त्यादिवशी अॅप्सशी ( अपर्णा ) चॅटवर बोलताना डायरीची आठवण झाली. डायरी कधी काळी लिहायचो, काहीतरी खरडायचो..म्हणजे नेहमी नाही हां. रोजनिशी वैगरे तसला प्रकार नाही. बस्स कधी असाच कंठाळा आला की काहितरी खरडत बसायचं. बरं ती डायरी सर्वसमावेशक असायची. म्हणजे त्यात माझं मनातलं खरडणं, क्लायंटसचे अॅडरेसेस, फोन नंबर. क्वेरीज, ऑफीसच्य मिटींग्जच्या नोट्स सारं काही. म्हणजे ती डायरी कुणाच्या समोर उघडू पण शकत नसे.. आजकाल मी डायरी वापरत नाही, लॅपटॉप आल्यापासून. आता डायरीची जागा लॅपटॉपने घेतली. यातही बरचं काय काय आहे. पण नशीब वेगवेगळ्या कप्प्यात ठेवता येतं. त्यामूळे लॅपटॉप हवा तिथे कुणाच्याही समोर ओपन करून माझं काम करता येतं. आणि खरं सांगतो लॅपटॉपवर जितक्या पटपट सुचत ना, तितकं डायरीवर नाही सुचायचं..
तर डायरी.. आज संध्याकाळी घरी आल्यावर मम्मीच्या मागे लागून लागून तिला शोधायला लावली. डायरी शोधता शोधता अजुन दोन डायर्या सापडल्या. त्या डायरीला बघताच असचं पटकन काळजात थोडसं दुखलं. डायरी हातात घेतली, मम्मीच्या शिव्यांसकट. डायरीवरली धूळ हलकेच पुसली. असचं कुणीतरी खूप वर्षानी आपल्याला भेटावं आणि आपल्याला त्या व्यक्तीने स्पर्श करावा, मायेचा हात केसांवरुन फिरवावा तसं जाणवलं. डायरी उघडली, पहिल्या पानवर माझं नाव, त्याखाली माझा त्यावेळचा सेल नंबर आणि माझा रेडीफमेलाचा ई मेल आयडी dparulekar@rediffmail.com आईशप्पथ! मी हा आय डी विसरुनच गेलो होतो..
तर डायरी.. आज संध्याकाळी घरी आल्यावर मम्मीच्या मागे लागून लागून तिला शोधायला लावली. डायरी शोधता शोधता अजुन दोन डायर्या सापडल्या. त्या डायरीला बघताच असचं पटकन काळजात थोडसं दुखलं. डायरी हातात घेतली, मम्मीच्या शिव्यांसकट. डायरीवरली धूळ हलकेच पुसली. असचं कुणीतरी खूप वर्षानी आपल्याला भेटावं आणि आपल्याला त्या व्यक्तीने स्पर्श करावा, मायेचा हात केसांवरुन फिरवावा तसं जाणवलं. डायरी उघडली, पहिल्या पानवर माझं नाव, त्याखाली माझा त्यावेळचा सेल नंबर आणि माझा रेडीफमेलाचा ई मेल आयडी dparulekar@rediffmail.com आईशप्पथ! मी हा आय डी विसरुनच गेलो होतो..
हलकेच पानं उलटु लागलो आणि आपोआप मन मागे मागे जाउ लागले. काय काय लिहिलं होतं त्या डायरीत. कुणाकुणाच्या कविता, गाणी.. कुणाकुणांची नावं.. कैच्या कै होतं सगळं. त्यावरुन एक किस्सा आठ्वला. ४ वर्षांपूर्वी मी नेट फोर मध्ये असताना माझ्या टीममधल्या एका मुलाला माझी डायरी दिली आणि बोललो अरे इथे बघ जरा, इन्वेंचर सिक्युरिटीज चा नंबर आहे त्याला फोन कर आणि पेमेंट स्टेट्स विचार.. थोड्यावेळाने तो आला, " सर राँग नंबर आहे!"
"काय? राँग नंबर कसा असेल? अरे मी नेहमी याच नंबरवर बोलतो तिथे.. पुन्हा ट्राय कर !"
तो परत गेला आणि थोड्या वेळाने परत आला, " सर! राँग नंबर आहे, ती बाई ओरडते मला सारखी!" " बाई??? कोण बाई??" (हा तर अर्जुनचा नंबर आहे मी मनात पुटपुटलो) अरे , तू कुणाल कॉल करतोयस?
"सर ह्याच नंबरवर पल्लवी मॅडमना"
"आयचा घोव तुझ्या! साल्या इथे अर्जुन लिहिलय ते दिसत नाही तुला, पल्लवी बरोबर दिसली..!!"
"तुझाच टीममेट ना तो!" कूणी तरी मध्येच खेकसलं..
त्या डायरीमधे मला सवय होती (अजूनही आहे) कंठाळा आला की मुलींची नावं, जी मला आवडतात ती मी वेगवेगळ्या फाँट्समध्ये काढायचो, त्यात जास्त नक्षत्रांची नावं असायची म्हणजे उत्तरा, पूर्वा, जेष्ठा, रोहिणी वैगरे..वैगरे... कधी त्यात मैत्रीणींची नावं जसं या पल्लवीचं होतं.. असो.
टीसीएस मध्यी झालेल्या एका मिटींगची मिनीटस आहेत. वेल, मिनीट्सच्या शेवटी मी त्या टीसीएस च्या मुलीचं नाव लिहीलं होतं,मौसुमी. आणि तिचा सेल नंबर आणि पर्सनल आयडीपण.. हि एक चांगली मैत्रीण होती म्हणजे आता कुठे आहे माहित नाही..
जागोजागी रिहानाचं नाव पण कोरलयं.. वेल माझी फेव्ह सिंगर आहे हां !
ओह! हो!! कधी काळी तबला शिकायला जात होतो.. त्या क्लासमधले नोट्स आहेत..
तालः त्रिताल, मात्रा: १६, भागः ४ ( ४*४) , ३ टाळ्या, एक खाली.. २,५,१३ या मात्रांवर टाळी. ९ व्या मात्रेवर खाली.. हे हे हे..
( बायदवे त्या क्लासमधे गाणं शिकवणारी एक मुलगी सहीच होती.. अर्पिता की काय नाव तिचं.. मला गाणं शिकायचा मोह आवरला नव्हता.. असो :) नंतर पनवेला राहायला आल्यावर तबला बंद झाला)
नंतर दुसरी डायरी उघडली यात पहिली ३-४ पाने खरडली होती. लेखाचं नाव होतं "संध्याकाळची संध्या" वेल, शाळेत असताना एका मुलीवर जरा जास्तच सिरिअस झालो होतो.शाळेतल्या त्या आठवणी खरडल्या होत्या.वाचून अगदी हसायलाच आलं.काय काय लिहिईलं होतं मी तिच्याबद्दल. हे हे हे !!
नतंर काही पानांवर कवी ग्रेस यांच्या काही कविता उतरवल्या होत्या.
पुढल्या पानावर अजुन एक लेख" Forgiving But Never Forgets!"
नको ! हा लेख वाचावासा नाही वाटला, फक्त नजर फिरवली आणि पुढे वळलो.
पुढे खोडलेले, अर्धवट परिच्छेद दिसले. कदाचित पुढे काही सुचलं नसेल किंवा भरकटलो असेन म्हणून अर्ध्यावरच सोडून दिलेले.
प्रत्येक पानावर नावं आहेत कोरलेली (खर्या नक्षत्रांची).
एका पानावर मी माझ्या मित्रांची नावं लिहिली आहेत. तेजस, सिरीष्,समीर खान्,बन्या, गोकूळ्.,अमोल्,योगेश्,विजय... का लिहिली होती ते आठवत होतो, जाउ दे आठवत नाही...
"माझे प्रश्न फारसे वेगळी नाहीत फक्त त्यांचे संदर्भ वेगळे आहेत." या वाक्याने सुरु केलेला आणि अर्ध्यावरच सोडलेला एक उतारा सापडला.तो अर्ध्यावर का सोडला हे कळलं वरच्या वाक्याने सुरु होउन तो ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत पोचला होता म्हणून त्याला आवरला...:)
बाजुलाच CHELSEA, ACHILLES आणि TROY असं कोरलंय.
LUFTHANSA,VENOM, OSCAR हे पण वेगवेगळ्या फाँट्समध्ये.
मी पार्ल्याला राहायला होता तेव्हा टेरेसवरुन नेहमी लँड आणि टेक ऑफ होणारी विमानं पाहायचो.तो कसला तरी छंदच होता अणि मग वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या लोगोज आणि प्लेन्स काढायचो. LUFTHANSA आणि QANTAS कांगारु एकदम फेव्हरिट.त्या पहिल्या डायरीत बरीच प्लेन्स सापडली..
"कधी कधी हे जगणं नकोसं वाटतं, एकच क्षणात सारं संपवून टाकावसं वाटतं" अम्म्म फ्रस्ट्रेट असेन... :)
२५ व्या बर्थडेच्या वेळी लिहिलेला "वळणं" नावाचा लेख आहे. यात स्व:ताची जरा जास्तच स्तुती केलीय मी......
२६.१२.२००९ला ( पहिल्यांदा मी एखाद्या लेखाला तारिख टाकली होती ) त्या वर्षाचा आढावा घेणारी २-३ पाने दिसली.. वाचून सगळं डोळ्यांसमोरुन झर्र्कन निघून गेलं.पूढे माझ्या काही चारोळ्या.. वेल या डायरीत फक्त लेख आणि कविताच आहेत म्हणजे ही डायरी फक्त मी खरडण्यासाठी वापरत असे..
ट्युलिपमध्ये जॉईन झाल्यापासून मी नेहमीच्या नोट्ससाठीपण डायरी हा प्रकार वापरत नव्हतो, जे काही आहे ते सगळं नोट्पॅडवरच टायपतो.. एकदा बॉस भडकला होता, जब लॅपटॉप खराब हो जाएगा तो क्या करेगा??
अरे काळ्या जीभेच्या जरा चांगलं बोलत जा की जरा! पण तो बोलला ते पटलं. मागल्या कंपनीत असताना लक्ष्मीपुजनाच्या वेळी भटजीनी वाट्लेल्या लक्ष्मीमातेचं चित्र असलेलीं चोपडी सापडली. पहिल्याच पानावर कसलं तरी लक्ष्मी यंत्र की काय आहे.असो सध्या हीच ऑफीशिअल डायरी म्हणून वापरत होतो. दोन दिवसांपूर्वी ऑफीसमध्ये माझ्या नावाचं एक जाडजूड पर्सल आलं. DOW CORNING या क्लायंट्सकडून आलं होतं. काय असेल त्यात म्हणुन ओपन केलं ४ डायर्या होत्या.. स्वःताला एक ठेवून बाकीच्या टीममधल्या ३ लोकांना दिल्या.
ती डाव कॉर्निंगची डायरी इतकी मस्त आहे की, ऑफीशिअल नोट्स लिहून खराब करावीशी नाही वाटतं.. नक्षत्रांनो मी येतोय...
ती डाव कॉर्निंगची डायरी इतकी मस्त आहे की, ऑफीशिअल नोट्स लिहून खराब करावीशी नाही वाटतं.. नक्षत्रांनो मी येतोय...
अशी डायरीची मज्जा मज्जा!
आताची डायरी म्हणजे माझा लॅपटॉप आणि त्यात असलेलं डी नावाचं फोल्डर. आणि हो जीमेलचा ड्राफ्टबॉक्स पण!!
चला जपून ठेवतो. परत कधी कंठाळा आला की वाचायला काढेन..
हे हे हे ..सहीच काही पाने परत उलगडताना खूप खूप आनंद होतो :)
ReplyDeleteस्वगत : आयला मी डायरी लिहायचा संकल्प पार ५-६ वर्षापुर्वी केला होता....हा हा हा
मस्त... मुला-मुलींची नावे असं एक पुस्तक छाप. बारश्यासाठी चांगली विक्री होईल.
ReplyDeleteबाकी तुझी डायरी वाचताना खूप मज्जा आली. त्यात मुलांची पण नावे तू गिरवलेली आहेस ह्यावरून तुझी कळते. लवकरच एका पल्लवी बरोबर मस्त कॉफी पी. आणि हो त्या डायरीची काही पाने स्कॅन करून बझ्झ वर नाहीतर पोस्टवर टाक. धमाल येईल.
सही है भिडू....लिहितो म्हणाला तेव्हा कळलं नव्हतं की या विषयावर नक्की काय लिहिणारेस...
ReplyDeleteएकदम मस्त...माझ्या पण जुन्या डायर्या आईला येताना आणायला सांगायला हव्या...(मारेल धरुन मला त्यानंतर तिनेच दोन घरं बदललीत...काय काय पाठीवर घेऊन फ़िरणार माझं.....त्या डायर्या नसतील आता..त्यांची कधीच चण्याची पुडी झाली असेल असं मला तर वाटतं....)
एकेकाळी मी अधेमधे तरी डायरी लिहायचे कारण लिहून टाक म्हणजे मनातलं तरी बाहेर जाईल असं एक मैत्रीण म्हणायची...आता पुन्हा खरं म्हणजे कधी सुरुवात केलीच तरी बॅक टू लॅपटॉप ...तुझ्या बॉस़ची काळी जीभ काहीतरी बरोबर सांगु पाहातेय रे....
BTW Sidharth ne aatapasun profile la ambe kaay lawlet...nantar jalawa na aamhala...
थँक्स सुझे!!
ReplyDeleteकाय नाय रे , संकल्प वैगरे करायचा नाय .. असंच रिकामी जागा दिसली की खरडायला सुरु करायचं.. :)
सिद्धू ! तुला कसं काय कळतं बुवा माझी कॉफीची इच्च्छा!??
ReplyDeleteमस्त... मुला-मुलींची नावे असं एक पुस्तक छाप. बारश्यासाठी चांगली विक्री होईल.+++ आयडीया छान आहे.. :)
पल्लवीला कॉल करतोच आत कॉफीसाठी :) वेल, या पल्लवीचा पण एक किस्सा आहे तो शेप्रेट ताकतो ब्लॉगवर.. :)
थँक्स अॅप्स !
ReplyDeleteअरे त्यादिवशी आपण बोलत होतो ना, मला एकदम आठवली गं डायरी...
मग वाचता वाचता जे सुचलं ते लिहित गेलो..
:)
सहीच! उजळणी छानच केलीस.
ReplyDeleteडायरी मेरी जान!! :)
काय काय लिहून जातो ना आपण... मागे वळुन पाहताना कधी हसू तर कधी आसू चा खेळ मस्त जमतो.
श्री ताई, आभार !!
ReplyDeleteखरचं मज्जा येते जुन्या लिहिलेल्या आठवणीना उजळणी द्यायला.. कधी हसू आणि कधी आसू.. खरचं... !
माझी डायरी तर माझी सख्खी मैत्रिणच आहे...माझं अख्खं आयुष्य आहे ती...तू बरी आठवण केलीस...मीही माझ्या जुन्या डाय-या वाचणार आहे आज...काय माहित नविन काहितरी मिळुन जाइल...
ReplyDeleteबाकि पोस्ट शॉर्ट अॅण्ड स्वीट...!!!
आभार सारिका...
ReplyDeleteकुणी जवळचं नसलं की डायरीला जवळ घ्यावं आणि तुच्याशी तासंतास बोलाव....
मज्जा मज्जा ! :)