Thursday, August 6, 2009

पैलतीर ...५

रात्री ३ च्या सुमारास चिन्मयला जाग आली. कुणीतरी डोअरबेल वाजवत होतं. इतक्या रात्री कोण असेलं ? जावू देत मम्मी बघेल असं म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. त्याच्या आईने दरवाजा उघडला. प्रियाचे वडील होते.
"काय झालं भाउजी ? इतक्या रात्री ?" चिन्मयच्या आईने विचारलं.ते जरा घाबरल्यासारखे वाटत होते.
" काही नाही वहीनी, चिन्मय झोपलाय का ? जरा , प्रिया.... ..."
" काय झालं पियुला?" चिन्मय आपल्या रूममधुन बाहेर आला.
" काही नाही रे, अचानक झोपेतुन ओरडत उठली आणि पार घाबरून गेलीय...." पुढचं काही ऐकायच्या आत चिन्मय घरातुन बाहेर पडला त्याच्यामागोमाग प्रियाचे वडील आणि त्याचे आई बाबा देखिल गेले. धावत पळत तो प्रियाच्या रूममध्ये शिरला. प्रिया बेडवर बसली होती. तिची आई तिचा घाम पुसत होती. तिचा श्वासोच्छवास देखिल वाढला होता. धापा टाकल्यासारखा.चिन्मयला बघताच ती ओरडली, "चिनू ...!" चिन्मय धावतच तिच्या जवळ गेला आणि तिला जवळ घेतले. प्रिया त्याला बिलगुन रडायला लागली. चिन्मय तिला शांत करत होता. पण तिचं रडणं थांबत नव्हतं.
" पियु काय झालं? का रडतेस? इतक्या रात्री, काही वाईट स्वप्न वैगरे पाहिलंस का?, काकु, काय झालं? का रडतेय ही अशी?" चिन्मय तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होता आणि प्रिया त्याला अजुनच घटट पकडत होती.
" अरे, अचानक झोपेतुन ओरडत उठली. काय झालं ते देखिल कळत नाही. ती काही सांगायलाही तयार नाही. नुसती रडतेय.आणि उठल्यापासून चिन्मयला बोलवा म्हणतेय्.म्हणून यांना पाठवलं तुला बोलवायला. काय झालंय माझ्या पोरीला, कुणाची नजर लागली काय माहित ?" बोलता बोलता काकुंनी पदर तोंडावर धरला त्यांचा आवाज रडवेला झाला. चिन्मयच्या आईने त्यांना सावरले.
" पियु, काय झालं?बोल ना, प्लिझ. " बोलता बोलता चिन्मयने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि नंतर मानेवर ताप आहे की नाही ते बघायला. प्रिया तापाने फणफणत होती.
" अरे बापरे! हीला ताप किती आहे. काका, अ‍ॅडमिट करुया का?"
" नको. प्लिझ चिनु. मी ठिक आहे. फक्त तु जावू नकोस. प्लिझ." प्रिया रडत रडत बोलली.
" ठिक आहे. मी नाही जात. हिने झोपण्यापूर्वी औषध घेतलं होतं का? " काकुनी नकारार्थी मान हलवली.
" अगं पण तुला कळत नाही का ? भरवायचं होत ना तिला. " चिन्मय भडकला.
" पियु,औषध घे. ताप कमी होईल."
" नको. मला काहि नको. पण तु जावू नकोस. तु इथेच थांब माझ्याजवळ, प्लिझ. "
" ओके. मी थांबतो. तु पडुन राहा." प्रियाने चिन्मयच्या मांडीवर डोकं ठेवलं. चिन्मय तिला थोपटु लागला.
" ममा, तुम्ही घरी जा. मी थांबतो इथे.काका, काकु तुम्हीही जावून झोपा. मी आहे। "
सगळेजण जायला रुममधुन बाहेर पडले. इतक्यात प्रियाचे बाबा तिच्या जवळ आले. त्यानी प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवला. नंतर त्यांनी चिन्मयकडे पाहिले.त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले," कधी कधी भीती वाटते. तु नसलास तर प्रियाचं काय होईल? तु आहेस म्हणून थोडा आधार तरी आहे. " त्यांचा आवाज भारावला होता. ते रुममधून बाहेर पडले. प्रिया चिन्मयच्या मांडीवर शांतपणे पडून होती.चिन्मय तिच्या त्या शांत चर्येकडे बराच वेळ पाहत होता. एखादे सशाचे पिल्लु जीव मुठित धरून पळत पळ्त आपल्या बिळात शिरून धापा टाकत असते त्याप्रमाणे प्रिया धापा टा़कत होती. चिन्मय अधुन मधुन तिच्या चेहर्‍यावरचा, कपाळावरचा घाम पुसत होता. प्रियाने त्याचा एक हात घट्ट पकडुन ठेवला होता. बराच वेळ निघुन गेला. आता चिन्मयचे डोळेही पेंगत होते. त्याने पाय बेडवर घेतले. प्रियाने अजुनही त्याचा हात सोडला नव्हता. प्रियाने झोपेतच एका हाताने चिन्मयला वेढले. चिन्मयला थोडं अवघडल्यासारखं झालं. तिचे गरम श्वास त्याच्या चेहर्‍यावर आदळत होते. श्वास घेतान तिच्या ह्रदयाची होणारी धडधड त्याला जाणवत होती.चिन्मय पहिल्यांदाच प्रियाला इतक्या जवळून पाहत होता. त्याला काय करावे तेच सुचत नव्हते. प्रिया आता गाढ झोपली होती. त्याने तिला बाजुला केले. तिचं डोकं उशीवर ठेवलं आणि तो बाहेर जायला लागला.
" डु यु लव्ह मी ?" प्रियाने त्याचा हात पकडला, या प्रश्नाने तो जागच्या जागी थांबला आणि प्रियाकडे पाहु लागला. तिचे डोळे बंद होते. त्याला वाटलं ती झोपेत बडबडतेय. प्रियाने डोळे उघडले. ती चिन्मयकडे एकटक पाहत होती.
" ए, कशी आहेस तु आता? बरं वाटतयं तुला? " चिन्मयने पटकन पाण्याची बाटली खोलली आणि तिच्याकडे जवळ गेला.
" चिन्या, मला पाणी नकोय. तु मला उत्तर दे. "
" काय? कसलं उत्तर ? "
" हे बघ चिनु, मी इतका वेळ झोपले नव्हते. "
" मग मघाशी तुला काय झालं होतं? तु अचानक झोपेतुन का उठलिस ? सगळे किती घाबरले होते माहितए.माझा तर जीवच घेतला होता तु."
" एक्झॅटली ! तुला माझी इतकी काळजी का वाटते ?"
" कम ऑन ! तुला वाटत नाही माझी ?"
" वाटते ना. खूप वाटते. अगदी लहानपणापासून वाटते. तुला जरा काही झालं की माझा जीव थार्‍यावर नसतो. सैरभैर होते मी ! एक दिवस तु दिसला नाहीस, तुझा आवाज ऐकला नाही तर मला काहिच सुचत नाही. तु कधी बाहेर गावी गेलास की माझी किती दैना होते? आठवतं तुला जानेवरीमध्ये मी तुला नागपूरला रेल्वे स्टेशनवर माझ्या मैत्रीणीबरोबर भेटले होते, तुला काय वाटल कि मी खरचं माझ्या नागपूरच्या मैत्रीणिला भेटायला गेले होते. तुझ्या व्यतिरिक्त मला अजून कुणीही मित्र मैत्रीण आहे का रे? तुझं हसणं, बोलणं, गाणं, मझ्यावर रागावणं मी खूप मिस्ड करते रे! मी तुझ्यासमोर कधी हे सारं बोलुन नाही दाखवलं. कधी तुला हे सगळं जाणवूही नाही दिलं. मला वाटायचं की तुला कधीतरी समजेल हे सारं. पण कालांतराने माझ्या लक्षात आलं की, तुला माझ्याबद्दल असं काहिच वाटत नाही. तु मला कधी कसलीही कमतरता जाणवू नाही दिलीस. माझ्या प्रत्येक सुख दु:खात तु माझ्याबरोबर होतास. एक मित्र म्हणून माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तु माझ्या सोबत होतास. कधी पडले तर मला सावरायला तुझा हात होता. कधी रडावसं वाटलं तर तुझा खांदा होता. तु सोबत असताना माझ्याकडे कधी कुणी वाकड्या नजरेने पाहिलं नाही. जेव्हा माझ्या लक्षात आलं की तु माझ्याबद्दल असं काही फील नाही करत मग मी माझ्या मनाला आवर घालायल सुरुवात केली. पण तुझ्यापासून दूर होता नाही आलं. तुला कधीच नाही कळलं का रे? मी अशा अनेक रात्री तुझ्या आठवणीत रडुन,जागुन काढल्याएत. मी उगाचच उशीर केला. नेहाच्या अगोदरच तुला सांगायला हवं होतं. पण नाही जमलं रे ! नेहाबरोबर तुला आनंदी हसताना पाहुन मला तुझं आणि नेहाचं मन नाही दुखवता आलं. मी दुसरी वाट पकडली आणि चालु लागले पण तुला नाही विसरता आलं. माझ्या आईवडीलांनी नसेल दिला इतका आधर तु मला दिलास. तुझचं बोट पकडून मी चालायला शिकले. इथपर्यंत आले. तुझ्याशिवाय हे सगळं मला शक्य नसतं झालं. माझ्या आईने पुसले नसतिल इतके अश्रु तु पुसलेस. वडीलांनी दाखवला नसेल इतका तुझा धाक आहे मला. माझी आई, माझे वडील,माझा मित्र, माझी मैत्रीण माझं अवघं विश्व तुच होतास आणि आहेस. फक्त मला तुझी प्रेयसी नाही होता आलं. मी कुठेतरी कमी पडले. तुझ्या मनात, ह्रदयात मला कधीच ते स्थान नाही मिळालं. मी किती अभागी आहे ना रे? सगळं मिळूनही माझी झोळी रिकामीच राहिली. तुला फक्त दुरुन पाहण्याशिवाय माझ्याकडे काहिच नव्हतं. पण तु मला कधिच दुर नाही लोटलंस, नेहा तुझ्या आयुष्यात असतानाही तु माझ्यापासुन दुर नाही गेलास. आपली मैत्री एका अर्थाने तु जपत गेलासं, पाकळीवरच्या दवासारखी. पण माझं प्रेम अळवाच्या पानावरच्या थेंबासारखं.. कधी निसटलं ते कळलच नाही....तु विचार करत असशील की मी तुला हे सगळं आता का सांगतेय. मला माहित आहे या सगळ्याचा आता काहिहि उपयोग नाही. पण आयुष्यभर मी हे ओझं मनावर घेउन जगु शकले नसते. मघाशी बाबा म्हणाले की तुझ्याशिवाय या पोरीचं काय होईल. खरचं माझं काय होईल? मी नाही जगु शकत तुझ्याशिवाय. एवढीशी असल्यापासुन तुझ्या सोबत आहे कशी सोडु मी तुला? दुसर्‍या कुणावर इतकं प्रेम करता नाही येणार रे मला. खरं तर मला प्रेम म्हणजे काय हे देखिल ठावूक नव्हतं. आज संध्याकाळपासुन तुझी माझ्यासाठी होणारी धडपड बघतेय. कोण घेईल रे माझी इतकी काळजी? कधी काही झालं तर कुणाच्या तोंडाकडे बघु मी?या सगळ्यांचा मला विचारही करवत नाहीए. नाही ! मला तुझ्या आणि नेहाच्या मध्ये अजिबात यायचं नाही. हे सगळं तुला सांगण्याचा माझा हा उददेश बिल्कुल नाहीए. मी फक्त माझं मन हलकं करायचा प्रयत्न करतेय. कारण तुला नाही सांगणार तर आणखी कुणाला सांगणार? मी फार स्वार्थी आहे ना रे? तुला माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सांगितलिय, मग ही कशी लपवू शकले असते?
चिनु , मला काहीच समजत नाहीए मी काय करु रे? अ‍ॅम सॉरी.... आय हर्ट यु ! आय हर्ट यु ! आय रिअली हर्ट यु !!!!! अ‍ॅम सॉरी !!!!! "
इतका वेळ चिन्मय सुन्न होउन तिच्याकडे बघत उभा होता. जे काही त्याने ऐकले होते त्याचा स्वःताच्या कानावर विश्वास बसत नव्हता. प्रियाच्या ओक्साबोक्शी रडत होती. चिन्मय तिच्या जवळ गेला.
" पियु....." त्याचा स्वर कंपित होता.
" नको चिनु, आतापसुन तु माझे डोळे नको पुसु. मला याची सवय करुन घेतली पाहीजे. मी खूप त्रास दिलाय तुला, यापुढे मला तुला अजिबात त्रास द्यायचा नाहिए. तु जा इथुन, प्लिझ........ "पूढे ती काही बोलणार इतक्यात चिन्मयने तिच्या तोंडावर हात ठेवला. पुढच्या क्षणी प्रिया त्याच्या मिठीत होती.
"आय लव्ह यु चिनु, आय लव्ह् यु सो मच ! आय जस्ट कान्ट लिव्ह विदाउट यु !" प्रियाने आज अश्रुंची सीमा पार केली होती.
चिन्मयला काय करावे तेच सुचत नव्हते. असा काही प्रसंग आपल्याला फेस करावा लागेल याची त्याला साधी कल्पनाही आली नव्हती.प्रियाला काय उत्तर द्यावे हे त्याला उमजत नव्हते. त्याने प्रियाकडे पाहिले. ती त्याच्या मिठीत रडत होती. तिच्या अश्रुंनी तो पुर्णतः भिजुन गेला होता. त्या एका रात्रीने त्याला मोठ्या संकटात पाडले होते. काय करावे आणि काय नाही काही कळायचा मार्गच उरला नव्हता. आपल्या कधिच कसं लक्षात आलं नाही हे? मित्र मैत्रीणी चिडवायचे, घरातल्यांनी तर लहानपणापासुनच मनोमनी दोघांच लग्न लावलेलं. आपल्या लक्षात आलं नाही ठिक आहे पण प्रियाने तरी सांगायला नको का? पण, प्रेम असं होतं का? मला प्रिया त्या अर्थाने कधिच का नाही भावली, तिने माझ्यावर इतकं प्रेम केलं....आणि मी का नाही समजु शकलो तिला? नेहाला हे समजलं तर? तिची रिअ‍ॅक्शन काय असेल? काय करु मी?????? चिन्मय अशा अनेक प्रश्नांच्या भडीमाराखाली दबुन गेला. त्याला वाटत होतं की आप्ण बॉलिंग करतोय आणि समोरचा बॅटस्मॅन प्रत्येक बॉलला सिक्स ठोकतोय. त्याने घडाळ्या़डे पाहिले. सकाळ्चे ५.३० वाजले होते.
" पियु, ! ए पियु !" प्रियाने डोळे उघडले आणि त्याच्या़कडे पाहु लागली.
"मी निघु का? मला लवकर ऑफीसला पोहचायचंय."
"ठिक आहे." चिन्मय जायला वळला.
" चिनु...... !" " हां, बोल ना !"
" अ‍ॅम सॉरी !" चिन्मय काही बोलला नाही. फक्त हसला आणि बाहेर पडला. बाहेर सर्वजण जागेच होते. तो बहेर पडताच सगळेजण सावरले.
" काकु, तिला औषधं वेळेवर दे. आणि काहीतरी खायलाही दे. काही प्रॉब्लेम असेल तर मला ताबडतोब फोन कर. आणि काही काळजी करु नका ठिक आहे ती."
चिन्मय बोलतच घराकडे जायला निघाला। जे काही झालं, ते सगळं त्याच्या डोळ्यापुढे नाचत होतं.

क्रमशः

6 comments:

 1. सही चालली आहे. एकदम मोठ्ठा टर्न घेणार का आता? फ्लो छान आहे, आवडली. येऊ देत लवकर.

  ReplyDelete
 2. झकास. सुरुवात काय मस्त. पुढे काय होणार याची उत्सुकता राहते.

  ReplyDelete
 3. when u will be going to posted next episode
  it's very interesting.

  ReplyDelete
 4. @ manisha very soon.....

  Thank u so much !

  Regards
  Deepak Parulekar

  ReplyDelete
 5. Deepu, lavkar post kar re next part, dying to read it.

  ReplyDelete