दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये आमच्या दोघांचं बरच कौतुक झालं. ऑर्डरही तशीच मिळाली होती. येणारा - जाणारा प्रत्येकजण आम्हा दोघांचं अभिनंदन करत होता..काही वेळाने रिया माझ्यापाशी आली.
" Congrats !! कसा आहेस?"
" Same to you!! मी मजेत,.. तु कशी आहेस??"
" I,m good!! चल आता अजुन कामं करायची आहेत. तसं आपलं या महिन्याचं टार्गेट तर पुर्ण झालंय... पण पुढच्या महिन्याची तयारी करायला हवी."
" या! हो !काही प्रॉस्पे़क्ट्स आहेत. मी फॉलो अप करायला सुरुवात करतो..."
" Ok. All the best !!! "
" Thanks ! "
असं म्हणुन मी कामाला सुरुवात केली. लॅपटॉप सुरु केला. पहिलं काम जी - मेलवर मेल्स चेक करणे. बाजुलाच ट्विटर लॉगइन केल. नेहमिच्या मित्रांच्या ट्विट्स वाचणे आणि रिट्विट करणे. मेल्स काही विशेष नव्हत्या.. रियाने ऑरकूट आणि एफबीवर काही स्क्रॅप टाकले होते.. मेघाने श्री बालाजीचा फोटो फॉर्वर्ड केला होता आणि २० जणांना फॉरवर्ड करा असं लिहिलं होत. तसं न केल्यास काय होईल तेही उदाहरणांसहीत लिहिल होतं. मी बालाजीला नमस्कार केला आणि पुढच्या कामाला लागलो..मराठीब्लॉगविश्व ओपन केलं.. काही नविन लेख, कविता, वाचायला मिळाल्या...चला...सकाळचा सहित्यिक नाश्ता झाला.. आता जी - टॉकवर लॉगिन केले' म्हणजे दिवसभर काम करता - करता मित्रांच्या सोबत टवाळक्या करायला मो़कळा. आता कामाला सुरुवात... आउटलुकमध्ये बॉसकडुन आणि कंपनीच्या अमेरिकेतल्या गोर्या साहेबाकडुन अभिनंदनपर मेल आलं होतं.. त्यासगळ्यांचे मन:पूर्वक आभार मानुन मी माझ्या कामाला आरंभ केला. खरं तर काम करायचा मुड नव्हता..जी टॉकवर रिया, मेघा, सिद्धु,समीर असे ऑनलाईन दिसत होते.. रियाच्या स्टेटस बदलला होता.. फिलिंग गुड !! काही क्लायंट्सना फोन करुन अपॉईंट्समेंट फिक्स्ड केल्या..आणि प्रपोझल बनवत बसलो..दुपारी २-३ च्या दरम्याने ममाचा फोन आला. " हाय मा, बोल."
" अरे, संध्याकाळी लवकर नीघ जरा."
" का गं? "
" अरे, नंदा मावशीकडे जायचयं, तीने बोलवलयं, आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मग छोटीशी पार्टी आहे. मी, वैशु आणि पपा चाललोय, तु ऑफिसमधुन ये."
" ममा, तुम्ही जा ना, मला जाम कंठाळा येतो गं तिथे. मावशी सारखी पकवते गं."
" काही पकवत वैगरे नाही, तु यायचं म्हणजे यायचं. ओके?"
" ओके. चल बाय." म्हणुन मी परत कामाला सुरुवात केली. संध्याकाळी बॉसने मला आणि रियाला मिटिंगसाठी बोलावलं.. काही एक्सपेक्टेड प्रॉस्पे़क्टसवर चर्चा झाली. इतक्यात परत ममाचा फोन आला. मी ते कट केला.. असं दोन तीन वेळा झालं. रिया माझ्याकडे डोळे वटारुन बघत होती. मी ममाला कॉल बॅक करतो असं टेक्स्ट करुन परत मिटींगमध्ये शिरलो....मिटींग संपल्यावर मी निघायची तयारी करु लागलो. रिया आली. " काय? कुठे चाललाय? "
" अरे! मावशीकडे जायचयं. तिची वेडींग अॅनीवर्सरी आहे आज. गेलं पाहीजे नाही तर आमच्या मातोश्री!!!! " मी वाक्य पुर्ण करणार इतक्यात ममाचा परत फोन आला.
" अगं माझ्या आई निघतोय मी. सात - साडे सात वाजेपर्यंत पोहचेन."
" मग हे प्रेझेंटेशन??? " रिया.
" मी तयार करतो. तु काळजी करु नको. रात्री बनवेन."
" रात्री?? तु पार्टीवरुन येणार केव्हा आणि बनवणार केव्हा?? राहु दे. मीच तयार करते."
" So Sweet of you!!! "
" बाय दे वे, कूठे राहते तुझी मावशी? "
" नेरुळ. नवी मुंबई. "
" ओके. चल मी तुला ड्रॉप करते वाशी पर्यंत."
" अरे. नको. डोन्ट बॉदर. मी जाईन ट्रेनने."
" अरे आता लोकलला किती रश असेल. चल. मग वाशीवरुन जा तु."
" ओके. चल." आम्ही दोघे निघालो. ट्रॅफिक भयंकर होतं चेंबुरला पोहचेपर्यंत आम्हाला सात वाजले. परत ममाचा फोन.
" हा ममा. मी चेंबुरला पोहचलोय. खूप ट्रॅफिक आहे."
" अरे, पण तु बसने का येतोय? ट्रेनने इतक्यात पोहचला असतास."
" अगं, मी बसमध्ये नाहीए. रिया मॅमच्या कारने येतोय. त्या वाशीला राहतात ना. मग मला वाशीपर्यंत ड्रॉप करते म्हणाल्या. येतो मी लवकर." फोन ठेवून मी रियाकडे पाहीले. फक्त ओठांनीच सॉरी बोलुन ती हलकेच हसली. "इटस ओके." मी ही ओठांची हालचाल केली. ट्रॅफिकमधुन आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो.
" मला तुझ्याशी काही बोलायचं होतं.."
" अं? काय? बोल ना? "
" काही नाही रे. सहजच... काल फार मज्जा आली ना? "
" हो!! "
" आपण परत जाउया तिथे? पण पावसात...."
" पावसात???? " पुढे शांतता.... कुणीच बोललं नाही.
" तु काही तरी बोलणार होतीस... ?"
" काही नाही रे.. असच....नंतर बोलू.... " पूढे हाय वे वरुन रियाने गाडी सुसाट सोडली. काही वेळात आम्ही वाशीला पोहचलो.
" मी सोडु तुला नेरूळला? "
" नको. यार. थँक्स. मी जाईन."
" शुअर?"
" या.. या... चल. थँक्स फॉर द लिफ्ट. उद्या भेटु ऑफिसमध्ये."
" ओके. बाय."
मी मावशीच्या घरी पोहचलो तेव्हा ८ वाजले होते. मम्मीने डोळे मोठ्ठे करुन माझ्याकडे पाहिलं. बरेच पाहुणे मंडळी जमले होते. समोरुन मावशी आणि अंकल आले. बघताच मावशी ने माझे गाल ओढले. ती नेहमी असंच करते. मी अजुनही लहान असल्यासारखे ती माझे गालगुच्चे घेत राहते. मी दोघांनाही विश केलं. ममाने मला बोलावलं.
" अरे जा. जरा फ्रेश होउन ये. आणि हो तो मी दुसरा शर्ट घेउन आलेय. तो घाल."
" शर्ट???? का? कशाला? ह्याला काय झालंय???"
" काही नाही रे. जा तु फ्रेश होउन ये.." ममा मावशीला काही तरी इशारे करत होती. तिकडे वैशुही खुद्खुदत होती. काय चाललयं ते कळत नव्हतं...मी फ्रेश होउन आणि शर्ट बदलुन आलो. ड्रींक्स आणि डीनरचा कार्यक्रम टेरेसवर जोरात सुरु होता. मी टेरेसवर गेलो.पपानी बोलावून घेतलं आणि काही नातेवाईकांशी ओळखी करुन दिल्या. मी एक पाईंट घेतला आणि टेरेसच्या एका कोपर्यात जाउन उभा राहीलो. संध्याकाळची वेळ.. समुद्राची खारी हवा अंगाला झोंबत होती.. पाम बीच रोडवरुन गाड्यांची ये - जा सुरु होती. ती कातरवेळ मी माझ्या बीअरसोबत एंजॉय करत उभा होतो. इतक्यात मावशीची मुलगी अनघा आली." हाय दादा, कसा आहेस'"
" ओह! चिकु?? मी ठीक. तु कशी आहेस? हाव'ज युर कॉलेज गोईन ऑन? "
" इट्स कूल!! अच्छा, ऐक ना तुला ममाने खाली बोलावलयं."
" ओके. चल येतो म्हणुन सांग."
" नाही. आत्ताच चल. मला तुला घेउन यायला सांगितलयं."
" अगं पण माझी बीअर तर संपु दे."
" ते सगळं नंतर. चल आत्ता. "
' ओके. ओके. चल"
आम्ही दोघं खाली गेलो. ममा आणि मावशी बसल्या होत्या. त्यांच्यासोबत अजुन एक बाई बसल्या होत्या. ममाने मला बसायला सांगितलं आणि त्या बाईंशी माझी ओळख करुन दिली. " हा माझा. मोठा मुलगा.. अॅड एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणुन आहे." मी त्या बाईंना नमस्कार करायला वाकलो. " अरे, अरे, राहु दे.. सुखी रहा!!"
" तुमची मीरा कुठे दिसत नाहीए." ममाने त्या बाईंना विचारले.
"होती इथेच. चिकु, मीरा ताई कुठे आहे? जा तिला बोलव." मावशीने चिकुला सांगितले.
" अगं ती टेरेसवरच आहे."
एव्हाना हा प्रकार माझ्या लक्षात यायला लागला होता. ममाचं मला पार्टीला यायला फोर्स करण. दुसरा शर्ट घालायला सांगण. ओळख वैगरे... आयला!!! माझी वि़केट काढण्यासाठी ही सगळी फिल्डींग लावली होती तर... मी उठलो..
" ममा... जरा ये ना. मला तुझ्याशी बोलायचयं."
मी आणि ममा किचनमध्ये गेलो. " काय चाललयं हे?"
" कुठे काय? काही नाही!! अरे ती नंदाची मैत्रीण आहे ना तिला तुला बघायचं होतं."
" का? "
" का म्हणजे? असच.. ओळख अजुन काही नाही...."
" ओळख??? तिच्याशी कि तिच्या मुलीशी???"
" हे बघ, तु आता २७ वर्षांचा झालास. तुझ्या लग्नाचा विचार आम्हालाच करावा लागणार ना? "
" अगं पण इतकी घाई का? करु सावकाश"
" कधी म्हातारा झाल्यावर?? त्यात तुझी कूणी गर्लफ्रेंडही नाही. आम्हाला वाटलं होतं तुझं तुच जमवशील... पण कसलं काय? एक मुलगी नाही पटवता आली तुला?? आणि तसं पण आम्ही फक्त तुझी ओळख करुन देतोय.तुला तिच्या गळ्यात नाही बांधत आहोत. तु फक्त तिला भेट. बघा एकमेकांना. जमतयं का ते. नाहीतर लिव्ह इट....चल आता..."
नी मुकाट्याने ममाच्या मागुन बाहेर आलो. " मावशी!!!! मीरा ताई वर आहे टेरेसवर." चिकु ओरडली.
" जा. दादाला तिच्याकडे घेउन जा आणि ओळख करुन दे." त्या बाईंनी चिकुला सांगितलं.... चिकु मला टेरेसवर घेउन गेली. कोण कशी असेल कूणास ठाउक? मला राहुन राहुन ती तारका आठवत होती. चुकलं! ममाला सांगायला हवं होतं कि मी काल एका मुलीच्या प्रेमात पडलोय. अजुन थोडा वेळ मिळाला असता तर तिला पटवुन दाखवलं असतं. नंतर विचार केला जाउ दे तिकडे, असं धक्का लागुन किंवा आपटुन प्रेम फक्त चित्रपटांमध्येच होतं..एक मुलगी जिथे थोड्यावेळापूर्वी मी उभा होतो तिथे उभी होती. लेमन कलरची साडी. लांब सोडलेले केस.. चिकुने मला तिच्याकडे जायला सांगितलं. " तु चल ना सोबत."
" नाही दादा. तुच जा. मी जाते माझे काही फ्रेंड्स आलेत." असं बोलुन ती पळाली..मी धीर करुन तिच्याकदे गेलो आणि तिच्या मागे उभा राहीलो..
" excuse Me! " ती मुलगी वळली.. आणि मला धक्काच बसला.....
" य्य्यु ?????? " आम्हा दोघांच्या तोंडुन एकाच वेळी प्रश्न निघाला........पुढे काय बोलावे ते दोघांनाही सुचत नव्हते.. आम्ही फक्त एकमेकांकडे बघुन, न बघुन हसत होतो... मग मीच सुरुवात केली." काय योगायोग आहे नाही? "
"अं?? हो ना!! बाय द वे, कालच्यासाठी पुन्हा एकदा थँक्स...."
" इट्स ओके.तुम्ही काय करता?"
" मी. मेहता शिपिंग्समधे असिस्टंट मॅनेजर आहे. आपण काय करता? "
" मी एका अॅड एजन्सीमधे आहे."
" ओके. ग्रेट." पुन्हा काहीवेळ शांतता पसरली... समुद्राच्या वार्याने तिचे केस उडत होते आणि एका हाताने ती ते सावरत होती......
क्रमशः