काही वेळा हे शब्द असे काही खेळतात ना की बस्स्स ! उगाच मनात इकडे तिकडे उड्या मारत फिरत असतात पण त्यांना पकडुन एक योग्य वाक्य करायचं म्हणजे नाकी नउ येतात..
हे असंच कित्येक दिवस चाललयं.. माझ्या डायरीमध्ये कित्ती तरी खाडाखोडी झाल्यात. जीमेलच्या ड्राफ्टमध्ये असे कित्येक परिच्छेद तसेच्या तसे पडून आहेत. पण नाही जमत...
खरं तर माझं सगळं लिखाण हे असंच तिच्या डोळयांपासून सुरू होउन तिच्या ह्रद्यापर्यंत पोहचू पाहणारं...
प्रत्येक शब्दात तिला ह्रद्यातुन मारलेली हाक..
प्रत्येक वाक्य जणू तिच्यासाठी गुंफलेला बकुळीच्या फुलांचा गजरा..( स्वारी, गजरा नाही ! तिला गजरा नाही आवडत. बरं मग गाजराचा हलवा :) )
आज कित्ती दिवसांनी तिला पाहिलं आणि इकडे तिकडे उड्यामारणारे शब्द आज अचानक कागदावर अलगद उतरु लागले. बॅकग्राउंडला " मर जायियां, तेरे बिन मर जायियां रे..." हे गाणं आणि या जीवघेण्या संध्याकाळच्या वेळी तिच्या त्या पारिजातकी आठवणी....
ती आजही तशीच पारिजातकाच्या अल्लड फुलासारखी. पहाटेच्या प्रसन्न वेळी रोमांरोमातुन भिनलेल्या सुगंधी जहरासारखी. पण सगळ्यात जहरी तिचे डोळे..
ती आजही तशीच पारिजातकाच्या अल्लड फुलासारखी. पहाटेच्या प्रसन्न वेळी रोमांरोमातुन भिनलेल्या सुगंधी जहरासारखी. पण सगळ्यात जहरी तिचे डोळे..
ती माझ्या समोर होती, किती तरी वेळ, पण तिच्या त्या डोळ्यांत मला पाहता आलंच नाही...
तिच्यापेक्षा मला तिच्या डोळ्यांनिच जास्त वेड लावलं होतं आणि ते या जन्मी तरी सुटणार नाही हे नक्की...
हे! तिच्या त्या टपोर्या डोळ्यांवर मी काही कविता पण केल्या होत्या... त्यातली एक..
तुझ्या डोळ्यांना सांगून ठेव
ते नेहमी मला वेड लावतात
तसा मी आहेच थोडा वेडा पण ,
ते चारचौघातही मला वेड्यात काढतात...
ते नेहमी मला वेड लावतात
तसा मी आहेच थोडा वेडा पण ,
ते चारचौघातही मला वेड्यात काढतात...
आणि जेव्हा ती डोळ्यांत काजळ घालायची तेव्हा तर उफ्फ्फ्फ!
मोकळे सोडलेले तिचे ते उसळलेल्या लाटांसारखे लहरी केस आणि अमावास्येच्या काळोखासारखे तिचे ते का़जळी डोळे.
मी कितिदा तिला सांगायचो डोळ्यांतलं थोडं काजळ घे आणि गालावर एक ठिपका लाव, कुणाची नजर लागली तर,.... आणि मग त्यावर ही चार ओळी सुचल्या होत्या...
वारा उसळे असा भरारा,
तुझ्या केसांतुन वादळ लहरे.
नभि दाटति अवचित घन जसे,
तुझ्या डोळ्यांतले काजळ गहिरे...
तुझ्या केसांतुन वादळ लहरे.
नभि दाटति अवचित घन जसे,
तुझ्या डोळ्यांतले काजळ गहिरे...
आता तिचे ते डोळे आठवत नाहीत, आठवते फक्त तिची ती संदिगध नजर.. थेट ह्रद्याला भिडणारी...
मला माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची, तू नेहमी ग्लेअर्स लावून का फिरतोस? "
मला माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची, तू नेहमी ग्लेअर्स लावून का फिरतोस? "
त्यावर माझं उत्तर असायचं "माझ्या डोळ्यांतली "ती" कुणाला दिसू नये म्हणून!"
********************************************************************************
त्यादिवशी बर्याच दिवसांनी आईच्या मांडीवर पहुडलो होतो.. ती माझ्या केसांतुन हात फिरवत होती... आणि समोर टीव्हीवर एक गाणं सुरु होतं;
वहाँ कौन हैं तेरा मुसाफिर जायेगा कहाँ....
वहाँ कौन हैं तेरा मुसाफिर जायेगा कहाँ....
ऑफिस, टार्गेट, रिपोर्ट्स, रिव्ह्युझ, मंथ एन्ड, ....... आणि मनातल्या त्या व्यथा..... सांगाव्या तरी कुणाला??? ह्रद्य भरुन जातं. कुठूनशी एक कळ ह्रद्यात येतें आणि बराच काळ ती कळ त्रास देत राहते. ह्रद्याच्या जवळचं असं कुणीच नसतं..
कळा ज्या लागल्या जीवा, मला का ईशवरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या...
माझं वर्क प्रोफाईल सेल्स/मार्केटींगमधलं असल्यानं मला वाटु लागतं की मी माझ्या फिलिंग्ज्सचं पण मार्केटींग करु पाहतोय, बदल्यात मी काय अचिव्ह करणार ???? आणि त्याचा रिपोर्ट कुणाला करणार?? आणि मला काय अॅवार्ड मिळणार ?? " द फिलिंग ऑफ द मंथ" :D:D:D
काही दिवसांनी लक्ष्यात येतं की आता या यातनेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवाच... म्हणुन डॉक्टरकडे जातो.. सगळ्या तपासण्या झाल्यावर भुवया उंचावून आणि चेहर्यावर उसनं हसू आणुन ते माझ्या हातात माझ्या ह्रद्यांच्या स्पंदनांचा आलेख देतात... मी वाचतो
ECG = Emotionally Confused Graph... :D:D:D
कळा ज्या लागल्या जीवा, मला का ईशवरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या...
माझं वर्क प्रोफाईल सेल्स/मार्केटींगमधलं असल्यानं मला वाटु लागतं की मी माझ्या फिलिंग्ज्सचं पण मार्केटींग करु पाहतोय, बदल्यात मी काय अचिव्ह करणार ???? आणि त्याचा रिपोर्ट कुणाला करणार?? आणि मला काय अॅवार्ड मिळणार ?? " द फिलिंग ऑफ द मंथ" :D:D:D
काही दिवसांनी लक्ष्यात येतं की आता या यातनेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवाच... म्हणुन डॉक्टरकडे जातो.. सगळ्या तपासण्या झाल्यावर भुवया उंचावून आणि चेहर्यावर उसनं हसू आणुन ते माझ्या हातात माझ्या ह्रद्यांच्या स्पंदनांचा आलेख देतात... मी वाचतो
ECG = Emotionally Confused Graph... :D:D:D
ते गाणं, ऐकता ऐकता बरंच काही सांगुन गेलं...
बीत गये दिन, प्यार के पलछिन
सपना बनी वो रातें.
भूल गये वो, तू भी भुला दे
प्यार की वो मुलाकाते....
सब दूर अंधेरा, मुसाफिर जायेगा कहाँ....
सपना बनी वो रातें.
भूल गये वो, तू भी भुला दे
प्यार की वो मुलाकाते....
सब दूर अंधेरा, मुसाफिर जायेगा कहाँ....
मला खरंच ठाउक नव्हतं की मी कुठे चाललोय ते.. पण चालायच तर होतंच ना... माझ्यासाठी कूणी थांबलं नव्हतं... वाट मलाही शोधायची होतीच पण तिच्याशिवाय एकटं चालणं मनाला पटत नव्हतं...
एकदा तिने मला विचारलं होतं, " जर मी सगळ्यानां सोडुन तुझ्याकडे कायमची आले तर??"
मी उत्तरलो. " हजारवेळा विचार कर. एकदा माझ्याकडे आलिस तर मला सोडुन जाण्याचा विचारही तुझ्या मनात येणार नाही!" ( मायला मी उत्तर जरा जास्तच भारी मारलं का राव? ती कधी आलीच नाही, ;)
पण मग मी एकटं चालायचं ठरवलं. वाट वेगळी केली.. फक्त, माझी वाट एकट्याची होती... नेहमीसारखीच.
जो मिल गया गया उसिको मुकद्दर समझ लिया,
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया....
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया....
छे ! ही गाणी फक्त फेसबुकवर स्टेटस म्हणून छान वाटतात.. कारण कित्येकदा विसरायचं ठरवून ही तिला विसरणं जमत नाही...
मला तिला विसरायचं होतं पण ते शक्य नव्हतं.. एव्हाना ती माझ्या अस्तित्वाचा एक भाग झालीय आणि स्वःताच्या अस्तित्वापासुन दूर राहता येतं का कधी?
मला तिला विसरायचं होतं पण ते शक्य नव्हतं.. एव्हाना ती माझ्या अस्तित्वाचा एक भाग झालीय आणि स्वःताच्या अस्तित्वापासुन दूर राहता येतं का कधी?
फक्त तिला मनातुन काढायचं होतं.माझ्यासाठी हे नविन नव्हतं. असं कित्येकदा मी तिच्यापासुन दूर गेलो होतो आणि असं प्रत्येकवेळी तिने मला.......
वाट वेगळी केल्यावर मी चालु लागलो, अनेकदा मागे वळून पाहिलं... त्या नादात बर्याचवेळा धडपडून पडलो.. पण मागे वळून बघण्यात अर्थ नव्हता... मनात ठरवलं होतं " This time I'll honor my commitmeint "
मग त्या गाण्यातल्या पुढच्या ओळी ह्रद्यावर घाला घालू लागल्या...
कोई भी तेरी राह न देखे
नैं बिछाये ना कोई.
दर्द से तेरे कोई ना तडपा
आँख किसी की ना रोई
कहे किसको तू मेरा.... मुसाफिर जायेगा कहाँ....
नैं बिछाये ना कोई.
दर्द से तेरे कोई ना तडपा
आँख किसी की ना रोई
कहे किसको तू मेरा.... मुसाफिर जायेगा कहाँ....
- दीप
mastach lihili ahes post, deep. khup chaan. Manat utarat jatat shabda.
ReplyDeleteShradha
दिपू हा पोस्टचा प्रवाह खूप छान आहे....गाण्याला एका वेगळ्या ढंगाने पेश केलंस पण त्याचबरोबर भावनांनाही...
ReplyDeleteतुला नक्की काय लिहू?? म्हणजे काही प्रश्नांवर उत्तर नसतं तसं काही पोस्ट वाचल्या की आपणच शांत होतो तसं...
आणखी एक त्यादिवशी विचार करत बसले होते की खरंच मी बझला मिस करतेय त्याचं कारण काय असावं...आणि ही पोस्ट वाचल्यावर त्याचं उत्तर मिळालंय....तुझ्या चारोळ्या....(आमचा त्यावरचा टिपी नाही खरंच नाही कारण तो टीपीच असावा) पण कविता जास्ती न समजणार्या माझ्यासारख्या व्यक्तीला तुझ्या चारोळ्या आवडायच्या..या पोस्टमध्ये सुरूवातीला चारोळ्या लिहिल्या आहेत त्या वाचायलाही फ़ार बरं वाटतं...
काळजी घे मित्रा....
धन्यवाद श्रद्धा :)
ReplyDeleteप्रतिक्रियेकरता अनेक आभार !
हे अॅप्स !
ReplyDeleteकाय गं? टीपी वैगरे काही नाही हं ;)
हल्ली बराच गोंधळ उडतोय गं! बाकी काही नाही !
तू म्हणतेस तसं गद्धेपंचविशी संपण्याच्या मार्गावर आहे. :)
दीप्स !
तूझ्या वेड्या दीपोळ्यांची सगळ्यांनाच आठ्वण येत असेल...
ReplyDeleteमस्त्...अप्रतिम....सुंदर्....निरागस..
हाभार्स यार...
ReplyDeleteआता नाही सुअचत चारोळ्या.. म्हणुन जुन्याच आठवत राहतो.
सुंदर...!
ReplyDeleteधन्स धुंडीराज !
ReplyDelete