Thursday, November 11, 2010

ऑरफन !नेट फोर मध्ये असताना मी, समीर आणि तेजस संध्याकाळ झाली की आम्ही मुव्ही बघायला सुटलो.. त्यात समीर वाशीला राहतो आणि मी पनवेलला त्यामुळे संध्याकाळी ऑफीसमधुन सुटल्यावर कंठाळा आला की आम्ही वाटेत एखाद्या थिएटरमधे शिरायचो ! एकदा कंपनीकडुन सार्‍या स्टाफला मुव्हीसाठी पाठवणार होते !! कोणता मुव्ही बघायचा यावर आमचा वाद सुरु होता.. तेव्हा ऑरफन आणि व्हॉट्स युवर राशी रिलिझ झाले होते !! मुव्ही ठरवणारे मी, तेजस आणि समीर !! शेवटी, आयला हिंदी पिक्चर बघण्यापेक्षा हॉलीवूड मुव्ही बघायचे ठरले त्याप्रमाणे संध्याकाळच्या शो चे आय मॅक्स वडाळ्याला बुकिंग केले!! बाकीचे सारेजण तुम्ही न्याल तिथे आणि दाखवाल तो मुव्ही बघु अश्या स्थितीत होते !! त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता!!  

ऑरफन हा माझ्या आवडत्या मुव्हीपैकी एक !! अंगावर काटे आणणारा थ्रीलरपट ! आणि क्लायमॅक्स होतो तेव्हा कळतं की अरे असेही काही रोग असतात??  म्हणुन मी हॉलीवूडपटांचा निस्सीम चाहता आहे कारण त्यांचे कॉन्सेप्ट्स अतिशय वेगळे असतात मग तो एखादा फिक्शनल का असेना ?? बॉलीवूड फक्त नाव बदलून आणि पात्रे बदलुन तश्याचा तसा चित्रपट आपल्यासमोर ठेवतिल.. अ‍ॅम शुअर ! थोड्या दिवसानी हाच ऑरफन हिंदीमध्ये "अनाथ बच्चा"  किंवा मराठीत गोजीरी सारखा 'पोरकी' म्हणुन प्रदर्शित होईल !! :)ऑरफन सुरु होतो, केट कॉलमन ( वेरा फार्मिगा ) च्या डिलिव्हरीच्या स्वप्नाने ! तिने आत्तच तिसर्‍या अपत्याच्या डिलीव्हरीच्या वेळी एका मेलेल्या मुलाला जन्म दिलाय!  ( हा सीन खूप भयंकर आहे! वीक हार्टेडसनी टाळावा ) आणि या धक्क्यातुन ती सावरली नाहीए. त्यात अतिमद्यपानाच्या तक्रारीतुन ती स्वतःला सावरतेय! या सगळ्याचा परिणाम तिच्या आणि जॉनच्या नात्यावरही होतोय !! त्यांच्या दोन मुलापैकी मॅक्स नावाची २-३ वर्षाची मुलगी तिला बोलता आणि ऐकता येत नाही आणि डॅनिअल  नावाचा ८-९ वर्षाचा एक एक मुलगा आहे. अश्यातच ते दोघे एक मुल दत्तक घ्यायचे ठरवतात. त्यानुसार एका स्थानिक अनाथालयातुन इस्टर नावाच्या ९ वर्षाच्या  रशियन मुलीला ते दत्तक घेतात! घरी येताच इस्टर ताबडतोब मॅक्सला आपलसं करुन घेते पण डॅनिअल तिला बहीण मानायला तयार नसतो !! शाळेत पहिल्या दिवशी तिच्या ओल्ड फॅशन्ड ड्रेसवर आणि गळ्याला असलेल्या कापडाच्या गळपट्टीला (कॉलर) एक मुलगी छेडते आणि तिच्या हातातल्या बायबलशी झोंबाझोंबी करताना ते बायबल फाटुन विखुरते  तेव्हा इस्टर कान फाटेस्तोअवर किंचाळते. तिचं ते रुप बघुन सारेजण घाबरतात! त्यानंतर एका सुट्टीच्या दिवशी खेळत असतान त्या मुलीला एकट पाहुन इस्थर तिला घसरगुंडीवरुन  खाली ढकलुन देते. 

तिच्या वयाच्या मुलीला असलेलं सेक्स नॉलेज आणि पियानो वाजवण्याची तिची असक्ती बघुन केटला तिच्या एकंदर वागणुकीबद्दल संशय यायला लागतो. त्यानंतर त्या अनाथालयाच्या प्रमुख सिस्टर अ‍ॅबिगेल केटच्या घरी येवुन जॉन आणि केटला इस्टरबद्दल सावध राहायला सांगतात आणि त्यांची ही चर्चा इस्टर चोरुन ऐकते आणि सिस्टर अ‍ॅबिगेलचा काटा काढायचा ठरवते. त्यासाठी ती छोट्या मॅक्सला विश्वासात घेते की सिस्टर तिला या घरातुन बाहेर काढायच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठी तिला धडा शिकवणं गरजेचं आहे !!  सिस्टर आपल्या परतिच्या वाटेत आपल्या व्हॅनमध्ये असतानाच एका पुलाच्या इथे इस्टर मॅक्सला घेउन लपून राहते आणि जशी गाडी येते मॅक्सला गाडीसमोर ढकलते.. सिस्टर अ‍ॅबिगल कशीतरी गाडी सावरते आणि रडणार्‍या मॅक्सला बघायला धवत येते.. तेव्हाच इस्टर तिच्या डोक्यावर हातोड्याने वार करते आणि मॅक्ससमोर तिला मारुन टाकते ! ती मॅक्सला घेउन प्रेताला बर्फामध्ये धकलुन देते आणि सारे पुरावे डॅनिअलच्या ट्रीहाउस मध्ये लपवून ठेवते.. त्यादोघांना ट्रीहाउसमधुन उतरताना डॅनिअल लपुन पाहतो.. 

इथे केट जॉनला इस्टरच्या विअर्ड वागणुकिबद्दल सांगते पण तो इग्नोर करतो. केट तिच्याबद्दल अधिक जाणुन घेण्याच्या उद्देशाने तिच्या खोलीचा शोध घेते आणि तिला एक बायबलचे कॉपी सापडते जी इस्टोनिआ इथल्या एका मेंटल हॉस्पिटलमधली असते.  ती इस्टरचे फोटोग्रॅफ्स त्या इन्स्टिट्युटमध्ये पाठवते आणि अधिक माहिती सापडल्यास तिकडच्या डॉक्टरला कॉल बॅक करायला सांगते. 

इकडे इस्टर हळूहळू जॉन आणि केटच्या नात्यात फुट पाडायचे काम करत असते.. वेळोवेळी ती असं काही तरी करते की जॉनला वाटावं कि दोष केटचाच आहे. एका रात्री इस्टर डॅनिअलच्या खोलीत जाउन तो   त्याच्या गळ्यावर चाकु ठेवते आणि जर त्याने सिस्टर अ‍ॅबिगलच्या खुनाबद्दल कुणाला संगितले तर त्याला जीवे मारण्याची धमकी देते.. त्या धमकीने आणि तिच्या अवताराने बिचारा अंथरुण ओले करतो !! त्याला इस्टरची इतकी दहशत बसते की मॅक्सच्या खोलीतही तो लपुन छ्पुन जातो आणि त्यापुराव्यांबद्दल मॅक्सला हातवारे करुन ( तिच्या भाषेत ) विचारतो. मॅक्स सांगते की इस्टरने त्या सार्‍या वाईट गोष्टी ट्रीहाउसमध्ये लपवुन ठेवल्यात. 

दुसर्‍या दिवशी डॅनिअल ट्रीहाउसमध्ये शोध घेत असतानाच इस्टर तिथे येते आणि त्याला ट्रीहाउसमध्ये बंद करुन आग लावून देते.. हा सीन खतरनाक आहे ! बिचारा डॅनिअल ओरडत कसाबसा बाहेर पडतो पण झाडावरुन खाली पडतो.. तो जिवंत आहे हे पाहुन इस्टर एक दगड घेउन त्याच्या डोक्यात घालणार इतक्यात मॅक्स तिला आडवते आणि तो वाचतो.. एव्हाना आपल्या लक्षात येते की इस्टर एक सायको आहे पण ती असं का करते याचा तर्क आपणही असाच लावतो की ती एक सायको आहे आहे आणि त्यात ती सर्वांना मारुन टाकतेय ! 


डॅनिअल हॉस्पिटलमध्ये असताना इस्टर तिथेही त्याला उशीने त्याचे तोंड दाबुन मारायचा प्रयत्न करते तो ऑलमोस्ट मरत अस्ताना वेळेवर डॉक्टर त्याला वाचवतात ते की मॅक्सला काही तरी अघटीत घडतेय याची चाहुल लागते म्हणुन ! 
हे कूणी केलं ते केटच्या लक्षात यायला वेळ लागत नाही आणि ती इस्टरला तिथेच फटकावते पण जॉन तिचं ऐकत नाही आणि तो इस्टर आणि मॅक्सला घेउन घरी येतो. केटला डॉक्टर गुंगीचे इंजेक्शन देतात आणि तिलाही तिथेच अ‍ॅडमिट करतात.. 

त्या रात्री जॉन खुप वैतागलेला असतो आणि हॉलमध्ये बसुन ड्रींकस घेत असतो. त्यावे़ळी इस्टर ब्लॅक ड्रेसमध्ये हातात नाईफ घेउन त्याच्याशेजारी येते आणि त्याला सीड्युस करायचा प्रयत्न करते.. आता आपलंही डोकं ठणकु लागतं की इतकी छोटी मुलगी असं कसं करु शकते??? तेव्हा तिच्या अशा विचित्र वागण्याने जॉन वैतागतो आणि तिला परत ऑरफनेजमध्ये पाठवण्याची धमकी देतो.. आता त्यालाही कळु लागतं की केट जे सांगत होती ते खरे होते आणि आपण तिच्यावर अविश्वार दाखवला! 

इकडे केट शुद्धीवर येते असताना तिच्या सेलवर सार्ने इंस्टिट्युटमधुन एक कॉल येतो आणि त्या डॉक्टरकडुन तिला धक्कादायक बातमी मिळते. अ‍ॅक्चुअली इस्टर ही ३३ वर्षांची एक बाई असते आणि तिचं खरं नाव लीना क्लॅमर असते. तिला  HYPOPITUITARISM नावाचा रोग असतो जो माणसाची शारिरिक वाढ लहानपणातच खुंटतो आणि त्यामुळे लीना आतापर्यंत एका लहान मुलीसारखीच वागत असते. 
डॉक्टर केटला सांगतो की, लीना ही अत्यंत खतरनाक आहे. ती जरी शरीराने लहान असली तरी तिची मानसिक वाढ तिच्या मानसिक वयानुसारच झाली आहे; आणि या वयात असलेल्या शारीरीक सुप्त इच्छा ती पुर्ण करुन घ्यायला काही करु शकते.  आणि यापुर्वी तीने कित्येक खुन केलेत.. एका फॅमिलीत दत्तक म्हणुन असताना तिने तिच्या वडीलांनी तिच्याशी शारिरीक संबंध ठेवायला नकार दिल्यामुळे त्यांचा खुन करुन पुर्ण घराला आग लावली होती. 


इकडे जॉनच्या वागण्या आणि ओरडण्यामुळे हर्ट आणि रागवलेली लीना (इस्टर) परत आपल्या खोलीत येते आणि रागात आपला मेकअप उतरवते.. ( मेकअप उतरवतानाचा सीन डेंजर आहे ) त्यावेळी तिची सुरकुतलेली त्वचा, खोटे दात. मानेवर आणि हातावर असलेले स्कार दिसु लागतात ! रागाच्या भरात ती जॉनवर नाईफने वार करते आणि त्याला मारुन टाकते हे सगळं मॅक्स बघत असते. आता ती मॅक्सला मारायला धावते पण मॅक्स लपुन बसते आणि इतक्यात तिथे केट पोचते आणि मॅक्सला वाचवते. क्लायमॅक्समध्ये केट इस्टरला कशी मारते हे बघणंच योग्य आहे !जेव्हा मुव्ही संपवून बाहेर पडलो तेव्हा बाकीचे सारेजण घाबरले होते.. बोलले, साल्यानों परत तुमच्याबरोबर आम्ही कधी येणार नाही ! कसले पिक्चर दाखवता आम्हाला !

3 comments:

 1. आयला भारी लिहिलंयस.. वाचताना पण अंगावर काटा आला.. कधीचा डालो करून ठेवलाय. पण बघणं होत नव्हतं. आता हे एवढं वाचल्यावर बघेन की नाही सांगता येत नाही :)

  ReplyDelete
 2. धन्स हेरंब!!
  बघ ! बघ !! चांगला मुव्ही आहे !

  ReplyDelete
 3. लई खतरनाक मूवी आहे .
  रात्री २ वाजता माझ्या २ भावासोबत पाहिला होता.
  लिटरली फाटून हातात आली होती .
  जबरदस्त मूवी आहे .

  ReplyDelete