Sunday, August 5, 2012

If You Are Lonely When You Are Alone.....


If you are lonely when you are alone, you are in bad company...
 
एकाकीपणा, Loneliness  हा मनुष्याचा एक सर्वात मोठा शत्रु आहे. हा असा शत्रू आहे की तो कधी कधी स्वःताचाच घात करतो. प्रत्येक मनुष्य कधी ना कधी या एकाकीपणाचा शिकार होतोच. अशावेळी आपल्याल काहीच सुचत नाही. कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. म्युझिक, मुव्हीज आपली आवडती जागा किंबहुना आपली अतिशय आवडती व्यक्तीही ही अशावेळी आपल्याला नकोशी वाटते. मग अशावेळी तुम्ही काय करता? मी काय करायचो हे मला ठाउक नव्हतं पण त्यादिवशी एक चांगला उपाय सापडला..

दोन-चार महिन्यांपूर्वी भोपाळला कंपनीच्या कामानिमित्त गेलो होतो. भोपाळपासुन ८० कि.मी.वर असलेल्या सुजानपूर या एका गावात  एका  क्लायंटकडे जायचं होतं आणि तिकडलं काम झाल्यावर पुढे रतलामला अजुन एक क्लायंट होता. सुजानपूरमधलं काम त्याच दिवशी आटोपलं आणि रतलामला जाण्यासाठी सुजानपूर स्टेशनवर येवून ट्रेनची वाट बघत बसलो होतो. ट्रेनला यायला अजुन ३ तास होते. आता हे ३ तास कसे घालवायचे याच विचारात होतो. त्यात मी माझा लॅपटॉप पण सोबत आणला नव्हता त्यामुळे तर अजुनच कंठाळा येवू लागला. नशीब सोबत ब्लॅकबेरी फोन होता. त्यामुळे फेसबुक आणि ट्वीटरवर थोडा टीपी सुरुच होता. काही तरी लिहावं म्हणून नोटबुक काढलं पण काही केल्या एक शब्द ही सुचेना. उगाच मग एखादं नाव गिरवू लागलो; पण मनासारखं होतं नव्हतं. 

मे चा शेवटचा आठवडा होता. संध्याकाळच्या वेळी आभाळ विविध रंगांनी भरुन गेलं होतं. कुठून तरी काळे ढग पश्चिमेकडे जमा होत होते. आज कदाचित पाउस हजेरी लावेल असं मनोमन वाटत होतं. त्यात वारा ही अगदी सूसाट सुटला होता. पण नेहमीप्रमाणे ही संध्याकाळ मला खायला उठली होती. मी हे सगळं जाणून बुजुन टाळत होतो कारण ती संध्याकाळ पुन्हा एखादी अशीच आठवण उकरुन काढणार होती आणि त्या अनोळखी प्रदेशात तर मला ते नकोच होतं. कसाबसा मी मनाला सावरत होतो आणि इतक्यात ट्रेन आली. सुजानपूर ते रतलाम अजुन ४-५ तासांचा प्रवास होता. सुदैवाने एक विंडोसीट मिळाली आणि मी निर्धास्त झालो. ट्रेन सुटली तरी पश्चिमेकडलं ते आभाळ काही मला सोडत नव्हतं.सुर्य तर केव्हाचा मावळला होता पण ती संध्याकाळ अजुनही क्षितिजावर रेंगाळत होती. 
कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता आणि पुन्हा त्या संध्याकाळच्या क्षितिजावर आठवणींच एक-एक पान उलगडू लागलं. खूप एकाकी वाटू लागलं. मी डोळे मिटून घेतले आणि खिडकीवर डोकं टेकवलं. असं वाटू लागलं की आता या क्षणी कुणीतरी सोबत असावं आणि मी भराभर मनातलं बोलुन दाखवावं. त्यात माझ्या बाजुला एक गुज्जू फेमेली होती आणि त्यांचं अविरत चरणं आणि बोलण्याचा रवंथ सुरुच होता. एक अनामिक असा प्रचंड तणाव मनावर येवू लागला. रतलाम यायला अजुन बराच वेळ होता. मनातल्या आणि आजुबाजूच्या गोंधळामुळे तर झोप येण्याचा ही चान्स नव्हता. म्हणून मग शेवटी वैतागुन फोन घेतला आणि गाणी ऐकू लागलो. त्यात फोनचा मिडीया प्लेयर शफल मोडवर होता आणि तो ही नको ती दु:खी गाणी ऐकवू लागला. 
"कसे सरतिल सये" हे गाणं वाजवायची त्या फोनला काय गरज होती? :डःड असो. 

मी डोळे मिटून गाणी ऐकू लागलो. इंग्रजीत एक म्हण आहे ना कि,"Whenever you have any problem just sing a song, then you will realize that your voice is a lot more worse than your problem.." :D:D:D
 हे आठवून मग मी माझ्या आवाजात कधी काळी रेकॉर्ड केलेली दोन तीन गाणी ऐकली पण तरीही समधान होईना. अस्वस्थता गाण्याच्या रुपानेही सारखी घंघावत होती. आज मला कुणाशी तरी बोलायचं होतं. बरचं काही बोलायचं होतं.जे कधी कुणाला सांगितलं नव्हतं ते आज सांगायचं होतं. केव्हाचं मनात गाडुन ठेवलेलं एक-एक पान आज वाचायचं होतं. पण कुणाशी बोलणार? कुणाला सांगणार? काही व्यथा आपण नाही सांगू शकत कुणाला. काही दु:खं ही आपली आपल्यालाच पचवावी लागतात. अनघा नेहमी म्हणते की, "आपणच आपलं टीकाकार व्हायला हवं आणि त्याचप्रमाणे आपणच आपला स्व:ताचा एक चांगला मित्र ही व्हायला हवं." पण आज मला खरोखर कुणीतरी समोर हवं होतं. ज्याला मनातलं सारं काही सांगून टाकायचं होतं. काय करावं या विचारात असतानाच एक आयडीया सुचली. 

फोनचा म्युझिक प्लेयर बंद केला. 

ब्लॅकबेरीचं नेटवर्क रिमुव्ह केलं त्यामुळे आता कुणाचेही कॉल्स येणार नव्हते आणि मला डीस्टर्ब होणार नव्हता. 
हॅन्ड्स फ्री डीव्हाईस कानाला अडकवलं; ब्लॅकबेरीमधे हल्लीच इन्स्टॉल्ड केलेलं व्हॉईस रेकॉर्डर अ‍ॅप्लिकेशन ऑन केलं आणि बोलायला सुरुवात केली...... 

"हाय! आज मला तुला काही सांगायचं आहे.खूप दिवस तुझ्याशी बोलायचं होतं पण या ना त्या कारणाने राहुनच गेलं. खरं तर मी मुद्दामच तुला ते सांगितलं नाही आणि कदाचित तुला कधी सांगणारच नव्हतो पण आज राहवत नाहीय..." 


अशाप्रकारे बोलत राहिलो. किती तरी वेळ. जणु मी कुणाशी तरी फोनवर बोलतोय या अविर्भावात असल्याने आणि त्यात मी मराठीत तर कधी इंगिशमध्ये बोलत असल्याने आजुबाजूच्या लोकांचा काही त्रास होत नव्ह्ता. 

किती तरी वेळ मी बोलत होतो. बाहेरचा काळोख आता अधिकच गहिरा होत होता. आणि त्या काळोखाबरोबर एक एक आठवण ओठांवर येत होती. क्षणोक्षणी फार हलकं वाटत होतं. आज पहिल्यांदाच मी स्वःताशी इतका वेळ बोलत होतो. आज स्वःताला कुठून तरी शोधून आणलं होतं आणि माझ्यासमोर बसवून स्व:तालाच सगळं काही सांगत होतो. 

कधी त्या मजेशीर, खोडकर आठवणी सांगताना मोठ्याने हासत होतो तर कधी एखाद्या कटु आठ्वणी सांगताना आवाज खोलवर जात होता. 
कधी पाकळीवरल्या दवासारख्या जपलेल्या त्या आठवणी सांगताना शब्द संथ होत होते तर कधी उसळलेल्या लाटांसारखे माझे शब्द काही आठवणींचा मारा करत होते. 

भरभरुन मी स्व:ताशी बोलत होतो आणि नेहमीसारखं बोलताना माझे श्वास फुलत होते. एका विशिष्ट लयीत ट्रेन केव्हाची धावत होती आणि त्या ट्रेनचा आवाज नकळत माझ्या रेकॉर्डींगला बॅकग्राउंड स्कोर देण्याचा काम करत होता. आता बरंच काही मी बोललो होतो. खिडकीतून बाहेर पाहिलं तर दूर कुठे तरी अधुन-मधुन विजा चमकत होत्या.. रतलाम यायला अजुन एक तास बाकी होता. मी बोलणं आवरतं घेत होतो आणि बाहेरुन मृद्गंध दरवळू लागला. माझं मन पावसासाठी अधिर झालं आणि त्या मृद्गंधासरशी अजुन काही आठवणी ओठांवर तरळू लागल्या. पण मी स्वःताला आवरत घेतलं कारण मला ठाउक होतं की आता पावसाच्या सरी येतिल आणि जर पाउस आलाच तर मग त्या पावसाच्या आठवणी मला रोखता आल्या नसत्या. 

"आज खूप बोललो तुझ्याशी. मला ठाउक आहे  की तुला जाम पकायला झालं असेल, नाही...? But really thanks to listen to me..   आज खूप बरं वाटतयं. खूप हलकं वाटतयं.. थँक्स अगेन" 


असं बोलून मी माझं रेकॉर्डींग थांबवलं. तब्बल १ तास ५१ मि. मी बोललो होतो. खूप बरं वाटत होतं. फोनची बॅटरीही ड्रेन व्ह्यायला आली होती. रात्री साडे नउला रतलामला पोहचलो. बराच शोधा-शोध केल्यावर एक चांगलं हॉटेल सापडलं.( मायला ते हॉटेल डीसेंट नाही सापडलं कुठे :डःडः) खूप थकलो होतो आणि भूक ही लागली होती. रुमवर बॅग टाकली आणि बाहेर जेवायला गेलो. जेउन आलो. शॉवर घेतला आणि बेडवर पहुडलो. मघाशी रेकॉर्ड केलेली माझी बडबड ऐकावी म्हणुन फोन ऑन केला आणि ते ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळलंच नाही.
रात्री कसलसं स्वप्न पडलं होतं. पहाटे ते मी आठवू लागलो पण काहीच आठवेना. 


आता मला हल्ली असंच कधी भरुन आलं की मी हा उपाय वापरतो. लिहिण्यापेक्षा हे सोप्पं वाटतं. लिहिताना खूप विचार करावा लागतो.
शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. त्यात काही पर्सनल लिहायला गेलो तर कुणाच्या भावना दु़खावणार तर नाहीत ना याचीही काळजी घ्यावी लागते.त्यापेक्षा हे बरं वाटतं. कधी असं भरुन आलं ना की स्व:ताशीच असं बोलावं. आणि जेव्हा  स्वःताशीही काहीच बोलायला नसेल तेव्हा त्या रेकॉर्डींग्ज पुन्हा पुन्हा ऐकाव्यात. फार बरं वाटतं. माहीतीय??गाण्यापेक्षा आपला आवाज इथे फार सुन्दर लागतो. प्रत्येक सूर भावनेच्या तालावर अगदी चपखल बसतो. आणि हो बोलताना नेहमी जे मनात आहे ते स्पष्ट बोलावं. कसलीही तमा, भीती न बाळगता. 

असं
म्हणतात की स्व:ताशी बडबड करणारे वेडे असतात. पण खरं सांगतो हा वेडेपणा करुन बघा मनावरलं एखादं अनामिक ओझं कमी होतं......

- दीप्स

21 comments:

  1. काय मस्त लिहिलंय राव.......कधी कधी मी पण स्वताशीच असा बडबडत असतो ......//

    ReplyDelete
  2. _/\_ _/\_ _/\_


    तू वेडा आहेस आणि तुझे शब्द वेडं करतात....जबरदस्त लिहिलंय :) :)

    ReplyDelete
  3. mastach... karach swatashi pan kadhitari bolayla hava... aapla man he apalch asta..tyachyashi savvad sadhla tar khup goshti sutatat

    ReplyDelete
  4. Mastach... :) me pn krte asa khupda. pn, mnatlya mnat... :)

    ReplyDelete
  5. आपलाच आपल्याशी संवादु.. !

    ReplyDelete
  6. _/\_ _/\_ _/\_

    Mast Lihaly deepya ;)

    ReplyDelete
  7. 'दिपेश्वरी' लिहिणार वाटतं तुम्हीं भाऊ ! ! :p
    छान लिहिलयंस...आवडलं.
    मात्र बरेच दिवसांत आपण भेटलो नाही आहोत ! कधी भेटायचं सांग पाहू ? :) :)

    ReplyDelete
  8. छान लिहलाय ..... आणि एकटेपणावरचा उपाय जबरी

    ReplyDelete
  9. मायला दिप्या.... भारी रे. मीही असाच कधीतरी बोलत असतो माझ्याशीच. एकदा तर एकटाच काही काम नसताना ट्रेनने बेंगलोर-मैसूर-ऊटी-कुन्नूरला जाऊन आलो.

    ReplyDelete
  10. धन्स कवीराज.. हे बडबडणं कधी कधी चांगलं असतं राव!

    ReplyDelete
  11. हाभार्स सुहासा. बस काय यार..
    आपण सारेच वडे .. आय मीन वेडे.. :डःडःड

    ReplyDelete
  12. धन्यवाद प्रज्ञा..
    हो अगं.. आपण आपल्या व्यथांसाठी मित्र शोधत बसतो पण खरा मित्र जो आपला आपणच आहोत हे मात्र विसरतो, हो ना?

    ReplyDelete
  13. धन्यु वैदेही.. एकदा माझ्यासारखी बडबड करुन बघ. मज्जा येईल.. :)

    ReplyDelete
  14. अगदी अगदी हेरंबा...
    धन्स

    ReplyDelete
  15. अनेक धन्यवाद यवगेसाई.. :)

    ReplyDelete
  16. Indeed Sarika,

    Try it.. you'll feel better :D:D:

    ReplyDelete
  17. हे हे हे "दीपेश्वरी" हहहहः
    धन्यवाद अनघा..
    या विकांताला भेटुच की आपण.. सेनापतींचा खलिता आला आहे..

    ReplyDelete
  18. धन्यवाद पाटील...
    त्या दिवशी "टॅक्सी ड्रायव्हर" बघत होतो आणि एकतेपणा अजुनच दाटुन आला..

    ReplyDelete
  19. धन्य पंकज....
    अरे हहहहहः सहीच मायला सही आहोत आपण सगळे वेडे.. इथेच भेटलो आणि तिकडेपण भेटुच...

    ReplyDelete