Wednesday, July 29, 2009

पैलतीर .....२

इतकावेळ नेहा गप्पच होती.तिला गप्प पाहुन राहुल बोलला," आर यु ऑलराइट ?, काही बोलत का नाहीस ?"
" नाही रे, मी ठीक आहे." नेहा शक्य तितक्या हळू आवाजात बोलत होती.
" किती भिजलीस तु, डोकं पुसून घे."
" हो, अरे पण टॉवेल बॅगमध्ये आहे ना."
राहुल ने आपल्या खिशातुन आधिच भिजलेला रुमाल काढला. " हे घे. याने पुस "
" अरे हा आधिच भिजलेला आहे "
त्या दोघांच्या संभाषणाला तोडत त्या युवकाने, त्याच्या बाजुच्या सिटवर असलेल्या त्याच्या हँड्बॅगमधुन एक छोटे टॉवेल बाहेर काढले आणि मागे न बघता त्या दोघांसमोर धरले " यु कॅन युज धिस वन, अँड डोन्ट् वरी इट्स अ न्यु वन !"
राहुल ने थँक्स म्हणुन ते टॉवेल घेतले आणि नेहाला दिले. इतक्यात समोरून येणार्‍या एका गाडीचे प्रखर हेड्लाईट्स त्या युवकाच्या चेहर्‍यावर पडले आणि गाडित असलेल्या मिररमधे चिन्मयचा चेहरा तिला दिसला. त्याने समोरच्या डॅशबोर्डवरचं सिगरेट्च पाकिट उचललं आणि राहुलला ऑफर केली, राहुल ने थँक्स म्हणुन ती नाकारली.
" आय होप, तुम्हाला त्रास तर नाही ना होणार?"
" नाही नाही, तसं काही नाही, पण नेहाला थोडंसं......" राहुल पुढे काही बोलणार इतक्यात चिन्मयने ते पा़किट परत डॅशबोर्ड्वर फेकले.
" अरे नाही मि. चिन्मय यु प्लिज कॅरी ऑन"
" नो इट्स ऑलराइट!" असं म्हणून त्याने गिअर चेंज केला आणि गाडी वेगाने पळु लागली. आता गाडी कसारा घाटात होती.राहुलने परत बोलायला सुरुवत केली
" गाडी छान आहे तुमची"
"ओह! थँक्स ! "
" तुम्ही मर्सिडीज बेंझ मध्ये काम करता आणि गाडी ऑडी ?"
" अ‍ॅक्चुअली, माझी आवडती गाडी आहे,"
"ओके. बरीच महाग असेल ना?"
" हो ४०-५० पर्यंत जाते. "
राहुलने आवंढा गिळला त्याला लगेच त्याची सँट्रो डोळ्यासमोर दिसली. त्यादोघांचं संभाषण सुरु होतं आणि इकडे नेहा शांतपणे बसून ऐकत होती. चिन्मय असा अचानकपणे समोर आल्याने ती बावरली होती. पण राहुल सोबत असल्याने ती काही बोलत नव्हती. पण राहुन राहुन तिला भिती वाटत होती की जर चिन्मयने आपल्याला कही विचारलं तर? पण ती शक्यता कमी होती. चिन्मय शांतपणे ड्राईव्ह करत होता.त्याने आतापर्यंत एकदाही समोरच्या मिररमधे मला पाहील किंवा तसा प्रयत्नही केला नव्हता. त्याच्या मनात आता काय चाललं असेल? त्याला वाटत असेल का माझ्याशी बोलावसं? आता बाहेर पाउसही थांबला होता आणि घाटही.
" यु गायज आर हंग्री?"
" हो, भूक तर लागलीच आहे. विचार केला की घरी जाउनच जेवायच, तुम्ही म्हणत असाल तर खाउया काही तरी, नेहा, ?" राहुलने नेहालाही शेवटी विचारले.
" नाही तुम्ही खाउन घ्या, मी गाडीतच थांबते, मला झोप येतेय." नेहा टाळायचा प्रयत्न करत होती.
बोलता बोलता चिन्मयने गाडी हायवेच्या बाजुला असणार्‍या एका ढाब्याजवळ नेउन थांबवलीसुद्धा।गाडी बंद केली, सिगरेटच पाकिट घेतलं आणि तो गाडीच्या बाहेर पडला. बाहेर येवून त्याने सिगरेट पेटवली आणि गाडीला टेकून तो सिगरेट ओढू लागला.इतक्यात त्याच्या बाजुच्या दरवाजा उघडला आणि नेहा बाहेर आली. जिन्स, टॉप आणि डेनीम जॅकेट, केस विस्कटलेले. फार छान दिसत होती. चिन्मयने तिच्याकडे पाहिलं आणि तो पूढे आला. नेहा जागिच उभी राहीली. चिन्मय तिच्याकडे गेला ती थोडीशी बाजुला झाली. चिन्मयने तिच्याकडे न पाहता, गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडे लॉक करुन तो ढाब्याच्या दिशेने चालू लागला.वॉश बेसीनवर तोंड धुवून तो एका टेबलवर येवून बसला. राहुलही त्याच्यामागोमाग येवून समोर बसला.
" नेहा फ्रेश व्हायला गेलीय." न विचारताच राहुल बोलला.
इकडे नेहाला काय करावे तेच सुचत नव्हते. ती कशीबशी फ्रेश झाली अणि राहुलच्या बाजुला येवून बसली.
" ओके. काय खाणार ?"
" काहीही !"
" ओके, अरे तिन प्लेट 'काहीही' घेउन ये !" चिन्मयने बाजुला उभ्या असलेल्या वेटरला ऑर्डर केली.यावर त्या वेटर सकट सगळे हसायला लागले. जेवण आटोपल्यावर ते परत जायला निघाले. नेहाने एक गोष्ट नोट केली की चिन्मय तिच्याकडे अजिबात बघत नव्हता. बिल आल्यावर राहुलने ते घेतले.
" आय्'ल पे."
" नो युज मि. केळकर तो तुमच्याकडुन पैसे नाही घेणार. हा, जर तुम्हाला ते बिल आपल्या भेटीची आठवण म्हणून ठेवायच असेल तर तुम्ही खुशाल ठेवू शकता." राहुल फक्त हसला. चिन्मयने बिल पेड केले आणि गाडीच्या दिशेने चालता चालता सिगरेट पेटवली.........


क्रमश:

Monday, July 27, 2009

पैलतीर.... १

रात्रीचे बारा वाजायला आले होते. राहुल हाय वेवर केव्हापासुन मुंबईकडे जाणार्या गाड्यांकडे लिफ्ट मागत उभाहोता. कुणीही गाडी थांबवत नव्हतं. '
"शी ! लोक ईतके निष्ठुर कसे असू शकतात?'' ह्या गाडीला ही आताच बंद पडायचं होतं.
बाहेर पाउस तर नुसता माजलाय. बिचारा राहुल! केव्हापासुन लिफ्ट्साठी पावसात भिजत उभा आहे."
एक ना अनेक नेहाच्या मनात विचार येवू लागले. काय करवे ते सुचत नव्ह्ते. पाउस तर थांबायचे नावच घेतनव्हता. पावसामुळे सेल फोनचं नेट्वर्कही काम करत नव्हतं आता पोटात कावळे ओरडू लागले होते. ती गाडीच्या विंडोजवळ आली आणि राहुलला हा़क मारली."राहुल, काय झालं ? कुणी थांबत नाहीए का?"
राहुल, " नाही गं, मी काही तरी करतो. बघु कोणी तरी थांबेल.! "
ती दोघं बोलतं होती अचानक एक ऑडी क्यु ७ राहुलच्या बाजुला येवून थांबली. काच हळुहळु खाली आली. ड्रायव्हरच्या सिट्वर एक ३० -32 वर्षांचा युवक होता.
" एनी प्रॉब्लेम ?" त्याने विचारलं?
"अॅक्चुअली, माय कार ...." राहुल पुढचं काही बोलणार ईतक्यात तो युवक बोलला " नीड लिफ्ट?"
राहुलला क्षणाचाही विलंब न करता उत्तरला, "थँक्स सो मच, बट माय वाईफ इज देअर विथ मी ऑल्सो !"
तो युवक हसला " सर, देअर इज एनफ प्लेस इन माय कार, अँड अॅज यु कॅन सी, आय अॅम अलोन, सो नो प्रॉब्लेमो‍‍ !"
राहुलला देवच भेटल्यासारखं वाटलं. नेहाने एव्हाना तिच्या कारचा दरवाजा ओपन केला आणि बाहेर पडली. राहुलनेही कारमधुन दोन हँडबॅग्ज काढल्या. पावूस तर अक्ष:रश झोडपून होता. नेहा कारमधून बाहेर पडेपर्यंतभिजली. ती गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये शिरणार इतक्यात तो युवक ओरडला, 'मॅम, प्लीज स्टॉप, यु आरवेट ! " राहुलही दचकला. नेहाला तो आवाज थोडा ओळ्खीचा वाटला पण तिने दुर्लक्ष केलं. राहुल बॅग्ज मागे ठेवूनत्या युवकाच्या इथे आला," एनीथिंग राँग सर ? व्हाट हॅपन्ड ?"
"नथिंग, अॅक्चुअली, यु बोथ आर डॅम वेट, आय वॉज वरीड अबाउट दा सिट्स ऑफ माय कार, इट्स, लेदर, यु नो ? बट डोन्ट वरी देअर इज अ प्लॅस्टीक कव्हर, वि कॅन पुट ऑन !"
असं म्हणून त्या युवकाने सिट्च्या खालून प्लॅस्टिक कव्हर काढले आणि मागच्या सिट्स झाकून घेतल्या. " आयअॅम सॉरी, अॅम डुईन धीस, होप यू वोन्ट माईंड इट!" ‍‍
" नो, नो डेफिनिट्ली नॉट" असं म्हणून राहुल आणि नेहा मागच्या सिट्वर विसावली.गाडी सुरु झाली आणि तेमुंबईच्या दिशेने धावू लागले. गाडी खरोखरचं एकदम आलिशान होती.गाडी केव्हा सुरू होउन धावू लागली हे त्यादोघांना कळलंही नाही. पाच मिनिटं झाली, कुणीच काही बोलतं नव्हतं. " ओह! आय अॅम सॉरी, माय नेम इजराहुल, राहुल केळकर, अँड शी इज माय वाईफ, नेहा." राहुलने सुरुवात केली.
" ओह नाईस टु मीट यू गाइज !"
परत शांतता..
" सर, यु आर......" राहुल काही बोलणार इतक्यात तो युवक भानावर आला " ओह अॅम सो सॉरी,आय डीन्टइनट्रोड्युस मायसेल्फ, बाय दा वे अॅम चिन्मय , चिन्मय जाधव!" ‍ ‍
"ओह ! नाएस टु सी यु सर! म्हण्जे तुम्ही मराठीच तर ! "
इतक्यात नेहाचे डोळे चमकले !
"हो मी मराठीच !"
ती त्या युवकाचा चेहरा पाहण्याची धड्पड करू लागली. एव्हाना त्या युवकाच्या आवाजावरून आणि नावावरूनतिची खात्री पटली कि, हो, हा तिचाच चिन्मय !
नेहाला कय करावे ते सुचत नव्हते. त्याने आपल्याला पाहिले तर नसेल ? मला ओळखले तर नसेल ? मी कशी फेसकरू त्याला? त्याने काही विचारलं तर काय उत्तर देवू? आज ३-४ वर्षांनी तो असा अनपेक्षितपणे समोर आला होता. किती दिवस झाले त्याचा आवाज ऐकून ! आपण तर त्याला कधीच विसरून गेलो होतो. खरचं मी त्याला विसरलेहोते का? नाही मी त्याला कधीच विसरू शकत नाही. तो मनाच्या कुठल्या तरी एका खोल दरीत शांतपणे निजलाहोता. आणि आज अचानक अनाहुतपणे समोर आला. थोडा जाड झालाय.आणि कदाचित श्रीमंत ही! ऑडीचालवतोय. त्याचीच आहे की आणखी कुणाची ? ऑडी तर त्याची ड्रीम कार होती. रस्त्यावरून चालताना एखादीऑडी दिसली की ती नजरेआड होई पर्यंत बघत राहायचा. मग मी त्याच्यावर लटके रागवायची, "तु, ना त्याऑडीशीच लग्न कर. इतकी सुंदर मुलगी सोबत असताना त्या गाडीकडे काय बघत असतो नेहमी?"
तेव्हा एक छानशी स्माईल द्यायचा आणि म्हणायचा, "घाबरू नकोस मी तुम्हा दोघींशी लग्न करणार"
" अस्स, म्हण्जे ती गाडी आयुष्यभर मला सवत म्हणून झेलावी लागणार तर !"
" झेलशील ना माझ्यासाठी, जान !"
" हो, का नाही ? तुला झेलतेच आहे, मग तिला का नाही झेलणार ? "
" सो स्विट, यु आर माय डार्लिंग !"
" इज, इट ? पण त्या बदल्यात मला काय मिळेल? "
"तु मागशील."
" बघ हा, मग पलटायच नाही "
" नाही, तु मागून तर बघ !"
" ऑके, वेळ आल्यावर नक्की मागेन!"
त्या सर्व आठवणी नेहाच्या डोळ्यासमोर नाचू लागल्या.
" हाय जान!, कशी आहेस ?" नेहाला वाटलं त्याने तिलाच हाक मारली. मग तिला कळलं कि तो फोनवरबोलतोय. समोर बहुदा त्याची गर्लफ्रेंड असावी किंवा बायको तरी., नेहा तर्क लढवित होती.
" नो, नो डोंट वरी ! अॅम फाइन. तु कळजी करू नकोस, मी तासा - दिड तासात पोहचेन, आय जस्ट क्रॉस्डइगतपुरी"
अरे बापरे आपण इतक्या लवकर पोहचलो.
"आणि हे बघ तु माझी वाट पाहत उपाशी नको राहुस, काही तरी खावून घे.ओके? हो गं राणी मी ठिक आहे. चल मगमुंबईला पोहचल्यावर फोन करतो. लव्ह यु अँड मिसिंग यु सो मच, बाय !"
फोन झाल्यवर तो युवक बोलला, " अरे, पण तुम्ही कूठे जाणार ते नाही बोललात ?"
राहुल," अरे हो, मी दादरला राहतो, शिवाजी पार्क. तुम्ही आम्हाला ठाण्यापर्यंत सोडलं तरी चालेल !"
" अरे , नो प्रोब्लेम, मी प्रभादेवीला राहतो, तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडुन मग मी जाईन."
" थँक यु सो मच "
" माय प्लेझर "
" तुम्ही मॅरीड आहात ? "
" हम्म! हो, का? "
" नाही सहज विचारलं, तुमची पत्नी तुमची काळजी करत असेल ना !"
" हो, ते रोजचचं आहे, खरं तर मलाच तिची फार काळजी वाटतेय"
" का?"
" शी इज प्रेग्नंट! सातवा महीना सुरु आहे, पण ती एक दोन दिवस घरा बाहेर असलो की ती फार घाबरते "
" ओह! काँग्रॅट्स !यु हॅव टु बी विथ हर दीज डेज, घरी तुम्ही दोघंच असता का? "
"थँक्स ! नाही, आई - बाबा आहेत ना! , मला ही वाटतं तिला सोडुन जावू नये, बट धीस जॉब आय्'ल टेल यु !"
" काय करता आपण " " ओह, अॅम जनरल मॅनेजर ऑफ........,
तो बोलत होता आणि इकडे नेहावर एकामागुन एक बाँब पडत होते...

क्रमशः