Thursday, March 24, 2011

आमच्या दुनोळ्या आणि बझबझाट !!!

कवितांचे बरेच प्रकार असतात नै !! पण आमच्या बझ्झवरचे प्रकार हे कैच्याकै असतात, त्यातलाच या नविन प्रकाराचा आका उर्फ आनंद काळे याच्या बझ्झ्वर शोध लावला. या प्रकाराचं नाव दुनोळी!! म्हणजे दोन ओळींची कविता!
" माझ्यासाठी कोण आहेस तू?"  मी शारुक  मांजरसुंभेकर  या नाटकात सिद्धु जेव्हा आउट ऑफ ऑर्डर असलेल्या फोनवर त्याच्या हयात नसलेल्या प्रेयसीला कवितेच्या रुपात वेगवेगळ्या उपमा देउन सांगतो  तो प्रसंग मस्तच आहे !!
तर त्यावरुन आमचा मित्र आका याने खालीलप्रमाणे  बझ्झ टाकला ! मग काय म्हणता, सगळ्यांनी आपापल्या परीने सांगितलं की, " माझ्यासाठी कोण आहेस तू !"
वाचा तुम्हालाही आवडतिल आमच्या दुनोळ्या............


Buzz From Anand Kale - 
रविवारी "मी शारुख मांजरसुंभेकर" नाटक पाहीलं....
त्यातला एक प्रसंग आहे ज्यात "माझ्यासाठी कोण आहेस तु??" हे सिध्द्या सांगतो ते असं....

माझ्यासाठी कोण आहेस तू
सकाळच्या नाष्ट्याचं ऑम्लेट आहेस तू
उजाड माळरानावरलं हीरवगार गवत आहेस तू....

तुम्हाला काय वाटतं???

आ का Anand Kale -
माझ्यासाठी रोजचा बझ आहेस तू
कोल्हापुरच्या बाजारातला किमती साज आहेस तू
तलावपालीची एक गुलाबी संध्याकाळ आहेस तू
बालपणीत रमलेला माझा भुतकाळ आहेस तू..
माझ्यासाठी कोण आहेस तू.....

दीप Deepak Parulekar -
सकाळचा गुड मॉर्निंगचा टेक्स्ट आहेस तू
चकॉपी करून पेस्ट केलेला ड्राफ्ट आहेस तू
 लोकल ट्रेनच्या डब्ब्यातली विंडो सीट आहेस तू
वार्‍याच्या झोताबरोबर वाहणारी प्रीत आहेस तू

सुहास झेले -
पहिल्या पावसाने दरवळलेला मातीचा सुगंध तु..
आजवर बघितलेलं सुंदर स्वप्न तु..

भारत मुंबईकर -
पार्टीच्या डिशमधला पहिला घास तू
माझ्यासाठी चवीची आणि वासाची झक्कास स्वीट तू. 

आ का Anand Kale -
सकाळच्या धुक्यात मारलेली रपेट आहेस तू
लाडाने मारलेली गालावरची चापट आहेस तू.. :)

आ का Anand Kale -
स्वामींच्या झोळीतली त्रिवेणी आहेस तू
दिपकच्या चारोळीतली रातराणी आहेस तू...
 
विशाल कुलकर्णी -
अंगणात ओघळलेली प्राजक्ताची कळी तू...
तृणपर्णाने सांभाळलेलं लाजरं दंव तू..

सिद्धार्थ . -
गोड शिळ मारणारा पारवा आहेस तू...
भर उन्हात हवाहवासा गारवा आहेस तू...
 
विशाल कुलकर्णी -
अंगाला झोंबणारा गारवा तू...
आत जावून टोचणारा मारवा तू...
 
आ का Anand Kale -
लाल लाल गोळ्याचा गार गार बर्फ तू
मारवाड्याच्या मिठाईवरचा चमकणारा वर्ख तू...... ( खादाडी स्पेशल... :)
 
दीप Deepak Parulekar -
माझ्या कवितेतले शब्द आहेस तू
क्षणात उसळणारी लाट, आज का स्तब्ध आहेस तू??
 
सुहास झेले -
फेविकॉलचा मजबूत जोड तु..
दिलखेच लाजणारी गोड तु.. :)
 
सिद्धार्थ . -
गोड गोड चॉकलेट तू...
मस्त भरलेलं पापलेट तू... (नॉनव्हेज स्पेशल)
 
आ का Anand Kale -
पिवळाजर्द  कोकणातला हापुस आंबा तू...
बिचवरला रात्री बसून मारलेला खंबा तू... :) :) ... (बेवडा स्पेशल,,,,

सुहास झेले -
फुर्रर्र्र आवाज करत संपणारी रश्याची वाटी तु...
कधीही न संपणारी प्रिती तु..
 
सुहास झेले -
उकडीच्या मोदकातला गोड मसाला तु
गरम गरम भातावर सोडलेली तुपाची धार तु ....
 
दीप Deepak Parulekar -
माउताईचे केक्स तू
सीसीडीच्या कॉफीचे फ्लेक्स तू :)
 

सुहास झेले -
पोळी मधले पुरणाचे सारण तु
माझ्या जगण्याचे कारण तु...
 
ABM नितीन मोरजे -
दरी डोंगरामध्ये स्वच्छंद भटकणारा वारा तू !
सह्याद्रीमधील उंच कड्यावरून पडणारे पाणी तू !!
फुलाना पाहून होणारा बावळा तू !!
महाराजांच्या गड कोटावरील मावळा तू !
आसमंतात उंच उडणारा गरुड तू !
सर्व मित्रांच्या मनावरील आरूढ तू !!
 

( काही वेळाने मला आठवलं की काही जण तू ह शब्द चुकीचा म्हणजे तु असा लिहित आहे म्हणून मग मी बोललो )
दीप Deepak Parulekar - ए सगळ्यानीं तू असा लिहा दीर्घ, अ‍ॅप्सने पाहिलं तर मारेल सगळ्यांना !!

सिद्धार्थ . -
बेंद्रीणीसाठी तोडफ़ोडकर तू
सुर्‍यासाठी केवडा अन् माझ्यासाठी शिरोडकर तू... (शाळा स्पेशल)
 
सुहास झेले -
वाळवंटात मृगजळाने भागलेली तहान तू
हळूच खुदकन हसणारे बाळ लहान तू...
 
Pankaj Z -
भरलेला खिसा तू,
लवंगी मिरचीचा रस्सा तू !!
 

( तोवर अ‍ॅप्स आली )
Aparna S -
दिप्या मला उचक्या का लागतात हे पाहायला आले मी नाहीतर खर म्हणजे गायब आहे हा आठवडाच...पण आता आलेच आहे तर माझे पण तू तू....

माझा कधी न वाचणारा ब्लॉग तू...
तरी माझ्या सगळ्यात आवडत्या पोस्टमध्ये येणारा तू...
 
आ का Anand Kale -
पेबच्या झ-यातुन नितळ पडनारं पाणि तू
राजगडावर ऎकू येणारी मावळ्यांची गाणि तू...
( खादाडीवरुन डायरेक्ट गडावर पोचलो आम्ही ) 

सिद्धार्थ . -
डाइव मारुन घेतलेली कॅच तू...
सचिनने एक हाती जिंकवलेली मॅच तू... (वर्ल्डकप स्पेशल)
 
आ का Anand Kale -
दिप्याचा रटाळ निधिगंध तू...
देवकाकांची कधी कधी फसलेली चाल तू...
सागराची नासलेली बर्फि तू...
सपाची न दिलेली पार्टि तू.....  ( खेचाखेची स्पेशल.... :)

विशाल कुलकर्णी -
सह्याद्रीच्या दर्या-खोर्यातली पाऊलवाट तू...
रस्ता चुकल्यावर अचानक कानी पडाणारी ’एओ’ तू....!!
 

इतक्यात बराच वेळ झाल कुणीच काही बोलले नाही मङ सुझे बाबांनी विचारणा केली
सुहास झेले - सगळे शांत?? तिचा फोन आला वाटत ;)
दीप Deepak Parulekar - शिव्या घालतेय फोनवर :):):)
सिद्धार्थ . - सही जवाब... बाबा सुझे की जय हो...
सुहास झेले -
हा हा हा... :) :)
सुखी रहा मित्रांनो :)
 

आणि आकाने दुनोळी टाकुन शांतता तोडली... बझ्झ पुन्हा वाहू लागला
 
आ का Anand Kale -
कधी कधी फोनवर वाहणारी निरव शांतता तू
तूला भेटण्या लागलेली जिवाची ओढ तू..
 
सुहास झेले -
नसती उठाठेव तू, काय वाट्टेल ते तू..
हरकतनाय..माझिया मनात तूच तू :)   (ब्लॉग स्पेशल :D

सचिन पाटील -
इथे तू , तिथे तू ,
सगळीकडे तूच तू
 
दीप Deepak Parulekar -
मार्च महिन्यातलं सेल्स टार्गेट तू
पूणे -सातारा मार्गावर लागणारं स्वारगेट तू

Aparna S -
"रस्सा" मधलं कालवण तू....
"पंगत" मधली सुरमई तू....(रेस्तरा फेम...)
 
सुहास झेले -
कोकणातलं मालवण तू
जीवाची होणारी घालमेल तू
 
सचिन पाटील -
पवईतली डबल आम्लेट तू,
मालाड मधली बुर्जी-पाव तू.... (अंडा स्पेशल)
 
सुहास झेले - मला वाटत सगळे लगेच फोनाफोनी करून सांगत असावे की माझ्यासाठी कोण आहेस तु ? :)

ABM नितीन मोरजे -
जंगलात दिलेली हाकारी तू !
कुणा शिलेदाराने दिलेली ललकारी तू !!
रायगडावर झडणारी नौबत तू !
राजगडावर वाजणारे पडघम तू !!
ठासून भरलेली कलालबांगडी तोफ तू !
शाहिराने दिलेली डफावरची थाप तू !!
 
विशाल कुलकर्णी -
जल्लेबीच्या जाहिरातीतल्या पिल्लाची लडीवाळ चिडचिड तू...
आणि मल्लिकाच्या प्रत्येक मुव्हीतली खल्लास बिकीनीही तू..

सुहास झेले -
मनाचे बांधकाम पक्क करणारी तू...
तुझ्या प्रेमाने थक्क करणारी तू..
 
विशाल कुलकर्णी -
अजय देवगणला न जमलेली कॊमेडी तू...
त्याची कॊमेडी बघून आमची होणारी ट्रॅजेडी तू...
 
सुहास झेले -
हळूच वाजणारी आकाची शिटी तू..
मैदानाला चकरा मारायला लावणारी पिटी तू... 

दीप Deepak Parulekar -
हैदराबादी पेशल पाया तू
चारमिनार की मसाला चाया तू

ABM नितीन मोरजे -
वाळवंटातले Oasis तू !
IT मधले Symboisis तू !!
सिद्धार्थ . -
इस्माईलभाईच्या विरोधातील कावा तू
जहांगीर का ड्यूप्लीकेट पायजन वाला बावा तू.  ( जर हैद्राबादी चित्रपट " द अंग्रेज" पाहिला असेल तरच अश्या पात्रांचा आणि दुनोळ्यांचा मतितार्थ कळेल !

दवबिंदु . -
शिवाजीच्या संभासारखा छावा तू
अप्लिकेशन सोफ्टवेअर मधील जावा तू
 
दवबिंदु . -
कधीही न थांबणारा असा श्वास तू
पिलाचा आईवर असलेला विश्वास तू
 
reshma ranjankar -
गावच्या ओढ्यातल अवखळ गाण तू.....
माझ्या मनातल रुनझुंण पैंजण तू.......
 
reshma ranjankar -
दिल ने छेडी गयी शायरी हे तू...
फिर बनाई गयी गझल हे तू....
 
विशाल कुलकर्णी -
वृत्त चुकलेली ”गझल" आहेस तू...
चुकून जमलेली ’हझल’ आहेस तू... ;)
 
दवबिंदु . -
मला रात्री न येणारी झोप तू
माझ्यासाठी शेवटची होप तू ...
 
सुहास झेले -
मनाभावातून केलेली प्रेमळ चारोळी तू.
वाट लावलेली अप्पोळी, सुपोळी, दिपोळी तू...
  
( आप्पोळी, सुपोळी, दीपोळी हे आमच्या बझ्झ्वरिल कॉपीरायटेड, अफलातुन काव्यप्रकार आहेत! त्यांच्यावर कधीतरी स्वतंत्र पोस्ट लिहीन! आळशीपणातून वेळ मिळाला तर

reshma ranjankar -
पहाटेची भूपाळी तू..
रात्रीच्या थंड चांदण्यातली अंगाई तू....
 
दीप Deepak Parulekar -
संथ ओघळणारा पारिजात तू
देहात विरघळणारा मोगरा तू
 
दीप Deepak Parulekar -
माझ्या दिलाचा लॉक तू
रवीवारचा मेगा ब्लॉक तू
 
दवबिंदु . -
माझ्या तोंडातून न निघणारे बोल तू
माझ्या कडून झालेला एक झोल तू    
( याने काय झोल केला तो त्याचा त्यालाच ठावूक )

दीप Deepak Parulekar -
वैशाख वणव्याचं उन तू
किशोरीच्या 'सहेला रे" ची धून तू
 
reshma ranjankar -
सकाळच्या उन्हातला दवबिंदू तू
माझ्या मनातला मोरपिसारा तू...
 
दीप Deepak Parulekar -
न परवडणारी गाडी तू
तरीही माझी ड्रीमकार ऑडी तू
 
महेश सावंत -
प्रीतीच्या हाकेशिवाय.....माझं ह्र्दय कसं धावेल.......
कसं सांगु तुला......माझ्यासाठी कोण आहेस तु........
मी बघितलेलं सर्वात सुन्दर स्वप्न......आणि......
माझ्या मनानी केलेली प्रेमाची एक कल्पना आहेस तु.

सुहास झेले -
उन्हात फिरून होतेस टॅन तू..
पारीजातकासाठी दीपक ने इंस्टाल केलेल W-लॅन तू.. :)
( पारिजातक हा माझ्या दिपोळीचा कॉपीराईट शब्द आहे

दवबिंदु . -
कातरवेळी एकांतात बाहेर आलेला हुंकार आहेस तू
मैफिलीत पाय थिरकायला लावणारे झंकार आहेस तू
 
reshma ranjankar -
हवीहवीशी वाटणारी सावली तू..
रात्री पिंपळावर दिसणार भूत तू....
 
महेश सावंत -
माझ्या जगण्याची इच्छा आहेस तू ........
कसं सांगु तुला......माझ्यासाठी कोण आहेस तु.........
 
दीप Deepak Parulekar -
माझ्या आभाळातलं नक्षत्र आहेस तू
तुला कधीही न पाठवलेलं पत्र आहेस तू
 

दवबिंदु . -
माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुटलेला तारा आहेस तू
मला आनंद देण्यासाठी वाहणारा वारा आहेस तू ....
 
आ का Anand Kale -
चंद्राची अर्धकोर तू
गोठवणारी रात्र तू
पहाटेची गुलाबी छटा तू
वासुदेवाची ऎकलेली गाणी तू..
 
सुहास झेले -
स्वच्छंदी उंच भरारी घेणारा पक्षी तू.
रांगोळीच्या रंगात नटलेली नक्षी तू..
 
दीप Deepak Parulekar -
देहावर सळसळणारा वारा आहेस तू
पावसात कोसळणार्‍या गारा आहेस तू
 
दवबिंदु . -
पावसाची एक रिमझिम सर आहेस तू
वेड्यांच्या दवाखान्यात एक भर आहेस तू
 
दीप Deepak Parulekar -
डार्क नाईट मधला जोकर आहेस तू
काईट बघून लागलेली ठोकर आहेस तू
 
दवबिंदु . -
काईटमधली बार्बरा मोरी आहेस तू
रंगाने तशी गोरी आहेस तू

दीप Deepak Parulekar -
ठावूक आहे माझी कधी होणार नाहीस तू
तरीही माझी आणि फक्त माझीच आहेस तू
 
विशाल कुलकर्णी -
मोगले आझमच्या सलीमची अनारकली तू...
खुळावलेल्या दिलीपची मधूबाला तू...
वेडावलेल्या नानाची माधूरी तू...
खरं सांगू.........?
भुकेजलेल्या जिवाची शिदोरी तू....... 

दीप Deepak Parulekar -
कधी रागाने ओरडणारी आई असतेस तू
तेव्हाच मायेने जवळ ओढणारी ताई असतेस तू
 
दवबिंदु . -
देवाने मला दिलेली दैवी शक्ती तू
हनुमानाची रामावर असलेली भक्ती तू...
 

दीप Deepak Parulekar -
कृष्णाच्या सुरातली राधा तू
कॄष्णासाठी झुरणारी मीरा तू
कसं सांगू तुला माझ्यासाठी कोण आहेस तू
शब्द संपले गं सगळे,  घे ना  जरा समजून तू!!
 
Devdatta देवदत्त Ganar गाणार -
आधी वाटले तिजोरीतील सोन्याची रास तू..
नंतर कळले, दिवसा होणारे भास तू..
 
दवबिंदु . -
कधी कॄष्णासाठी झुरणारी मीरा तू
कधी वाका वाका करणारी शाकीरा तू ...
 
reshma ranjankar -
मीरेचा वेडा कृष्ण तू
तोच कृष्ण प्रश्न तू ......
 
Dhundiraj Sakpal -
अळवा-वरच्या पाण्याचा टपोरा थेंब तू !
उजाड माळरानावरच्या वाऱ्याची एक मंद झुळूक तू

दवबिंदु . -
दु:खातही करावा लागणारा जश्न तू
मला निरुत्तर करणार एक प्रश्न तू ...

Dhundiraj Sakpal -
सलग १० दिवस शिफ्ट करून मिळालेला दोन दिवसांचा विकली ऑफ तू !
रेसेशनच्या नावाखाली मिस झालेली एक अप्रेझल तू !!

दीप Deepak Parulekar -   (मी ऑफीसच्या कामासाठी बाहेर पडलो पण दुनोळ्या स्वस्थ बसू देइनात, म्हणुन सेल फोनवरुनच ही अपडेट केली.)
Mazya astittvaachi saaksh tu,
kolhyala aambat laagleli draaksh tu.:-)
 
दीप Deepak Parulekar -
Shane warne chi afalatun leg spin tu,
safai ki chamakar tikiya Rin tu.

दवबिंदु . -
माझ्यासाठी बदनाम झालेली मुन्नी तू
सात खून माफ असलेली खुनी तू ....

दवबिंदु . -
माझ्यासाठी अनिश्चिततेच इलेक्शन पोल तू
माझ्यासाठी एक विहीर खूप खोल तू ....

दवबिंदु . -
धगधगणारी एक आग तू
पण माझाच एक भाग तू ....

Dhundiraj Sakpal -
जीवनातली सुंदर लकेर तू !
आयुष्यातलं एक अवखळ वळण तू !!

Aparna S -
श्रीतैच्या स्वेटरमध्ये गुंडाळलेला मऊ मऊ बब्बू तू
डुलक्या घेतही जेवण पूर्ण करणारा खाबू तू...

आ का Anand Kale -
सकाळी सकाळी झोपेत पाहीलेलं बब्बुचं हसु तू
त्यानं हळूच चादरीवर सोडलेली पाण्याची गरम धार तू... :)

आ का Anand Kale -  नंतर आकाने सगळ्यांना उद्देशुन मस्तच लिहिली...
सुझेची खादाडी तू
अनुची लबाडी तू

रोहणाची चढाई तू
सपाची बढाई तू

काकांच्या गप्पा तू
श्रेयातायचा धक्का तू

हेरंबच्या भन्नाट पोस्ट तू
दवबिंदुची ओली गोष्ट तू

योमूचे केक्स तू
दिप्सच्या बेबस तू

ईटलीच्या जावयाचा मस्का तू
माउच्या रेसिपीचा चस्का तू

सागराचा तळमळलेला प्राण तू
आपाचे षटकार छान तू

:) :) थकलॊ....
16 Mar


दीप Deepak Parulekar -
मुंबईच्या चाळीची १० बाय १२ ची खोली तू
आणि त्या खोलीतल्या स्वप्नातली अँजेलीना जोली तू

सुहास झेले -
मुंबई लोकलची गर्दी तू..
उन्हाळ्यात झालेली सर्दी तू... :)

दीप Deepak Parulekar -
माझ्या डोळ्यातले पाणी तू
विरहाने गायलेली गाणी तू

दीप Deepak Parulekar -
परीक्षेत मारलेली कॉपी आहेस तू
तरीही लागलेली केटी आहेस तू

सुहास झेले -
भारतावर लावलेली बेटिंग तू..
पाकिस्तान ने केलेली सेटिंग तू...

सुहास झेले -
भविष्याच्या विचारात अथांग रमणारी तू
माझेच विश्व होऊन माझ्यातच हरवणारी तू..

दीप Deepak Parulekar -
रानात एकटं पडलेलं फूल तू
मला पडलेली माळरानाची भूल तू

Swami Sanketanand -
सलिमची फ़रहा तू..
इस्माईलची दुसरी बेगम तू..
  ( द अंग्रेज स्ट्राईक अगेन )

सुहास झेले -
लाजतेस किती गोड तू
तळहातावर जपलेला फोड तू..

Swami Sanketanand -
स्वामीची कैपाडी तू..
त्या वाचणारी येडी तू..

दीप Deepak Parulekar -
कधी देशी थर्रा तू
कधी चिवास रिगलची स्कॉच तू

दीप Deepak Parulekar -
किंगफिशरची माईल्ड बीअर तू
आणि माझी लाडकी डीअर तू :)

दीप Deepak Parulekar -
शोएब अख्तरचा बाउंसर तू
आणि त्याला सचिनने ठोकलेला सिक्सर तू
 
सुहास झेले -
प्रेमात उत्स्फूर्त केलेलं मुक्तछंद तू..
मसाला पानातला गोड गुलकंद तू...

दीप Deepak Parulekar -
मिथुनचा डिस्को डान्स तू
रेहमानचा सुफी ट्रान्स तू !

दीप Deepak Parulekar -
डोक्यावर प्रेमाने मारलेली टपली तू
ह्रदयाच्या जखमेवरली खपली तू !

दीप Deepak Parulekar -
आगीतून चालणारी सीता तू
कृष्णाने वदलेली गीता तू

Jyoti Ghanawat -
दिप्याच बोंबील नक्षत्र तू ......
अन त्याला झुलवणारी मदमस्त सुरमई तू

( हे मला उद्देशुन होतं !

Jyoti Ghanawat -
सुझीचा हलवा तू ......
 देवाची लाली तू .....
( आणि हे सुझे आणि देवेंद्रला )


सुहास झेले -
काटेरी फणसातले गोड गोड गरे तू..
डोंगरकपाऱ्यातून वाहणारे शुभ्र झरे तू..

Swami Sanketanand -
सहेला रे किशोरीचे तू..
मोहक हास्य माधुरीचे तू..

दीप Deepak Parulekar -
अंतरात उगवलेली संवेदना तू
ह्रदयात जपलेली गोड वेदना तू

सुहास झेले -
उफाळत्या तेलात मस्त पोहणारे वडे तू..
अशक्य चढणीचे सह्याद्रीचे कडे तू.. :)
 
Jyoti Ghanawat -
आठवणीत जागवलेली रात्र तू ....
तुटलेल्या स्वप्नातली सुंदर पहाट तू

सुहास झेले -
तुझ्या आठवणीत केलेला बझ्झबझ्झाट तू
शब्द संपल्यावर झालेला शुकशुकाट तू..

Jyoti Ghanawat -
माझे मुके शब्द तू ....
हरवलेले भेसूर स्वर तू ...

Swami Sanketanand -
गालावर मोरपीस अलगद फ़िरणारा तू..
कृष्णाची प्रेमदिवाणी मीरा तू

सुहास झेले -
गर्द धुक्यात हरवलेली वाट तू
माझ्या आयुष्यात झालेली सुंदर पहाट तू..

Jyoti Ghanawat -
सुनासुना झालेला मेलबॉक्स तू .... .
Add on विना इन्स्टॉल केलेला फायरफ़ोक्स तू

Swami Sanketanand -
उबुन्ट्ची ओ एस तू..
ओपन सोर्स सॉफ़्टवेअर तू

reshma ranjankar -
माझ्या डोळ्यातल्या अश्रूत भिजलेली पापणी तू....
माझ्या आयुष्यात न बहरलेली रातराणी तू...
( रेश्मा जियो !!! )

Jyoti Ghanawat -
चाफ्याचा मंद सुवास तू .......
केवड्याचा उग्र वास तू

सुहास झेले -
बागेत हळुवार उमलणारी कळी तू.
हळूच गालावर फुलणारी खळी तू..

Aparna S -
वाफमोडवर असणारा बझर तू
फेबुवरची टीवटीव तू....
  ( हे बझ्झवरिल प्रचलित शब्द आहेत इतरांना कळायला थोडे जड जातिल, मंडळ दिलगिर आहे )

सुहास झेले -
चांदण्यात दाटलेलं अस्तित्व तू...
हा खरंच चंद्र आहे की आहेस तू... :)

reshma ranjankar -
माझ्या स्पर्शात सामावलेलं आभाळ तू..
प्रेमाने मारलेली शीळ तू...

सुहास झेले -
शुभ्र चंदन लेवून नभी आलेला चंद्र तू..
दीपकची झोप उडवणारा हा निशिगंध तू... :)
 
reshma ranjankar -
राधिकेचा चितचोर तू..
माझा फक्त माझाच चंद्रकोर तू..

दीप Deepak Parulekar -
आहेस माझा निशिगंध तू
कधीही न जुळलेला बंध तू

Swami Sanketanand -
ग्रंथसाहिबातला सबद तू..
कुराणातली आयत तू....

Swami Sanketanand -
कबिराचे दोहे तू..
सुदाम्याचे पोहे तू..

दीप Deepak Parulekar -
डोळ्यांत साठवलेली साठवण तू
विसरुन पुन्हा आठवलेली आठवण तू !

सुहास झेले -
कधीही न सुटलेलं गणित तू..
माझ्या आयुष्याचे झालेलं फलित तू...

Swami Sanketanand -
विदर्भातली कपाशी तू ..
ठेवतेस उपाशी तू .....

Swami Sanketanand -
a*a+b*b=c*c तू.. (पायथागोरसचे प्रमेय तू)
E = m*c*c तू ..... ( सापेक्षतेचा सिद्धांत तू)

Swami Sanketanand -
सत्यवानाची वटवट तू..
अनघाची पटलेली पाटी तू..

दवबिंदु . -
कधी द सोशल इन्सेक्ट असलेला भुंगा तू
कधी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा तू ...

दवबिंदु . -
रोहनची ऐतिहासिक सह्यभ्रमंती तू
पंक्याची अनलिमिटेड भटकंती तू

सुहास झेले -
माऊताई ने बनवलेल्या केकवरच आयसिंग तू..
सचिनच्या बॅटमधून निघालेल्या स्ट्रेट शॉटचं टायमिंग तू... :)


सुप्रभात मंडळी :)
17 Mar दिवस दुसरा......

आ का Anand Kale -
नरिमनची एक संध्याकाळ तू
आणि तिकडलीच जॉगिंग करणारी सकाळ तू.. :)

सुहास झेले -
मनात घोळत असलेले अविरत विचार तू..
शाळेतल्या फळ्यावर लिहिलेला सुविचार तू... :)

आ का Anand Kale -
बेंचवरती कोरलेलं पहिलं वहीलं पेंटिंग तू
आणि कॉपीसाठी लावलेलं मस्कापावचं सेटिंग तू

sarika gurav -
मला नेहमी पडणारं स्वप्नं तू...
जागेपणी धुंद करणारं नभ तू...!!

दवबिंदु . -
उन्हाळ्यातल्या कोल्ड्रिंकच रूप तू
थंडीत पिलेला गरमागरम सूप तू

दीप Deepak Parulekar -
माझ्या आईची होणारी सून तू
त्यादिवशीच बोललसी कमिंग सून तू !!

आ का Anand Kale - हा हा हा... कांदेपोहे स्पेशलही... :)

सुहास झेले -
माझ्या आईची होणारी सून तू..
माझ्या आयुष्यात येणारा सुपरमून तू... ;-)

sarika gurav -
बुब्बुला कुशीत घेऊन अंगाई गाणारा तू....
कपाळाचं चुंबन घेऊन आधार देणारा तू...

Deepak , -
पहाटेच्या पारिजातकाचा सडा तू
रणरणत्या उन्हात कडूनिंबाची छाया तू..

sarika gurav -
माझ्या मनाचे अंतरंग तू....
माझ्या प्रेमाचा कॅनव्हासही तू...

Deepak , -
वसंतरावांनी खुलवलेला "मारवा" तू
मालवणाच्या किनार्‍यावरचा गारवा तू..

सुहास झेले -
माझ्या मनाचे अंतरंग तू...
प्रीतीचे उठलेले स्वरतरंग तू... :)
काही सुचतच नाही, म्हणून ढापाढापी :)

दवबिंदु . -
फुटबॉलला मारलेली लाथ तू
विटीला दांडू ची असलेली साथ तू

दीप Deepak Parulekar -
मेस्सीची सुपर किक तू
दुसर्‍यांची भांडी फोडणारी विकीलिक्स तू
:)

सुहास झेले -
हॅरी पॉटर ने छडी झटकून म्हटलेला मंत्र तू..
ध्यानी मनी माझ्या जगी सर्वत्र तू...

सुहास झेले -
परीक्षेत लपवून आणलेली चिट्स तू
पाकिस्तान ने केलेली स्पॉट फिक्स तू...

दीप Deepak Parulekar -
टायटॅनिकची लोभस केट तू
कमी कर ना थोडं तूझं वेट तू.

आ का Anand Kale -
वेड्याला देणारे १०० व्होल्ट्चे झटके आहेस तू
शाळेत गालावर खाल्लेले हळूवार फटके आहेस तू...

( याला दोन्ही़कडला अनुभव आहे वाटतं

Deepak , -
गरम गरम भाकरीवरचा ठेचा आहेस तू.
ऎन जवानीत माझ्याकडून झालेला लोचा आहेस तू...

श्रध्दा . -
माझा श्वास तु,श्वासातला निश्वास तू
माझ्या गात्रातला अणु रेणु तू
तुच माझे हास्य अन अश्रुही माझे तू
माझीया हळव्या मनाचे संगीत तू
र्‍हृदयातल्या जाणीवेची आर्तता तू
निःशब्द माझ्या प्रितीचे भाव तू
अतृप्त माझ्या या तनुचे पुर्णत्व तू
कवितेची माझ्या प्रेरणा तू अन फ़क्त तू


( हिला वेळ नसेल बहुतेक म्हणून एकत्रच टाकल्या.. भापो. )

Deepak , -
अथक परिश्रमाने बनवलेला ’गाजराचा हालवा’ आहेस तु..
हे काय! आजपण साखरेऎवजी मिठ टाकलस तू... थू.

सुहास झेले -
बुद्धिबळात मुद्दाम केलेला चेकमेट तू..
फेडरर ने एक हाती मारलेला सेट तू...

दीप Deepak Parulekar -
मनातल्या ओढीची वाट तू
हिरवागार खंडाळ्याचा घाट तू
 
दीप Deepak Parulekar -
मुक्याने घातलेली साद तू
बहीर्‍याने ऐकलेली हाक तू

सुहास झेले -
हिरव्या नवलाईने नटलेल माळरान तू..
पावसा पाठोपाठ कोकिळेने धरलेली तान तू..

विशाल कुलकर्णी -
काव्याच्या नावाखाली टाकलेल्या पाट्या तू...
श्रीखंड समजून ओरपलेल्या पिठल्याच्या वाट्या तू...

सचिन पाटील -
दीप ने केलेली चारोळी तू .....
शीशीडी मधील दीपची आवडती कॉफी तू .....

विशाल कुलकर्णी -
रात्रीच्या अंधाराची उबदार झूल तू...
पहाटेच्या पहिल्या किरणांचा स्पर्ष तू...
 
सुहास झेले -
मोदकात मुरलेला गोडवा तू..
आसमंतात भिनलेला गारवा तू..

आ का Anand Kale -
ओल्या पावसातला एक कटींग चाय तू
आठवणीत रमताना उतू गेलेली साय तू... :)

विशाल कुलकर्णी -
भर पावसात फ़ुकटात मिळालेली गरमागरम भजांची प्लेट तू...
वडापाववर भांडून मिळवलेली ए़क्स्ट्राची मिरची तू...

सुहास झेले -
स्पर्शाने तुझ्या बहरलेला निशिगंध तू..
आत्मा सुखावून गेलेला सुगंध तू...

विशाल कुलकर्णी -
माझ्या अंगणात ओघळलेला प्राजक्त तू...
तुझ्या नसण्याने बावरलेला मोगरा तू...

विशाल कुलकर्णी -
चकोराला सुखावणारा पुर्णचंद्र तू...
चंद्रालाही मोहवणारा तारकासमुह तू...

सुहास झेले -
उधाणलेल्या समुद्राची एक अशांत लाट तू..
मनात विचाराचे वादळ असताना का शांत तू...

sarika gurav -
माझा म्हणताना माझा न वाटणारा तू..
शेवटी फक्त तूझाच असं म्हणणारा तू...

Deepak , -
थंडीच्या दिवसांत सकाळच्या उन्हात बसून खाल्लेली पेज आहेस तू..
स्वयंपाकघरात चुलीच्या बाजुला बसुन घेतलेली शेक आहेस तू...

दीप Deepak Parulekar -
फक्त तुझीच आहे रे असं म्हणताना बिलगणारी तू
माझी माझी म्हणताना कूणा दुसर्‍याची झालेली तू

reshma ranjankar -
असलेला तू..नसलेला तू..
न पाहिलेल्या डोळ्यांतल पाहिलं वहिल प्रेम तू...

CS Piyu Pari -
देवाला मारलेल्या हाका तू...
प्रेमाच्या आणाभाका तू..
काळेंच्या घरी जन्म घेतलेला...
आमचा सखा आ.का. तू... :)

दीप Deepak Parulekar -
पुस्तकात जपलेलं मोरपीस तू
पावसातली पहिली थरथरती किस्स तू :)
( आठवली ना किस्स्स !!! :):):)  )

reshma ranjankar -
मेलेल्या हृदयातल्या जिवंत भावना तू...
त्याच भावनेन बनवलेलं रक्तरंजित काव्य तू....

दीप Deepak Parulekar -
मेल्यावर लागणारी दोन गज जमीन तू
तोंडावर पसरलेली एक तुकडा कफन तू

दीप Deepak Parulekar -
कळलं का तुला माझ्यासाठी कोण आहेस तू
या शब्दांतूनही कळलं नसेल तर तुझ्यासारखी दुर्दैवी तू !
( म्हणजे काय! किती सांगावं यार ,शब्द संपले तरी कळतच नाही या पोरींना )
 
sarika gurav -
मंदिरातली निरव शांतता तू...
पहिल्या पवित्र प्रेमाचा हकदार तू....

Gurunath Kshirsagar -
मोहोरल्या आंब्याची पालवी ग तू
माझ्या अंधारातली समई ग तू

sarika gurav -
मला न कळलेलं गुढ तू...
असा कसा रे धूड तू...

श्रध्दा . -
माझ्यासाठी एक बझ तू
बझ मधला एक पोस्ट तू ... :)

दवबिंदु . -
संगीतातला बास आहेस तू
माझ्यासाठी खूप खास आहेस तू
 
सुहास झेले -
माझ्या जखमेवर मारलेली हळुवार फुक तू...
वेड लावणारी वार्‍याची झुळूक आहेस तू...
 
दवबिंदु . -
हिऱ्यांच्या खाणीतल रत्न आहेस तू
मला रोज पडणार स्वप्न आहेस तू

दवबिंदु . -
माझ्या हृदयाची धडधड आहेस तू
कधी न संपणारी बडबड आहेस तू ... :)

दवबिंदु . -
माझ्या रडण्यातलही हसण तू
मी नसतानाही माझ असण तू .

सुहास झेले -
रात्र जागून केलेला देवीचा जागर तू..
दगडाला फुटलेला प्रेमाचा पाझर तू... ...

Deepak , -
माझ्यासाठी कोण आहेस तू..?
वरच्या प्रश्नातले दोनच शब्द ’आहेस तू’..

दीप Deepak Parulekar -
माझ्या स्वप्नातली परी आहेस तू
स्वःताला झोकून दयावसं वाटणारी दरी आहेस तू
!
( झोकुन दिलं केव्हाच! आता गटांगळ्या खातोय )

दवबिंदु . -
नदीचा अथांग सुंदर काठ आहेस तू
कधीही न सुटणारी गाठ आहेस तू

दवबिंदु . -
सगळ्याना हवी असलेली मनी आहेस तू
माझ्यासाठी मात्र गोड हनी आहेस तू

नितिन मोरजे -
रेल्वे प्रवासातील सामान्य तू !
तुझ्या क्षेत्रातील असामान्य तू !!
बझ्झ वरील लोकमान्य तू !
कैच्याकै लिहिलेस तरी जनमान्य तू !!

दवबिंदु . -
सह्याद्रीची पसरलेली रांग तू
अरबी समुद्रासारखी अथांग तू

दवबिंदु . -
माझ्यासाठी वाळवंटातली हिरवळ आहेस तू
कळत नाही मृगजळ कि खर तळ आहेस तू ....

आ का Anand Kale -
सर्वांच्या मनातलं बाहेर येण्यास जबाबदार तू
या बझला पाडायला कारणीभूत तू...

Kanchan Karai -
रातराणीचा मंद दरवळ तू
उष्ण वाळवंटातील हिरवळ तू

नितिन मोरजे -
गंगातीरीचा सुंदर घाट तू !
काश्मिरातील सुखद पहाट तू !!
पानावरचा दवबिंदू तू !
दुर्गामधील सिंधू तू !!
शिंपल्यातील मोती तू
दिवाळीतील दीव्य ज्योती तू !!

दीप Deepak Parulekar -
नेहमी लागणारी भूक तू
जेवायला चाललोय, येतेस का तू ?

Vidyadhar Bhise -
जन्नतची हूर तू..
मिठाईतला मोतीचूर तू! 

दवबिंदु . -
मिकाने राखीला दिलेली पप्पी तू
मुन्नाभायची जादू कि झप्पी तू ...

दवबिंदु . -
सागराला सर्वस्व देणारी सरिता तू
किती जळणार अशी माझ्या करिता तू

आ का Anand Kale -
आनंदात ओरडता येणारं "यप्पी" तू
गाण्यामधला सोन्याचा बप्पी तू... :)

Vidyadhar Bhise -
तेंडल्याचा स्ट्रेट अन द्रविडचा कव्हर ड्राईव्ह तू
मित्रांना दिलेले हाय फाईव्ह तू!

( इटलीकरांना ही राहवलं नाही मग ! )

आ का Anand Kale -
विद्या बालनचा पल पल तू
स्मिताचा रंग शामल तू...

विशाल कुलकर्णी -
सुखाची जराशी जाणीव तू...
दु:खांची जणू ती उणीव तू...

आ का Anand Kale -
आज्जीच्या हातची कोरड्यास भाकरी तू
आजोबांच्या सोबत केलेली शेतातली चाकरी तू... (मजा यायची यार आजोबांसोबत.. मिसिंग हीम :( 
.. )
 
sarika gurav -
प्रेमाचा निरागस अर्थ तू..
जिवन केलेस सार्थ तू...

दवबिंदु . - सहीये...

पडला रे पडला ....ढिंगच्याक ढीच्याक, ढिंगच्याक ढीच्याक,ढिंगच्याक ढीच्याक.....  !!!!!!
( आणि इथे हा बझ्झ पडला! बायदवे बझ्झ पडणे किंवा पाडने हा सुद्दा एक आमचा प्रचलित वाक्प्रचार आहे )
 

**************************************************************************************************

( पण लगेच त्या बझ्झचा दुसरा भाग तयार )

दीप Deepak Parulekar -
गालिबच्या शायरितले लब्ज तू
पडल्यानंतर लगेच टाकलेला नवा बझ्झ तू

सुहास झेले -
पहाटेच थंडी गुलाबी तू..
ओठ रंगवणारी लाली तू...

sarika gurav -
मिळवण्याच्या नादात हरवून बसलेला तू...
निघून गेल्यावर आठवणींत रडवणारा तू......

दीप Deepak Parulekar -
अंगावरली चांदण्याची दुलई तू
शहाळ्यातली गोड मलई तू

दीप Deepak Parulekar -
वादळाशी झगडणारी नाव तू
वादळात वाहुन गेलेला गाव तू

sarika gurav -
माझ्यासारख्या शहाणीला वेडी करणारा तू...
एका वेगळ्याच विश्वाची बेडी घालणारा तू...

दवबिंदु . -
मला किनारयावर पोहोचवणारी नाव तू
कधी लावशील तुझ्या नावापुढे माझ नाव तू

आ का Anand Kale -
अंधारातही चालणारी सावली आहेस तू
माझ्या छोटूश्या पिल्लाची माऊली आहेस तू...

seema shelar -
कॉलेज मध्ये बंक केलेला लेक्चर तू
चहा मध्ये पडलेला मच्छर तू

दीप Deepak Parulekar -
समुद्रात उठलेली लहर आहेस तू
देहात भिनलेलं जहर आहेस तू

Anagha Nigwekar -
असा तू,
तशी मी,
रोजची मग आपली...
तू तू
मैं मैं!
:p

दीप Deepak Parulekar -
फुलांवरून भिरभिरणारं फुलपाखरू आहेस तू
गायीच्या कुशीत शिरलेलं वासरु आहेस तू

लिना माने -
लेक्चरला आलेली झोप तू
मास्तरांचा झालेला कोप तू

दीप Deepak Parulekar -
दुथडी भरून वाहणारी कॄष्णा तू
तरीही न संपलेली तॄष्णा तू

दीप Deepak Parulekar -
पावसात दाटुन आलेले मेघ तू
दुष्काळात धरेला पडलेली भेग तू

दीप Deepak Parulekar -
माझ्या कवितेच्या सगळ्या ओळी तू
सारं काही मिळूनही रिकामी माझी झोळी तू

दीप Deepak Parulekar -
कधी मंदिराचा मंत्रमुग्ध  गाभारा आहेस तू
कधी मनातला रिकामा देव्हारा आहेस तू

सुहास झेले -
सारवलेल्या अंगणातला शेणाचा गंध तू...
चंदनालाही लाजवेल असा सुगंध तू...

अनुजा पडसलगीकर -
कस्तुरी मृगातील कस्तुरी तू..
पावसाच्या पहिल्या थेंबाचा मृदगंध तू.....
To be continued...

काय आवडल्या ना आमच्या दुनोळ्या !! अजुन बरेच प्रकर आहेत सवडीने टाकतो ब्लॉगवर !!!