Thursday, March 28, 2013

प्रिय मैत्रिणीस...



मैत्रिणी, 
संधिप्रकाशाच्या रंगांच कोडं मला अजुन उमगलेलं नाही.
निर्जन किनार्‍यावर बसुन मी त्या रंगांची उधळण बघत राहतो निश्चलपणे..
अगदी त्या रंगांना काळोखाने गिळेपर्यन्त..
तू आज इथे हवी होतीस..
मग आपण शोधले असते त्या संधिप्रकाशाच्या रंगांचे रहस्य..
आणि तुझ्या डोळ्यांतून वाहणार्‍या नदीचा उगम..

मैत्रिणी,
इथे सारं काही बदलून गेलयं.
वैराण वाळवंटासारखा भासू लागलाय आपला किनारा..
परक्याने हाक मारावी तसा स्पर्शुन जातो हा वारा..
तुझ्या पाउलखुणा शोधत माझी नजर फिरत राहते
पण प्रत्येक सापडलेल्या खुणेला ती बेभान लाट पुसून जाते..

मैत्रिणी,
इथे फक्त माजलयं स्वार्थी माणसांचं रान,
माझ्या वहीत मी अजुनही जपून ठेवलयं
तू दिलेलं ते पिंपळाचं पान.
कधी कधी मी ती वही उघडतो,
प्रत्येक पानावर हात फिरवत राह्तो.
तुझ्यासाठी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला डोळ्यांत भरुन घेतो,
प्रत्येक शब्दाला शहारत, स्पर्शत मी त्या पिंपळपानापर्यंत येतो.
तिथून पुढे मी काहीच लिहिलेलं नाही....

मैत्रिणी,  
आता ते पान खूप जुनं झालयं,
कोरडं पडलयं.
त्या पानाच्या जाळीवर विरुन गेलेत माझे सर्व शब्द
बर्फाखालून वाहणार्‍या हिमनदीसारखे शांत, स्तब्ध
आज पुन्हा, माहित नाही कितव्यांदा
मी आवरतोय त्या पानाला स्पर्शण्याचा माझा मोह
कारण, त्या पानावर कुठे तरी साचून राहिलाय
तुझ्या डोळ्यांतील आसवांचा डोह.....

मैत्रिणी...


- दीपक परुळेकर

19 comments:

  1. ते 'मैत्रिणी' अनेकवचनी नसावं अशी एक माफक अपेक्षा :P

    सुंदर कविता !

    ReplyDelete
  2. कसलं भारी...

    मस्तच ...


    हेरंब ... मैत्रिणी :P

    ReplyDelete
  3. कविता......अप्रतिम

    मैत्रिणी?????? जाडी ला आठवून लिहिली आहे का?? ;) असो मस्करी होती

    फक्त कविताच असू दे एवढिच इच्छा......

    पुन्हा केलेल्या काव्या बाबत thanks

    ReplyDelete
  4. आम्ही सगळ्या 'मैत्रिणी' होतो की त्या दिवशी तुझ्याबरोबर समुद्र किनारी !!! ;) :)

    सुंदर लिहिली आहेस रे...भावना सुंदर उतरल्या आहेत. :)

    ReplyDelete
  5. प्रिय मैत्रिणीस... मस्तच... :)

    ReplyDelete
  6. आज बर्‍याच दिवसांनी जुना दिप्या भेटला रे. मस्त एकदम.

    ReplyDelete
  7. हहहहः हेरंबा! अरे अ‍ॅक्च्युअली ही कविता लिहिण्याचा कॉन्सेप्ट वेगळा होता.. वेल पुढच्या कवितेत कळेल..

    प्रतिक्रियेकरता धन्यवाद.

    ReplyDelete
  8. धन्यवाद स्नेल..
    असं काही नाहीय. कविता ही त्यावेळी सुचलेल्या तरल भावनेचे शब्द असतात.. कुणाला समोर धरुन मी लिहिलेली नाही..
    आणि हो फोटु मठाण्याचा आहे.. :)

    ReplyDelete
  9. अनेक धन्यवाद मोनिका :)

    ReplyDelete
  10. थँक्स अनघा!
    हो तुम्ही सगळ्या मैत्रीणी अहातच की :)

    ReplyDelete
  11. धन्यवाद सागर भावा :)

    ReplyDelete
  12. धन्यवाद पंकज !
    असं स्वतःला कुठून तरी शोधुन आणुन स्वतःसमोर उभं करावं लागतं ! :)

    ReplyDelete
  13. दिप्या ,भन्नाट रे...आवडली ...

    ते 'मैत्रिणी' अनेकवचनी नसावं अशी एक माफक अपेक्षा :P +1

    ReplyDelete
  14. धन्यवाद देवा :)

    ReplyDelete
  15. वाहवा सुंदर !

    ReplyDelete