Thursday, July 12, 2012

माझी "शाळा" ( भाग ७ )

परीक्षेच्या दिवशी शिक्षकांनी बर्‍याच सूचना दिल्या होत्या. परीक्षेचं  केंद्र वेंगुर्ल्याला होतं. बर्‍याच विद्यार्थ्यांचा क्रमांक वेंगुर्ला हायस्कूल तर माझा आणि काहीजणांचा पाटकर हायस्कूलला होता. परीक्षेच्या दोन - तीन दिवस अगोदर मला सडकून ताप भरला होता. अंथरुणावर पडल्या पडल्या मी अभ्यास करायचो. सगळ्यांना काळजी लागली होती, पण झालो कसाबसा रिकव्हर. परीक्षेच्या दिवशी सकाळी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. वाडीतून बस स्टॉपवर जाईपर्यंत जो कुणी मोठा माणुस दिसे आई मला त्याच्या पाया पडायला लावत असे. :डःड
त्यानंतर नाईकच्या घरी गेलो त्याच्या आई वडीलांचे आशीर्वाद घेतले. वाटेत भेटणार प्रत्येकजण आम्हाला शुभेच्छा देत होता. शाळेत पोचलो. सगल्या शिक्षकांचे आशिर्वाद घेतले. शिरोडकरही भेटली. गोड हासुन तिने ही शुभेच्छा दिल्या.....

बोर्डाची परीक्षा ही सरली. दीड - दोन महिन्यांचा अवकाश होता. आता मला घरात कसलीच आडकाठी नव्हती. उनाडक्या करायची, खेळायची पण खरं सांगतो शाळा सरल्यानंतर अचानक या सगळ्यातली मजाच निघून गेली. हळुहळू मित्र सुद्धा विरळ होत गेले. परीक्षेचा निकाल लागला. पहिल्यांदाच आमची शाळा जिल्ह्यात प्रथम आली होती. शाळेतुन माझा दुसरा क्रमांक आला. पुढे काय ?? पुढे काय?? याचा विचार माझ्या मनात काहीच  नव्हता मामाने सगळं ठरवंच होतं की इंजिनिअरिंग करायची....

या सगळ्यात शिरोडकर माझ्या
मनातून कधीही गेली नाही. 
ती मला नेहमी आठवायची. 
तिचे ते ब्राउन डोळे... 

शाळेबरोबर शाळेतले मित्र सुध्दा दुरावले. पण अमोल नाईक आतापर्यंत संपर्कात आहे. आम्ही पाचवीपासुन एकत्रच होतो. खूप मस्ति केली. मारामार्‍या केला. भांडलो पुन्हा एकत्र झालो ते आतापर्यंत. जरी मी कधी विसरलो तरी अमोल न चूकता मला कॉल करतो माझ्या घरातल्यांची चौकशी करतो. 

कोळसुलकर गावीच असतो. मी जेव्हा गावी जात तेव्हा त्याला आवर्जुन भेटतोच. खूप गप्पा होतात. त्याने कॉलेजमधली बरीच कांडं मला सांगितली. प्रशांत ही मुंबईला आला. मी बर्‍याच वेळा त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. एक दोन वेळा त्याला त्याच्या घरी जाउन भेटलो. पण तो पुन्हा कधी संपर्कात राहिला नाही. तो खूप पुढे निघुन गेला. बाकी नयन, वासुदेव, बाबाजी, बाबुराव' शांताराम हे सगळे आपापल्या मार्गाने सेटल्ड झाले कुणी गावातचं राहिले. कधी कुणी चुकून माकुन भेटलं तरी पूर्वीचा तो जल्लोष नसतो. आयुष्याच्या, संसाराच्या, व्यथा त्यांच्या त्या हास्यात कुठेतरी दिसत राहतातच.. अर्थात मी ही त्याला अपवाद नाहीच.........
 
शाळा अगदी जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा कधी इतकं जाणवलं नाही पण आता त्या दिवसांची खूप आठवण येते. वाटतं पुन्हा जावुन शाळेत बसावं.मस्ती करावी, मारमार्‍या कराव्यात. शिक्षकांचा मार खावा. पण आता हे सगळं बदलून गेलयं. आयुष्य कुठच्या कूठे गेलयं. पण आज ही वाटतं की ते सर्व काही पुन्हा मिळावं. ते हरवलेले मित्र पुन्हा मिळावेत.. कारण इतर नात्यांपेक्षा शाळेचं हे नातं फार वेगळं असतं. ज्याला ते समजलं त्याने ते आयुष्यभर जपायलाच हवं....... 
_____________________________________________________________

शाळा संपली होती. संपले होते ते उनाड दिवस. त्या खोड्या,सायकलची रेस,पावसाचं पाणी,नदीला आलेला पूर, दूरवरुन दिसणारा समुद्र,या सगळ्यांना आता एक वेगळीच परिभाषा मिळाली होती. नजरेत आता ती निरागसता राहिली नव्हती. दाहावीच्या परीक्षेनंतर आम्हाला आमचा गाव सोडुन,आमचं जग सोडुन, या विशाल दुनियेच्या सागरात झोकुन द्यायचं होतं. पण शाळा मनातून कधीच सरली नाही. आजही हे सगळं लिहीताना शाळा तश्शीच्या तश्शी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिलीय.

खरं तर ना, शाळा म्हणजे आपली दुसरी आईच असते. आपला दुसरा जन्म इथे, या शाळेत होतो. जशी आपली आई आपल्याला ९ महिने उदरात वाढवते अगदी तस्संच ही शाळा आपल्या आयुष्याची ९ वर्षे आपला सांभाळ करते. आपला सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक विकास करते. त्यानंतर दहावीचे ९ महिने आणि आपली शाळेची असलेली नाळ तुटते. नंतर आपण मोकळे असतो या विश्वात स्वैर फिरायला.. जसं नुकतचं जन्माला आलेलं मुलं रडायला लागतं अगदी तस्संच मला निरोप समारंभाच्यावेळी रडताना वाटतं होतं. दहावीला काही जण पास होतात तर काहीजण नापास होतात. काही जण खूप पुढे निघुन जाता तर काही जण तिथेच राहतात. या दुसर्‍या आईने आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर येवून आपल्याला सोडलेलं असतं. सोडून दिलेलं असतं या जगात घडण्यासाठी आणि जगाला घडवण्यासाठी. आपण आयुष्यात काय केलं हे ज्याचं त्याचं नशीब आणि कर्तबगारी; पण या सगळ्यामागे आपल्या या आईचा हातभार फार मोठा असतो. त्यामुळे उभ्या आयुष्यात आपल्या या दुसर्‍या आईला विसरुन कधीच चालणार नाही.
..

                                               --- समाप्त--- 

- दीपू 

29 comments:

 1. hmmmm
  >> इतर नात्यांपेक्षा शाळेचं हे नातं फार वेगळं असतं. ज्याला ते समजलं त्याने ते आयुष्यभर जपायलाच हवं.

  kharach n.....

  ReplyDelete
 2. Tuzya post mule 'shala' ekada navyane aathavayala lagale aahe...ti masti, tya khodya, te pahila niragas prem, shalechya shevatachya divashi aalela radu...sagala aathavatay.. Ya busy schedule madhun ekmekana bhetayala vel milat nahi...pan sagale sandharbh, tyachyabarobar jodalele lok aathavat rahatat..kharach 'shala' aapan kadhich visaru shakat nahi...aani visaruhi naye..

  ReplyDelete
 3. खूप भावस्पर्शी...!!!

  ReplyDelete
 4. "पण शाळा मनातून कधीच सरली नाही. आजही हे सगळं vachatana शाळा तश्शीच्या तश्शी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिलीय."

  Deepak, anek dhanyawaad tya dniyechi punha ekada safar ghadavalyabaddal.

  shradha

  ReplyDelete
 5. सगळे भाग आज एकदमच वाचले. ग्रेट! आता तुझ्या शाळेवर “शाळा २” काढायला पाहिजे!

  ReplyDelete
 6. सही... आत्ता पर्यंत तुझी सगळ्यात जास्त आवडलेली पोस्ट. :-)
  शेवट तर भार्रीच...

  ReplyDelete
 7. हो अ‍ॅप्स ! हे नातं जपायला हवंच.. :)

  ReplyDelete
 8. धन्स सारिका...
  हो ना ? शाळा कधीच मनातून जात नाही ..

  खूप खूप हाभार्स..

  ReplyDelete
 9. धन्यवाद श्रद्धा.. :)

  ReplyDelete
 10. अनघा, काही नाही गं .. :)
  आल इज वेल

  ReplyDelete
 11. हे हे हे ! धन्यवाद गौरी ताई.. :)

  ReplyDelete
 12. हे मैथीली ! धन्यु गं ! :) :)

  ReplyDelete
 13. आयला काय रे भावा... एकदम हळवं करून शेवट केलास :(

  अजून लिव की रे, मज्जा येत होती :)

  ReplyDelete
 14. झाली की भावा. संपली शाळा.. :)

  ReplyDelete
 15. संपूर्ण मालिका अप्रतिम. डोळ्यातून पाणी आले भावड्या...

  ReplyDelete
 16. वाह वाह दीपक. भारीच आठवणी आहेत. स्मरणशक्ती दांडगी आहे तुझी. साला हेवा वाटतो तुझा, तु नेहमी पैला नंबर काढायचास ते समजुन! बढिया.

  ReplyDelete
 17. धन्स सिद्ध्या भावा..

  ReplyDelete
 18. सौरभ! हो रे चूकून माकुन यायचा पैला नंबर..
  धन्यवाद.. :)

  ReplyDelete
 19. hi. saglya post ekdam chan aahet. thanks for sharing with us

  ReplyDelete
 20. thanx deepak tuzya ya postne aj mala mazi shala aathvli...pn tuzi mazi story mdhe barechs....samya aahe...tuzi jashi shirodkar tashich mazi pn ek hoti....pn deepak tu barech diwas tichya contactmdhe hota.....pn ata aahe ka tu tichya relationmdhe.....???
  asach post karat ja....
  thanx.....
  Amol harkal

  ReplyDelete
 21. khup avdli deepak tuzi shala.....!!
  pn tu sangitl nahi ki shirodkar v tu ata relation mdhe aahat k nahi...??

  ReplyDelete

 22. प्रिय अमोल,
  प्रतिक्रियेकरता धन्यवाद.. तुला माझ्या पोस्ट वाचून आनंद झाला हे माझ्यासाठी खूप आहे.
  वेल, मी आणि ती कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही आहोत. जसं मी शेवटी लिहिलं तिची माझी शेवटची भेट मी मुंबईला पुढील शिक्षणासाठी येताना झाली. त्यानंतर आम्ही आजतागायत कधीही भेटलो नाही किंवा कोणत्याही प्रकारे एकमेकांच्या
  संपर्कात नाही आलो. ती जिथे असेल तिथे सुखी असेल हीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे.


  ReplyDelete
 23. thanx....but yaar ha blog tu pudhe wadhvava....ashi mazi ichha aahe....!!!
  khupc hridyi-sparshi lihtos......!!
  asch lihit raha...!!
  Best of luck..!!

  ReplyDelete
 24. महोदय,
  अत्यंत भावस्पर्शी असं तुमचं लेखन आहे.वाचता वाचता डोळे कधी पाणावून गेले समजलं पण नाही. प्रत्येक गोष्ट डोळयासमोर घडतेय असचं लेखन आहे....
  एक चांगली,सुंदर ,अप्रतीम अशी मालिका बनु शकते.कोकणच्या भूमीवर अशी मालिका बनावी असे मला मनापासून वाटते.

  ReplyDelete