Saturday, December 31, 2011

असंच... काहीसं...

यावर्षातली ही शेवटची पोस्ट माझ्या आवडत्या जागी म्हणजेच सीसीडीमध्ये, माझी आवडती एसप्रेसो घेत  लिहितोय. माहित नाही पुर्ण करेन की नाही. हे लिहिण्याचं व्यसन सुरु ठेवलंच पाहिजे, कॉफीचं कमी केलं पाहिजे -;)

काही तरी लिहावं ही खूप दिवसापासूनची इच्छा.. बरेच दिवस ब्लॉगवर काहीच लिहिलं नाही., काही सुचतच नव्हतं. शब्द जसे दूर मला एकट्याला कुठेतरी सोडून गेल्यासारखे. परके झालेले. अनेकदा लिहायचा प्रयत्न केला,पण कधी अपूर्ण तर कधी खोडून टाकलं. हे नेहमी असंच होत राहीलं. पारिजात, नक्षत्र, कॉफी, पाउस, वारा, ढग, फुलपाखरं, हे माझे नेहमीचे शब्दही मला सोडून गेल्यासारखे, इतके दूर की एक ओळ ही सुचत नाही. माणसं सोडून गेल्याच्या दु:खापेक्षा माणसं तोडल्याचं शल्य नेहमी मनात रुतत गेलं. 
"दर्द का हद से गुजरना है , दवा हो जाना" हे गालिबचे शब्द अगदी माझ्या आत्म्यात भिनलेले. मग कधी कधी हा ही विचार मनात की; "तू ने भी तो तोडे है दिल अपनोंके, दर्द सिर्फ तेरा ही हमराज नहीं"

हे असं झालं ना की मन पिळवटून निघतं. चांगलं -वाईट, चूक - बरोबर, आयुष्यातले हे आलेख कधी व्यवस्थित बसतच नाहीत. हे सगळं एकदा व्यवस्थित केलं पाहिजे. हा सगळा अट्टाहास फक्त अस्तित्त्वाचा नाही तर अस्मितेचा आहे. पण स्व:ताची अस्मिता जपताना दुसर्‍याच्या अस्मितेला आणि अस्तित्त्वाला जराही धक्का लागता कामा नये याची खबरदारी मला घेतलीच पाहिजे.

जहाजे येतात जहाजे जातात
किनारा नेहमी स्तब्ध असतो
प्रत्येक भरकटलेल्या जहाजाला
आशेचा तो एक शब्द असतो...

कधीतरी या चार ओळी लिहिल्या होत्या, आणि आता त्या जाणवू लागल्या. मग मी जहाज की किनारा या संभ्रमात हेलकावे खात. पण मग जाणवू लागलं की हे दोन्ही रोल मला पार पाडायचेत. कधी स्तब्ध, शांत किनारा होउन भरकटलेल्या जहाजाला मला आश्रय द्यायचाय, तर कधी एखाद्या जहाजासारखं महासागरात हरवलेल्या दिशा शोधत भरकटायचयं. किनारा आणि जहाज यांचा निकटचा संबध. दोघेही एकमेकांना आसुसलेले. पण जहाजाच जन्मच मुळी महासागरात विहार करण्यासाठी झालेला, किनारा त्या जहाजाला थांबवू शकत नाही. हे किनार्‍याला समजायला हवं... मग काय ?काही नाही...

व्हावं कधी जहाज आणि धुंडाळाव्या नव्या दिशा.. तसंच
होउन कधी निश्चल किनारा द्यावी  जहाजास आशा....

माझ्या सर्व ब्लॉगवाचकांना आणि ब्लॉगर्स मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या खूप सार्‍या
शुभेच्छा....

आपलाच
दीपक, दीप्स, दिप्या .... :)


20 comments:

 1. दि हो आहेस तू काही भरकटलेल्या जहाजांसाठी निश्चल किनारा ....
  तू पण तुझ्या नवीन दिशा धुंडाळाव्या अस आम्हालाही वाटत आहे.. त्याच वाटांवर आम्ही चालू तुझ्या मागे मागे..
  नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ..
  यशवंत

  ReplyDelete
 2. छान लेख ...
  समजूतदारपणाचा आव छान ....

  पण आमचा दंगेखोर दिप्स जपून ठेवा ...

  शेवटी ....

  कश्ती भी हो जाना
  और कभी किनारा भी
  याद बस ये रखना
  साथ रहेंगे हम भी !!! :)

  भक्ती

  ReplyDelete
 3. सुंदर लेख, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ..

  ReplyDelete
 4. >> पारिजात, नक्षत्र, कॉफी, पाउस, वारा, ढग, फुलपाखरं, हे माझे नेहमीचे शब्दही मला सोडून गेल्यासारखे,

  अबे बझ्झ (आणि कुलुप) पण सोडून गेले नां रे? :D

  असो, नविन वर्षात खूप नविन गोष्टी येतील. नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भावा...

  २०१२ मध्ये आपण नक्की भेटतोय. चारमिनार में बैठ के इस्माईल भाय के खर्चे में चार चाया, चार बिस्कूटा खाते रे...

  ReplyDelete
 5. दीपक, नवीन वर्षात सगळे तुझे आवडते शब्द तुला भरभरुन सापडोत ! जेणेकरुन तू वारंवार लिहावे... नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा !

  ReplyDelete
 6. तुलाही नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा रे ! :)

  आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी तू बरोबर होतास हे एकदम मस्तच आलं बघ ! :)

  ReplyDelete
 7. प्रिय यशवंत,
  प्रतिक्रियेकरता खूप धन्यवाद... :)
  नववर्षाच्या हार्देक शुभेच्छा !

  ReplyDelete
 8. समजूतदारपणाचा आव छान .... ...

  हम्म्म ! भक्ति, मनापासून धन्यवाद...

  ReplyDelete
 9. धन्यवाद नागेश,
  तुला ही नववर्षाच्या अनेक शुभेच्छा! :)

  ReplyDelete
 10. सिद्धू भावा.. बझ्झ गेल्याचं दु:ख तर खूपच मोठं आहे..
  तुला आम्ही सगळे फेसबुक वर खूप मिस्ड करतोय...

  ताडाताडी कर के आना रे भाई, चारमिनार में बैठ के बहोत सारी बाताएं करनी है रे !

  ReplyDelete
 11. श्री ताई , मनापासुन धन्यवाद गं!
  यावर्षी कासला मज्जा मज्जा केली ना आपण..
  यावर्षी ही नक्की अशीच भटकंती करु..

  ReplyDelete
 12. हो ना अनघा, फार धम्माल केली आपण सर्वानी दोन दिवस..
  नुसति खादाडी आता काय काय खदाडी केली याचे फोटू टाकून बकीच्यांना जळवायचं बरं... ;)
  अनेक धन्यवाद...

  ReplyDelete
 13. व्वा व्वा... मालक एकदम जोरदार पुनरागमन ;-)

  जहाज हो किंवा किनारा, त्याचे असणे हे महत्वाचे. दोघांना एकमेकांची ओढ हे असतेच ....


  नवीन वर्षाच्या शुभेच्छा :) :)

  ReplyDelete
 14. सॉरी दिप्स जरा जास्तच उशीर होतोय तुझ्या ब्लॉगवर यायला...पण काय बोलाव हे कळत नव्हत...
  काय आहे आम्हाला दिप्याला सिरीयस पहायची सवय नाही आहे न....और इस साल तो इस्मैलभाई खुद आके चाय पिलानेवाला है बोले तो सलीम तुम लोगा अन्ग्रेजा वाली चाय पियेंगे वो भी बडे बडे कपा में और साथ में बिस्कुटा भी......:) चारमिनार भी लेके आयेगा वो....फिर तू तेरे पारिजात, नक्षत्र, कॉफी, पाउस, वारा, ढग, फुलपाखरं सबको भूल के सिर्फ कुलुपावाली वाता करेगा...
  असो...या वर्षी खूप छान छान पोस्टा लिही....वाचायला नक्की आवडेल...Happy 2012....

  ReplyDelete
 15. धन्स भावा...
  To Be.. Is the most essential thing :)

  ReplyDelete
 16. हे हे हे अ‍ॅप्स!
  इट्स ओके रे !
  वेल, मी इतका ही सिरीअस नव्हतो झालो काही ;)
  और तुम सच बोल्या, अब इस्माइल भाय हैदराबाद से आरेले तो चार चाँद लग जायेंगे !
  फोक्कट की चाया पिलाते, हमको बडी बडी बाता सुनाते..
  और शूशूशूशूSSSSSS कुलुपवाली बाता पब्लिक में नक्को बोलने का, क्या हैं की बिगडे हुए है, फिर भी थोडे शरीफ तो लगते रे ! :D:D:D:D

  ReplyDelete
 17. दीपक तुला ही नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....आणि सगळे तुझे ठरलेले शब्द घेऊन खूप सारे लेखन घेऊन नक्की ये ह्या वर्षी....तुझ्या ब्लॉगवर आम्हां सर्वांनाच वाचायचे आहे.

  ReplyDelete
 18. दीपक तूलाही नव्या वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा :)

  ReplyDelete
 19. धन्स मोनिका...
  तुलाही नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! :)

  ReplyDelete
 20. धन्यवाद तन्वी ताई...
  मागल्या वर्षी मस्त नाशिक भेट झाली आपल्या सगळ्यांची, मज्जा आली.

  ReplyDelete