Saturday, August 1, 2009

पैलतीर ....४

चिन्मयने प्रियाला उचलून तिच्या रूममध्ये आणले आणि बेडवर झोपवले. मागोमाग प्रियाचे आईवडीलही आले. त्यांना बघताच चिन्मयने दरवाजा बंद केला.
" चिनु, दार उघड रे! "
"नको तू पियुला ओरडत राहशील. "
" अरे असं काय करतोस, नाही ओरडणार मी, तु दार उघड."
"प्रॉमिस ?"
" हो, नक्की, नही ओरडणार !"
" हे बघ जर तु तिला ओरडलिस ना तर तुला, तुझ्या घरात असलेल्या सगळ्या देवांची शपथ आहे."
" चिनू दार उघडतोस की नाही, अरे तिचे कपडे नको का बदलायला? " तेव्हा चिन्मयने दरवाजा उघडला. इकडेप्रिया मनातल्या मनात हसत होती.
"चिन्या, तू पण घरी जा आणि कपडे बदल, किती भिजलास तु, ह्या पोरीने नुसता जिवाला घोर लावलाय." चिन्मयजायला निघाला.
" चिनू !" प्रियाने त्याला हाक मारली.
" काय गं?" चिन्मय तिच्य जवळ गेला.
" परत लवकर ये."
" हो मी लगेचच जावून येतो.
" अँड अॅम सॉ...री ! "
" तो पहले क्यु झक मारी ?" प्रियाच्या आईचा नेहमीचा डायलॉग. प्रियाने तोंड वाकडं केलं. चिन्मय जायला निघालातर प्रियाच्या वडीलांनी त्याला थांबवलं.
" अरे, चिन्मय बिल किती झालं होतं ? " चिन्मयने न ऐकल्यासारखं केलं आणि तो तिथुन पळाला. " चिन्मय, अरे, थांब ना. हा मुलगा ना..."
इकडे चिन्मय घरी येताच, आईने सांगितल," अरे नेहाने २ वेळा फोन केला होता, तुझा मोबाईल चालु नाहीए का ?"
" अं? हं ,,, नाही काहे नाही." तो बाथरूममध्ये शिरला. पटापट फ्रेश होउन तो परत प्रियाच्या घरी जायला निघाला.
" अरे जेवून तर जा. "
" नको, प्रियाकडे खाईन काहीतरी. "
चिन्मय प्रियाच्या घरी आला आणि प्रियाच्या खोलीत शिरला. त्याला बघून प्रियाने एक छानशी स्माईल दिली.
" ओह! हीर यु गो, काय छान दिसतेस माहितए तु हसताना!"
" खरं ?"
" हमम्म, अगदी खरं ! बरं तु काही खाल्लंस का?"
"नाही मला भूक नाहीए."
" अरे असं कसं ? काकु, हिने काही खाल्लं की नाही ?"
" ती काय आमच ऐकतेय?" असं म्हणून प्रियाची आई जेवणाचं ताट ठेवून निघून गेली.
" पियु, खा ना थोडसं."
" नको रे मला भूक नाहीए. "
" अगं मी पण नाही जेवलो अजुन. "
" काय रे, तु ना अगदी मठ्ठ्च आहेस, तु का नही जेवलास ?"
" अगं, विचार केला तुझ्याबरोबरच जेवेन, पण तुल मला उपाशी ठेवायचयं ना, असु दे मग, माझी काळजीच नाहीएतुला! "
" ह्म्म, ओके, ओके, मला माहीत आहेत तुझी नाटकं, चल जेवुयात आपण. "
" ह्म्म, दॅट्स लाइक माय डॉल," प्रिया बेडवर उठून ताट घ्यायचा प्रयत्न करु लागली पण तिचा पाय ठण़कत होता.
" अगं, तु थांब, मी भरवतो तुला,"
" काही नको, मी जेवेन! "
" थांब गं! " चिन्मयने ताट घेतलं आणि त्याने एक घास तिला भरवला.
" हा घास चिउचा, "
"हा घास काउचा आणि हा घास पियुचा" असं म्हणुन शेवटचा घास प्रियाला भरवता भरवता पटकन स्वतः घेतला. दोघही जोरजोरात हसू लागले.
" हॅविंग फन गायज ??? दोघांनी ही वळून पाहीलं दरवाज्यात नेहा उभी होती.
" अरे ये ना, केव्हा आलिस तु ?"
" आत्ताच, हाय प्रिया! काय झालं ? "
चिन्मयने ताट बाजुला ठेवलं.
"काही नाही गं, पार्कात धावता धावता पडले."
" धावत कशाला होतीस ?"
" पकडापकडी... " चिन्मय.
" पकडापकडी ??? माय गॉड ! आता बरं वाटतयं?"
" हो !"
" अगं पण तुला कसं कळलं, आणि इतक्या रात्री तु ?"
" तु काय "माझा फोन "उचलत नाहीस, घरी ३-४ वेळा फोन केला, तेव्हा आईने सांगितल तु प्रियाकडे आहेसम्हणून आले.का तुला आवडलं नाही का? "
" असं तिरकस का बोलतेस ?" चिन्मय दुसरा घास प्रियाला भरवायला गेला.
" चिनु, नको रे बसं झालं. " असं म्हणत त्याचा हात थांबवला.
" ठिक आहे मग, येते मी. चल प्रिया काळजी घे."
" ओके. बाय!"
"चिन्मय, वॉक मी ?" नेहाने विचारले,
" या, व्हाय नॉट? पियु मी हिला सोडून येतो."
" रात्र इथेच काढायचा प्लॅन आहे वाटतं ????"
चिन्मयने रागाने नेहाकडे पाहिले आणि तिचा हात धरून तो तिला बाहेर घेउन गेला.
" नेहा, काय चाललंय हे?"
" हा प्रश्न मी तुला विचारायला हवा, नाही का?"
" काय?"
" चिन्मय, हे बघ तुला माहित आहे, मला काय बोलायचेय ते, मी कधी आजारी असले तर मला कधी तु बघायलातरी येतोस का रे ?"
" तुझ्या आईला आवडतं का मी तुझ्या घरी आलेलं? तिचा धर्म भ्रष्ठ होईल मी तुझ्या घराला पाय लावला तर, नाहीका?"
"हे बघ तो वेगळा प्रश्न आहे. आणि आपण ऑलरेडी ठरवलयं ना,कि काही झालं तरीही आपण लग्न करायचचं!"
" मी ही तेच म्हणतोय, पण प्रॉब्लेम कूठे आहे ?"
" चिन्मय.... तुला कसं समझावू रे? यु नो हाव मॅडली आय अॅम इन लव्ह विथ यु.." नेहा चिन्मयला बिलगली.
"सो डु आय डार्लिंग., व्हाय डोन्ट यु ट्रस्ट मी?" चिन्मय तिला जवळ घेत उत्तरला.
" इट्स नॉट द मॅटर ऑफ ट्रस्ट, बट आय जस्ट कॅन्ट सी यु विथ समवन एल्स!" नेहाचे डोळे पाणावले होते.
ते पुसत चिन्मय बोलला," पियु इज नॉट जस्ट समवन फॉर मी, यु नो दॅट. सी, आय कॅन नॉट एक्सप्लेन यु अबाउटमी अॅन्ड हर कॉझ, यु विल नेव्हर अंडरस्टँड दॅट, बट आय कॅन अश्युर यु दॅट ......"
"चल मी जाते, मला फार उशीर झालाय." नेहा जायला वळली.
चिन्मयने तिचा हाथ पकडून तिला जवळ खेचले.तिच्या कमरेभोवती दोन्ही हाथ वेढुन त्याने तिला मिठित घेतले. नेहा त्याच्या मिठीत पार विरघळून गेली. पण लगेच भानावर आली.
"चिन्मय काय करतोस, कुणी बघेल ना?"
" तुझी आई सोडुन कुणीही बघु देत ईथे मला कूणाचे भीती नाही." चिन्मय तिला अधिकच जवळ घेत बोलला.नेहाखुद्कन हसली.
" सोड ना रे, जावू दे न मला. "
" हम्म, नाही सोडणार. "
"प्लिज, सोड ना रे, "
" नाही."
नाही, हो, नाही करता करता चिन्मयने तिचा तो चंद्रालाही लाजवेल असा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत भरूनघेतला. नेहा स्तब्धपणे त्याला पाहत होती. एखाद्या मुर्तीसारखी. चिन्मयने हळुहळु तिचा चेहरा जवळ घेतला आणिपुढच्या काही सेकंदात दोघांचेही ओठ बंदिस्त झाले होते....
" वॉव! ईट्स हेवन."
"चल चावट कुठला! " नेहा त्याच्यापासून दूर होत बोलली.
चल ना, मला घरी सोड ना." " ओके. चल. "
चिन्मय नेहाला घरापर्यंत सोडुन आला. आणि प्रियाला गुड नाईट टेक्स्ट करून आपल्य घरी गेला.....


क्रमशः

3 comments:

  1. :( aataatari sampel asa vatala hota...
    lavkar taka pudhcha bhaag

    ReplyDelete
  2. Actually, mala pan lavkarch sampavaayachee aahe, pan pudhe dhad kaahi suchat nahi ga! baghu pudhachyaa bhaagat sampvoon taakin.

    By the way thanks for your support......

    regards
    Deepak Parulekar

    ReplyDelete
  3. Deepu hey assa kitti diwas chalnaar re....kar na baba aata tari conclude hyala....kaay mantos ankhi kasa aahes tu....hmmmmmm....

    ReplyDelete