता. स्पेशली ती खिंड. जोसोलीतुन पुढे
आम्ही आसोलीला आलो आणि तिथुन घरी पोचलो. बाईकवाल्याची बाईक दिली. त्याला सगळं
समजावून सांगितलं. येउन जाउन ११० किमी झालं होतं आणि आम्ही १०० रु.
पेट्रोल भरलं होतं, सो त्याला ४०० रु. देउन आम्ही घरी पोचलो तेव्हा साडेसात वाजले होते.
तळवडेला
चुकल्यामुळे आम्हाला २०-३० किमीचा अतिरिक्त फेरा पडला होता. पण आजचा
दिवसही भन्नाट गेला होता. दोन किल्ले, खूप वर्षानंतर मित्राच्या घरी,
सावंतवाडीची चितार आळी, छोटासा अपघात, चुकलेली वाट आणि तो जोसोलीतला खिंडीतला रस्ता !!!
घरी पोचलो आणि आता रात्री जत्रेला जायची तयारी करु लागलो....
घरी पोचलो आणि आता रात्री जत्रेला जायची तयारी करु लागलो....
भारीच आता पुढे? :) :)
ReplyDelete
Deleteभटकंती संपली आता जत्रा
बाईक शिकताना stunt केलेला तूच पहिला असशील ;-)
ReplyDeleteहा हा हा फुल्ल ऑन स्टंट होता तो !
Deleteबाप्पाची मूर्ती खूपच छान आहे रे. एकदम प्रसन्न...
ReplyDelete