Monday, August 30, 2010

तू तेव्हा तशी....

तू  फार वेगळीच दिसतेस..
पहिल्यांदाच मी तुला इतक्या जवळून पाहतोय...
शांत,निर्विकार्,निच्छल..
सारं काही विसरुन निद्रेच्या अधिन झालेली तू !
हाताची उशी करुन खडकाच्या कुशीत शिरलेली तू !
नेहमी हसत,बागडत, खेळत राहणारी तू !
पहिल्यांदाच मी तुला अशी शांत विसावलेली पाहतोय.
नेहमी खळखळणार्‍या झर्‍यासारखी तू !
मी पहिल्यांदाच संथ वाहणार्‍या नदीसारखी पाहतोय.
किति तरी वेळ मी तुला पाहतोय.
तुझा चेहरा मी माझ्या डोळ्यांत भरुन घेतोय.
तुझ्या नकळत तुझे काही स्नॅप्स घेतोय.
माझं तुला पाहत राहणं तुला जाणवतयं का???  कदाचित नाही...
मलाही तेच हवयं...
थांब! मी तुला इतक्यात ऊठवणार नाहीए... 
असं वाटतयं हा  क्षण इथेच थांबावा, सारं विश्व इथेच स्थिर व्हावं आणि मी तुला असंच पाहत राहावं, तू उठेपर्यंत...
तुझ्या अंगावरुन वाहणार्‍या वार्‍याचा मला हेवा वाटतोय.उशीसाठी घेतलेल्या तुझ्या बाहुंचा मला हेवा वाटतोय, तू  ज्या खडकाच्या कुशीत विसावलीस त्या खडकाचाही मला हेवा वाटतोय!
तुझे लयबद्ध श्वास माझ्या श्वासांचा वेग वाढवत आहेत...
तुझ्या केसांवरुन हात फिरवण्यास अधिर झालेल्या माझ्या हातांना मी आवरतं घेतो, माझ्या स्पर्शाने तू  जागी झालीस तर???
नाही मला अजुन तुला बघायचयं..
तुला तसं बघुन मला एकदम शाळेत असताना कूठेतरी वाचलेली एक कविता आठवलीए,
"रानात एकटे पडलेले फुल" काही शब्द विसरलोय पण ती अशी होती;



वन सर्व सुगंधित झाले, मन माझे मोहुन गेले 
किती तरी.
मी सारे वन हुडकिले,फुल कोठे न कळे फुलले 
मज तरी...
स्वर्गात दिव्य वृक्षास्,बहर ये खास; असे कल्पिले,असे कल्पिले,
मन माझे मोहुन गेले 
किती तरी...
परी फिरता फिरता दिसले 
फुल दगडाआड लपाले,
लहानसे,दिसण्यास फार ते साधे, 
परि आमोदे.
मी प्रेमे वदलो त्यासी, का येथे दडुन बसशी तु प्रिय फुला??
तु गडे फुलांची राणी, तुला गे कोणी धाडीले वनी??
मन माझे मोहुन गेले 
किती तरी...
ते लाजत लाजत सुमन, म्हणे मज थोडके हसुन.
"निवडले प्रभुने स्थान, रम्य उद्यान, 
तेच मज झाले, तेच मज झाले"
मन माझे मोहुन गेले 
किती तरी...." 



नको, तू  जागी होउ नकोस..अजुन थोडा वेळ तरी!! माहीत नाही हा क्षण परत येइल की नाही...मला आत्ताच तो क्षण जगु दे!! ...
तुला ऐकुही जाणार नाही इतक्या हळू आवाजात मी तुला हाक मारतोय..ऐकु येतेय का तुला ???
उशीसाठी घेतलेल्या तुझ्या बाहुला  स्पर्शुन  मी तुला उठवतोय; तुझ्या आणि माझ्याही मनाविरुद्ध...
तू  जागी झालीस पण  झोप तुझ्या चेहर्‍यावरुन जात नाहीए...डोळे अजुनही झोपेतुन बाहेर यायला तयार नाहीत...
उठुन बसताना तुझे बांधलेले केस मो़कळे झालेत...पण तुला त्याची फिकीर नाहीए... झोपेतच तू  ते सावरण्याचा प्रयत्न करतेस..
नको ना, अशीच छान दिसतेस....
माहीत नाही मी आता या रुपात  तुला  डोळे भरुन पाहीन की नाही??? मी फटाफट दोन तीन स्नॅप्स घेतोय...
दोन्ही हात पसरुन तू ...
.
.
.
.
.
.
.

मस्तपैकी एक जांभई देतेस....

तुझी झोप जातेय मला काही स्वप्ने देउन !!!!

22 comments:

  1. दीपक तुझे लिखाण खूपच छान आहे ,मस्त लिहीले आहे रे .अरे पण हे काल्पनिक आहे की......? कसे ही असो सुंदर आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद अनुजा...

    काल्पनिक नाही गं!!

    बसं असचं लिहिलं!!!

    ReplyDelete
  3. झकास..मस्त..छान.. फोटो ही खूपच छान..
    खूप संवेदन शील आहात.. आवडले

    ReplyDelete
  4. झकास..मस्त..छान.. फोटो ही खूपच छान . खूप संवेदनशील आहात..आवडले

    ReplyDelete
  5. धन्यवाद, नचिकेत...

    ReplyDelete
  6. अरे काल्पनिक नाही आणि असेच लिहिले असे कसे काय होऊ शकते रे ?

    ReplyDelete
  7. अनुजा

    काल्पनिक अशासाठी नाही कारण, हे सगळं मी अनुभवलयं त्या ३-४ मिनिटांमध्ये...

    ReplyDelete
  8. हे दिपक, काय छान लिहिलेस रे !!काळजाचे तुकडे पडतायत

    ReplyDelete
  9. कसल भारी लिहल आहेस रे....
    मस्तच..आवडल...

    ReplyDelete
  10. u r gr8 deepak .......keep it up....khup sunder lihle ahes......

    Swati Churi

    ReplyDelete
  11. अप्रतिम.... सुरेख..... खुपच सुंदर लिहिलं आहेस... आवड्या.. !!

    ReplyDelete
  12. अरे वा..... भावा मस्त लिहिलं आहेस रे!!!!

    गु-या

    ReplyDelete
  13. वाचतांना संपूच नये असं वाटत होतं.

    ReplyDelete
  14. धन्यवाद गुरुनाथ

    ReplyDelete
  15. धन्यवाद विशाल तेलंग्रे

    ReplyDelete
  16. हाभार्स विशाल दादा

    ReplyDelete