Wednesday, May 27, 2009

दोन प्रसंग !!

एकदा एक मुलगा एका पुस्तकाच्या दुकानापाशी उभा होता. बराच वेळ तो फक्त पुस्तके चाळत होता.

हे पुस्तक कसले? ह्या पुस्तकाचा लेखक कोण? असे नाना प्रश्न तो दुकानदाराला विचारत होता.त्याच्या एकन्दर परिस्थीतीवरुन तो फार गरिब वाटत होता. पुस्तके विकत घेण्याइतके त्याच्याकडे पैसे नसावेत, म्हणून तो पुस्तके चाळ्ण्याचा बहाण्याने पुस्तक वाचुन सम्पवण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या ह्या वागण्याने दुकानदार वैतागला; आणि दोन शिव्या हासडून त्याने त्या मुलाला तिथून पळवून लावले. हिरमुसून तो मुलगा तिथुन नीघुन गेला.

जाता जाता त्याच्या मनात आले, ''किती बरे झाले असते जर मला वाचताच आले नसते!''.

एकदा एक गरिब मुलगा एका हॉटेल समोर ऊभा होता.

अतिशय खंगलेला, उपाशी !!

खूप वेळ तो दुकानात असलेल्या पदार्थांकडे तो अधाशीपणे बघत ऊभा होता. त्याच्यावरून असं वाटत होतं कि तो बरयाच दिवसापासून उपाशी असावा. त्याला बघून हॉटेलच्या मालकाचे डोके फिरले, त्याने त्याला दोन शिव्या घालून तिथून हुसकावून लावले.

तो मुलगा तिथून निघून गेला.

जाता जाता त्याच्या मनात आले, ''किती बरं झालं असतं, जर मला भूकच लागली नसती!!!!

No comments:

Post a Comment