इतकावेळ नेहा गप्पच होती.तिला गप्प पाहुन राहुल बोलला," आर यु ऑलराइट ?, काही बोलत का नाहीस ?"
" नाही रे, मी ठीक आहे." नेहा शक्य तितक्या हळू आवाजात बोलत होती.
" किती भिजलीस तु, डोकं पुसून घे."
" हो, अरे पण टॉवेल बॅगमध्ये आहे ना."
राहुल ने आपल्या खिशातुन आधिच भिजलेला रुमाल काढला. " हे घे. याने पुस "
" अरे हा आधिच भिजलेला आहे "
त्या दोघांच्या संभाषणाला तोडत त्या युवकाने, त्याच्या बाजुच्या सिटवर असलेल्या त्याच्या हँड्बॅगमधुन एक छोटे टॉवेल बाहेर काढले आणि मागे न बघता त्या दोघांसमोर धरले " यु कॅन युज धिस वन, अँड डोन्ट् वरी इट्स अ न्यु वन !"
राहुल ने थँक्स म्हणुन ते टॉवेल घेतले आणि नेहाला दिले. इतक्यात समोरून येणार्या एका गाडीचे प्रखर हेड्लाईट्स त्या युवकाच्या चेहर्यावर पडले आणि गाडित असलेल्या मिररमधे चिन्मयचा चेहरा तिला दिसला. त्याने समोरच्या डॅशबोर्डवरचं सिगरेट्च पाकिट उचललं आणि राहुलला ऑफर केली, राहुल ने थँक्स म्हणुन ती नाकारली.
" आय होप, तुम्हाला त्रास तर नाही ना होणार?"
" नाही नाही, तसं काही नाही, पण नेहाला थोडंसं......" राहुल पुढे काही बोलणार इतक्यात चिन्मयने ते पा़किट परत डॅशबोर्ड्वर फेकले.
" अरे नाही मि. चिन्मय यु प्लिज कॅरी ऑन"
" नो इट्स ऑलराइट!" असं म्हणून त्याने गिअर चेंज केला आणि गाडी वेगाने पळु लागली. आता गाडी कसारा घाटात होती.राहुलने परत बोलायला सुरुवत केली
" गाडी छान आहे तुमची"
"ओह! थँक्स ! "
" तुम्ही मर्सिडीज बेंझ मध्ये काम करता आणि गाडी ऑडी ?"
" अॅक्चुअली, माझी आवडती गाडी आहे,"
"ओके. बरीच महाग असेल ना?"
" हो ४०-५० पर्यंत जाते. "
राहुलने आवंढा गिळला त्याला लगेच त्याची सँट्रो डोळ्यासमोर दिसली. त्यादोघांचं संभाषण सुरु होतं आणि इकडे नेहा शांतपणे बसून ऐकत होती. चिन्मय असा अचानकपणे समोर आल्याने ती बावरली होती. पण राहुल सोबत असल्याने ती काही बोलत नव्हती. पण राहुन राहुन तिला भिती वाटत होती की जर चिन्मयने आपल्याला कही विचारलं तर? पण ती शक्यता कमी होती. चिन्मय शांतपणे ड्राईव्ह करत होता.त्याने आतापर्यंत एकदाही समोरच्या मिररमधे मला पाहील किंवा तसा प्रयत्नही केला नव्हता. त्याच्या मनात आता काय चाललं असेल? त्याला वाटत असेल का माझ्याशी बोलावसं? आता बाहेर पाउसही थांबला होता आणि घाटही.
" यु गायज आर हंग्री?"
" हो, भूक तर लागलीच आहे. विचार केला की घरी जाउनच जेवायच, तुम्ही म्हणत असाल तर खाउया काही तरी, नेहा, ?" राहुलने नेहालाही शेवटी विचारले.
" नाही तुम्ही खाउन घ्या, मी गाडीतच थांबते, मला झोप येतेय." नेहा टाळायचा प्रयत्न करत होती.
बोलता बोलता चिन्मयने गाडी हायवेच्या बाजुला असणार्या एका ढाब्याजवळ नेउन थांबवलीसुद्धा।गाडी बंद केली, सिगरेटच पाकिट घेतलं आणि तो गाडीच्या बाहेर पडला. बाहेर येवून त्याने सिगरेट पेटवली आणि गाडीला टेकून तो सिगरेट ओढू लागला.इतक्यात त्याच्या बाजुच्या दरवाजा उघडला आणि नेहा बाहेर आली. जिन्स, टॉप आणि डेनीम जॅकेट, केस विस्कटलेले. फार छान दिसत होती. चिन्मयने तिच्याकडे पाहिलं आणि तो पूढे आला. नेहा जागिच उभी राहीली. चिन्मय तिच्याकडे गेला ती थोडीशी बाजुला झाली. चिन्मयने तिच्याकडे न पाहता, गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडे लॉक करुन तो ढाब्याच्या दिशेने चालू लागला.वॉश बेसीनवर तोंड धुवून तो एका टेबलवर येवून बसला. राहुलही त्याच्यामागोमाग येवून समोर बसला.
" नेहा फ्रेश व्हायला गेलीय." न विचारताच राहुल बोलला.
इकडे नेहाला काय करावे तेच सुचत नव्हते. ती कशीबशी फ्रेश झाली अणि राहुलच्या बाजुला येवून बसली.
" ओके. काय खाणार ?"
" काहीही !"
" ओके, अरे तिन प्लेट 'काहीही' घेउन ये !" चिन्मयने बाजुला उभ्या असलेल्या वेटरला ऑर्डर केली.यावर त्या वेटर सकट सगळे हसायला लागले. जेवण आटोपल्यावर ते परत जायला निघाले. नेहाने एक गोष्ट नोट केली की चिन्मय तिच्याकडे अजिबात बघत नव्हता. बिल आल्यावर राहुलने ते घेतले.
" आय्'ल पे."
" नो युज मि. केळकर तो तुमच्याकडुन पैसे नाही घेणार. हा, जर तुम्हाला ते बिल आपल्या भेटीची आठवण म्हणून ठेवायच असेल तर तुम्ही खुशाल ठेवू शकता." राहुल फक्त हसला. चिन्मयने बिल पेड केले आणि गाडीच्या दिशेने चालता चालता सिगरेट पेटवली.........
क्रमश: