Saturday, August 1, 2009

पैलतीर .....३

काही क्षण असे असतात की त्यांना फेस करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.गुदमरत्,मनाची घुसमट होत असताना देखिल ते सर्व आपल्याला फेस करावं लागतं. कदाचित ही एक शिक्षाच असावी. पण नेहाचं नशीब तितकं थोर नव्हतं. तिने जे काही केलं होतं त्या गोष्टीच्या गंभीरतेची तिला कधीच जणिव झाली नव्हती. पण आता त्याची सुरुवात झाली होती. नेहा आणि चिन्मयची ओळख प्रियाच्या थ्रु झाली होती. प्रिया चिन्मयची अगदी शाळेपासुनची मैत्रीण होती. दोघांची मैत्री इतकी क्लोझ होती कि त्यांच्या ग्रुपमधल्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना ते दोघं एकमेकांसाठीच आहेत असं वाटायचं.पण प्रिया आणि चिन्मय या दोघांच्या मनात एकमेकांविषयी निखळ मैत्रीशिवाय काहीही नव्हतं. त्या दोघांनी या सगळ्यांचा कधी विचारही केला नव्हता. एकदा शिवाजी पार्कात प्रियाबरोबर भटकताना नेहाने चिन्मयला पाहिलं आणि बघताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडली.पहिल्यांदा तिला वाटलं की प्रिया चिन्मयची गर्लफ्रेंड आहे पण प्रियाशी मैत्री केल्यावर तिला सत्य कळलं आणि तिने प्रियाला चिन्मयबद्दलच्या आपल्या फीलिंग्ज सांगितल्या. प्रियानेही तिला प्रॉमिस केलं की ती चिन्मशी तिची ओळ्ख करून देइल.एकदा नेहाने प्रियाला संध्याकाळी पार्कात यायला सांगितले आणि त्याच वेळी चिन्मयशी तिची ओळ्ख करून देवून ती पसार झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि साहजिकच जसं सगळ्यांचं होतं दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण एक होतं प्रिया आणि चिन्मयच्या मैत्रीत त्यामुळे कधीही फरक किंवा फूट नाही पडली. तो तासंतास प्रियाला नेहाबद्दल,त्यांच्या भेटीबद्दल पकवत बसायचा आणि नेहाही प्रिया भेटल्यावर तेच सांगत बसायची.पण प्रिया कधीही बोर होत नसे. पण नेहा आणि चिन्मयला नेहमी एकमेकांना प्रियाच्या थ्रुच भेटावे लागे कारण नेहाच्या घरच्यांना चिन्मय कधीच आवडला नाही. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे चिन्मय हा नवबौद्ध म्हणजे नेहाच्या घरच्यांच्या मते खालच्या जातीतला होता. पण दोघांना त्याची पर्वा नव्हती. त्यांनी ठरवलं होतं की काही झालं तरी आपण एकमेकांशीच लग्न करायचं. चिन्मय त्यावेळी नुकताच एका कंपनीत सेल्स इंजीनिअर म्हणून नोकरीला लागला होता. आणि नेहाही एका कंपनीत नोकरी करत होती. दोघांचं प्रेम तेव्हा ऐन भरात होतं आता भेटण्यासाठी त्यांना प्रियाची गरज नव्हती. ते बिन्धास्त भटकत राहायचे.एकदिवस एकमेकांचा नुसता आवाज नाही ऐकला तर त्यांना करमत नसे. त्यांच्यामधे आता कसलिही अंतरे राहिली नव्हती. प्रेमामध्ये जेव्हा शब्द संपतात तेव्हा देह बोलु लागतात. दे वेर एन्जॉइंग देअर लाइफ विदाउट वेस्टींग अ सिंगल मोमेंट दे हॅविंग.
पण नेहमी आपल्याला जसं हवं तस (प्रेमात) कधिच मिळत नाही हा माझा तरी पर्सनल अनुभव आहे. जेव्हा जेव्हा नेहा चिन्मयला भेटायला जायची प्रिया चिन्मयबरोबरच असायची, कारण प्रियानेही चिन्मयचीच कंपनी जॉइन केली होती अर्थात चिन्मयनेच तिला त्याच्या कंपनीत घेतले होते. म्हणजे ऑफीसमध्ये जाताना आणि घरी जाताना प्रिया नेहमी चिन्मय्सोबत असायची. कधी मुव्हीला जायचं असेल तर चिन्मय नेहमी तीन ति़किट्स घ्यायचा. शॉपिंग पासून ते फिरण्यापर्यंत प्रिया चिन्मयसोबत असायची. या सगळ्यांमुळे नेहा फार वैतगायची. एक दोन वेळा नेहाने चिन्मयला बोलूनसुद्धा दाखवलं पण चिन्मयने तिची समजूत घातली. नेहाची होणारी तगमग प्रियाच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. तीने चिन्मयला या बाबत समजावलं आणि बाजुला झाली. एकदा चिन्मय आणि प्रिया नेहमीप्रमाणे पार्कात भटकत होते. अर्थात दोघेही नेहाबद्दलच बोलत होते. प्रियाने चिन्मयला समजावलं की नेहाला आपल्या दोघांच्या मैत्रीमुळे फार त्रास होतोय. त्यामुळे आपण वेगळेच झालेले बरे. चिन्मयलाही ते पटलं होतं पण प्रियाची मैत्री तो तोडु शकत नव्हता. पण दोघांनीही ठरव्लं की आपण नेहमीसारखं भेटायच नाही वैगरे वैगरे.. ती दोघं पार्कात फिरत असताना अचानक पाउस भरून आला आणि दोघेही पार भिजून गेले. त्यांच घर काही लांब नव्हतं पण पाउस उसंत घेतच नव्हता.कसेबसे धावत धावत ते पार्काच्या कडेला असलेल्या झाडाच्या अडोश्याला येवून उभे राहीले. दोघेही चिंब भिजून गेले होते. प्रिया तर थंडीने कुड्कुडत होती. चिन्मयने रुमाल काढला आणि तो प्रियाचे डोके पुसु लागला. त्याला माहीत होतं की प्रियाला पावसात लगेचच सर्दी होते.डोके पुसता पुसता प्रिया मस्ती करत पावसाचे पाणी चिन्मयवर उडवत होती. पाउस इतका जोरात पडत होता की प्रियाला भिजण्याचा मोह आवरता नाही आला ती झाडाखालून निघून पार्कात धावू लागली आणि चिन्मय तिच्या मागे. चिन्मय तिला सर्दी होईल म्हणून भिजू नको असं सांगत होता पण प्रिया अगदी फूल मूड्मध्ये होती तिला तो पाउस हवाहवासा वाटत होता. प्रिया एखाद्या लहान मुलासारखी त्या पवसात भिजत धावत होती आणि चिन्मय तिला पकडायला तिच्या मागून धावत होता. त्या पावसात दोघेही एकदम पुन्हा लहान झाले होते. अचानक धावता धावता प्रिया एका दगडाला आपटून पडली. तिचा पाय चांगलाच मुरगळला. चिन्मय लगेच तिच्याकडे गेला. प्रिया पाय दुखावल्यामुळे अक्षरशः ओरडू लागली. चिन्मयने तिला उठवलं पण पाय मुरगळल्यामुळे तिला उभंही राहता येतं नव्हतं.प्रिया आता दुखणं असह्य झाल्याने रडायलाच लागली. चिन्मयला तिला रडताना पाहवलं नाही.
"खूप दुखतयं का गं पियु ?"
" हम्म्म.." हुंदके देत देत प्रिया....
"कुणी सांगितलं होतं तुला धावायल?" चिन्मय तिच्यावर ओरडला, त्याने ती अजुनच रडु लागली. चिन्मयला ते पाहवलं नाही. त्याने प्रियाला दोन्ही हातानी उचललं आणि तो चालु लागला. पाउस अजुनही कोसळतच होता आणि प्रियाच्या डोळ्यातुनही संततधार सुरु होती. तिने चिन्मयला दोन्ही हातानी वेढून घट्ट पकडलं होतं. चिन्मय तिला शांत शांत करायचा प्रयत्न करत होता पण प्रियाचा पाय अजुनही ठणकत होता. चिन्मय तिला उचलून घेउन रस्त्यावर जिथे बाईक होती तिथपर्यंत आला. तो चालत असताना तिथुन पास होताना नेहाच्या आईने त्याला पाहिलं.त्याने ही तिला पाहिलं पण तिच्याकडे दुर्लक्ष करुन तो प्रियाला बाईकपर्यंत घेउन आला. त्याच्याच बिल्डींगमधल्या साने काकु तिथुन जात होत्या. त्यांना पाहुन चिन्मयने प्रियाच्या घरी निरोप द्यायला सांगितले आणि प्रियाच्या घरच्यानां हिंदुजा हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले. साने काकु लगबगीने निघुन गेल्या. चिन्मयने बाईकला किक मारली आणि तो सुसाट निघाला. प्रिया त्याला घट्ट पकडून होती. हॉस्पिटलला पोहोचल्याअवर त्यने प्रियाला उचलून एमरजंसी वार्डमधे नेले.नर्सनी तिला बेड्वर झोपवले आणि तिचा पाय तपासू लगले. पाय चांगलाच मुरगळला होता. तिच्या पायला नर्सने हात जरी लावला तरी ती व्हिवळत होती. चिन्मयला ते पाहवत नव्हतं.आज पहिल्यांदा तो प्रियाला इतकं रडताना, आणि व्हिवळताना पाहत होता. इतक्यात चिन्मयचा फोन वाजला. नेहाचा होता.चिन्मयने तो लगेच कट केला. आणि पहिलं तर ८ मिस्ड कॉल आणि २ एसएमएस डिस्प्ले होत होते. नंतर त्याच्या लक्षात आलं की आज नेहाला भेटायला जायच होतं पण प्रियाच्या त्या परिस्थितीसमोर त्याला काही सुचत नव्हतं. नेहाचा फोन त्याने कधीही कट केला नव्हता. अगदीच एखाद्या मिटिंगमध्ये असला तर तो तिला एसएमएस करायचा. इकडे नेहा त्याची वाट बघून वैतागली होती. काय करावे ते तिला कळत नव्हतं. वैतागून ती घरी गेली. घरात पाय ठेवताच तिच्या आईने तिला चिन्मयला प्रियाला उचलून घेवून जाताना पाहिल्याच सांगितलं. त्यामुळे नेहा आता चांगलीच भडकली. ती वारंवार चिन्मयला फोन करत होती पण चिन्मय फोन उचलत नव्हता. शेवटी वैतागून चिन्मयने तिला फोने केला,
" हां नेहा !"
" अरे कूठे आहेस तू? कितीवेळ झाला तुला फोन करतेय, तुला फोन अ‍ॅन्सर नाही करता येत का?"
" अगं माझं थोडं ऐक, "
" एक तास झाला मी वेड्यासारखी तुझी वाट बघतेय आणि तु....., काय झालं काय तुला?, असा का वगतोय तु माझ्याशी?, "
"नेहा, प्लीज माझं ऐक, इकडे प्रिया ...."
" हो मला माहित आहे तु त्या प्रियाबरोबरच असशील..., तिला काय चालता येत नाही का? तुला तिला उचलून घ्यायची काय गरज होती .....?
एव्हाना चिन्मयच्या लक्षात आलं की नेहाच्या आईने त्याला पाहिलं होत..
" हे बघ नेहा तु ऐकणार आहेस का माझं?"
" काय, ऐकू तुझं?मला काहिएक ऐकायच नाहीय, " :
"ओके देन, डोन्ट कॉल मी अगेन" असं न्हणून रागाच्य भरात चिन्मयने फोन कट केला. आणि तो परत प्रियाकडे गेला. प्रिया अजुनही रडतच होती. इतक्यात प्रियाचे आणि चिन्मयचे आई वडील हॉस्पिटले मध्ये आले. प्रिया आईला बघून अजुनच रडू लागली.
" काय झालं रे चिनू? तुम्ही बाईकवरून पडलात का?"
" नाही गं काकु, पावसात हिला पकडापकडी खेळायची हौस आली आणि दगडाला आपटून पडली."
" लहान आहेस का गं तु अजून ? अक्क्ल आहे की नाही ? दिवसे दिवस अगदी लहान होत चाललीए घोडी!" प्रियाची आई कडाडली.
चिन्मयने त्याच्या आईला तीला बाहेर घेवून जायला सांगितले. डॉक्टरानीं तिच्या पायाच्या एक्स रे काढला.
" हाडं थोडसं दुखावलयं, ठिक होईल पण २ महीने पुर्णतः बेडरेस्ट !" डॉक्टरने बजावलं.
त्यानंतर तिच्या पायाला प्लॅस्टर घालण्यात आलं. तिच दुखणं आता थांबल होतं. डॉक्टरानीं काही औषधं लिहुन देवून तिला घरी घेवून जायला संगितले. चिन्मयने काउंटर्वर जावून पैसे भरले आणि प्रियाला टॅक्सीमध्ये बसवलं. एकडे प्रियाच्या आईची बडबड चालूच होती." चिनू तु ना तिचे लाड करून ठेवलेस. त्यामुळे ती इतकी शेफारलीय, काय ह्या मुलीला कळतं का नाही, आता लग्नाला आली ही आणि नको ती थेरं."
" काकु तु गप गं, ए ममा तुन्ही दुसरी टॅक्सी करून या." असं म्हणून चिन्मयने टॅक्सी घराच्या दिशेने घेतली. प्रिया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. " आता बरं वाटतयं का? "
" हम्म" असं म्हणून प्रिया पुन्हा रडू लागली.
" गप गं पियु, किती रडशील? मी आहे ना! " चिन्मयने तिला जवळ घेतलं.
" तुला नेहाला भेटायला जायचं होतं ना आज ?, माझ्यामुळे...."
" मग मी तुला असं सोडून जाऊ का?"
" जायचं होतं ना, तिला बिचारीला किती वाईट वाटलं असेल ?"
" काही नाही, तिचा फोन आलेला, मी तिला सगळं सांगितलं, उद्या भेटेन मी तिला. तु आता शांत हो, आणि पडून राहा." 

क्रमशः

2 comments: